Tuesday, December 18, 2012

अंकोदुहि - ०२


भाग - ०२
दर चार दिवसांत ताईच्या बोलण्यात मात्र त्या खोली उघड्ण्याचा विषय यायचा, मग माझा तो दिवस घाबरुनच जायचा, माझा पडलेला चेहरा बघुन ताई धीर द्यायची पण मनातली भीती काय अशी जाते काय छे...
-...
एक दिवस आम्ही मैत्रिणिंसोबत बसलो होतो बोलत तेंव्हा त्या खोलीबद्दल बोलणं चाललं होतं, माझी एक मैत्रिण जिचे बाबा आमच्या गावातले मोठे तालेवार सोनार होते, ती म्हणाली की ' अगं माझे बाबा सांगत होते, तुझ्या काकांनी एक मोठा चौरंग सोन्यानं मढवुन घेतला आहे आणि जेंव्हा पासुन तो चौरंग त्यांनी तुमच्या वाड्यावर पाठ्वुन दिला त्यानंतर तो बाहेर कधीच दिसला नाही तुमच्या घरात पुन्हा, तोच असेल तिथं त्या खोलीत ? मला तरी असा एखादा खुप मोठा  चौरंग घरात कधी पाहिल्याचं आठवत नाही आणि तो देखील सोन्यानं मढवलेला तर मुळीच नाही, कारण सोन्या-चांदीची तशी कमतरता नाहीच आमच्याकडे. अगदी दररोजची जेवणाची ताटं सुद्धा चांदीची आहेत. मी ताईकडं पाहिलं,ती सुद्धा गप्पच होती म्हणजे तिला सुद्धा त्या चौरंगाबद्दल काही माहित नव्हतं. म्हणजे त्या खोलीत नक्कीच तो चौरंग असणार.
आणि अशातच एके दिवशी सकाळी स्वयंपाकघरात काम करत असताना ती बातमी कळाली, अजुन सहा दिवसांनी ती खोली उघडणार असल्याची. माझी पाच रात्रींची झोप उडाली. त्या दिवशी सगळ्या घरात एकच धामधुम होती,कितीतरी लोकं आली होती. आज ब्राम्हण सुद्धा खुप जास्त होते, देवघराच्या बाहेर त्या खोलीच्या मागे एक मोठा मंडप घातला होता तिथं कसलं तरी हवन चालु होतं पहाटेपासुनच. एकंदर सगळं शुभ वातावरण होतं, माझ्या मनात मात्र कुठंतरी दाटलेली भीती परत परत वेडावुन दाखवत होती. ताईला काही बोलणं शक्यच नव्हतं, तिला सगळ्यात जास्त आनंद झाला होता, मी दोन्ही धाकट्या बहिणिंना बोलुन दाखवलं तसं, त्यांची अवस्था देखील माझ्यापेक्षा फार वेगळी नव्हती. उत्सुकता आणि भीतीच्या सावल्या त्यांच्या चेह-यावर आलटुन पालटुन दिसत होत्या. 
त्या खोलीत काय  असेल याबद्दल आम्ही बरेच अंदाज बांधलेले होते, त्यांची सत्यासत्यता तपासुन पाहायची होती. आमच्या घरातल्या पुरुषांना त्या खोलीत काय आहे याची कल्पना होतीच पण बायका कधी त्या खोलीत गेल्याचं ऐकलं देखील नव्हतं, आई आणि काकु तर त्या खोलीचा विषय निघाला की गप्प गप्प राहायच्या. आमच्या मैत्रिणिंकडुन काही अर्ध्या मुर्ध्या गोष्टी कानावर येत होत्या पण त्याबद्दल देखील आई किंवा काकुकडं बोलणं शक्य नव्हतं. एक शक्यता त्या चौरंगाची होती, पण कशासाठी असेल तो चौरंग आणि काय असेल त्यावर, एखाद्या देवाची प्रतिमा की आमच्या कुलदेवतेच्या विशिष्ट पुजेसाठी तो चौरंग बनवलेला असेल काय माहित.
सुर्य पुर्ण माथ्यावर येइस्तोवर पुजाअर्चा, हवनं चालु होती, मग नैवेदय झाले आणि तो क्षण आला, दोन तीन ब्राम्हणांनी मोठ मोठ्यानं मंत्र म्हणत त्या बंद दरवाज्यवरच्या प्रतिमेची पुजा केली आणि मग काकांनी ती प्रतिमा त्या दरवाज्यावरुन बाजुला केली. खोलीच्या दरवाज्यावर त्या प्रतिमेमागचा भाग तेवढा स्वच्छ राहिला होता, आणि प्रतिमेला वाहिलेल्या कुंकुवामुळं एक लाल चौकट तिथं तयार झालेली होती, अशी चौकट जिच्यातुन बाहेर पडणं अवघड होतं. काकांनी मागं सरकुन त्या दरवाज्याला साष्टांग दंड्वत घातला अन उठता उठता खांद्यावरचं उपरणं काढुन कमरेवर बांधुन घेतलं घट्ट, बायकांच्या बाजुला सगळ्यात पुढं काकु, आई होत्या, त्यमागं ताई अन मी ताईच्या मागं उभी होते. ती विस्फारल्या डोळ्यांनी सगळं पाहात होती तर मी डोळे किलकिलेच केलेले होते. काकांनी दोन्ही हात उंचावुन सुर्यदेवाच्या स्तुतीचे मंत्र म्हणले, मग दोन्ही हात छातीवर घट्ट नमस्कारात धरुन शिवस्तुतीचे एक दोन मंत्र म्हणले आणि मग आपल्या बलदंड हातांनी ते दार आत ढकललं.
दार उघडता क्षणी एक वेगळाच वास तिथं भरुन राहिला , दोन ब्राम्हण दोन समया घेउन आत गेले आणि क्षणार्धात ती खोली प्रकाशानं भरुन गेली.  त्या खोलीत दोन वस्तु होत्या व्यवस्थित कापडानं गुंडाळुन ठेवलेल्या. आणि त्या दोन्ही एका मोठ्या चौरंगावर ठेवलेल्या होत्या. तोच तो सोन्यानं मढवलेला चौरंग, वरुन मोठं कापड पांघरलेलं असलं तरी त्याचे पाय दिसत होते खाली मोकळे आणि त्यावरुन अंदाज येत होता तो किती मोठा असेल याचा.  आत जाउन ब्राम्हणांनी समया खाली ठेवल्या आणि बाहेर येउन पुजेचं ताट घेउन आत गेले, काका आणि बाबा त्या खोलीच्या उंब-याला नमस्कार करुन आत गेले  आणि त्या चौरंगावरचं कापड बाजुला केलं. त्या चौरंगावर पुढच्या बाजुला एक लाकडी पेटी होती, खुप छान नक्षीकाम केलेली. पेटीचा आकार देखील मोठा होता जवळ्पास दोन हात लांब आणि एक हात रुंद होती ती पेटी, उंचीला देखील दोन हात उंच होती. काका आणि बाबांनी त्या चौरंगावरच्या दोन्ही वस्तुंना नमस्कार केला, ब्राम्हणांचं अनुक्रमे भुमिस्तवन आणि शिवस्तुती म्हणणं चालु होतं. त्या पेटीची पुजा केल्यानंतर, काका आणि बाबा मागच्या बाजुला गेले, तिथं काय आहे ते बाहेरुन दिसत नव्हतं.
पुजा झाल्यावर दोन्ही ब्राम्हण बाहेर आले, अजुन दोन समया खोलीत ठेवुन परत बाहेर आले, आतुन बाबांची हाक आल्यावर आम्ही सगळ्या बायका आत गेलो, तो उंबरा ओलांडतानाच मला एवढी भीती वाटत होती की मी ताईचा हात घट्ट पकडला, पण तिनं एका झटक्यानं तो बाजुला केला आणि चटकन आत गेली. दोन क्षण मी त्या उंब-यावरच घुटमळले, नाईलाज होता म्हणुन पाय आत टाकले. चार समयांच्या उजेडात ती खोली प्रकाशित झालेली होती, समोरचा सोन्यानं मढवलेला चौरंग झळाळुन निघाला होता, मी आत येताच बाबांनी दरवाजा बंद केला. आता खोलीत आम्ही आठच जण होतो आणि समोरच्या चौरंगावर ठेवलेली ती भलीमोठी पेटी आणि त्यामागं काय होतं ते मलातरी अजुन दिसलं नव्हतं. एक तर मी अजुन सुद्धा चौरंगापासुन बरीच लांब होते आणि त्यावरचं कापड अजुन तसंच होतं. सगळ्याजणी बाबांच्या बाजुला जाउन उभारल्यावर लक्षात आलं की मी एकटीच आहे एका बाजुला उभी असलेली, स्वेच्छेनं की बाकीच्यांनी मला एकटं सोडलं म्हणुन, पण अशा विचारांवर मनातल्या भीतीनं कधीच मात केली होती.
मी आता काकु आणि आईच्या मागं उभी होते, आणि समोर चौरंगाच्या दुस-या बाजुला काका आणि ताई उभे होते. ताईनं काकांकडे पाहिलं, तिच्या नजरेनंच परवानगी मागितली अन काकांनी डोळ्यांनीच हो म्हणलं, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, मी एकदम चमकले, काकुकडं पाहिलं ति देखील रडत होती, आई पण,बाबा पण. अरे पण का,का रडत आहेत सगळे, काही कळेना. विस्फारल्या नजरेनं जे होतंय ते पाहात राहिले. ताई पुढं आली तिनं त्या पेटीला नमस्कार केला अन ती उघडली, काही क्षण ती तशीच बसुन होती त्या पेटीसमोर, एकदम तिनं काकुला विचारलं ' खरंच या पेटीतच होते मी, अगदी खरं ना, का थट्टा करताय तुम्ही सगळे माझी? ' काकांनी निशब्द मान हलवली, काकु पटकन पुढं होउन ताईकडं गेली, तिला उठवुन आपल्या मिठित घेत म्हणाली ' होय बाळा, तु याच पेटीत होतीस, जेंव्हा आम्हाला सापडलीस तेंव्हा, आजपर्यंत हे सत्य तुला सांगितलं नव्हतं, पण कधीतरी ते तुला समजणारच होतं म्हणुन तुम्ही सगळ्याजणी मोठं होण्याची वाट पाहात होतो, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्यावरच की अशा गोष्टी समजावुन घेउ शकाल म्हणुन.'
आम्हां तिघिंसाठी हा आश्चर्याचा धक्का होता, म्हणजे ताई काका-काकुंची मुलगी नाही, ती त्यांना सापडली होती या पेटीत. एका क्षणात माझ्या डोळ्यासमोरुन आतापर्यंतचं आमचं सगळं आयुष्य सरसरत गेलं, प्रत्येकवेळी ताईला मिळणारी वेगळी वागणुक, ती मोठ्या काकांची मुलगी आहे म्हणुन मिळत असेल अशी माझी समजुत होती पण त्यामागचं कारण हे होतं खरंतर. ' आणि ते मागं काय आहे ?' माझ्या धाकट्या बहिणिनं विचारलं. अशा वेळी खुप छोटं असणं फार फायद्याचं असतं, खोट्या मोठेपणाचे मुखवटे वागवावे लागत नाहीत चेह-यावर. एका बाजुनं बाबा आणि एकाबाजुनं ताई पुढं झाली, आता मलादेखील तिकडं जायचं होतं, पण पुढं होताना काकुच्या पायावर पाय पडला आणि तिथंच थांबले. तिथुन पुढं जाईपर्यंत ते जांभळ्या रंगाचं कापड बाबांनी सरसरत ओढलं होतं, आणि मी पहिल्यांदाच एवढं मोठं धनुष्य पाहिलं, एवढं मोठं म्हणजे बाबांच्या धनुष्यापेक्षा मोठं पण एकदम साधंसंच, एखाद्या भिल्लाचं असावं तसं. दोन टोकांना मात्र दोन माणकं लावलेली होती, तीसुद्धा करड्या रंगाची.
समोर ठेवलेल्या समयांच्या प्रकाशात त्या धनुष्याच्या अर्धवर्तुळांच्या सावल्या भिंतीवर पडल्या होत्या, त्या सर्पासारख्या दिसत होत्या आणि टोकाला लावलेली ती करडी माणकं त्या सर्पजिव्हेसारखी लवलवत होती, कितीतरी काळ या खोलीत बंद असुन देखील त्या धनुष्यावरची चमक कमी झालेली नव्हती, साधारणपणाचा एकही गुण त्याच्यात दिसत नव्हता. आता मी जाउन ताईच्या मागं उभ्री राहिले होते. ' मी उचलु हे धनुष्य ?' मी काकांकडं पाहात विचारलं, त्यांच्या थकत चाललेल्या डोळ्यांत देखील एक चमक होती, नजरेनंच त्यांनी मला होकार दिला, मी ताईच्या मागुन पुढं झाले. खांद्यावरुन खाली घसरु लागलेलं उत्तरीय कमरपट्ट्यात खोचलं आणि त्या धनुष्याला वाकुन नमस्कार केला. दोन्ही हात त्या अर्धवर्तुळांच्या मध्यभागी ठेवले आणि ते धनुष्य उचललं, दोन पावलं मागं आले चौरंगापासुन. वाटलं होतं तसंच ते वजनदार होतं ते आणि जर उभं धरलं असतं तर जवळपास माझ्या एवढीच त्याची उंची झाली असती, त्याच्यावर कपाळ टेकवुन ते पुन्हा चौरंगावर ठेवायला गेले आणि माझाच तोल गेला, मला वाटलं ते धनुष्य आता खाली पडेल, मोठा आवाज होईल पण तसं झालं नाही. तोल सावरुन मी वर पाहिलं तो ताईनं ते माझ्यापेक्षाही सहज पेललं होतं, ते सुद्धा एकाच हातानं अगदी त्याच्या मध्यभागी धरुन, माझ्याकडं पाहुन ती हसत होती, मी खाली वाकुन माझ्या पायात गुंतलेली त्याची प्रत्यंचा सोडवत होते, तेव्हाच ताईनं त्या धनुष्याला एक हिसका दिला अन कुठल्याश्या प्राण्याच्या आतड्याची असावी अशी ती खरखरीत प्रत्यंचा माझ्या हातातुन सरकन ओढली गेली, माझ्या हातावर अजुन एक रेघ ओढुन ...........

Wednesday, December 5, 2012

अंकोदुहि - ०१मी, बाई होते म्हणुनी. म्हणुन लग्न झाल्यावर नव-याच्या घरी यावं लागलं, पुरुष असते तर मला घर नसतं बदलायला लागलं. कसली मज्जा लग्नात, किती लोकं, किती माणसं, मित्र, शत्रु, जवळ्चे,लांबचे सगळे आले होते. आई बाबा किती आनंदात होते. तशी कधी बाबांनी किंवा आईनी आमच्या, म्हणजे आम्हा बहिणींच्या लग्नाची काळजि केल्याचं आठवत नाही मला. एकत्र कुटुंब आमचं. माझे आईबाबा, मोठे काका काकु, त्यांची मुलगी, सगळं किती मस्त होतं. सगळ्याजणी एकत्र राहायचो, एकच मोठं घर होतं आमचं. घर कसलं राजवाडाच होता तो. पण घर म्हणलं की जीवाच्या जवळचं वाटतं.
आम्ही सगळ्या जवळपास एकाच वयाच्या, एक दोन वर्षांचा फरक असेल . घरात खाण्यापिण्याची ददात नव्हती पण शिस्त देखील तेवढीच, तसं आमचं घर जुन्या वळणाचं, संस्कारांचं होतं. सकाळी लवकर उठणं, आवरणं, मग देवघरात जाउन बसणं, कधी मोठे काका तर कधी  बाबा पुजा करत असायचे. म्हणजे ब्राम्हण असायचे पुजा सांगायला, ते सांगतील तसं काका,बाबा करायचे, मध्ये मध्ये ते मंत्र म्हणायचे. आम्ही परकर पोलक्यात गप्प मागं बसुन राहायचो, समोरच्या प्रतिमेच्या गळ्यातले  हार, पायातले पैंजण बघत. त्यांना म्हणे पैंजण म्हणायचं नाही असं आई सांगायची, ते तोडे आहेत. पायात म्हणजे पैंजण आणि हातात म्हणजे कंगन एवढंच कळायचं वय होतं आमचं.   देवाच्या घरात, आम्हाला सगळीकडं फिरता यायचं नाही. तिथं सगळ्यात पुढं ब्राम्हण मग पाठमोरे बाबा किंवा काका आणि त्यामागं थोडं अंतर सोडुन आम्ही असायचो.
मध्ये मध्ये आई नाहीतर काकु यायच्या, देवाच्या जेवणाचं घेउन, त्याला म्हणे नैवेद्य म्हणायचं पण असायचं काय त्या ताटात, छे काय नसायचं ते विचारा, पार ताज्या ताज्या फळांपासुन गरम गरम पु-या अन दाट खीर असायची. त्या खिरीवरच्या तुपाचा असा मस्त वास यायचा की कधी एकदा पुजा संपते आणि आम्हाला प्रसाद मिळतो असं व्हायचं. देवघराच्या आत उजव्या बाजुला एक दरवाजा होता, त्याला मात्र नेहमी कुलुप असायचं. त्या दरवाज्यावर एक मोठी प्रतिमा होती, जिची पुजा केली जायची दररोज त्या लालभडक कुंकुवानं अन लालभडक फुलांनीच. पण दरवाजा उघडलेला आम्ही ती कधीच पाहिला  नव्हता. मला तर त्या प्रतिमेतल्या साधु बाबाचीच भीती वाटायची, म्हणुन मी कधी कुणाला विचारलं देखील नव्हतं त्या दरवाज्याबद्दल. पण एके दिवशी मात्र, आम्ही नेहमीप्रमाणे पुजा झाल्यावर नमस्कार केला आणि बाहेर निघणार प्रसाद घेउन तेवढ्यात काकांच्या मुलीनं विचारलं ' बाबा, त्या खोलीत काय आहे ? अजुन मोठे देव आहेत का आत ? तुम्ही पाहिलेत का ते ? ' आणि क्षणांत तिथले सगळेच जण स्तब्ध झाले. काका, पुजा सांगायला आलेले ब्राम्हण, काकु,  माझी आई सगळेच जण, आम्ही तर हातातला प्रसाद खायचं देखील विसरलो. काही वेळाच्या शांततेनंतर काकांचा आवाज आला ' बाळा, आपण ती खोली वर्षातुन एकदाच उघडतो, आतले देव ज्या दिवशी आपल्या घरी आले ना, त्या दिवशीच. आणि या एक दोन वर्षात वर्षी तुम्हाला कळेलच आत काय आहे ते, या गोष्टी समजण्याएवढं मोठ्या व्हालच तुम्ही तोपर्यंत, ठीक. चला पळा आता, गुरुजी येतील ना शिकवणीला, पळा.'
काका एवढ्या सहजी ती खोली उघडुन दाखवायचं म्हणतील असं मला तरी वाटलं नव्हतं, पण ताईचा, म्हणजे काकांच्या मुलीचा चेहरा एकदम आनंदला होता, ती चालताना देखील उड्याच मारत होती. माझ्या मनात मात्र उत्सुकतेपेक्षा भीती जास्त होती त्या खोलीत काय असेल याची. एवढे दिवस त्या साधुबाबाची भीती आणि आता आत काय असेल याची भीती याचा अजुन जास्त गोंधळ माझ्या मनात व्हायला लागला. मी त्यादिवशी रात्री आईला विचारलं देखील, पण तिनं नुसतीच उडवाउडवीची उत्तरं दिली. म्हणे आमचं वय नाही अजुन, लहान आहोत असलंच काही. मला काही समाधान वाटलं नाही पण आईनं तिच्या कुशीत ओढलं तेंव्हा ती रडेल असं वाटत होतं, म्हणुन मी पण फार काही न विचारता झोपुन गेले. मला नाही आवडायचं  आईनं रडलेलं. कारण तिला पण नाही आवडायचं मी रडलेलं. बाबा किंवा काका जरी रागावले तरी आई आणि काकु किती समजुन घ्यायच्या. पण कधीतरी आई सुद्धा रागावायची मग मात्र मी काकुमागं जाउन लपायची. आणि आईला पण हे माहित होतं, ती यायचीच नाही काकुच्या खोलीत. मग काकु बोलता बोलता काय झालं ते माझ्याकडुन काढुन घ्यायची, आणि मग माझी समजुन काढुन परत पाठवायची  आईकडं. खरंच किती मजा यायची त्या वेळी.
मला वाटतं बहुधा दोन वर्षे गेली, आणि आमचं बालपण संपलं आम्ही मोठ्या झालो. निसर्गाचा जादुचा पिसारा उमलायला सुरुवात झाली होती. आमची खेळ्णी बदलली, खेळ बदलले, हल्ली घरात बसुन रहायला आवडेनासं झालं, बाहेर बागेत फिरावं,लांब कुठंतरी फिरुन यावं असं वाटायला लागलं. आणि एवढी वर्षे हे करत नाही म्हणुन ओरडणा-या आई आणि काकु आता हेच करु नका म्हणुन रागावायाला लागल्या. आम्हा चौघींचे बोलायचे बिषय बदलले, या घरापलीकडच्या जगाची स्वप्नं हळुहळु आकार घेत होती. एवढी वर्षे आम्ही सगळ्या मैत्रिणींच्या घरी जायचो खेळायला आता त्यावर पुर्ण बंदी आली, त्याच आमच्या घरी यायच्या. तेंव्हा देखील गप्पाच जास्त व्हायच्या. आणि खरंतर अशा गप्पांना जास्त वेळ मिळायाचाचं नाही. सकाळी उठुन आवरलं की आई आणि काकुला मदत करायला स्वयंपाकघरात जावं लागायचं, अजुन पदार्थ शिजवणं आम्हाला करावं लागत नव्हतं पण सगळी छोटी छोटी कामं आम्हाला करायला लागायची,तसं तर हे सगळं करायला नोकर चाकर होते, पण ' या वयात सगळं यायला हवं' या एका सुचनेखाली सगळं करावं लागायचं. तिथं देखील आम्ही चौघी नेहमी हसत खिदळतच असायचो, आमच्या गप्पा ऐकुन बरोबर काम करणा-या बायका देखील हसायच्या, मग आई नाहीतर काकु ओरडायच्या. लहानपणी त्या ओरडण्याची भीती वाटायची, हल्ली गंमत वाटायची. मुद्दाम असं काहितरी करावं वाटायचं ज्यामुळं त्या रागावतील.
दर चार दिवसांत ताईच्या बोलण्यात मात्र त्या खोली उघड्ण्याचा विषय यायचा, मग माझा तो दिवस घाबरुनच जायचा, माझा पडलेला चेहरा बघुन ताई धीर द्यायची पण मनातली भीती काय अशी जाते काय छे...
क्रमश :

Wednesday, November 28, 2012

तुझ्या गळा माझा गळा ' .........

ऑफिसच्या गारव्यातुन बाहेर येत लिफ्ट समोर उभं राहिलं की जरा बरं वाटतं, मन शरीराच्या आधीच बार मध्ये जाउन पोहोचलेलं असतं. खाली पार्किंग मध्ये येताना मी रोज विचार करतो, प्रत्येकवेळी बाहेर पडणं हे असं आधी खाली खोल खड्यात जाउन मगच असतं का ? कारण, आमच्या ऑफिसचं पार्किग मायनस ९ ला आहे. गाडी घेउन वर येताना प्रत्येक वळणावर गाडी घसरायची भीती वाटते, पण घसरलो कधीच नाही, बहुतेक त्या भीतीमुळंच माझा वेग आपोआप कमी होतो. बाहेर आल्यावर लगेच सिक्युरिटी समोर थांबावं लागतं, रोज नेमका इथं येउन थांबलो की मंद्याच्या फोन येतो. तो  सिक्युरिटी वाला बॅग उचकत असतो अन मंद्याची बोंबाबोंब चालु असते. केबिन मध्ये ती लेडिज गार्ड असेल तर मी फोन उचलतच नाही, 'जिगर मा बडी आग है, पर्यंत रिंगटोन वाजु देतो, तो बाहेरचा काळा ठोकळा अन ती लेडिज गार्ड वैतागुन जातात, संध्याकाळची स्रुरुवात मजेत होते.
मी आज सगळ्यांना सांगितलं, उद्याचा शुक्रुवार शेवटचा. त्यानंतर मी दोन वर्षे येणार नाही. प्रोजेक्टला बदली झाली आहे माझी. सगळ्यांना खुप हेवा वाटतोय, तोंडावरुन दिसतंय तसं. आज सगळे मिळुन मला त्यांच्या पेगमधला एक चमचा दारु माझ्या ग्लासात टाकुन कॉकटेल करुन देतात. एक लार्ज बुईथ सोडा, बॉटम्स अप. पाच मिनिटं काही सुचत नाही, मग ह़ळु हळु नॉर्मल होतो. तसं मला कधी चढत नाही दारु पण हे पाच वेग़ळ्या वेगळ्या एकत्र करुन म्हणुन थोडा त्रास झाला. सगळ्यांचा निरोप घेउन मी लवकर निघतो, प्रवासाची तयारी करायची आहे, मेडिकल टेस्ट करुन घ्यायच्या आहेत, तीन लसी  टोचुन घ्यायच्या आहेत. हे सग़ळं आवरुन घरी पोहोचायला अकरा वाजतात. दरवाजा उघडुन मी आत येतो, लाईट सकाळी अ‍ॅटो मोडला टाकले होते, ते चालु बंद होत राहतात माझ्या मागं मागं. दोन तासांत बॅगा भरुन होतात. मग दोन्ही गाड्यांच्या किल्या  घेउन मी खाली जातो, इथं पण खड्यात जावं लागतं मायनस ३ ला.  स्कॉर्पचं कव्हर काढतो, आतुन पल्सरचं कव्हर काढतो. स्कॉर्पचं कव्हर पल्सरच्या बॅगमध्ये ठेवतो, तिच्या बॅटरीच्या वायर कादुन ठेवतो, कव्हर घालतो. मग ठोंगा, म्हणजे स्कॉर्पिओ चालु करुन चेक करतो. ठोंगा महिन्यातुन दोन वेळाच बाहेर निघतो.
आज शनिवार, ऑफिसमधुन अर्धे डिटेल घ्यायचे आहेत, ते मिळणार संध्याकाळी साडेचार वाजता, आणि त्यासाठी ठोंगा घेउन जावा लागेल. अर्धे डिटेल उद्या मिळणार अर्धे १४० किलोमिटरचा प्रवास झाल्यावर. नेहमीचं आहे हे. यावेळी हॉटेल आणि पोरी वेगळ्या आहेत असं ऐकुन आहे, पाहुया. नेहमीप्रमाणे ऑफिसला आलो, कामं केली, रिपोर्ट छापले, पैसे घेतले, प्रोजेक्ट करन्सी. बरोबर साडेचार वाजता मायनस ९ ला आलो. ठोंगा वॉशिग एरियात घातला, बाहेर आलो तेंव्हा आउट ऑफ द वर्ल्ड फिलिंग आहे. मग सरळ घरी आलो, जेवण केलं आणि झोपलो. उद्या सकाळी अकराच्या सुमारास निघेन. खरंतर लवकर निघणार होतो पण सात वाजता शाल्मली येणार आहे. मग दोन तास तरी जातीलच म्हणुन अकरा वाजता. अकरा वाजता निघालो की हॉटेलला पोहोचायला तीन वाजतील मग तिथंच मुक्काम होईल, पहाटे तीन वाजता निघेन आणि सात वाजता साईटवर. कार्यक्रम पक्का आहे. उद्या सकाळी शाल्मली येईल त्याची वाट बघत झोप लागली आज थोडी लवकरच.
सकाळी साडेसहा जाग आली, उठुन आवरलं, बरोबर सात वाजता दरवाजा वाजला, शाल्मलीचं ही, कधीच बेल वाजवत नाही. दरवाजा उघडुन आत येताच तिच्या ओल्या केसांचा वास घरभर पसरला. पुढचा तास फार छान गेला. दोघांनी मिळुन चहा, पोहे केले, घरातल्या माझ्या आवडीच्या गोष्टी काढुन तिच्या आवडीच्या गोष्टी वर काढुन ठेवल्या, आता दोन वर्षे तिच्या मनासारखं होणार सगळं, पुन्हा मी गेल्यावर तिला हे सगळं जमणार नाही, म्हणुन. मग दहा ते साडेदहा आम्ही गॅलरीत बसुन होतो. अलार्म वाजला तसा उठुन आवरलं. एकटाच मायनस ३ ला आलो. शाल्मलीला पुजा करायची होती. ठोंगा काढला, शहरातली गर्दी मला ही आवडत नाही अन ठोंग्यालाही. ती संपली की पाचवा गिअर,  अठराशे आरपिएम, पंच्याहत्तरचा स्पिड. पहिला घाट लागेपर्यंत तरी.
साडेचार वाजल्यानंतर जे पहिलं हॉटेल दिसलं तिथं गाडी घातली, दहा सेकंड इंजिन बंद केलं, सिस्टिमनं सर्व काही अपडेट झाल्याचं कळवलं. बाहेर पडुन हॉटेलमध्ये गेलो, रुम बुक केली आणि आत जाउन झोपलो, जेवण वगैरे करायचं नव्हतंच. पहाटे अलार्म वाजला, उठुन आवरलं. चेक आउट करुन निघालो. आज एकुण नउ तास प्रवास करायचा आहे. ही साईट नविनच आहे, आजचा प्रवास तसा नविनच भागातुन आहे, ब-यापैकी निर्मनुष्य सुद्धा. कंटाळवाणं होणार आहे सगळं. या नोकरीत आलो ते पैसा, घर, गाडी मिळणार म्हणुन, पहिले सहा महिने फार छान गेले पण जेंव्हा पासुन साइट सुरु झाल्या तेंव्हापासुन त्रास आहे खरंतर. ही माझी दुसरीच साईट, पहिली एक महिन्यासाठीच होती ट्रायल बेसिसवर, वर्षभरानी त्याचे रिझल्ट आल्यावर मग इथं दोन वर्षासाठी पाठवत आहेत. शाल्मलीला जेंव्हा हे समजलं तेंव्हा तिनं स्पष्ट नाराजी व्यक्त केलेली होती, पण मिळणारा पैसा, सुरक्षितता ह्यांच्या जीवावर तिला समजावता आलं होतं. दिवसभर गाडी चालवुन साडेपाचच्या सुमारास साईटच्या गेटसमोर उभा आहे, सगळ्या चेकिंगला वगैरे अर्धा तास गेला. मग आत आलो, आता सगळंच सिस्टिमच्या हवाली इथुन पुढं.
गेले आठ दिवस नुसता माझ्या रुममध्ये बसुन आहे,जेवणखाण वेळेवर मिळतंय, ठरल्या वेळेला बाहेर फिरायला मिळ्तंय ठरलंय तेवढंच मग पुन्हा रुममध्ये. प्रत्यक्ष काम काहीच दिलेलं नाही अजुन. सिस्टिमवर वेटिंग लिस्ट चेक केली. अजुन तीन दिवस मला कुणी भेटणार नाही. प्रचंड कंटाळा आलेला आहे. पहिल्यांदा साईटवर गेलो होतो ते आठवतं पुन्हा एकदा, म्हणजे गेल्या आठ दिवसांत दररोज दोन वेळा आठवुन झालेलं आहे. आता पुन्हा आठवंतय, बॉसनं घेतलेलं ब्रेन स्टॉर्मिंग, झालेले वाद आणि मग दोन दिवसांनी दिलेला होकार, नंतर शाल्मलीचा गोंधळ आणि बरंच काही. ही कंपनी जॉइन करतानाच लक्षात आलेलं होतं की काहीतरी घोळ आहे, पण पैसा, घर आणि गाडी डोळ्यासमोर नाचत होते. अशावेळी नेहमी करतो ते केलं, बॅगमधुन एक इंजेक्शन काढलं आणि टोचुन घेतलं. या ऑषधाचा प्रभाव पुढचे दोन दिवस टिकेल. मग एकच दिवस वाट बघणं आणि त्यानंतर काम सुरु.
आज दुपारी माझा पार्टनर येणार आहे, नंबर ८९३७, वय वर्षे २९, आज सकाळीच आलेल्या मेसेज मध्ये होतं तसं. बरोबर तीन वाजता रुमचा दरवाजा उघडला तेंव्हा समोर जॉब नंबर ८९३७ उभी होती. चेह-यावर प्रसन्न हसु, केसांचा बांधलेला पोनी आणि त्याला न शोभणारं बंगाली कुंकु कपाळावर. ' हाय, मी प्रवीण ' , ' हाय, मी मीना, आत येउ ?' दोनच वाक्यं बोललो, पण खुप जवळची ओळख आहे असं वाटलं. पुढची दोन वर्षे तरी एकत्र काढायची  आहेत, किंवा रिझल्ट मिळेपर्यंत. दोघं आत येउन रुममागच्या लॅबमध्ये गेलो . ' थोडा वेळ गप्पा मारु या का, आपण अहेड ऑफ स्केड्युल आहोत बरंच'  तिला विचारलं. कपडे बदलत पडद्यामागनं तिनं उत्तर दिलं ' मी तेच करणार आहे, तुझी कितवी साईट आहे ?' मला बरंच हायसं वाटलं ' दुसरी, तुझी?' पडदा बाजुला करत ती म्हणाली 'चवथी, यु आर टु  ज्युनियर टु मी, किती रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत आजपर्यंत, काय पर्सेंटेज ?  तिनं   सोफ्यावर अंग टाकत विचारलं.  ' काही घेणार,  नव्वद टक्के आहेत रिझल्ट, निदान माझ्याकडुन तरी'  पार्टनर आल्यावर रुममधल्या सर्व सर्विस ओपन होतात, त्यानुसार बार उघडलेला होता. ' आतातरी फक्त सोडा दे तीन क्युब टाक त्यात'  दोघांचे ग्लास तयार करुन टिपॉयवर ठेवले तेंव्हा तिचा चेहरा फुललेला होता, बंगाली कुंकु पुसल्यानं कपाळ थोडं जास्तच मोठं दिसत होतं.
 'तर मि. प्रवीण, येत्या महिनाभरात आपल्याला ही दोन पझल्स सोडवायची आहेत, मला वाटतं तुम्ही माझ्या शरीरापेक्षा या कोड्यांवर जास्त लक्ष द्यावं, कसं सुरु करायचं आपण, आधी एक पुर्ण करायचं की  दोन्ही पॅरलली करत जायची. ' तिच्या आवाजात सिनियरनेस जाणवत होता, मी माझी नजर तिच्या वरुन काढुन समोरच्या टिपॉयच्या  स्क्रिनवर नेली. दोन प्लॅन आणि दोन ड्रॉइंग उघडी होती स्क्रिनवर. मला एका ड्रॉईंगमधलं बरंचसं समजलं, प्लॅनमधली गावं रस्ते ओळखीचे वाटत होते, पण दुस-याचा काही पत्ता लागेना.  ' मला पण काहीच समजत नाही यातलं, प्लॅन ए आहे तो पुर्ण शहरातला पाणीपुरवठा विषयुक्त करुन मरणाचा थैमान घालायचा आहे, पण दुसरा काय आहे समजत नाहीये. तुला कळालं का काही यातलं ? मीनानं संवादाला सुरुवात केली. ' ग्रेट , मला प्लॅन बी समजलाय संपुर्ण, सगळ्या शहरात मोक्याच्या ठिकाणी गाड्या अडवुन एक प्रचंड ट्रॅफिक जाम घडवुन आणायचा आणि मग  मेमॅवेच्या साहाय्यानं धुळ्धाण उडवुन द्यायची. वुई कॉम्प्लिमेंट इच अदर ' उगा जवळीक दाखवायची म्हणुन मी बोललो. ' मेमॅवे म्हणजे काय ? समथिंग केमिकल ऑर हाउ ?' मिनानं मुलभुत प्रश्न विचारला. '  मेमॅवे म्हणजे मेगा मॅगनेटिक व्हेव - मेमॅव्हे, पण उच्चार मेमॅवे असाच केला जातो.
'चल तु माझ्या क्षेत्रातल्या प्लॅनवर काम करायला सुरुवात कर, मी तुझ्या फिल्ड्मध्ये दिवे लावतो, म्हणजे दोन्ही प्लॅनच्या सगळ्या बाबी चेक होतील आणि व्यवस्थित होतील, व्हॉट से पार्टनर ?' मी माझा नेहमीचा गेम प्लॅन टाकला, असं केलं की मला माझ्या चुका, ते माझं फिल्डच नाहीय या सबबीखाली लपवता येतात. तिनं होकार दिला. माझी व्होड्का आणि तिचा सोडा संपला होता. आता तिनंच उठुन विचारलं ' अजुन एक घेणार का ? माझा होकार आहे असं समजुन ती बारकडं गेली. काचेचा दरवाजा उघडणार तेवढ्यात सिस्टिमचा बायकी आवाज आला ' रुट ३ रुमचे अल्कोहोल कंझ्म्शन लिमिट संपले आहेत.'  आणि त्यामागं एक जिवंत बायकी आवाज ' ओ शिट मॅन, धिस इज अनफेअर' हातातला ग्लास तिनं  फोडुन टाकला. पुन्हा येउन ति सोफ्यावर बसली. दोन्ही हात डोक्याच्या मागं धरुन, मी तिच्या कडं न पाहायचा अयशस्वी प्रयत्न केला, ते जास्त वेळ जमलं नाही, आणि तिच्यदेखील लगेच लक्षात आलं, डोळे बंद असुन देखील ' तुझी पहिली साईट डेडबॉडीज वरुन व्हायरस उचलायची होती ना ?' मला सिनियर असल्यानं तिला माझी हिस्ट्री माहित होती, तो चान्स मला नव्हता. ' हो, पहिली साईट एवढी बेकार लागली मला' मी माझी निराशा  स्पष्ट केली. ' मग त्या वेळी स्त्रियांच्या प्रेतांकडं पाहताना, त्यांच्यावरुन व्हायरस उचलताना ज्या भावनेनं वागला असशील ना त्याच भावनेनं वाग आताही माझ्याबरोबर, पुरुषाबरोबर राहायची वेळ आली तर माझी रिअ‍ॅक्शन प्रेतापेक्षा जास्त वेगळी नसते हे लक्षात घे, उगा नंतर अपेक्षाभंग नको.'  तिचं स्पष्ट बोलणं मला लागलं ' म्हणजे तु इथुन बाहेर गेल्यावर माझ्यामागं भुत होउन लागणार नाहीस ना, माझ्या इच्छा पुर्ण कर म्हणुन, त्यापेक्षा आताच काय ते मागुन घे, प्रेतं देखिल काही कमी डिमांडिंग नसतात. ' माझ्या विनोदाच्या ढ क्वालिटिवर तिला हसु देखील आलं नाही, ती उठुन रुममधल्या तिच्या बेडवर गेली, बाजुचा लेसर ट्रॅप चालु केला अन  झोपली, अगदी प्रेतासारखी.
आज, दोनशे दिवस झालेत, केमिकल इंजिनियरिग आमच्या इंजिनियरिंगपेक्षा फार कमी अवघड नसतं याची पुर्ण कल्पना मला आली आहे. त्यत मिनाबरोबर झालेल्या करारानुसार वर्किंग टाइममधला फक्त एकच तास एकमेकांच्या शंका निरसनासाठी ठेवलेला आहे. त्यामुळं फार अवघड होतं, प्रत्येक वेळी माहिती सिस्ट्मिमधुन घ्यावी लागते, मिळत नाही, समजत नाही असं नाही पण तिच्याकडुन ऐकायला बरं वाटतं, आणि मी सिस्टिमवरुन माहिती करुन घेउन तिला पुन्हा मुद्दाम विचारतो आहे हे तिच्या लक्षात येतं, तिच्या शिक्षणाची नक्की कल्पना नाही पण फार नसावं, जेवढं मला अडतं त्यापेक्षा तिला जास्त अडतं, आनि स्पेशली मॅगनेटिक ईंडक्शन मध्ये ती जाम फसते, तो टेस्ला तिला प्रत्येक वेळी घुमव घुमव घुमवतो आणि जोरात आदळतो खाली, आणि तो तर आपला खास दोस्त, याचा बराच फायदा घेतो मी, तिच्या शंका अर्धवटच क्लिअर करतो. मग पुढच्या शंकानिरसनच्या तासात ती पुन्हा तेच घेउन बसते, सिनियर असली तरी लाजत नाही कळत नाही हे सांगायला. माझं तसं नाहीये, बहुधा पुरुषी अहंकार मध्ये येतो अजुन देखील. तिच्या प्रत्येक उत्तरात काहीतरी खुसपट काढतो, तिचं बोलणं मध्येच तोडतो, तिला आवडत नाही ते खरंतर. पण पुरुष असल्याचा कंड  कुठं तरी शमला पाहिजे ना.
' प्रवीण, हे बघ म्हणजे हा मेमॅवेचा संपुर्ण प्लॅन झाला नाही अजुन, पण एका  शहराच्या गेल्या एकोणीस महिन्यातल्या ट्रॅफिकचा स्टडी करुन मी एक ट्रॅफिक होल्ड प्लॅन बनवलाय, पहिल्या होल्ड पासुन शेवटचा होल्ड येईपर्यंत बारा मिनिटं जातील, आणि त्यानंतर मेमॅवेला तु म्हणतो तसं अर्धा तास लागेल होत्याचं नव्हतं करायला, किमान ७०% सक्सेस रेशो दिसतो आहे. आपल्याला काय पाहिजे रेशो मिनिमम ९५ % ना, मग अजुन बरंच काम करावं लागेल. ' एक दिवस मीनानं एक वॉक थ्रु दाखवला रुममधल्या स्क्रिनवर. माझं समोर टिपॉयच्या स्क्रिनवर काम चालु होतं. मला वर पहायला दोन मिनिटं गेली. तिनं पुन्हा पहिल्यापासुन दाखवलं, 'गुड ना ,ब-यापैकी जमलंय ना रे, आणि हेच अल्गोरिथम वापरुन कोणत्याही शहराला यात फिट बसवता येईल असं करायचं आहे मला ते  आता उरलेलं २५% तु जमव.' तिला प्लॅन पुन्हा एकदा रनथ्रु करायला लावला, त्यावेळी मी टिपॉयवर लिहित होतो वर बघता बघता. रन थ्रु संपल्यावर तिच्या ते लक्षात आलं, शेजारी येउन बसत ती म्हणाली ' काय काय लिहिलं आहेस माझ्या विद्यार्थ्यानं बघु ?' मी तिची व्हायवा घ्यायला सुरुवात केली.  एक तासभर आम्ही बोलत होतो. तिनं टिपॉयच्या तिच्या बाजुला  ब-याच नोट्स काढ्ल्या आमचं बोलणं संपलं तशा त्या बोटातल्या रिंगवर पिकप केल्या अन तिच्या बेडवर जाउन बसली, लेसर ट्रॅप चालु केला.
आज सहाशे पन्नास  दिवस संपले प्रोजेक्टचे, मिना आणि मी, बाकीच्या दोन्ही टिमपेक्षा खुप पुढं आहोत,म्हणजे सातशे दहा दिवसांचे टारगेट आम्ही साठ दिवस आधीच पुर्ण केलंय. सध्या आम्ही प्लॅन २ आणि प्लॅन ३ बनवतोय, पहिले प्लँन फेल झाले तरची तयारी,अर्थात आम्हाला ते डिटेल वर्कआउट करायचे नाहीत, पुढच्या सिनियर टिम आमच्या स्क्रॅचवर काम करुन फायनल करतील आणि आता पण सिस्टिम पॅरलली त्यावर काम करत आहेच. आमचे ओरिजनल प्लॅन सध्या रुट १९ ला चेक होत आहेत, त्यापुढं अजुन एक  रुट, तो क्लिअर केला मी प्रमोशन, मी मास डिस्ट्रक्शन वरुन पर्सनल हंटिंगला जाईन आणि मिना  इनर किलिंगला. तिच्या पहिल्या दोन साईट पर्सनल हंटिंगच्या होत्या त्यामुळं तिला ती एक स्टेप टाळता येईल असं वाटतंय. उद्या पहाटे पाच पासुन रुट१९  बरोबर मिटिंगला बसायचं आहे. डार्क मिटिंग, या प्रकाराचा मला अनुभव नाही, म्हणजे रुममध्ये फक्त स्क्रिनच दिसते, पलीकडं कोण आहे तुम्ही पाहु शकत नाही आणि ते पण तुम्हाला पाहु शकत नाही, फार भयाण प्रकार आहे हा. मिनाला विचारलं तर ती काही स्पष्ट बोलली नाही याबद्दल. आज संध्याकाळी ती आमची गाडी घेउन बाहेर गेली आहे कुठंतरी, बहुदा लांब गेली असेल कारण आज गाडी हवी म्हणुन तिनं गेला आठवडाभराचा कोटा सेव्ह केला होता तिचा आणि मला पण एक दिवस रुममध्येच बसवुन ठेवलं होतं.
पहाटे पाच ते दुपारी एक, रुट १९ ची मेगामॅरेथॉन मिटिंग संपली, आमची दोन्ही प्रोजेक्ट रुट १९ नं अ‍ॅडमिन क्लिअर केली, आता ती फायनान्स क्लिअरसाठी रुट २० ला जातील, तिथं साधारण ५० दिवस लागतात, आणि त्यानंतर हातात येईल डायरेक्ट डि डेट आणि प्रमोशन लेटर. डि डेटच्या आदल्या दिवशी आम्हाला इथुन सोडलं जाईल. पुढचे ५० दिवस फार निवांत नाही जाणार पण फार टेन्शन नसेल आम्हाला. आता निम्मा दिवस गाडी वापरायची परवानगी आहे, प्रोजेक्टच्या रुट १६ पर्यंत आम्ही बिनघोर फिरु शकतो, रुममधला बार चोवीस तास खुला होणार उद्यापासुन. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शाल्मलीबरोबर दररोज ३०० सेकंद बोलु शकतो, हो म्हणजे पाच मिनिटंच पण ३०० म्हणलं की खुप जास्त वाटतं. जवळ्पास दोन वर्षानी,धाकट्या बहिणीबरोबर बोलताना काय बोलु आणि काय नको असं होणार आहे मला, अर्थात आमचं बोलणं ट्रॅक होणार, रेकॉर्ड होणार आणि सेन्सॉर देखील, तरी पण खूप खुप छान वाटतंय मला. गेल्या सहाशे पन्नास दिवसात एकावेळी २० लाख लोकांना कसं मारता येईल याचाच विचार करत होतो.  मिना तिचे ३०० सेकंद कुणाबरोबर बोलेल काय माहित. असेल तिचा कुणीतरी बॉयफ्रेंड वगैरे नाहीतर मुलगा आणि नवरा सुद्धा असेल. अजुन साठच दिवस मला देखील तिची हिस्ट्री चेक करायची ऑथोरिटी मिळेल आणि मग कळेल मला सगळं.
उद्या सातशे दिवस पुर्ण होणार, आज आम्ही दोघं बाहेर गेलो होतो रुट १३ ला तिथं, आमच्या प्रोजेक्टवर एक ग्रुप चर्चा करत होता. आम्ही पण जाउन उभे राहिलो झालं, काही कमी पडलंय का पहायला, अर्थात इथं कुणीच कुणाला ओळखत नाही त्यामुळं ती लोकं बिनधास्त बोलत होती. काही पॉइंटस मिळाले आहेत. रात्री बसुन पुन्हा अपडेट करुन घेउ ते. गेले पन्नास दिवस मिना दररोज पाच मिनिटं पुढचा वेळ देते, पहिला दिवस ००:०० ला बोललो, दुस-या दिवशी ००:०५ ला असं करुन तिचा प्रत्येक वेळचा मुड समजला मला. एकदम मस्त आयडिया दिली तिनं. सगळ्या घराला नविन रंग दिला आहे तिनं,टाइल्स बदलल्या आहेत, अजुन बरंच काही. माझ्यासाठी दोन तीन मुली पाहुन ठेवल्यात. आई बाबांची कसर भरुन काढते आहे. हे सगळं मी मिनाला पण सांगितलं, ती कुणाशी बोलते ते कळालंच नाही, दररोज दुपारि एक वाजता मला रुमच्या बाहेर जायला सांगते, काही कळालंच नाही त्यामु़ळं. उद्या दिवसभरात कधीही रुममधले स्पिकर सुरु होतील आणि आम्हाला गुड न्युज मिळेल. आणि मग अर्धा दिवस फोन, पुर्ण दिवस गाडी आणि रुट १८ पर्यंत प्रवासपरवानगी. मिना पण कुठं गेलीच नाही आज दिवसभर, नुसती बेडवर पडुन आहे. सकाळीच तिनं चार पेग व्होड्का घेतली आहे, त्याबरोबर तीन बाटल्या सोडा. एवढं डायल्युट करुन कसं काय घशाखाली कोण जाणे. असते एखाद्याची आवड कोण सांगणार काय ते?
डोक्याचा भुगा झालाय, डि डे अजुन एक महिन्यानं आहे, मेमॅवेचा प्लॅन फायनल झाला आहे, मला आणि मिनाला प्रमोशन मिळालं आहे. अजुन पगार पण वाढला आहे पण फोन बंद झालेत आता प्लँन यशस्वी किंवा अयशस्वी होईपर्यंत आम्हाला बाहेर कुणाशी संपर्क साधता येणार नाही.  पण प्रत्येक सिनेमाला असतो जसा क्लायमॅक्स असतो इथं पण आहे, आमचा प्लॅन ज्या शहरात ट्राय करणार आहेत तिथं मिनाच्या आईबाबांचं घर आहे, जसाजसा आमच्या प्लॅनवर शहराचा प्लॅन लॅप होत गेला तसं तसं तिला रडु आवरेनासं झालं, आम्ही नेहमीप्रमाणे अंधारात होतो डार्क मिटिंगच्या,पण रुममधली आर्द्रता लिमिटच्या बाहेर गेल्याचं आणि अनावश्यक आवाज येत असल्याचं सिस्टिमनं रुट २० ला कळवलं तसं, एक क्षण आमची रुम प्रकाशानं झगझगुन गेली, मिनानं प्रयत्न करुन देखील तिला डोळ्यातलं पाणी पुसता आलं नाही. मिटिंग संपल्यावर ति लगेच निघुन गेली गाडी घेउन. कधी परत येईल माहित नाही. मला आता तिची दया येते आहे,  इथं पुर्वी झालं आहे तसं ती बहुधा रुट २० ला जायचा प्रयत्न करेल आणि मरुन जाईल. इथं आत्महत्या करायचा तो एकमेव मार्ग आहे, बाकी कोणत्याही मार्गानं तुम्ही स्वताला संपवु शकत नाही. मी पण तसंच केलं असतं का आमच्या शहराचा प्लॅन लॅप केला असता तर, कालपर्यंत मिनाला आमचा २० लाख लोकांना एकत्र मारायचा प्लॅन निवडला गेला म्हणुन आनंदात होता, आणि आज तिला दुख आहे ते त्या मरणा-या वीस लाखांचं नाही तर त्यातल्या दोघांचं. का तर ती तिची आपली आहेत म्हणुन.
त्या बिनओळखी एकोणीस लाख नव्याण्ण्व हजार  नउशे अठ्याण्णव लोकांच्या मरणानं आम्हाला काही फरक पडत नव्हता पण या दोघांच्या जाण्यानं पडत होता. त्या विस लाखांचं मरणं आमच्या देशाच्या साठी फार गरजेचं आहे, दर सहा महिन्यांत असे रॅडम निवड करुन वीस लाख लोक मारले जातात, त्याशिवाय बाकीच्यांना जगणंच शक्य नाही असा एक निष्कर्ष काढलेला आहे सिस्टिमनं. या मरणाच्या उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात,  त्यांना वाचवणं शक्य आहे, पण त्यासाठी त्यांची गरज आम्हाला सिस्टिमला सिद्ध करुन दाखवता आली पाहिजे, अजुन तीस दिवस उरले आहेत. काहीतरी करणं भाग आहे, काय ते कळत नाहीये. मिनानं आत्महत्या केली नाही, ती रात्री परत आली. कुठं गेली होती ते विचारलं, काही बोलली नाही. मी माझ्या बेडकडं जात होतो तेंव्हा माझ्या मागं आली, मला घट्ट पकडलं मागुन आणि सोफ्यावर आणुन ढकललं. मला काहीच समजेना. आज तिनं पुन्हा ते बंगाली कुंकु लावलं होतं. दोन वर्षात तिची पोनी जाउन केस चांगले खांद्याच्या खालपर्यंत आले आहेत, कधी लक्षात आलं नव्हतं पण आज आलं. पण माझ्याकडं पाहताना भेसुर वाटली नाही उलट डोळ्यात कुणावर तरी  उपकार करत असल्याची भावना दिसत होती.
' तुला ड्राय बनवु का कॉकटेल' तिनं विचारलं,' आज एंजॉय करायचं आहे आपल्या जवळच्या कुणाचं तरी मरण, आज मी प्रेतासारखं नाही तर मित्रासारखं वागणार आहे तुझ्याबरोबर' व्होड्काचे दोन ग्लास हातात घेउन येत ती बोलत होती. ' तुला काय वाटलं असतं रे, तुझ्या बहिणीच्या घराखाली मेमॅवेचा जनरेटर लावला असता तर, त्या एका न दिसणा-या वलयानं तुझ्या घराची विट अन विट हादरवुन तोडली असती, एखाद्या बिमच्या खाली तुझी बहिण चिरडली असती, तुझी आवडती पल्सार, किती तुकडे होउन पडली असती का तिला आग लागेल रे लगेच. ....' बराच वेळ ती बडबडत होती. काही काही कल्पना तर एवढ्या भयंकर होत्या की मला खरंच भीती वाटायला लागली, शाल्मलीबद्दल हे ऐकवेना. जेंव्हा ती थांबली तेंव्हा तिला सांगितलं' असं काही होणार नाही माझ्या घराला, माझा अंदाज खरा ठरला मेमॅवेचा, गेल्या महिन्यात मी दररोज पाच मिनिटं शाल्मलीला समजावलं आहे त्याबद्दल आमच्या कोड मध्ये. आता माझं घर मेमॅवेप्रुफ झालं आहे. तुझी घाणेरडी स्वप्नं कधीच पुर्ण होणार नाहीत.  शाल्मलीला पाणी पिणं बंद कर हे सांगणं मला शक्य नव्हतं. म्हणुन मग मीच पहिल्यापासुन पाण्यात विष घालायच्या प्लॅन मध्ये फॉल्ट ठेवत गेलो. आणि शेवटी मला हवं ते मिळवलं. तुला माझ्या  क्षेत्रात एवढं तज्ञ व्हायचं होतं की तु प्रत्येक गोष्ट काळजीपुर्वक करत गेलीस आणि मग माझ्या ट्रॅप मध्ये अडकत गेलीस. आता या मधुन मी तुला सोडवु शकतो पण एका अटीवर. '
' माझं शरीर हवंय तुला, पण मिळणार नाही अजिबात अगदी माझ्या आईबाबांच्या बदल्यात देखील नाही' तिच्या बोलण्यात निर्धार होता, ' आणि तु असं काहीतरी करशील याची मला कल्पना होतीच, अरे तुझी सिनियर आहे मी, या खेळाचे, सिस्टिमचे  नियम तुझ्यापेक्षा जास्त माहित आहेत मला. आपले फोन बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी मी शाल्मलीला निरोप दिला आहे, आपण लग्न करणार आहोत आणि तयारीसाठी तिला माझ्या घरी जायला सांगितलं आहे. पाच सहा दिवसांनी ती तिकडे जाणार आहे.' मंदशी हसत ती खाली बसली. आणि मी तर तुला यातुन सोडवु पण शकत नाही. सॉरी ज्युनियर. माझं डोकं अजिबातच कामातुन  गेलं, तिला जीवे मारावं असा विचार करुन मी उठलो पण ती माझ्यापेक्षा चपळ निघाली, मी तिला पकडेपर्यंत ती तिच्या बेडवर पोहोचली अन लेसर ट्रॅप सुरु केला. हताश होउन मी तिथंच खाली बसलो, सगळं हरलो होतो मी.  'आणि आता ऐका आजच्या परिस्थितीला अनुरुप गाणं याचे निवड कळलीय श्री.प्रवीण यांनी' रेडिओवरच्या निवेदिकेसारखा आवाज तिनं काढला आणि मग गाणं म्हणायला लागली ' तुझ्या गळा माझ्या गळा गुंफु मोत्यांच्या माळा, तुज कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला, ह्हे तुझ्या गळा माझा गळा ' .........
Sunday, October 21, 2012

क क कपलचा - भाग १० (अंतिम)


स्मिता साधा सरळ विचार करत होती, ही असली पोचलेली बाई, हिनं दुसरा कुणीतरी गाठला असेल असा, पण स्व:त प्रेमात पडुन लग्न केलेल्या नव-याचा असा अपमान केला असेल असं तिला वाटलं नव्हतं, आणि असं का वाटलं नाही याचं तिलाच आश्चर्य वाटत होतं ' एवढ्यावरुन सरांनी तुला घटस्फोटाची मागणी केली, खरं नाही वाटत मला ' स्मितानं तिची शंका बोलुन दाखवली. अनुजा हसली ' सगळ्यांना असंच वाटतं, आजसुद्धा, जाउ दे, चुका माझ्या सुद्धा झाल्याच, ए असं करा आता जेवुनच जा, दोघंजण, आमच्या घरी आलात खरं पण घरचं जेवलाच नाहीत, काल केटरर होता आज आपण बाहेरच जेवलो, पुन्हा हर्षद रागवेल मला ' असं म्हणत अनुजा उठुन किचनकडे गेली.
तिच्या मागंमागं जात स्मितानं विचारलं ' किती वाजता येतात गं? ' दाळ तांदळाचे डबे काढत अनुजा म्हणाली' आठ साडेआठ तरी होतात, मला तरी अजुन कुठं याचं टाइमटेबल माहित झालंय, तीन महिने तर झालेत लग्नाला' ' म्हणजे अजुन दोन तास आहेत तर ' समोरच्या ड्ब्यातल्या शेंगा उचलत स्मिता बोलली. ' हो तेवढ्यात आपलं बोलुन होईल सगळं, तु नको काळजी करु आता थोडंच राहिलंय.' तांदळाचं भांडं नळाखाली धरत अनुजा बोलली, त्या पाण्याच्या आवाजात तिच्या बोलण्याचा रोख नक्की कसा आहे ते स्मिताच्या लक्षात आलं नाही. ' असं ही केसबद्दल मी फार बोलणार नाहीये, तो विषय बोलायचा नाहीये मला, मळमळतं मला ते वाद अन चर्चा आठवल्या की' दाळ धुता धुता अनुजानं क्लिअर केलं. ' पण ते वाद अन चर्चा तुम्ही जे करत होता आणि बघत होता त्याबद्दलच होत्या ना, खुशीनं असुदे कि जबरदस्तीनं तुम्ही दोघंही जे करायचा, जे पाहायचा, जे अनुभवायचा किंवा ज्याची कॉपी करायचा, त्यावरच चर्चा व्हायची ना ? स्मिताचा प्रश्न ऐकुन अनुजाच्या हातातलं दाळीचं भांडं कुकरमध्ये पडलंच, का माहित नाही या बाजुनं तिनं कधी विचारच केला नव्हता.
' हो, म्हणजे तसंच आहे थोडंफार, पण ते पाहणं आणि करणं आमच्या घरात होतं, घरातच काय घरातल्या पण एका खोलीत होतं, आमच्या दोघांत होतं, तिथंच सुरु व्हायचं अन तिथंच संपायचं, त्या सगळ्याचा असा बाजार मांडला गेला त्याचं दुख: जास्त आहे. सरांनी मला enjoy करायचा ऑप्शन दिला तो मी जमेल तेवढा स्विकारला होताच मग त्यांना improve करायचा ऑप्शन स्विकारायला काय अडचण होती ?' वाईट याचं वाटतं की, एक बाई म्हणुन मी होणारा अन्याय सुद्धा आनंद म्हणुन स्विकारला पण त्या बदल्यात मला त्या पातळीचा आनंद मिळावा ही माझी इच्छा सुद्धा पुर्ण होउ नये याचं, समोरचा तुम्हाला चाबकानं मारणार असेल तर, मार खायची तयारी आहे, पण मारताना किमान त्याचं पेटुन उठलेलं शरीर दिसावं,त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेलं असावं आणि प्रत्येक फटक्याच्या आवाजाबरोबर रागानं येणारा त्याचा आरडाओरडा तरी ऐकु यावा असं मला वाटतं, enjoy करायचा आहे तर मग त्या अन्यायात पण काहीतरी थ्रिल नको का ? , हे असलं लॉ़जिक स्मिताच्या डोक्याबाहेर चाललं होतं. तिनं अनुजाच्या समोरुन कांदे अन बटाटे घेतले अन चिरायला सुरु केले. बराच वेळ दोघीजणी आपल्या घरातल्या स्वयपाकाच्या पद्धती आणि चवी यावर बोलत होत्या. तासाभरात स्वयपाक झाला, दोघी हातात कॉफीचे मग घेउन हॉलमध्ये येउन बसल्या.
'तुमच्या केसमध्ये हर्षद कसा काय आला ?' ब्रेक नंतर स्मितानं पुन्हा गाडी मुळ विषयाकडं नेली. ' केस फॅमिलि कोर्टात होती तोपर्यंत काही संबंधच नव्हता हर्षदशी, चार महिने झाले होते केस करुन तेंव्हा सरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, आणि लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीत माझं नाव होतं, त्यावेळेला चौकशीला पोलिस घरी आले तेंव्हा हर्षद पहिल्यांदा भेटला. सर तर वाचले, पण हे नवं लचांड माझ्या मागं लागलं, अर्थात माझ्या वकिलांनी याचा देखील उपयोग करुन घेतलाच घटस्फोटाच्या केसमध्ये, त्यामुळं माझी सुटका जरा लवकर झाली एवढंच,पण या चौकशीच्या निमित्तानं हर्षद भेटत राहिला, आमचं बोलणं होत राहिलं आणि आम्ही प्रेमात पडलो एकमेकांच्या. माझं सगळं प्रकरण हर्षदला माहित होतंच, आणि त्यानं प्रामाणिकपणे कबुल केलं की त्याला सुद्धा अशा गोष्टीचंच जास्त आकर्षण आहे,' तिचं बोलणं तोडत स्मितानं विचारलं ' आणि तुलादेखील एक पुरुष हवा होताच, हो ना?' दोन सेकंद गप्प राहुन अनुजा थोड्या चढ्या आवाजात बोलली, ' हो मला हवाच होता पुरुष, का हवा असु नये, तुझा नवरा आठ दिवस गावाला गेला, तर तुला नाही काही वाटत, महिन्यातलं चार दिवस लांब राहणं पुरुषांच्या जीवावर येतं, तर एक वर्ष सुखापासुन लांब राहिले होते मी, उलट मलातरी वाटतं की मी याबाबतीत फार संयम बाळगला, आम्ही वेगळं राहायला लागल्यानंतर एक दोन वेळा सरांनी माझ्या रुममध्ये घुसायचा प्रयत्न केला होता, माझी केस बघणारा पहिल्या वकीलानं पण फासे टाकुन पाहिले होते, एक वेळ अशी आली होती की, जाउदे मला बोलायचंच नाही आता त्याबद्दल.' एवढं बोलुन अनुजा मग ठेवायला किचनमध्ये गेली.
हर्षद आणि शरद एकत्रच आले, दोघी अजुन घरच्याच कपड्यात होत्या, आल्या आल्या शरदनं घरी जायची गडबड सुरु केली, पण स्वयपाक तयार आहे हे कळल्यावर त्याचा नाईलाज झाला, सगळुयांनी एकत्र बसुन जेवण केलं, जेवण झाल्यावर हर्षद खाली पान आणायला गेला, तो परत येईपर्यंत स्मिताचं आवरुन झालं होतं, ती दोघं निघायच्या तयारीत होते, पुन्हा भेटायच्या आमच्या घरी या ना एकदा असल्या गप्पा झाल्या अन अकराच्या सुमारास घराचा दरवाजा लावुन हर्षद आता आला, तेंव्हा अनुजा बेडवर बसुन होती, समोरच्या भिंतीकडं पहात ' यापुढं घरात कुणलाही बोलवायचं नाही, काहीही झालं तरी, समजलास ' तो आत आल्याचं जाणवताच ति अक्षरशः ओरडलीच त्याच्या अंगावर ' नालायक साले सगळे, दुखावर औषध तर नसतंच कुणाकडं पण पट्ट्या काढुन किती लागलंय ते पहायला फार आवडतं सगळ्यांना हराखखोर कुठले एकजात ', अनुजा दिवसभराचं ओझं उतरवुन ठेवल्यासारखं बोलली, ' होय, खरंय आणि तु सुद्धा अल्बम उघडुन बसली असशील दिवसभर हा माझा अन्याय, हा माझा न्याय करत, मानसिक आजार झालाय तुला, कुणीतरी लागतं तुझ्या अन्यायाबद्दल वाईट वाटतंय म्हणणारं तुला जवळ घेउन थोपटणारं, तुझंच खरं,तुझंच बरोबर असं म्हणणारं, आणि असं झालं नाही की तुला अ‍ॅटॅक येतो अन्यायग्रस्त असल्याचा मग जाहिरात करावीशी वाटते. इथं आल्यापासुन एक निकाळजे काकु भेटल्या होत्या, आता ही एक झाली. बेडवर आडवं पडत हर्षद बोलला.
बराच वेळ दोघं घुसमटुन झोपली होती, मग दोघांनाही कधीतरी शांत झोप लागली असावी. सकाळ झाली तशी दोघंही सवय लागल्याप्रमाणे उठली अन नेहमीच्या कामाला लागली, हर्षदचं आवरुन होईपर्यंत अनुजानं त्याचा डबा करुन हॉलमधल्या टिपॉयवर ठेवला, तो बाहेर येउन बुट घालायला लागला तसं किचनच्या दारातुनच अनुजानं विचारलं ' केसचं कुठपर्यंत आलंय, कधी निकाल लागेल काही कळालंय का?' 'बघतो आज, जाउन येतो पांढरेकडं', डब्याची पिशवी उचलुन हर्षद निघुन गेला. अनुजा दरवाजा लावेपर्यंत निकाळजे काकु समोर आल्या. ' पाहुणे राहिले होते वाटतं काल पण?' मग अर्धा तास दोघींच्या दारगप्पा झाल्या, अनुजा आत येउन बेडवर पडली अन तिनं आईला फोन लावला, पुजेच्या दिवसापासुन तिचं बोलणंच झालं नव्हतं. एक तास भर ती बोलत होती. कंटाळा आल्यावर फोन ठेवुन तशीच झोपुन गेली. संध्याकाळी हर्षद आला, त्याला वकीलाकडं जाणं जमलं नव्हतं, सकाळचं गरम करुन संपवलं अन दिवस संपला. असे बरेच दिवस संपले, रात्री काही जागत काही पेंगत तर काही वाट बघण्यात गेल्या. चार महिन्यांनंतर पुन्हा केसची तारीख पडली, हर्षदनं दोन दिवस रजा काढली, एक दिवस आधी अन दुसरा केसचा दिवस कोर्टात गेला. फारसं महत्वपुर्ण काही झालं नाही, पण एक झालं की सरांच्या वकीलानं फारसं ताणुन धरलं नाही, अजुन एक दोन तारखांत केस सुटेल असं वाटायला लागलं.
आताशा दोन वर्षे झालीत, अनुजा आणि हर्षदचं तसं बरं चाललंय, ज्या एक दोन तारखांत केसचा निकाल लागायचा होता त्या अजुन आलेल्या नाहीत. केसचा निकाल लागेपर्यंत अन स्वताचं घर होईपर्यंत मुल होउ द्यायचं नाही असा निर्णय दोघांनी घेतलाय. मध्ये एक दोन वेळा अनुजाची आई गुपचुप येउन गेली घरी. हर्षद्च्या घरचं अजुनही कुणी येत नाही. तो दोन वेळा घरी जाउन आला, घराला पैसे हवे होते तेवढ्यापुरतं घरानं जेवण पाणी विचारलं, तो तेवढ्यावर खुश आहे, निदान तसं दाखवतो तरी, अनुजा पण त्याला या विषयावरुन काही बोलत नाही. स्मिताला एक मुलगा झाला, पण तिनं अनुजाला बारशाला येउ नको असं सांगितलं फोनवरुन,रडतच पण स्पष्ट सांगितलं होतं. हल्ली अनुजा सुद्धा या सगळ्याचं वाईट वाटावं याच्या फार पुढं गेली आहे किमान दिवसभर तरी, मग जेंव्हा असह्य होतं तेंव्हा फिल्म्स बघते पुन्हा जुने दिवस आठवतात, त्याकाळची गरिबी आजची श्रीमंती याची नकळत तुलना करते, आणि पुन्हा मागचं सगळं विसरायचा प्रयत्न पहिल्यापासुन सुरु करते. त्या जागलेल्या रात्रीचा आनंद पुढं चार दिवस टिकतो.
नोकरीतल्या पगारात घर घेणं शक्य नाही, वरच्या पैशात घेतलं तर दुस-या दिवशी अँटीकरप्शनवाले धरुन नेतील या भितिनं हर्षद घर घ्यायचं टाळतोय. यावर्षी गाडी घेतली खरी, एक सेकंड हँड स्कॉर्पिओ. पण साहेबच अल्टो घेउन येतो म्हणल्यावर स्टेशनला गाडी घेउन जायला अवघड होतं, मग 'कल भी आज भी' बजाज पल्सर उपयोगी पडते. नाही म्हणायला अनुजा चार गल्ल्या पलीकडे दळण न्यायला आणायाला गाडी घेउन जाते. दळणाच्या खर्चापेक्षा डिझेलचा खर्च आणि दळणाच्या वेळापेक्षा ती गाडी काढण्या घालण्याचा वेळ हेच जास्त आहेत. वर कॉलनीतल्या गिरणीवाल्याला 'असलं' गि-हाईक तुटल्याचं वाईट वाटतं. दोन वर्षात घरी बाहेरचं कुणी फारसं आलं गेलेलं नाही. घरगुती अडिनडीला निकाळजे काकु आहेतच. सोनवणे मॅडमनी केस पांढरे वकीलांना दिली तेंव्हा त्या समजवायला आल्या होत्या, त्यांच्या घरच्या एक दोन पार्ट्यांना अनुजा गेली होती.
एकुणात म्हणलं तर बरं चाललंय. वातीला काजळी पकडली असली तरी कंदिलाची वरची काच स्वच्छ आहे, खालच्या रॉकेलमध्ये कचरा आहेच, वेळ दिला तर तो साफ करता येईल पण तेवढी आज गरज नाही म्हणुन वेळ असुन देखील कुणी ते करत नाही, पण कधीतरी धक्का लागतोय, रॉकेल डहुळतंच आणि मग वात खाली वर करुन उजेड वाढवायची खटपट केली जाते. वातीत अडकलेला कचरा जळुन जातो, उजेड वाढतो. आता हवाय तेवढा पडतो. आणि तेवढ्यावर सगळे समाधानी आहेत कंदिल पण, वात पण आणि रॉकेल पण.
Print Page

Wednesday, September 26, 2012

क क कपलचा - भाग ०९

पाणी प्यायला उठत अनुजानं विचारलं ' शरद मारतो ना ग तुला, तु असं नाही म्हणालीस तर ?' - पुढे चालु....
अनुजानं तिची कथा सांगावी आपण ऐकत रहावी, कथा संपली की तिच्या दुखा:बद्दल दोन अश्रु ढाळावेत, तिच्यात नसलेल्या अन आपल्यात नसलेल्या धैर्याबद्दल थोडी चिडचिड करावी अन निघुन जावं, असा सरधोपट विचार स्मिता करत होती, पण ऐकता ऐकता आपण यात एवढं रंगुन जावु याची तिला कल्पना नव्हती, आणि या अनोळखी क्षणी ती बोलुन गेली ' हो, ब-याचदा', देवळाबाहेरची घंटा निशब्द अडकुन असते पण कुणीतरी नाद केला की आपल्याच आवाजानं थरारुन जाते तशी स्मिता थरारली, काहीतरी बोलु नये असं बोललं गेलंय ते सावरण्यासाठी ' म्हणजे याचसाठी असं नाही, बाकीही बरीच कारणं असतात, त्यांची ड्युटीच तशी आहे ना, दिवसभर चौकात उभं रहायचं केवढं टेन्शन असतं गं,' तिच्या सावरासावरीचं अनुजाला मनापासुन हसु आलं, कसंबसं तोंडातलं पाणी गि़ळुन ती हसायला लागली. ' माझ्यापासुन काय लपवतेस तु स्मिता, अगं वरच्या पाट्या वेगळ्या असतात, आत सगळ्या एस्ट्यांच्या सीट फाटलेल्याच असतात, तुला हवंय का पाणी ?' स्मिताला हवंच होतं, ती पाणी पित असतानाच अनुजानं विचारलं' एक सांगु स्मिता तुला, निदान माझ्याबरोबर तरी उघड उघड बोल, काही सांगणार नाही मी ना हर्षदला ना शरदभावोजीना, केसच्या ८ महिन्यात कुणाला कधी काय आणि कसं सांगायचं आणि काय लपवायचं हे चांगलं समजलं आहे मला.'
' पण नक्की कसली केस झाली होती, तु तक्रार केलीस का पोलिस स्टेशनला सरांबद्दल ?' स्मितानं पुढचा प्रश्न विचारला, ' हं, छे ग, मी काय जाणार होते तक्रार करायला, आणि कशाची तक्रार करणार होते, माझा नवरा असं वागतो, असं करतो, तसं करायची जबरदस्ती करतो अशी, कोण ऐकणार होतं माझं, उलट तिथंच माझ्या चारित्र्याचा पंचनामा मांडला असता, आणि माझ्या मागं त्यावरुन मनमुराद हसले असते, शेवटी हे झालंच कोर्टात, काही टळलं नाही नशिबातलं.' या विषयावर तिला फार बोलायचं नव्हतं, पटकन उठुन ती निघुन बेडरुम मध्ये गेली, दार आतुन बंद करुन घेतलं. स्मिताला काय करावं हेच सुचेना, तिनं भेदरुन बेडरुमच्या दरवाजावर थापा मारत अनुजाला हाका मारायला सुरुवात केली, दोन तीन मिनिटं गेली, अनुजा बाहेर आली, रडुन ओला झालेला चेहरा कोरडा केल्याचं दिसत होतंच. स्मितानं तिचे दोन्ही हात हातात घेत ' सॉरी ग, माझंच चुकलं, हा विषयच काढायला नको होता मी, ' असं सांत्वनाचा प्रयत्न केला. ' असु दे गं, कधीतरी आपली दुख: उगाळायला सुद्धा बरं वाटतं, आणि ज्या दुखातुन सहिसलामत बाहेर पडतो ती दुख: तर जास्तच आठवतात आपल्याला' अनुजा तोंड धुवायला बाथरुम मध्ये गेली. ती बाहेर येत असतानाच स्मितानं तिला विचारलं ' इतर वेळी बरा धीर दाखवतेस, केसचा विषय निघाला की फार अवघडतेस एकदम, का ग?'
'घरातली दुख: कितीही मोठी असली तरी घराच्या चार भिंतीत फार छोटी असतात, जेंव्हा त्यांच्या बाजार मांडला जातो तेंव्हा असहय होतं सगळं. मला माझ्या लग्नाच्या नव-यानं आमच्या घरात काय करावं आणि काय नाही हा आमच्या दोघांच्या मधला व्यवहार होता, खुशीचा असेना का जबरीचा असेना, पण जेंव्हा जग यात तोंड खुपसायला लागतं, तेंव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या आहेत ते जाणवायला लागतं, आणि नसतील तरी हे जग त्यांच्या मोठेपणा तुमच्या नजरेसमोर असं नाचवत राहतं की तुम्हाला तुमच्यातलं नसलेलं खुजेपण टोचायला लागतं, नुसतं टोचतच नाही तर जगणं नकोसं करतं, फुग्याच्या आत टाचणी घालुन फुगा फुगवला तर आतल्या टाचणीला कसं वाटेल, तसं वाटायला लागतं. फुग्याच्या आत टाचंणीला सुरक्षित वाटतं, पण हा सुरक्षेचा घेराव आपल्यामुळंच फुटणार आहे ही भीती सुद्धा असते प्रत्येक क्षण जगताना, प्रत्येक हालचाल करताना. स्वताचे अस्तित्व जपायचं आणि फुगा फुटणार नाही याची काळजी घेत जगणं फार मुश्किल असतं. केसच्या सुरुवातीच्या दिवसांत सरांना बहुदा केस करुन आनंद मिळत होता, मला धडा शिकवल्याचं समाधान वाटलं, माझ्या चारित्र्यावर संशय घेउन मी दिलेल्य त्रासाचा, मी केलेल्या अपमानांचा बदला घेतल्याची भावना त्यांना सुखावुन जात होती, पण जसजशी केस पुढं पुढं गेली तसं तसं त्यांनासुद्धा चटके बसायला लागले' अर्धवट निघालेल्या खपलीवर मलम लावलं की जीवाला शांतता लाभते तसं झालं अनुजाला, एका दमात एवढं सगळं बोलुन गेल्यावर.
दोघी जणी हॉलमध्ये बसल्या होत्या, 'म्हणजे तुला काय म्हणायचंय, कळलं नाही मला' स्मितानं पुन्हा प्रश्न केला ' आपण बायका फुगा असतो का टाचणी, की आपला संसार हा फुगा असतो आणि आपण टाचणी, समजलं नाही मला.' अवघडलेले हात मोकळे करायला आळस देत स्मितानं विचारलं. काही क्षण शांतता पसरली आणि मग अनुजानं विचारलं ' का ग, आपण बायकाच प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यावर ओढुन घेतो, का वाटतं तुला हा संसार म्हणजे फुगा आणि आपण त्यात अडकलेली टाचणी आहोत, असं का नाही वाटलं की फुगा म्हणजे संसार असेल आणि टाचणी म्हणजे पुरुष, प्रत्येक वेळी संसार फुटणं किंवा न फुटणं ही जबाबदार बाईचीच का असते किंवा बाई ती ओढुन का घेते आपल्या डोक्यावर ?' का नाही पुरुषाकडं त्या नजरेनं पाहिलं जात, का त्याला गुन्हेगार केलं जात नाही, या समाजानं नाही केलं हरकत नाही पण आपण बायका तरी का अशा समजुतीत राहतो, नुकसान कुणाचं होतंय अशानं आपलंच ना ? ' स्मिताकडं या प्रश्नांची उत्तरं नसावीत अशा नजरेनं तिच्याकडं पहात अनुजानं आपलं बोलणं थांबवलं, ' वाचलीत, मी सुद्धा असली स्त्रिमुक्ती वाल्यांची पुस्तकं वाचली आहेत, थेट त्यातलीच वाक्यं बोलतेस तु, तुझ्या केसमध्ये कुणी होतं का स्त्री जागरण मंचवालं ?' वर्गातल्या ढ विद्यार्थ्याला एखादा प्रश्न विचारुन त्याची जिरवायची असा विचार करुन एखादा नवीन मास्तर वर्गात येतो आणि नेमका त्याच दिवशी तो विद्यार्थी आख्खं अपेक्षित पाठ करुन आलेला असतो, मग मास्तरला कसं वाटतं, तसं अनुजाला झालं, या प्रतिप्रश्नाची अपेक्षाच नव्हती ठेवली तिनं.
' चहा करु का कॉफी ग, काय घेणार तु?' वेळ उलटी आली की विषय बदलायचा हे बायकांना जन्मजात येतच असतं आणि त्यात केसचा अनुभव यामुळं असं करणं अनुजला फार अवघड गेलं नाही, दोघी उठुन किचनमध्ये गेल्या, स्मितानं कॉफी करायला घेतली तशी अनुजा निवांत खुर्चीवर बसली ' किती छान वाटतं ना आपल्याच घरात कुणीतरी फुकट बसवुन चहा करुन देतंय ते, मला तर फार बरं वाटतं, पण आमच्याकडं कुणी येतंच नाही असं करुन द्यायला' कॉफि साठी दुध गरम करायला ठेवुन स्मिता कट्ट्यावर बसत स्मितानं विचारलं ' केस नक्की कसली झाली होती, म्हणजे केली होतीस तु ?' अनुजा हसली, थोडंसं असहाय वाटेल असं हसु होतं, ' मी केली, सांगितलं ना तुला, मी नव्हती केली केस, सरांनी केली होती केस, आणि केस कसली घटस्फोटासाठी अर्ज केला कोर्टात, एकतर्फी', स्मिता जवळ जवळ ओरडलीच, त्याला उतु जाणा-या दुधाच्या चरचरण्यानं साथ दिली, गॅस बंद करता करता तिनं विचारलं ' काय, हे असं घाणेरडं वागुन, तुला एवढा त्रास देउन त्यांनीच घटस्फोटासाठी अर्ज केला, नालायक मनुष्य असणार नक्कीच, शिक्षक म्हणायच्या लायकीचा नसणारच तो, हरामखोर कुठला, लाज नाही वाटली असं करायला त्याला' कळत नकळत स्मिता एकेरीवर आली होती. ' काही म्हण हे असंच झालंय, एके दिवशी सर वकिलाकडुन दोन सेट घेउन आले परस्परसंमतीने घटस्फोटाचे त्यावर सही करुन दे असं सांगितलं, मला वाटलं होतं की त्यांना जे हवंय जसं हवंय ते दिल्यावर ते समाधानी असतील, माझ्या मागण्या सोडुन द्यायची मी तयारी दाखवली, त्यांच्या हातापाया पडुन झालं, रडुन झालं, काही उपयोग झाला नाही. त्या रात्री सर बेडरुम मध्ये झोपले एकटेच, मी रात्रभर हॉल मध्ये जागी होते, दोन तीन वेळा पळुन जायचा विचार केला, दरवाज्यापर्यंत आले, दरवाजा उघडला पण मागं फिरले.'
' का, एवढा चांगला चान्स होता त्या नरकातुन बाहेर पडायचा मग का नाही पळुन गेलीस ?' स्मितानं कॉफिचा कप अनुजाच्या हातात देत विचारलं ' मोह असतो, सगळे रस्ते बंद झाले तरी एक नविन रस्ता असेल जवळ्च कुठंतरी अशी आशा असते आणि खरं सांगु मला वेड लागलं होतं, व्यसन लागलं होतं सुखाचं, या शरीराचे लाड करुन घ्यायचं ते सुटणं अवघड होतं, फरक एवढाच होता की पुरुष हे उघड व्यक्त करतात या ना त्या मार्गानं स्त्रीला ते शक्य होत नाही किमान आपल्याकडं तरी, जेवढं मिळेल तेवढ्यात सुख मानायची सवय लागलेली असते किंवा लावलेली असते, माझी ती सवय बदललेली होती आणि एकदा पायवाट सोडुन रान तुडवायला सुरुवात केली की सुरुवातीला टोचणारे काटे नंतर सुखावायला लागतात, प्रत्येक वेळी पाय समजुन उमजुन काट्यांवर पडायला लागतो, माझं तसं झालं होतं. शेवटी व्यसन ते व्यसनच आणि मी त्यात अडकले होते. आठ दिवस सर काहीच बोलले नाहीत घरात जेवण पण करत नव्हते, आणि एक दिवस संध्याकाळी त्यांनी सांगितलं की त्यांनी एकतर्फी केस दाखल केली आहे आणि उद्यापासुन ते वेगळं राहणार आहेत, माझ्या जगण्या खाण्याची सोय माझी मी पाहायची आहे' कॉफि संपवुन दोघी पुन्हा गॅलरीत येउन बसल्या, स्मितानं विचारलं' पण घटस्फोटासाठी नक्की काय कारण दिलं होतं सरांनी, म्हणजे असं नुसतंच हवाय म्हणुन घटस्फोट मिळत नाही ' अनुजा ह्सली ' तुला ग काय माहित घटस्फोटाबद्दल एवढं, शरदनं कधी ऑफर केला होता का, का तुच घेतली आहेस माहिती याबद्दल,' आपण प्रश्न विचारुन चुकतोय आणि फसतोय हे समजुन सुद्धा आपण असे प्रश्न का विचारतो हे स्मिताला कळत नव्हतं. ' कारण ना, विवाहबाह्य संबंध असणे, थोडक्यात चारित्र्य वाईट असणे हे प्रमुख कारण होतं, त्यामुळं संसाराकडं दुर्लक्ष, मुल होउ न देणं वगैरे वगैरे गोष्टी त्यातच आल्या त्यानंतर'
थोडंसं चाचरत स्मितानं विचारलं ' पण तु म्हणतेस तसं तुला लागलेलं हे व्यसन पुर्ण करायला तु कोणताही मार्ग अवलंबले असतील, विस्तु असल्याशिवाय धुर नाही येणार ना, सरांना संशय आला असेलच तुझं वागणं पाहुन' अनुजानं थोडं चिडुन विचारलं ' का ग का संशय यावा, ज्याच्या जोरावर ते मला उपभोगायचे किंवा मी तसं सुख द्यावं अशी त्यांची अपेक्षा होती त्याच मार्गांनं मी त्यांना सुख मागत होते यात माझं काय चुक होतं, त्यांचं वागणं पाहुन मला संशय आला होता पण त्याचं मुळ कशात आहे ते मी शोधुन काढलं आणि तोच मार्ग अवलंबला म्हणुन असले आरोप करायचे, ते ही थेट घटस्फोटासाठी' तेवढ्यात बाहेर दरवाजा वाजला, अनुजा बाहेर गेली तसं स्मितानं धीर गोळा केला ती परत आली की तिला काहितरी विचारण्यासाठी. ' कसलीतरी वर्गणी मागायला आले होते ' बेडरुममधला लाईट लावत अनुजा बोलली ' ये ना इथंच बसु, गॅलरीचा दरवाजा बंद करावा लागेल नाहीतर डास येतात घरात ' स्मिता दार लावुन आत आली, बेडवर बसत तिनं विचारलं ' पण तु देखील नक्की काहीतरी केलं असणारच त्या शिवाय ह्या थराला सर जाणार नाहीत, कारण बघ तु बरंच काही मागत होतीस तरी त्याबदल्यात त्यांना जे हवंय ते मिळत होतंच ना, मग ?' ' बरोबर पकड्लंस, ' अनुजा खाली जमिनीवरच बसत म्हणाली , ज्या दिवशी सरांनी घटस्फोटाचे अर्ज आणले त्या आधी दोन दिवस आम्ही रात्र जागवली होती, शेवट त्या दिवसांत व्हायचा तसं माझ्या रडण्याऐवजी सरांच्या चिडण्यात आरडा ओरडा करण्यत झाला होता, ते निघुन हॉलमध्ये गेले, आणि सकाळी जेंव्हा ते निघाले तेंव्हा मी त्यांच्या हातात एक जाहिरात ठेवली होती पेपरमध्ये आलेली ' अपने खोये हुवे पौरुषत्व की पुनप्राप्ती के लिये हमारे पास आये अक्सीर इलाज सिर्फ तीन दिनोमे' आणि म्हणलं ''when you cannot avoid it, try improving it'Print Page

Thursday, September 13, 2012

सहल - श्री गोंडेश्वर पंचायतन सिन्नर.

दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे.
प्रचि.१

प्रचि.२

प्रचि. ३

यौवनाची दोन रुपं, एक शतकांपुर्वी दगडांत उतरवलेलं दुसरं जिवंत पण दगडातलं देखील तेवढंच जिवंत..
प्रचि.४

प्रचि. ५

प्रचि. ६

प्रचि. ७

प्रचि.८

प्रचि.९

प्रचि.१०

प्रचि. ११

हे मंदिर संपुर्ण फिनिश केलेलं नसल्यानं हेमाडपंती बांधकाम पद्धतीचा अभ्यास करणं इथं शक्य आहे.
प्रचि. १२

प्रचि. १३

प्रचि. १४

प्रचि. १५

प्रचि. १६

संपुर्ण मंदिराला ह्या हत्तीशिल्पांनी उचलुन धरलेलं आहे,
प्रचि. १७

प्रचि. १८

एकतर काम अपुर्ण राहिलंय किंवा ही मंदिरं त्याकाळची आर्किटेक्ट किवा इंजिनियरिंग किंवा आर्टस कॉलेजेसची ऑन साईट प्रयोगशाळा असावीत बहुधा.
प्रचि. १९

प्रचि. २०

प्रचि. २१


हे मुख्य मंदिराचं शिखर
प्रचि.२२

बहुधा दगडाच्या क्वालिटिमुळं देखील इथलं नक्षिकाम पुर्ण होउन अपुर्ण वाटतंय, निसर्गाचा परिणाम जास्त जाणवतोय...
प्रचि. २३

प्रचि. २४

प्रचि. २५

प्रचि. २६

प्रचि. २७

प्रचि.२८

हा सादर मानाचा मुजरा त्याकाळच्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सना, आणि अर्थात त्या प्रत्येक मजुराला ज्यानं हे काम धर्मासाठी केलं का पोटासाठी केलं का मरणाच्य भितीपोटी केलं माहित नाही, पण का करतोय या पेक्षा कसं करतोय याचं जास्त भान ठेवुन ह्या कलाकृतीला जन्म दिला, निसर्गातल्या दगडांना एक नविन रुप दिलं एक व्याख्या दिली, जगण्याची दिशा दिली, जगण्याचा आशय दिला.

हे सगळं घडताना तो निसर्ग पाहात होताच, तो या सगळ्यांचा बाप, पिता, पितामह , प्रपितामह का त्याहुनही मोठा, एखाद्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडं आलेल्या चिल्यापिल्यांनी संध्याकाळी खेळुन दमल्यावर हात पाय धुवुन देवासमोर बसुन शुभंकरोती म्हणुन संपवावी, आणि मग एक क्षण शांतता अनुभवावी तेवढ्यात बाहेरच्या ओट्यावरुन आजोबांचा आवाज घुमावा एखादं मोठं अवघड स्त्रोत्र म्हणणारा हा जो अनुभव आहे.. तो दुस-या भागात.

प्रवासमाहिती
स्थळ - श्री शिवगोंडेश्वर पंचायतन देवस्थान, सिन्नर.
प्रवाससोय - सिन्नर गाव हे नाशिक - पुणे हमरस्त्यावर नाशिकच्या आधी ३० किमी अंतरावर आहे, पुण्याहुन जाणा-या सर्व एसटी या ठिकाणी थांबतातच, मुंबईहुन नाशिकला येउन मग पुण्याच्या बाजुला यावं लागेल,अहमदनगरकडुन येताना सुद्धा सिन्नर नाशिकच्या आधीच आहे, प्रवासाची सोय रात्री १० पर्यंत उत्तम आहे.
हा मंदिरसमुह सिन्नर गावातच पोलिस स्टेशन / कोर्टाच्या मागच्या बाजुला आहे, सिन्नर एस्टिस्टँडपासुन रिक्षाने ४० रुपये खर्च होतो, चालत गेल्यास २० मिनिटांचा रस्ता आहे.
जेवणखाण - सिन्नर औद्योगिक शहर असल्यानं इथं सर्व प्रकारचं, जेवण खाण उपलब्ध आहे, स्टँडसमोरचं पंचवटी गुजराथी थाळी ही नो रिस्क जेवणाची सोय.
सिन्नरचं एस्टि स्टँड हे एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं दिसतं निदान बाहेरुन तरी.

Print Page

Tuesday, September 11, 2012

क क कपलचा - भाग ०८


'आज मी इथंच राहतेय, ह्यांना इकडच्याच एरियात ड्युटी आहे, मला तुझी एखादी साडी देशील नेसायाला ?' स्मिताच्या आवाजात उत्साह होता, कालची अर्धवट स्टोरी तिला पुर्ण ऐकायची उत्सुकता होती. ' घे ना कपाटातली कुठलीपण' कपाट उघडत अनुजा बोलली, ' चल मी चहा टाकते'. ती निघुन गेली. एका तासात सगळ्यांच आवरुन झालं, नैवेद्याची तयारी झाली, गुरुजी आले. उत्तरपुजा झाल्यावर कालचा उरलेला शिरा खाउन हर्षद अन शरद दोघंही ड्युटीला निघुन गेले. दोघी शि-याच्या डिश घेउन बेडरुमच्या बाल्कनीत आल्या, ' तुझी अन हर्षदची ओळख कशी झाली मग ?' स्मितानं बोलायला सुरुवात केली. ' काही दिवस फार जड गेले, सरांना आधी ज्यासाठी जबरदस्ती करावी लागत होती, ते आता त्यांना सहज मिळत होतं, मी प्रत्येक गोष्ट अगदी एंजॉय करत होते असं नव्हतं पण विरोध मेला होता. दोन-तीन महिन्यात सरांना माझ्या या बिनविरोध शरणागतीचा कंटाळा आला, कॉलेजातलं काम पण वाढलं होतं, त्यामुळं त्यांच्या या संबंधातला इंटरेस्टच कमी होत गेला, आणि मी याचीच वाट पहात होते.' लिंक तोडत अनुजानं विचारलं ' तुला शिरा आणु अजुन, शिळ्या शिरा खरपुस भाजला की जास्त चवदार होतो ?' अनुजा आत गेल्यावर ती फक्त शि-याबद्दलच बोलत नाहीये हे स्मिताच्या लक्षात आलं, थोडंसं ऑकवर्ड वाटलं तिला.
अनुजा पुन्हा बाल्कनीत आली तशी स्मितानं विचारलं ' असं होण्याची का वाट पाहात होती ?' माहित असलेल्या अन कळत असलेल्या सगळ्या गोष्टी लपवायच्या कशा हे फक्त बायकांनाच जमतं बघ', थोडंसं कुत्सित हसत अनुजानं पुढं सुरु केलं' करुन करुन काय करुन घेणार होते सर माझ्याकडुन आणि किती वेळा, ह्या शरीराच्या पलीकडं बघायची शक्तीच नसणा-याकडुन काय अपेक्षा ठेवायच्या, दर रात्रीचा दहा पंधरा मिनिटांचा खेळ, नंतर माझं तोंड इकडं, त्यांचं तिकडं. सुरुवातीला मी काही दिवस रडायचे, मग ते देखील संपलं. काही गोष्टी सरांच्या देखील आवाक्यात नव्हत्या हे मला जाणवलं, आणि एकदा त्यांच्या लिमिट्स मला समजल्यानंतर मी त्यांच्याच आधारावर चाली रचायला लागले. एखादी गोष्ट बघुन त्याचा आनंद घेणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात वेगळ्या मर्यादा असतात, आणि तुम्ही खेळात जिंकु शकता खेळाचे नियम माहित झाल्यावरच, त्याआधी नाही. मी तेच केलं, नियम समजुन घेतले आणि मग त्याच नियमानुसार सरांना प्रत्येकवेळी हरवायला लागले, पुरुषाला बाकी कसलाही पराभव पचवता येतो बेडवरचा नाही, हे माझ्या लक्षात यायला लागलं, आणि मी त्याचाच फायदा घ्यायला सुरुवात केली. साहजिकच सरांची चिडचिड सुरु झाली, राग बाहेर कुठं काढावा हे समजत नव्हतं, कॉलेजात काम पडुन राहायला लागली. एकतर नोकरी नविन, त्यात असली नाटकं कोण खपवुन घेणार होतं, दोन महिन्यात त्यांची नोकरी गेली. '
दोघींचा शिरा खाउन झाला होता, किचनमध्ये चहा गरम करायला ठेवुन अनुजा तिथंच कट्ट्यावर बसली, स्मितानं हॉलमधुन खुर्ची ओढुन आणली तोवर चहा कपात ओतुन अनुजाच्या हातात कप ठेवला, त्या चटक्यानं स्मिता थोडी भानावर आली. ' पराभव म्हणजे काय करायचीस तु, कसं व्हायचं म्हणजे अजुन कुणी होतं,' स्मिता ओशाळली, आपण जरा जास्तच बोलतो आहोत असं तिला वाटलं' सॉरी हं अनुजा, तुझ्या दुखण्याबद्द्ल मी नको असं बोलायला ' अनुजाला, तिची अस्वस्थता जाणवत होतीच. छे ग कसलं दुखणं, तुला पण माहितीय किती वेळ लक्षात राहतात ही दुखणी, पहिल्या चार वेळेला अपमान वगैरे वाटतो, एकदा सवय झाली की भांडी घासण्याएवढंच साधं वाटतं सगळं, आणि तु अगदी सरांच्या सारखाच विचार केलास, अगं जो पुरुष स्वताच्या अपेक्षांच्या वजनाखाली दबुन मरायला तयार आहे त्याला मारायला दुस-या कुणाची गरजच नव्हती, ज्या मार्गानं सर अपेक्षा वाढवत होते मी सुद्धा तोच मार्ग स्विकारला, माझ्या अपेक्षा त्याच मार्गावर वाढवल्या, एका बाईनं असं करावं हे सरांना, म्हणजे त्यांच्यातला पुरुषाला पटलं नाही. पुरुषानं त्याची भुक भागवण्यासाठी स्त्रीचं शरीर वापरुन घ्यावं ह्या मानसिकतेत वाढलेल्या सरांना हे सगळं अपमानास्पद वाटत होतं, देणा-यानं देतच जावं, घेणा-यानं घेतच जावं अशी अपेक्षा ठेवुन जगणा-या सरांना देणा-यानं केलेली मागणी पेलवली नाही, दोन्ही पातळीवर शारिरिक आणि मानसिक. त्यात नोकरी गेल्याचा धक्का होताच. मग ब-याच खटपटी करुन त्यांनी इथं चिंबोरीच्या कॉलेजात नोकरी मिळवली एका महिन्यात. तो महिना माझ्यासाठी फार सुखाचा गेला, सर माझ्या जवळ देखील आले नाहीत, अगदी मी जवळ गेले तरी नाही. त्यांचं मन त्यांना खात होतं का कसं मला समजलं नाही पण त्यांनी मला त्रास दिला नाही हे तेवढंच खरं.
' हे सगळं होणार हे माहित असुन सुद्धा तु त्यांच्या जवळ जायचीस ?' स्मितानं अनुजाचं बोलणं तोडत विचारलं, ' का, माझ्या घरात, घरातल्या बेडरुममध्ये आम्ही नवरा बायको दोघंच असताना देखील मी माझ्या सुखाची मागणी करु नये, जर मी केलेल्या अपमानानंतर पुन्हा पुरुष म्हणुन सर असं करु शकत होते तर मी का नाही, आणि मी काही त्यांच्यासारखं आउट ऑफ बॉक्स मागत नव्हते, rather out Of CD मागणं नव्हतं माझं. माझ्या मागण्या साध्या सरळ सोप्या होत्या, पण निराशेच्या नशेत असलेला पुरुष काहीच देउ शकत नसतो आणि फार मोठ्या मनाचा गवगवा करत आपण बायका हे सत्य लपवुन ठेवतो, जगापासुन सुद्धा आणि स्वतापासुन सुद्धा. अशा खोट्या कोशांमध्ये राहायची सवय लावुन घेतो आपणच आणि मग वेळ निघुन गेल्यावर ओरडत राहतो. तुला सांगु, पोळ्या करताना गॅस संपला ना, की पोळी भाजली जात नाही, तवा गार होईपर्यंत मला गॅस बंद झाल्याचं कळत नाही, आणि चिडचिड होते ती पोळी न भाजल्याची, राग येतो तो गॅस संपलेलं लक्षात न आल्याचा. तशातली गत आहे ही. नविन सिलेंडर कधी लावला हे त्यावर लिहिलेलं असतं पण नंतर तो संपल्यावरच ती तारीख पाहतो आपण तो पर्यंत नाही, हो ना ?
चल, बाहेर फिरुन आणि जेवुन येउ, मी गाडी घेते निकाळजे काकुंकडुन' असं बोलुन अनुजा बाहेर गेली. स्मिताला बाहेर जाण्यात फार इंटरेस्ट नव्हता पण नको म्हणलं तर अजुन अवघड होईल म्हणुन ती तयार झाली. गाडीची किल्ली घेउन अनुजा आली, दहा मिनिटात आवरुन त्या बाहेर पडल्या. पार्किंग मध्ये गाडी मागं अडकुन पडली होती, पुढच्या गाड्या काढायला मदत करायला कट्ट्यावर बसलेली चार पोरं आली, तेवढंच नाही तर अनुजाला गाडी काढुन किक मारुन चालु करुन दिली. गाडीत पेट्रोल भरलं, दोघी जणी चिंबोरीतल्या एकुलत्या एक शॉपिंग मॉल मध्ये आल्या, हल्लीच सुरु झालेलं होतं ते. मॉल मधल्या एसिच्या गारव्यात दोघी मजेत फिरल्या, थोडी खरेदी केली, मग तिथल्याच एका स्टॉलवर खाउन घरी आल्या, निकाळजे काकु दारातच उभ्या दिसल्या. ' आलात का फिरुन, काय काय खरेदी केलीत, थांब ग थोडी भात भाजी देते, ' एकाच वेळी तीन चार वेगवेग्ळ्या गोष्टी बोलणं ही निकाळजे काकुंची स्पेशलिटि होती. भात भाजीची भांडी घेतली, गाडीची किल्ली दिली अन दोघी पुन्हा घरात आल्या. गेलेली लाईट परत आली की बटण चालु राहिलेला मिक्सर पुन्हा चालु होतो तसं झालं एकदम. '
किचनमध्ये भांडी ठेवुन दोघी तिथंच बसल्या, एक सांगु तुला, रागावणार नाहीस ना ?' स्मितानं विचारलं, कुणाच्या काही बोलण्यावर रागवावं या सगळ्याच्या पलीकडं गेली आहे मी, विचार', स्मितानं थोडा धीर गोळा केला अन विचारलं, तु अशीच आहेस का गं, तेंव्हा पासुन, म्हणजे अंगानं अशीच आहेस एखाद्या मॉडेलसारखी, तसं असेल तर कुणालाही मोह होईलच याचा उपभोग घ्यायचा, मग त्यात सरांचं काही चुकलं असं मला वाटत नाही' रात्रीपासुन स्मिताकडुन स्वतंत्रपणे आलेली ही पहिलीच रिअ‍ॅक्शन होती, अर्थात अनुजाला सध्या अनपेक्षित काहीच नव्हतं, हसुन ती म्हणाली हो हा विचार तर मी देखील केला होता, म्हणुनच तर एंजॉय करायला तयार झाले ना,
पण हिडिसतेला, विकृतीला एक मर्यादा असते, आणि सर जेंव्हा ही मर्यादा ओलांडायला लागले तेंव्हा मला लक्षात यायला लागलं की परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते आहे, इथुन पुढं सहन करणं शक्य नाही मला, म्हणुन मग मी काल म्हणलं तसं सरांचाच रस्ता धरुन त्यांच्यावर मात करत गेले, आणि माझ्या नशिबानं त्यात यशस्वी झाले' अनुजा असं काही बोलली की, स्मिताच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह यावं किंवा तिनं आणावं हे आता सहज झालं होतं, ' अशी गोंधळात काय पडलीस, सरांच्या रस्त्यावरुन म्हणजे काय हे स्पष्ट ऐकायचं आहे ना तुला, सांगते, इथं तु एकटीच आहेस, बाई आहेस, तिथं कोर्टात याबद्द्ल पाच सात पुरुषांसमोर यावर चर्चा झालेल्या आहेत, काही वेळातर माझ्या बरोबरच्या लेडिज कॉन्स्टेबलसुद्धा निघुन जायच्या, ज्युनियर होत्या बहुधा, त्यांना नसेल सवय या सगळ्याची अजुन,' कोर्ट, चर्चा या शब्दांनी स्मिताची उत्सुकता अजुन चाळवली गेली, ' माझ्या एक लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी सरांना सुचतात कुठुन, त्या ब्लु फिल्म पाहुन, मग मी एक दिवस हिम्मत करुन एक फिल्म पाहिली, पहिल्या पाच मिनिटात्च बंद करुन टाकली, उलटी झाली मला लगेच, पण असं मागं सरकले असते तर मी मरुन गेले असते,एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली होती , समोरचा जेवढा हिडिस किंवा विकृत होतो आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण झालो की तो तोल सोडतो,आणि हेच मला हवं होतं,
दुसरं कारण तोपर्यंत सर सुद्धा इथं सेटल झाले होते, त्यांची गाडी मुळ रस्त्यावर यायची चिन्हं दिसत होती, मग मात्र मी सगळा धीर गोळा केला अन एक दिवस एक पुर्ण फिल्म पाहिली, दोन दिवस, तीन दिवस असं करत महिनाभरात मला त्याचं व्यसन लागलं, नशे मध्ये माणसाचं धाड्स वाढतं, दोन महिन्यापुर्वी मी सरांना नाही म्हणायला घाबरत होते, आता माझ्या सुखाच्या मागण्या पुढं ठेवायला सुरुवात केली केली, एक हात दो एक हात लो, असं सुरु केलं,
एक दोन वेळा सरांनी विरोध केला, घरातुन निघुन गेले, दारु पिउन यायला लागले, ते तर माझ्यासाठी जास्त चांगलं होतं,दारु पिल्यावर त्यांचा स्वतावर ताबा राहायचा नाही, माझ्यावर काय हुकुम चालवणार होते' ' मारलं नाही त्यांनी तुला कधी सरांनी यावरुन ?' स्मितानं अनुजाचं बोलणं तोडत विचारलं ? ' नाही, तेवढी ताकद नव्हती त्यांची,मांजर उंदराला खेळवते तशी त्यांना खेळवत होते, अगदी उपाशी मारायची नाही त्यांना, जिवंत राहतील एवढं अन्न मिळत होतं त्यांना,' पाणी प्यायला उठत अनुजानं विचारलं ' शरद मारतो ना ग तुला, तु असं काही क्ररायला नाही म्हणालीस तर ?'Print Page

Monday, August 27, 2012

क क कपलचा - भाग ०७


'be positive, when you cannot avoid it, try enjoying it'- माझ्यासाठी आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का होता, ' अनुजानं पुढं बोलायला सुरुवात केली, स्मिताला खरंतर ओरडावसं वाटत होतं, इथुन पळुन जावंसं वाटत होतं, पण ती थिजल्यासारखी पडुन राहिली, एखादा भीतीदायक चित्रपट पाहताना उठुन जावंसं वाटतं,पण पाय एवढे जड होतात की हलवता येत नाहीत आणि भीती सहन होत नाही अशी अवस्था होते, तसं तिचं झालं होतं. अनुचं बोलणं सुरुच राहिलं 'एवढा मोठा की प्रेत पडल्यासारखं जागच्या जागी पडुन होते संध्याकाळ पर्यंत. डोळे उघडले तेंव्हा सगळीकडं अंधार होता नुसता, उठुन बसायला देखील नको वाटत होतं, खुप जोरात रडावंसं वाटत होतं, शक्य तेवढं सावरलं आणि बाहेर आले, घराच्या दाराला बाहेरुन कुलुप लावुन सर गेले होते. कुठं ते ठाउक नाही, घरातले लाईट सुद्धा बाहेरुनच बंद केलेले होते. मग बराच वेळ दाराला टेकुन बसुन होते. रात्री केंव्हातरी दार ढकललं गेलं तसं बाजुला पडले, तेंव्हा मात्र घाबरुन ओरडले. सर येताना जेवण घेउनच आले होते, किचनमध्ये त्यांनीच ताटं मांडली, मला जेवायला बोलावलं, दुपारी हे असं घाणेरडं वागल्यावर माणुस रात्री ताट वाढुन जेवायला बोलावतो, लाज, शरम्,माणुसकी हे सगळं फक्त शब्दांपुरतंच असतं असं वाटायला लागलं मला. सर जेंव्हा मला उठवुन आत नेउ लागले तेंव्हा मी ओरडले, आणि उठलेच नाही, मग ते एकटेच निघुन गेले जेवायला, मी जेवुन घेतो, गरम आहे तोवर घे जेवुन.'
दहा मिनिटांत जेवले सर अन बाहेर आले, मी तिथेच बसुन होते, ' का जेवली नाहीस भुक नाहिये का ?' अग ताट उघडं राहिलं की गारढोण होउन जातं मग बरं नाही वाटत जेवायला, आत गार झालंच आहे, जेंव्हा जेवावसं वाटेल तेंव्हा घे जेवुन.' एवढं बोलुन सर बेडरुममध्ये निघुन गेले.
वाटलं की बाई म्हणजे पण असंच एक ताट असतं का पुरुषासाठी?, भुक लागली की जेवुन घे, पोट भरलं की टाक नेउन घासायला, माझं मलाच समजत नव्हतं हे काय होतंय, काय चाललंय ते. पहाटे कधीतरी पुन्हा डोळा लागला माझा. सकाळी जाग आली तेंव्हा सर निघुन गेले होते पुन्हा दाराला बाहेरुन कुलुप लावलेलं होतं, दिवसाच्या उजेडानं जरा धीर आला, रात्र तरी उपाशीच गेली होती. उठुन पाणी प्याले, किचनमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यात उरलेलं अन्न तसंच पडुन होतं, कट्ट्यावर एक ताट वाढलेलं तसंच होतं. ते आवरयचा धीर झाला नाही. बेडरुम मध्ये आले, पिसीच्या टेबलवर एक सिडी तशीच पडुन होती, किचनमध्ये पडलेल्या ताटासारखी. घशात आवंढे गिळत अन डोळ्यातलं पाणी पुसत माझं आवरलं, सगळं सामान एका बॅग मध्ये भरलं आणि घर सोडायचं ठरवलं. बॅगमध्ये काही पैसे लपवुन ठेवलेले होते, ते अजुन सरांच्या हातात लागले नव्हते, निदान इथंतरी नशीब माझ्याबाजुनं होतं, दोन चार महिने माझं म्हणुन सजवलेल्या घराकडं पाहिलं आणि निघाले', अनुजानं एक पॉझ घेतला तसा स्मिताचा खोल पण उत्सुक आवाज आला ' पण बाहेरुन कुलुप होतं ना घराला, मग बाहेर कशी आलीस ?
अनुजा पुन्हा किचनमध्ये जाउन पाणी घेउन आली, एक ग्लास आधीसारखाच स्मिताला दिला,' तुला काय वाटतं, कशी आली असेन घराबाहेर ?' एवढ्या नॉर्मल आवाजात हा प्रश्न ऐकुन स्मिताला ठसका लागला एकदम. खोकतच तिनं विचारलं ' हे एवढं सगळं भोगुन बाहेर पड्लीस तरी काही वाटत नाही याचं, एखादं कोडं घालावं तसं विचारतेस ?' बेडवर बसत अनुजा म्हणाली' होय मी फक्त यात दोन्ही भोगलंय, फक्त दुख्:च नाही तर सुखही या सगळ्यातलं, तुझं काय, तु अजुन दुख भोगतेस की आनंद पण उपभोगतेस काय करते आहेस, तुझं तुला समजतंय का ? आता स्मिता निरुत्तर होती. शांत पडुन पुढं काय झालं ते ऐकावं अशी भुमिका घ्यायचं तिनं ठरवलं, पण अनुजाच्या प्रश्नावर तिच्या अंतर्मनाचा बर्नर पेटला होताच, आणि त्याची धग तिला जाणवु लागली. आपल्यासारख्या संस्कारित सुशिक्षित रितीभातीनुसार लग्न होउन नव-याच्या घरी येउन सुखानं नांदणा-या एका पतिव्रतेला, एखाद्या अन्याय झालेल्या असल्या तरी दुय्यम वागणुकीच्या स्त्री च्या आयुष्याबद्दल आकर्षण वाटावं, पुढं काय झालं असेल यात मजा वाटावी याची तिला एकीकडं लाज वाटत होती, स्वताचा राग येत होता त्याचबरोबर एवढ्या क्लायमॅक्सला आलेला पिक्चर सोडावा पण वाटत नव्हता.
' नाही सुचत ना मी कशी आली असेन घराबाहेर, असु दे मीच सांगते' अनुजानं बोलणं पुन्हा सुरु केलं, तसं छताकडं एकटक बघत बसलेली स्मिता तिच्याबाजुला कुशीवर वळली, गारुड गारुड म्हणतात ना तसं, ' मी आलेच नाही बाहेर, येणं शक्यच नव्हतं, मग घरातच बसुन या सगळ्याचा बदला घ्यायचा, यातुन बाहेर पडायचा विचार सुरु झाला, अगदी आत्महत्येपासुन ते सरांच्या खुनापर्यंत सगळे विचार करुन झाले, काल सर जे बोलले ते शब्द्च डोक्यात घुमत होते 'when you cannot avoid it, try enjoying it', आत्महत्या किंवा खुनाचा आवेग कमी झाला होता, डोकं प्रत्यक्ष समोर आलेल्या परिस्थितीबद्दल आणि त्यातुन सुटण्याबद्दल विचार करत होतं, खरंच मी अ‍ॅव्हॉईड करु शकणार होते का, इथुन जरी बाहेर पडले तरी माहेरुन काही आधार मिळण्याची शक्यता फार कमी होते, अर्थात माझ्याच उद्योगांमुळं मी माझं माहेर तोडलं होतं, गाव बदलल्यानं मैत्रिणी अशा कुणी नव्हत्या, आईबाबाच जवळ करणार नाही म्हणजे इतर नातेवाईकांकडुन काही अपेक्षाच नव्हती, आणि तशीच बाहेर पडुन करणार काय होते, सेकंड इयरला या प्रकरणात गुंतवुन घेउन कशीबशी काठावर पास झाले होते, शिक्षण पुर्ण नव्हतं, म्हणजे बहुतेक सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह होत्या, मग एकच मार्ग उरला तो म्हणजे, 'try enjoying it', त्याक्षणी नाईलाजानं मी तोच स्विकरायचा ठरवला.'
'दोन-तीन दिवस अबोल्यात गेले, मग पुन्हा सगळं पहिल्यासारखं सुरु झालं, कॉलेज दुपारी तीनला संपायचं, सर घरी आले की काय होईल याची भीतीच बसली होती माझ्या मनात' , अनुजा न थांबता बोलत होती, एके दिवशी त्यांनी विचारलंच मला ' हल्ली थंड पडतेस फार लवकर, तुला एकदाच बोललो आहे, enjoy it, तु आणि मी, दोघंही जवानीत आहोत तोवरच काय आहे ती मजा, एकदा का पोरं झाली नंतर काय राहणार आहे, तुच विचार कर, नाहीतर जे सुख मला तुझ्याकडुन मिळायला हवं त्यासाठी मी घराबाहेर पडणार आणि मग काय अर्थ राहिला या लग्नाला, एकत्र राहण्याला?' एवढं बोलुन सर उठुन आवरायला लागले. पाच मिनिटं शांततेत गेली' जसं सर उठुन बाहेर निघाले, एवढ्या दिवसांचा गोळा केलेला धीर गोळा करुन मी विचारलं, ' enjoy it म्हणजे काय, जे तुम्हाला enjoy वाटतं, त्याचा मला किती त्रास होतो हे कळतं का तुम्हाला, का जे तुम्ही एंजॉय करता तेच मी पण एंजॉय केलं पाहिजे हा हट्ट का ? माझी काही वेगळी आवड असेल किंवा नसेलच काही आवड हे शक्य नाही का? आणि भुक वेगळी आणि आवड वेगळी हे का नाहि समजुन घेत तुम्ही. प्रत्येक वेळी जे तुम्हाला हवं ते देण्यातच मी का समाधान मानावं, तेच का एंजॉय करावं मी. ' मला वाटलं मी खुप बोलले, म्हणुन थोडं थांबले.
बेडरुमच्या दारातुन सर परत आत आले, ' एंजॉय म्हणजे काय, हेच मुळात समजत नाही तुम्हा बायकांना, थांब दाखवतोच एंजॉय म्हणजे काय ते' एवढं बोलुन सरांनी पिसि सुरु केला. पुढचा एक तास माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट वेळ होता, निदान तेंव्हापर्यंतरी.' मोबाईलमधला अलार्म वाजला आणि दोघी भुतकाळातुन वर्तमानकाळात आल्या, अनुजानं उठुन टेबलावरचा मोबाईल घेतला, अलार्म बंद करुन पुन्हा बेडवर अंग टाकलं. अलार्ममुळं लिंक तुटली, आणि सकाळ होत आल्याची जाणीव देखील झाली. ' तुला कधी निघायचं आहे, उत्तरपुजा करुनच निघा आता' ,' हो ग, निघावंच लागेल आज, परवा सासुबाई जायच्या आहेत गावाकडं परत, त्यांची औषधं आणुन द्यायची आहेत,अजुन बरंच काही आहे' स्मिताच्या मनात खरंतर राहायचं होतं, अजुन बोलायचं होतं, एवढा वेळ ती ऐकत होती, बोलण्यासारखं तिच्याकडंही बरंच होतं, अपघातातुन वाचलेली दोन माणसं, त्या अपघाताचं वर्णन एकमेकांना सांगुन आपणच कसे सुदैवी, धाडसी याचं कौतुक गात राहतात तसं तिला होत होतं, अनुजाची कथा तिनं ऐकली होती, ती संपल्यावर तिला देखील बरंच काही बोलायचं होतं, पण आपण तिच्याएवढं मोकळं होउ शकणार नाही याची खात्री होती तिला. अनुजाच्या मोकळं होण्यातच आपल्याला जे म्हणायचं ते येतंय हे तिला जाणवत होतं. पुन्हा एकदा अलार्म वाजला, मगाशी अलार्म पुढं ढकलला गेला होता फक्त, यावेळी अनुजा उठलीच नाही,अलार्म वाजु दिला, तो आपोआप बंद झाला आणि ती पुन्हा बोलायला लागली ' तु बघितल्यात का ग कधी ब्लु फिल्म?' शाळेत धड्यावरचा सगळ्यात अवघड प्रश्न आपल्यालाच विचारावा असं वाटत असतं, आणि तसा तो विचारल्यावर मात्र उत्तर सुचत नाही तसं झालं स्मिताला. नाही म्हणावं तर पहिल्याच भेटीत एवढं प्रामाणिकपणे बोलणारीशी खोटं बोलल्यासारखं होतंय आणि हो म्हणावं तर अजुन पंचाईत, अर्थात काल रात्रीचा अनुजाचा प्रत्येक प्रश्न तिला असाच अस्वस्थ करुन सोडत होता, त्या अस्वस्थतेची रात्रभरात स्मिताला सवय झाली होती.
' एवढा विचार करते आहेस हो म्हणायला म्हणजे पाहिल्यात तु पण, स्मिताकडं वळत तिला विचारलं ' तु नाहीस करत एंजॉय हे सगळं?' एकतर हिनं असल्या गोष्टी एंजॉय करायच्या ठरवल्या आणि आता मला विचारतेय, मी एंजॉय करते का नाही ते ? इंजक्शनची सुई टोचते त्या क्षणी दुखतं, पण त्या सुईतुन आत जाणारं औषध आपल्या भल्यासाठीच आहे ही जाणीव ते दुखणं विसरायला लावते, तसं होत होतं स्मिताला. अनुजाच्या प्रश्नानं ती अजुनच गप्प झाली. ' उठलीस काय ग ?' शरदच्या आवाजानं स्मिता भानावर आली. उठुन केस अन कपडे नीट केले आणि बाहेर गेली.बाहेर जाताना सुटले बाबा एकदाची परिक्षेतुन असा विचार तिच्या मनात आला. अनुजा एकटीच राहिली, दवाखान्यात एखाद्याला डॉक्टर समजुन जखम उघडुन दाखवावी अन तो तिथला झाडुवाला निघावा असं तिला वाटलं. रात्रीपासुन पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं, ती तशीच एका कुशीवर पडुन राहिली. ' झाली का झोप, चला गुरुजी येणार आहेत आठ पर्यंत ' असं म्हणत हर्षदनं तिच्या खांद्यावर हात ठेवुन तिला हलवेपर्यत ती तशीच पडुन होती. तिचा चेहरा पाहुन रात्रभर काय झालेलं असेल याची हर्षदला कल्पना आली, सांत्वन करतात तसं तिच्या डोक्यावरुन त्यानं हात फिरवला, खाली वाकुन तिच्या कपाळावर ओठ टेकवले अन हात हातात घेत म्हणाला, ' आज ती आईनं दिलेली निळी पैठणी नेस, चालेल.' उठुन बसत तिनं उत्तर दिलं ' तिचा ब्लाउज फाटलाय'. आपल्या आईनंच दिलेल्या सगळ्या साड्यांचे ब्लाउज का फाटतात हे एकदा शोधलं पाहिजे, असं हर्षदला वाटलं. ' ठिक आहे, जी तुला आवडेल ती नेस.', स्मिता आत आल्याची चाहुल लागल्यानं तो बाहेर निघुन गेला.

Print Page

Monday, August 6, 2012

क क कपलचा - भाग ६


गच्चीवरचं सगळं आवरुन झालं, दोघं घरात आले तेंव्हा निकाळजे काकु घरी निघुन गेल्या होत्या, त्यांच्या दाराबाहेर तेच दोन महागडे बुटांचे जोड होते, घराचं दार स्मितानंच उघडलं, आज मुक्कामाला आलेले असल्यानं तिनं कपडे बदलुन गाउन घातला होता, मागं बेडरुममधुन अनु बाहेर आली, तिचंही आवरुन झालं होतं. 'चहा करु का रे?' तिनं विचारलं, कुणीच काही बोलत नाही हे पाहुन ति सुद्धा गप्प झाली, सगळे जण हॉलमध्येच बसुन होते. पार्टीत ब-याच गोष्टी स्मिताच्या कानावर पडल्या होत्या, काही आधीपासुन शरद लपवतो आहे हे तिला जाणवत होतंय, त्यामुळं आता तिच्या स्त्रिसुलभ आकर्षणानं हे सगळं नक्की काय आहे हे तिला जाणुन घ्यायचं होतं, पण स्पष्ट विचारणं शक्य नव्हतं,म्हणुन ती देखील गप्प होती. पाच मिनिटं अशीच टेन्शनमध्ये गेली ' आम्ही दोघं इथं हॉलमध्येच झोपतो,तुम्ही दोघी आत झोपा' हर्षद उठत बोलला, सगळ्यांना तेच हवं होतं. अंथरुणं टाकुन हर्षद पुन्हा दरवाजा लावायला आला तेंव्हा ते महागडे बुट जागेवर नव्हते.
' तुला वाईट वाटलं का ग फार, लोकं काय बोलतात ते ऐकुन?' बेडवर एका कुशीवर होत अनुजानं स्मिताला विचारलं, स्मिता गोंधळली, हो म्हणावं तर काही माहित नाही, नाहि म्हणावं तर फार बावळटपणा वाटेल, ती उगाच डोळे मिटुन झोप लागल्यासारखी पडुन राहिली. कुस बदलत अनुजानं विचारलं ' तुला नाही का ग काही वाटत बाकीं कुणाबद्दल, म्हणजे पुरुषांबद्दल ?' स्मितानं घेतलेलं झोपेचं सोंग गळुन पडलं, डोळे सताड उघडले, थोडंसं घाबरतच तिनं अनुजाकडं पाहिलं, अंगापिंडानं तिच्यापेक्षा थोडी थोराडच होती अनुजा, तिच्या डोक्यात नाही ते विचार यायला लागले, अगदी आता इथुन उठुन दरवाज्यापर्यंत जाउन कडी काढुन बाहेर कसं पळायचं इथंपर्यंत सुद्धा.' मला वाटतं, म्हणजे कधी आकर्षण वाटतं, तर कधी कीव येते, कधी तर त्याचीच कीव येते ज्याचं आकर्षण वाटतं.' सगळा धीर गोळा करुन स्मितानं एकच शब्द उच्चारला 'का?'. गच्च पाणी भरलेल्या टाकीचा एकच थेंब पुरेसा असतो ओव्हरफ्लो सुरु व्हायला तसं झालं,.
'सेकंड इयरला असताना' अनुजानं सुरुवात केली' मी प्रेमात पडले पहिल्यांदा आमच्या एका सरांच्या, एक वर्ष नक्की काही कळलंच नाही, पण थर्ड इयरला मात्र ब-याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या, इतक्या की मला आवडणारा शर्ट सर सलग दोन दोन दिवस घालायचे आणि मी पण रात्री ड्रेस धुवुन पुन्हा दुस-या दिवशी तोच घालुन जायचे, कॉलेजात चर्चा होत होत्याच, पण ना मी कधी स्पष्ट बोलले ना कधी सर. एक दिवस मैत्रिणीच्या घरी गप्पा मारताना तिच्या लहान बहिणीनं ऐकलं, तिच्या आईला सांगितलं आणि मग माझ्या घरी समजलं. गोंधळ झाला,वय,कमाई अशा चिल्लर तेवढ्या सगळ्या गोष्टी आड येत होत्या. खरंतर आम्हाला लगेच लग्न वगैरे करायचं नव्हतंच, पण आमचे संबंध फार पुढं गेले आहेत असा काकुला संशय होता, ' एवढी भरली कशी नाहीतर वर्षात' मी आणि आई दोघीच समोर असताना तिनं घेतलेला संशय आणि कँटिन मध्ये बसुन मारलेल्या गप्पा यांचा संबंध लागायला लागला मला. कॉलेज बंद, मैत्रिणी बंद आणि स्थळं पाहणं सुरु झालं. पंधरा दिवसात तीन ठिकाणी दाखवुन झालं. साहजिकच मी सुद्धा ठाम विरोध सुरु केला,जे विचार आजपर्यंत करत नव्हते ते करायला लागले, माझी काही चुक नसताना मला शिक्षा भोगावी लागत होती, म्हणुन बंडाचा मार्ग धरला.'
'बंड म्हणजे?', एक अध्याय संपेपर्यंत ऐकणारा सत्यनारायणाच्या कथेत गुंतलेला असतो, मध्येच गुरुजी पाणी प्यायला थांबले तरी अस्वस्थ व्हायला होतं, तसं स्मिताला होत होतं. अनुजा खिड्कीच्या बाजुला होती, त्यामुळं तिच्यामागुन रस्त्यावरच्या लाईटचा येणारा उजेड तिच्या चेह-यावर पडत नसला तरी तिच्या मागं एक प्रभावळ उभी केल्याचा भास होत होता, आणि ही कथा ऐकताना अनुजा काही एखाद्या देवीपेक्षा कमी नाही असंच स्मिताला वाटत होतं. 'चार दिवस जेवलेच नाही, आजारी पडले, घरीच डॉक्टरांना बोलावुन उपचार सुरु झाले, मैत्रिणि यायला सुरुवात झाली, एक दिवस मैत्रिणिकडुन त्या गोळ्या मागवुन घेतल्या, घेतल्या, पहिल्यांदाच, घाबरतच पण अपेक्षित परिणाम झाला, तारखा उलटुन गेल्या. पहिल्यांदा आई आणि काकु उघडपणे,आणि नंतर सगळेच हादरले. काका आणि बाबा त्याच दिवशी कॉलेजमध्ये जाउन सरांना भेटले, पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट नाकारलं, मला भेटण्याची परवानगी मागितली एकट्यानं. अर्थात असं काही झालंच नव्हतं पण बहुधा कधीतरी त्या वयातल्या आकर्षणानं आणि अव्यक्त प्रेमानं बाजी मारली, जातीचा काही प्रश्न नव्हता, सरांनी दोन दिवस घेतले, आणि मग हो म्हणाले. ते पिक्चरमध्ये असतं ना ' मुझे इस जमानेने गुनहगार बना दिया' तसं झालं माझं. लग्नाचा सिझन चालु होताच, फक्त शिक्षण पुर्ण करणे ही सरांची अट होती. तारखा उलटण्याचं खरं कारण समजेपर्यंत माझ्या लग्नाची गोष्ट जगजाहीर झाली होती, आता मागं सरकणं ना माझ्या घरच्यांना शक्य होतं ना सरांना.' 'आलेच ग पाणी पिउन' लागलेली तंद्री तोडत अनुजा उठत म्हणाली, त्यावर स्मिताची सहज रिअ‍ॅक्शन गेली 'पटकन ये' आता ती सुद्धा बेडला टेकुन बसली होती.
परत येताना एक ग्लासभरुन पाणी स्मिताला सुद्धा आणलं होतं अनुजानं, तिचं पाणी पिउन झाल्यावर अनुजानं पुढं सुरु केलं ' नंतरच्या पहिल्या मुहुर्तावर माझं लग्न झालं, सहा महिने राहिले होते लास्ट इयरचे, पण आता माझ्याच कॉलेजमध्ये जाणं फार अवघड झालं होतं. आज पार्टीत काय बोलली असतील लोकं त्यापेक्षा घाणेरडं ऐकायला मिळायचं आणि ते पण बरोबरच्या मुलांमुलींकडुनच नाही लॅब असिस्टंट कडुन सुद्धा. महिनाभरात चिडुन सरांनी नोकरी बदलली, गाव बदललं आणि माझं शिक्षण अर्धवटच राहतं का काय अशी शंका यायला लागली मला. ' लग्नानंतर पण सरच म्हणायचीस त्यांना?' स्मितानं बोलणं तोडत प्रश्न केला. 'हो, अग तशीच सवय पडली होती दोन वर्षात, नवीन गावात माझी अ‍ॅडमिशन व्हायला वेळ होता, तेंव्हा घरीच असायचे, अभ्यास पुन्हा सुरु करावा म्हणुन एक दिवस घरातला पिसि जोडला, सर एकटेच असायचे त्यामुळं पासवर्ड वगैरे नव्हताच सिस्टिमला. थोडा अभ्यास केला मग गाणी आणि पिक्चर आहेत का पहावं म्हणुन सर्च केला, गाणि आणि काही पिक्चर सापडले, बरेचसे जुने पण जे जे पहायला सुरु केले तेंव्हा चालु झाल्या त्या तसल्या घाणेरड्या फिल्मस, ज्यांच्याबद्दल आजपर्यंत इनडायरेक्टली ऐकत होते ती गोष्ट, ब्लु फिल्मस. ब-याच फाईल्स पाहिल्या सगळ्यात तेच, शेवटी कंटाळुन पिसि बंद केला अन सुन्न बसुन राहिले. सरांकडं ह्या असल्या घाणेरड्या गोष्टी असाव्यात याचं फार वाईट वाटत होतं, घरी आल्यावर त्यांच्याशी यावर बोलायचं ठरवलं. '
या विषयाबद्दल स्मितानं देखील फक्त ऐकलंच होतं, आणि यावर एका नवरा बायकोत काय बोलणं झालं असेल याची तिला फार उत्सुकता लागुन राहिली होती. अनुजानं दोन मिनिटं गॅप घेतला, तेवढं थांबणं सुद्धा तिला अवघड झालं ' मग बोललीश त्यांच्याशी ?' तिनं अनुजाला विचारलं. ' नाही' , एकदम निराश करणारं उत्तर आलं, पण अनुजानं पुढं चालु केलं बोलणं 'नेमकं त्याच दिवशी माझ्या अ‍ॅडमिशनचं, सरांचं अपॉईंट्मेंट लेटर, त्यांच्या घरुन आमच्या लग्नाला मिळालेला स्विकार अशा ब्-याच गोष्टी झालेल्या, त्यामुळं दोघंही खुप खुश झालो, आणि या आनंदात त्यांना असं काही विचारावं हे माझ्या डोक्यातच आलं नाही, मग लगेच दुस-या दिवशी सरांच्या मुळ गावी देव देव करायला गेलो, दोन दिवस तिथं राहुन सर परत निघुन आले आणि मी पुढचे आठ दिवस तिथंच राहिले. आठ दिवसानी परत आले त्या दिवशी सरांच्या वागण्यातला बदल पाहुन एक दोन दिवस मला सुद्धा बरं वाटलं. खरा फटका बसला तो त्यानंतर, त्यांच्या अपेक्षा आणि मागण्या वाढत दर रात्री वाढत होत्या, दोन दिवसातच लक्षात आलं की त्यांची अपेक्षा त्या फिल्म मध्ये दाखवतात तसं मी वागावं अशी होत होत्या, त्या प्रकारांची खरंतर पहिल्यांदा चिड आली होती, त्यावरुन आमच्यात वाद होणं सुरु झालं, स्पष्ट तर दोघंही बोलत नव्हतो, मी बेडरुमचा दरवाजा बंद करुन झोपायचा प्रयत्न करायचे, माझ्याच घरात घाबरुन, लपुन जायचे. माहेरी काय अन कसं सांगणार, शेजार पाजार देखील नविनच आणि या विषयावर बोलणार तरी काय आणि कुणाला.'
' तोंड दाबुन बुक्क्यांचा मार, म्हणतात ना तेच हे' सरांनी वर्गाबाहेर उभी केलेली मुलं एकमेकांकडं जशी पाहतात त्या नजरेनं पहात स्मिता बोलली, ' बाईच्या जन्माचे भोग आहेत, भोगल्याशिवाय संपणार का?' ' का नाही ?', रात्रीच्या शांत वातावरणात अनुजाचा आवाज जरा जास्तच मोठा वाटायला लागला ' मी पण असाच विचार करत होते काही दिवस, मग जेंव्हा सरांनी सकाळी, दुपारी कधीही अंगाला झटणं सुरु केलं तेंव्हा मात्र पुर्ण विरोध करायची, एक दिवस तिथं शारिरिक ताकद कमी पडली आणि शेवटी बाजुला झाल्यावर सर हसत हसत बोलले 'be positive, when you cannot avoid it, try enjoying it'
क्रमशः


Print Page

Friday, July 20, 2012

क क कपलचा - भाग ०५


हॉलमधले सगळेच उठुन उभे राहिले,खांद्यावरचं उपरणं सावरत गुरुजींनी सुरुवात केली ' सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची......' तेंव्हा दरवाज्यात सोनवणे साहेब उभे होते विठ्ठल स्टाईलमध्ये..आणि मागं चक्क सौ. सोनवणे,
सोनवणे साहेब पार्टीला येणारच हे नक्की होतं, पण सकाळी पुजेला सुद्धा ते येतील आणि ते पण सहकुटुंब अशी अपेक्षा हर्षदनं तरी केली नव्हती, एका हातात आरतीचं तबक धरुनच हर्षदनं मान हलवत साहेबाना नमस्कार केला, साहेब सुद्धा लगेच आत येउन टाळ्या वाजवायला लागले, दहा मिनिटात सगळे सोपस्कार संपले. हर्षद अन अनुजानं दक्षिणा देउन गुरुजींना नमस्कार केला, बाकी उपस्थितांनी सुद्धा पुजेसमोर यथाशक्ति नाणी, नोटा ठेवल्या,नमस्कार केला आणि तिर्थप्रसाद घेउन बाजुला झाले. स्वयंपाकाचं सगळं आटोपलंच होतं, निकाळजे काकुंनी कॉलनीतल्याच अजुन एक दोन बायकांना वाढणं वगैरे कामाला बोलावलं होतं, त्यांची कामं चालु होती. दोघं जण कपडे बदलुन येईपर्यंत शरद सोनवणे साहेबांबरोबर बोलत बसला, अजुन एक दोन कॉलनीतलेच पिएसआय आलेले होते, पोरांचा दंगा चालु होताच, त्यातल्या त्यात एका थोराड पोराला प्रसाद वाटायच्या कामावर बसवुन गुरुजी साबुदाण्याची खिचडी आणि दुध घेउन निघुन गेले होते, बाकीची पोरं त्या प्रसादवाल्याला वशिला लावण्याचं काम करत होती.
' ताटं घ्यायची का ग लगेच ?' निकाळजे खणखणीत आवाज आला तसा, बेडरुम मधुन बाहेर येत येत अनुजा काही बोलणार त्याआधीच हॉलमधुन सोनवणे साहेबांचं उत्तर आलं, ' मग हो काकु, आता अजुन कुणाची वाट पाहताय, इथं ड्युटी बोलावतीय, रोजचा समाजसेवेचा रतिब घालायला जायचंय आम्हाला, घ्या ताटं, जरा फास्ट हात चालवा.' स्टेशनातली सिनियरगिरी त्यांनी इथं पण सुरु केली. हर्षदनं बाहेर येउन अनुजाची अन जमलेल्या सर्वांची ओळख करुन दिली, सगळे संपल्यावर सोनवणे साहेबांनी त्यांच्या बायकोकडं हात करुन सांगितलं ' हे आमचं खटलं, म्हणजे तुमच्यासारखं खटल्यातच सापडलेलं म्हणुन खटलं, पार बापजाद्यांपासुन वकिलीत आहेत मॅडम' साहेबांची बायको शहरातील ब-यापैकी सेटल्ड वकील होती. अनुजाला एकदम मळमळावं असं झालं, तोंडावर हात दाबुन उलटी थांबवावी असा चेहरा करुन अनुजा बाथरुममध्ये निघुन गेली. हर्षद सुद्धा हातानंच एक मिनिट असं म्हणत आत गेला, त्याच्या मागं स्मिता पण गेली. बाहेर सौ. सोनवणेंनी नव-याकडं असं काही पाहिलं की विचारता सोय नाही.
निकाळजे काकुंनी अन बरोबरच्या दोघींनी ताटं मांडली तोपर्यंत पोरं सगळी निघुन गेली होती, शरदनं जाळीचा दरवाजा लावुन घेत पडदा टाकला. बेडरुममधुन बेडशीट आणुन त्याच्याच घड्या करुन बसायची व्यवस्था केली, एकीनं ताटांच्या बाजुला रांगोळी काढली, साहेब बसण्याची वाट पाहात सगळे जण उभे होते, तर साहेब हर्षद्ची वाट पहात होते. पाच मिनिटात तिघंही बाहेर आली, पावडर लावली काय किंवा विको टर्मरिक गालावर पडलेले डोळ्यातल्या पाण्याचे डाग लपता लपत नाहीत किमान सौ. सोनवणेंना तरी ते लक्षात येत होतं. ' अरे बसा ना, तुम्ही बसल्याशिवाय काकु वाढायला नाहीत घेणार, काकु बसले ओ सगळे घ्या वाढायला' एकदम दोन्ही बाजुला बोलता बोलता अनुजा पायानंच एका बाजुचं बेडशीट नीट करायला लागली. ती दोघं जण पुजा मांडली होती त्याच भिंतीला टेकुन बसली, त्यांच्या ताटासमोर स्मितानं आठवणीनं आणलेली मोत्यांची रांगोळी मांडुन ठेवली. जेवणं चांगली अर्धा तास चालली. कॉलनीतले मेंबर निघुन गेल्यावर हॉलमध्ये हर्षद अनुजा, शरद स्मिता आणि साहेब व सौ. एवढीच जण होती.
सौ. सोनवणेंनी पर्स मधुन एक वेल्वेटचा बॉक्स काढला, तो उघडुन अनुजाच्या हातात दिला, आत एक नेकलेस आणि कानातल्यांचा कुड्या होत्या. बॉक्स हातात घेउनच अनुजा आणि हर्षंद त्यांच्या पाया पडली ' हे फक्त प्रथा म्हणुन, नाहीतर आमची लायकी नाही तुमच्याकडुन पाया पडुन घ्यावं एवढी' हर्षदला एवढंच बोलुन सौ. व साहेब घराबाहेर पडले. ' आम्ही बसु का आता ग, का अजुन कोणी यायचं बाकी आहे ?' जास्त झालेला स्वयंपाक आपल्या घरात ठेवुन आलेल्या निकाळजे काकुंनी विचारलं तेंव्हाच हॉलमधली शांतता भंग झाली. ' चला आम्ही वाढतो तुम्हाला, तुम्ही होता म्हणुन झालं सगळं,' रितीप्रमाणे कौतुकाचे शब्द बोलुन अनुजा त्यांना घेउन किचनकडे गेली. हर्षद अणि शरदनं हॉलमधलं आवरायला घेतलं, पुजेसमोरची शांत झालेली समई पुन्हा पेटवली. तेवढ्यात संध्याकाळच्या पार्टीसाठी ठरवलेला केटरिंगवाला खुर्च्या अन टेबलं घेउन आला. शरद त्याला घेउन गच्चीवर गेला, स्मिता अन अनुजा काकु आणि बाकीच्या दोघींना वाढत होत्या, हॉलमध्ये हर्षद एकटाच पुजेच्या समोर बसुन होता, थोडासा सुन्न थोडासा उदास, मगाशीच ऐकलेल्या कथेतल्या वाण्यासारखी त्याची अवस्था झाली होती, बुडालेली नौका बाहेर काढायला फार प्रयत्न करावे लागणार होते, अर्थात नौका पहिल्यांदा बुडत नव्हती.
दुपारी जेवणाला मोजुन १२ जण होते पण संध्याकाळी कोरडी अन व्हेज पार्टी असुन देखील, शंभर दिडशे जण तरी येणं अपेक्षित होतं, आणि साहेब येउन गेले हे स्टेशनमध्ये सगळ्यांना कळाल्यानं ते सगळे निवांत येणार होते. लागलेल्या किंवा लावुन घेतलेल्या सवयीनं अनुजानं पुन्हा सगळं आवरलं, पार्टीसाठी म्हणुन ति हिरव्या रंगाची शिफॉन नेसणार होती, काळ्या वेलवेट्च्या ब्लाउजवर. आवरताना ती आणि स्मिता दोघीच होत्या बेडरुम मध्ये, तिनं कपाटातुन साडी आणि ब्लाउज काढुन टाकल्यावर स्मितानं हसत विचारलं ' एवढी बारीक होतीस आधी ?' अनुजानं हसत हसत उत्तर टाळलं, ' तु पण आवर ना पटकन, वर जावं लागेल पहायला, ह्यांना काही समजत नाही, सगळं आपल्यालाच पाहायचं आहे, नाहीतर पुढचा आठवडाभर मला नान आणि पनीरची भाजी खावी लागेल या शि-याबरोबर' त्या दोघी आवरुन गच्चीवर येईपर्यंत सात वाजलेच होते, तेंव्हाच कॉलनीतल्या गणेश मंडळाची पोरं साउंड सिस्टिम लावुन निघाली ती यांना वर येताना पाहुन जिन्यातच थांबली, ' या ना खाली, बरंच वजन आहे ना तुमच्याकडे' एका बाजुला थांबत अनुजा म्हणाली. पोरं निघुन गेल्यावर गळ्यावरचा पदर नीट करत स्मिताला म्हणाली' आपल्याला बघुन नाही, बघण्यासाठी बाजुला थांबली होती'.
साडेसातला सुरु झालेल्या पार्टीत रंग भरला, साडेआठच्या सुमारास, चिंबोरी स्टेशनचा पन्नास टक्के स्टाफ, सहकुटुंब एकत्र होता, त्यांच्या पार्ट्या व्हायच्या त्या बहुदा ओल्या आणि सड्या, असे प्रसंग क्वचितच यायचे. प्रत्येक जण टिशर्ट आणि जीन घालुन आलेला असला तरी चिंबोरीत किती वर्षं काढलीत ते बायकोच्या अंगावरचे दागिने आणि पोरांच्या अंगावरचे कपडे यावरुन समजत होतं. थोड्याच वेळात ग्रुप तयार झाले आणि गच्चीचा एक एक कोपरा गाठुन गप्पा सुरु झाल्या, हर्षद आणि अनुजा थोड्या थोड्या वेळानं एका एका ग्रुपजवळ जावुन बोलुन पुढं सरकत होते, मग कुणीतरी नाचायचा फंडा काढला आणि थोडा वेळ सगळ्यांचं नाचुन झालं, शरद एका कोप-यात एकटाच उभा असलेला पाहुन अनुजा त्याच्याकडं गेली ' का हो भावजी, एकटेच उभे आहात असे, काही झालं का?' ' काही नाही, सहजच, स्मिता पण खाली गेलीय बाथरुममध्ये म्हणुन इथं थांबलोय, त्यात आम्ही ट्रॅफिकवाले, ह्या स्टेशनवाल्यांच्यात जास्त मिसळुन घेत नाहि आम्ही' अजुन थोडं बोलुन अनुजा तिथुन निघुन गेली.
दहाच्या सुमारास पार्टी संपली, शरदनं थोडा आवाज चढवला आणि मग अनुजा, स्मिता आणि निकाळजे काकु खाली घरात निघुन गेल्या, गच्चीत केटररची दोन चार पोरं आवराआवरी करत होती, हर्षद आणि शरद कठड्याला टेकुन बसले, तात्पुरत्या केलेल्या आडोशामागं केटररची माणसं भांडी साफ करत होती तिथुन आवाज येत होता ' भावड्या, फंक्शनची हीरॉइन एकदम आयटम होती बाप,ब्लाउज तर कट टु कट, ना उन्नीस ना बीस' दुस-यानं उत्तर दिलं ' उन्नीस बीस तुज्या*ला भाड्या चौतीसची गॅरंटी बघ, च्या*ला दिड वर्षे टेलरकडं काढलंय' कठडयाला टेकुन बसत शरद हर्षदला बोलला 'वहिनीला सांगा चारचौघात बाहेर असले कपडे घालत जाउ नको', हसत हर्षद बोलला ' मनापासुन बोलतो आहेस का, वरवरचं रे, नाही तुला पण बघितलं नजर तर तुझी सुद्धा हलत नव्हती तिच्यावरुन,' शरद गप्प झाला, खरंतर त्याची नजर अनुजावरुन हलत नव्हतीच पण मनात तो तिची अन स्मिताची तुलना, ती पण समोर दिसत होती तेवढीच नाही तर इतर वेळेची पण, आणि तोच का चिंबोरीस्टेशनचा सगळा स्टाफ याबद्दल बोलत होताच ' नशीब रायटरचं तिच्यायला, पहिली पोस्टिंग चिंबोरी, करुन घेतलेली बदली रद्द झाली, आणि हे असलं प्रकरण घरी.' या कौतुकाच्या गप्पांना नजर लागु नये म्हणुन 'आणि ते पण एक्स्पिरिय्न्स्ड, अनुभवी' ही काळी तिट.
क्रमशः


Print Page