Thursday, December 2, 2010

जगणे म्हणजे खाणे - मु. पुणे. - ०१

नमस्कार आणि  अतिशय  धन्यवाद आपणा सर्वांना.
काल माझ्या ब्लॉग पहाणा-यांची  संख्या १००० ओलांडून गेली. हां फार मोठा भाग नाही पण मी जे काही लिहिले  ते इतक्या लोकानी वाचल याचा आनंद आहे. या पुढेही मी असेच लिहित राहेन आपण वाचत राहावे ही नम्र विनंती. 


या निमित्ताने माझ्या गा आणि खा पैकी खा वर आज लिहितोय. 
पुणे हे माझ्यासारख्या खाणा-यांचे शहर म्हणून प्रसिद्द आहेच, या  मालिकेत मी काही माझ्या आवडत्या होटल्स बद्दल लिहिणार आहे. मानून मालिकेचे नाव आहे जगणे म्हणजे खाणे - मु. पुणे. - ०१ 


काही व्याखा - खर्च - हां नेहमी दोन व्यक्तींसाठीच असेल आणि तो सुद्धा पोटभर म्हणजे  खुर्चीतून उठायला अंमल जड़ होइल एवढे ( डायेट मात्रा गुणिले 3 (किमान))  
नाश्ता- न्याहारी व चहा / कोफी 


तर मंडळी आजचं होटल आहे - सदर्न स्पाइसेस -
पत्ता - होटल आनंद कर्वे रोड च्या लेन मध्ये - शारदा सेंटर कड़े जाताना डावीकडे. 
प्रकार - प्युअर  व्हेज.   ---  वेळ - सकाळी ७ ते रात्रि ११ पर्यन्त. 
खाण्याचे प्रकार - नाश्ता व जेवण दोन्ही.  ---  मालक - श्री प्रसाद (माझ्या माहिती प्रमाणे)
खर्च - नाश्ता - रु ६० व जेवण रु १३०.
तर या तांत्रिक माहिती नंतर मुख्य विषयाकडे येवू,


ही जागा होटल पेक्षा ही मेस जास्त आहे. मुख्य मेनू  राईस प्लेट आणि ती सुद्धा फक्त राईस प्लेटच, उगाच ग्राहकांची मागणी म्हणून १/२ एमएम पेक्षा पातळ दोन चपाती वगेरे नाटक नाहित. आतल्या काउंटर वर पेसे देऊन कूपन घेतली की मोकळ्या टेबल मागच्या खुर्चीवर जाउन बसले की ५-६ कप्पे असलेली ताटं समोर येतात. त्यांत चटणी,भाजी, दाळ, दही वाटी व बोब्बी, म्हणजे फिंगर्स वाढले जातात. तो पर्यन्त आपण आजुबाजुला  पाहतो, इतर  गिर्हाईक बहुतेक आंध्रचे आणि बहुतेक टेक महिंद्रा वाले.  (मला पहिल्यांदा हे त्यांचेच केंटिन वाटले होते.)  तेवढ्यात वाढपी एका मोठ्या टोपल्यातुन घेउन छोट्या टोपल्याने भात वाढतो आणि त्यानंतर दूसरा त्यावर सांबार किंवा रस्सम. हवे असेल तर हे दोन्ही वाटीत पण मिळेल पण भाताच्या मानाने त्या खुपच छोट्या आहेत, अगदी आनंद / सुयोग वगेरे कार्यालयात श्रीखंड किंवा बासुन्दिला देतात ना तेवढ्याच. असो एखादा पक्का पुणेरी श्री.कोवेगे ना सांगुन मला पुण्याबाहेर काढायचा( आणि माझ्या कंपनीला माझी फार गरज आहे हो, दया करा तिच्यावर). आता चमचा वगेरे विसरा व हाताने तो भात कालवा आणि सुरु करा, चव अगदी  सेम तू सेम आंध्रा जेवणाची.  सांबाराचे कोतुक करे पर्यंतच भात संपला तर पुन्हा घ्या आणि यावेळी  रस्सम घ्या. याची ही चव भन्नाट आहे. जोडीला हिरव्या टोमिटोची लाल काळी चटणी, वांगे किंवा कोबीची भाजी व दही. पण दही आत्ताच न खाता शेवटी मद्राशी पद्धतीने पुन्हा भात घेउन त्यात दही व वरून थोड़े पाणी घालून ताक भात खाऊन बघा, त्यात थोड़ी पुड चटणी घाला एका अतिशय सुन्दर जेवणाची तेवढीच सुन्दर सांगता. 


इथल्या नाश्य्त्याबद्दल पुढच्या भागांत.
आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा.


हर्षद 

2 comments:

Anonymous said...

me tikade aale kee hyaveli aapan tithe nakki javuya! mala aattach bhuk lagalee.
mastach!

harshad said...

yaa lagech yaa aapale pot bharun swagat aahe.

Post a Comment