२०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता..
पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि
आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे,
असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे. आपले आपले कॅरियर वाहने घेउन यावं आणि तिळ्गुळ घेउन जावा.
चिरंजीवांनी त्यांच्या साईट्वरुन खास पोक्ल्न मागवल आहे त्यासाठी.
आपले वाहन उपलब्ध नसल्यास आमचे कडुन तिळगुळ घरपोच करण्याची व्यवस्था केली जाउ शकेल, ही सोय देखिल चिरंजिवांच्याच सॉज्यनाने.
काल आमच्या सॉ. नी भाकरी भाजी चा बेत केला होता, तर आज आमच्या मासाहेबांनी आज शेंगागुळाच्या पोळ्या केल्या होत्या. हो आता होत्याच, फोटो सकाळी आठचे आहेत आणि साडेनउ पर्यंत ब-याच पोळ्या संपल्या आहेत. हे फोटो पण फार घाईत काढले आहेत.
आज आमच्या कडच्या माहेरवाशीणी पण होत्या ना क्मापिटिशिन्ला. फोटो पहा आणि मज्जा करा.
पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा व हे वर्ष आपणा सर्वांना अर्थपुर्ण, आरोग्यपुर्ण व आनंदाचे जावो ही सुर्य नारायणाच्या चरणि प्रार्थना.
1 comments:
Nice sharee
Post a Comment