Friday, July 20, 2012

क क कपलचा - भाग ०५


हॉलमधले सगळेच उठुन उभे राहिले,खांद्यावरचं उपरणं सावरत गुरुजींनी सुरुवात केली ' सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची......' तेंव्हा दरवाज्यात सोनवणे साहेब उभे होते विठ्ठल स्टाईलमध्ये..आणि मागं चक्क सौ. सोनवणे,
सोनवणे साहेब पार्टीला येणारच हे नक्की होतं, पण सकाळी पुजेला सुद्धा ते येतील आणि ते पण सहकुटुंब अशी अपेक्षा हर्षदनं तरी केली नव्हती, एका हातात आरतीचं तबक धरुनच हर्षदनं मान हलवत साहेबाना नमस्कार केला, साहेब सुद्धा लगेच आत येउन टाळ्या वाजवायला लागले, दहा मिनिटात सगळे सोपस्कार संपले. हर्षद अन अनुजानं दक्षिणा देउन गुरुजींना नमस्कार केला, बाकी उपस्थितांनी सुद्धा पुजेसमोर यथाशक्ति नाणी, नोटा ठेवल्या,नमस्कार केला आणि तिर्थप्रसाद घेउन बाजुला झाले. स्वयंपाकाचं सगळं आटोपलंच होतं, निकाळजे काकुंनी कॉलनीतल्याच अजुन एक दोन बायकांना वाढणं वगैरे कामाला बोलावलं होतं, त्यांची कामं चालु होती. दोघं जण कपडे बदलुन येईपर्यंत शरद सोनवणे साहेबांबरोबर बोलत बसला, अजुन एक दोन कॉलनीतलेच पिएसआय आलेले होते, पोरांचा दंगा चालु होताच, त्यातल्या त्यात एका थोराड पोराला प्रसाद वाटायच्या कामावर बसवुन गुरुजी साबुदाण्याची खिचडी आणि दुध घेउन निघुन गेले होते, बाकीची पोरं त्या प्रसादवाल्याला वशिला लावण्याचं काम करत होती.
' ताटं घ्यायची का ग लगेच ?' निकाळजे खणखणीत आवाज आला तसा, बेडरुम मधुन बाहेर येत येत अनुजा काही बोलणार त्याआधीच हॉलमधुन सोनवणे साहेबांचं उत्तर आलं, ' मग हो काकु, आता अजुन कुणाची वाट पाहताय, इथं ड्युटी बोलावतीय, रोजचा समाजसेवेचा रतिब घालायला जायचंय आम्हाला, घ्या ताटं, जरा फास्ट हात चालवा.' स्टेशनातली सिनियरगिरी त्यांनी इथं पण सुरु केली. हर्षदनं बाहेर येउन अनुजाची अन जमलेल्या सर्वांची ओळख करुन दिली, सगळे संपल्यावर सोनवणे साहेबांनी त्यांच्या बायकोकडं हात करुन सांगितलं ' हे आमचं खटलं, म्हणजे तुमच्यासारखं खटल्यातच सापडलेलं म्हणुन खटलं, पार बापजाद्यांपासुन वकिलीत आहेत मॅडम' साहेबांची बायको शहरातील ब-यापैकी सेटल्ड वकील होती. अनुजाला एकदम मळमळावं असं झालं, तोंडावर हात दाबुन उलटी थांबवावी असा चेहरा करुन अनुजा बाथरुममध्ये निघुन गेली. हर्षद सुद्धा हातानंच एक मिनिट असं म्हणत आत गेला, त्याच्या मागं स्मिता पण गेली. बाहेर सौ. सोनवणेंनी नव-याकडं असं काही पाहिलं की विचारता सोय नाही.
निकाळजे काकुंनी अन बरोबरच्या दोघींनी ताटं मांडली तोपर्यंत पोरं सगळी निघुन गेली होती, शरदनं जाळीचा दरवाजा लावुन घेत पडदा टाकला. बेडरुममधुन बेडशीट आणुन त्याच्याच घड्या करुन बसायची व्यवस्था केली, एकीनं ताटांच्या बाजुला रांगोळी काढली, साहेब बसण्याची वाट पाहात सगळे जण उभे होते, तर साहेब हर्षद्ची वाट पहात होते. पाच मिनिटात तिघंही बाहेर आली, पावडर लावली काय किंवा विको टर्मरिक गालावर पडलेले डोळ्यातल्या पाण्याचे डाग लपता लपत नाहीत किमान सौ. सोनवणेंना तरी ते लक्षात येत होतं. ' अरे बसा ना, तुम्ही बसल्याशिवाय काकु वाढायला नाहीत घेणार, काकु बसले ओ सगळे घ्या वाढायला' एकदम दोन्ही बाजुला बोलता बोलता अनुजा पायानंच एका बाजुचं बेडशीट नीट करायला लागली. ती दोघं जण पुजा मांडली होती त्याच भिंतीला टेकुन बसली, त्यांच्या ताटासमोर स्मितानं आठवणीनं आणलेली मोत्यांची रांगोळी मांडुन ठेवली. जेवणं चांगली अर्धा तास चालली. कॉलनीतले मेंबर निघुन गेल्यावर हॉलमध्ये हर्षद अनुजा, शरद स्मिता आणि साहेब व सौ. एवढीच जण होती.
सौ. सोनवणेंनी पर्स मधुन एक वेल्वेटचा बॉक्स काढला, तो उघडुन अनुजाच्या हातात दिला, आत एक नेकलेस आणि कानातल्यांचा कुड्या होत्या. बॉक्स हातात घेउनच अनुजा आणि हर्षंद त्यांच्या पाया पडली ' हे फक्त प्रथा म्हणुन, नाहीतर आमची लायकी नाही तुमच्याकडुन पाया पडुन घ्यावं एवढी' हर्षदला एवढंच बोलुन सौ. व साहेब घराबाहेर पडले. ' आम्ही बसु का आता ग, का अजुन कोणी यायचं बाकी आहे ?' जास्त झालेला स्वयंपाक आपल्या घरात ठेवुन आलेल्या निकाळजे काकुंनी विचारलं तेंव्हाच हॉलमधली शांतता भंग झाली. ' चला आम्ही वाढतो तुम्हाला, तुम्ही होता म्हणुन झालं सगळं,' रितीप्रमाणे कौतुकाचे शब्द बोलुन अनुजा त्यांना घेउन किचनकडे गेली. हर्षद अणि शरदनं हॉलमधलं आवरायला घेतलं, पुजेसमोरची शांत झालेली समई पुन्हा पेटवली. तेवढ्यात संध्याकाळच्या पार्टीसाठी ठरवलेला केटरिंगवाला खुर्च्या अन टेबलं घेउन आला. शरद त्याला घेउन गच्चीवर गेला, स्मिता अन अनुजा काकु आणि बाकीच्या दोघींना वाढत होत्या, हॉलमध्ये हर्षद एकटाच पुजेच्या समोर बसुन होता, थोडासा सुन्न थोडासा उदास, मगाशीच ऐकलेल्या कथेतल्या वाण्यासारखी त्याची अवस्था झाली होती, बुडालेली नौका बाहेर काढायला फार प्रयत्न करावे लागणार होते, अर्थात नौका पहिल्यांदा बुडत नव्हती.
दुपारी जेवणाला मोजुन १२ जण होते पण संध्याकाळी कोरडी अन व्हेज पार्टी असुन देखील, शंभर दिडशे जण तरी येणं अपेक्षित होतं, आणि साहेब येउन गेले हे स्टेशनमध्ये सगळ्यांना कळाल्यानं ते सगळे निवांत येणार होते. लागलेल्या किंवा लावुन घेतलेल्या सवयीनं अनुजानं पुन्हा सगळं आवरलं, पार्टीसाठी म्हणुन ति हिरव्या रंगाची शिफॉन नेसणार होती, काळ्या वेलवेट्च्या ब्लाउजवर. आवरताना ती आणि स्मिता दोघीच होत्या बेडरुम मध्ये, तिनं कपाटातुन साडी आणि ब्लाउज काढुन टाकल्यावर स्मितानं हसत विचारलं ' एवढी बारीक होतीस आधी ?' अनुजानं हसत हसत उत्तर टाळलं, ' तु पण आवर ना पटकन, वर जावं लागेल पहायला, ह्यांना काही समजत नाही, सगळं आपल्यालाच पाहायचं आहे, नाहीतर पुढचा आठवडाभर मला नान आणि पनीरची भाजी खावी लागेल या शि-याबरोबर' त्या दोघी आवरुन गच्चीवर येईपर्यंत सात वाजलेच होते, तेंव्हाच कॉलनीतल्या गणेश मंडळाची पोरं साउंड सिस्टिम लावुन निघाली ती यांना वर येताना पाहुन जिन्यातच थांबली, ' या ना खाली, बरंच वजन आहे ना तुमच्याकडे' एका बाजुला थांबत अनुजा म्हणाली. पोरं निघुन गेल्यावर गळ्यावरचा पदर नीट करत स्मिताला म्हणाली' आपल्याला बघुन नाही, बघण्यासाठी बाजुला थांबली होती'.
साडेसातला सुरु झालेल्या पार्टीत रंग भरला, साडेआठच्या सुमारास, चिंबोरी स्टेशनचा पन्नास टक्के स्टाफ, सहकुटुंब एकत्र होता, त्यांच्या पार्ट्या व्हायच्या त्या बहुदा ओल्या आणि सड्या, असे प्रसंग क्वचितच यायचे. प्रत्येक जण टिशर्ट आणि जीन घालुन आलेला असला तरी चिंबोरीत किती वर्षं काढलीत ते बायकोच्या अंगावरचे दागिने आणि पोरांच्या अंगावरचे कपडे यावरुन समजत होतं. थोड्याच वेळात ग्रुप तयार झाले आणि गच्चीचा एक एक कोपरा गाठुन गप्पा सुरु झाल्या, हर्षद आणि अनुजा थोड्या थोड्या वेळानं एका एका ग्रुपजवळ जावुन बोलुन पुढं सरकत होते, मग कुणीतरी नाचायचा फंडा काढला आणि थोडा वेळ सगळ्यांचं नाचुन झालं, शरद एका कोप-यात एकटाच उभा असलेला पाहुन अनुजा त्याच्याकडं गेली ' का हो भावजी, एकटेच उभे आहात असे, काही झालं का?' ' काही नाही, सहजच, स्मिता पण खाली गेलीय बाथरुममध्ये म्हणुन इथं थांबलोय, त्यात आम्ही ट्रॅफिकवाले, ह्या स्टेशनवाल्यांच्यात जास्त मिसळुन घेत नाहि आम्ही' अजुन थोडं बोलुन अनुजा तिथुन निघुन गेली.
दहाच्या सुमारास पार्टी संपली, शरदनं थोडा आवाज चढवला आणि मग अनुजा, स्मिता आणि निकाळजे काकु खाली घरात निघुन गेल्या, गच्चीत केटररची दोन चार पोरं आवराआवरी करत होती, हर्षद आणि शरद कठड्याला टेकुन बसले, तात्पुरत्या केलेल्या आडोशामागं केटररची माणसं भांडी साफ करत होती तिथुन आवाज येत होता ' भावड्या, फंक्शनची हीरॉइन एकदम आयटम होती बाप,ब्लाउज तर कट टु कट, ना उन्नीस ना बीस' दुस-यानं उत्तर दिलं ' उन्नीस बीस तुज्या*ला भाड्या चौतीसची गॅरंटी बघ, च्या*ला दिड वर्षे टेलरकडं काढलंय' कठडयाला टेकुन बसत शरद हर्षदला बोलला 'वहिनीला सांगा चारचौघात बाहेर असले कपडे घालत जाउ नको', हसत हर्षद बोलला ' मनापासुन बोलतो आहेस का, वरवरचं रे, नाही तुला पण बघितलं नजर तर तुझी सुद्धा हलत नव्हती तिच्यावरुन,' शरद गप्प झाला, खरंतर त्याची नजर अनुजावरुन हलत नव्हतीच पण मनात तो तिची अन स्मिताची तुलना, ती पण समोर दिसत होती तेवढीच नाही तर इतर वेळेची पण, आणि तोच का चिंबोरीस्टेशनचा सगळा स्टाफ याबद्दल बोलत होताच ' नशीब रायटरचं तिच्यायला, पहिली पोस्टिंग चिंबोरी, करुन घेतलेली बदली रद्द झाली, आणि हे असलं प्रकरण घरी.' या कौतुकाच्या गप्पांना नजर लागु नये म्हणुन 'आणि ते पण एक्स्पिरिय्न्स्ड, अनुभवी' ही काळी तिट.
क्रमशः


Print Page

Thursday, July 12, 2012

क क कपलचा - भाग ०४


पिसिवरच्या फाईल पाहण्यात ती गुंग होती, तेंव्हाच बाहेर बेल पण वाजत होती.पिसि बंद करुन ती बाहेर आली, निकाळजे काकु आल्या होत्या, ' झालं का सामान लावुन, की येई मदतीला ?' असं विचारत थेट आत येत हॉलमधल्या एकुलत्या एक खुर्चीवर बसत बसत बोलल्या. अनुजाला हा भोचकपणा आवडला नाही पण आपल्या अनुभवहीन नव-यानं न केलेल्या कामांची यादी संपवण्यासाठी तिला काही दिवस तरी कुणीतरी मदतीला हवंच होतं. ' अहो, सामान आवरायचं काय एका दिवसात होणार का, चांगला आठवडा लागेल सगळं, आवरायला, काकु, तुमच्याकडची धुणं भांडीवाली करेल का हो आमच्याकडं काम ?' अंगावरचा टीशर्ट नीट करत अनुजा खालीच भिंतीला खेटुन बसली. ' आमच्याकडे नाही बाई वगैरे भांड्याल, आम्हीच करतो सगळं, परवडत नाही हो हल्ली' गळ्यातल्या बत्त्तीस इंची मंगळसुत्राशी चाळा करत काकु बोलल्या, आणि एकदम काहीतरी महत्त्वाचं आठवलं असं दाखवुन निघुन गेल्या. अनुजानं उठुन दार लावलं, पुन्हा बेडरुम मध्ये येउन पिसि चालु केला, विंडोज चालु होईपर्यंत तिची मोठी बॅग उघडली, वरचे कपडे बेडवर टाकले, खाली एका जुनाट पर्समध्ये एम्पि३ प्लेअर होता, तो आणि त्याची डाटा कॉर्ड काढली.
एकुण फाईल्स पाहिल्या जवळपास २२ जिबि होत्या, तिच्या २ जिबित किती म्हणुन बसणार होत्या, मग तिनं एक एक फाईल पाहुन महत्त्वाच्या तेवढ्याच घ्यायचं ठरवलं, आणि एक एक फाइल उघडुन पाहायला सुरुवात केली, दोन मिनिटातच खिडक्या बंद करुन पुन्हा पिसि समोर येउन बसली.
तीन वाजल्यापासुन सात वाजेपर्यंत तिचा वेळ त्या फाईल्स बघण्यातच गेला, खोलीत फक्त बाहेरच्या लाईटचा उजेड येतो आहे हे जाणवल्यावर ती उठली, पिसि बंद केला, किचनमध्ये येउन आवराआवरी केली, करायचं काहीच नव्हतं, फोन पाहिला तो डिसचार्ज होउन पडला होता, चार्जिंगला लावला अन लगेच हर्षदचा फोन आला, मग दोन मिनिटं चार्जर सापडला नाही, लाईट नव्हती, झोप लागली होती अशी कारणं सांगुन वेळ मारुन नेली. हर्षदनं तिला आवरुन बसायला सांगितलं खरं, पण त्याला घरी यायला साडेनउ वाजले, तो पर्यंत ती तिचा आवडता लखनवी टॉप अन काळी सलवार घालुन बसली होती. हर्षद आल्यावर दार उघडुन ती फणका-यानं वळुन आत गेली, तिला तसंच पाठमोरं मिठित घेउन हर्षदनं तिच्या मानेवर ओठ टेकवायचा प्रयत्न केला, पण ती सटकली अन खिडकीत जाउन उभी राहिली ' मागुन बघणा-या प्रत्येक पुरुषाला असंच करावं वाटेल, हे असले झिरझिरीत कपडे घातल्यावर, सगळं दिसतंय आतलं ' फाडकन बोलुन हर्षद आवरायला निघुन गेला. तिला किती अभिमान होता त्या पांढ-याशुभ्र कुडत्याचा, तरी पण डोळ्यातलं पाणी आवरुन ती सुद्धा कपडे बदलायला गेली.
बेडरुम मध्ये दोघांनी एकदमच कपडे बदलले, पण काहीही न बोलता, अगदी घुम्यानं. सुटलेलं पोट दिसणार हे माहित असुन देखील त्यानं एक बॉडी टाईट टिशर्ट घातला अन तिनं एक दोन साइझ मोठा ब्राउन कलरचा कुर्ता अडकवला, ' आता मागुन काय पुढुनही कुणाला काही वाटणार नाही, ठिक आहे ना ?, ' त्याच्या स्टेटमेंटला तेवढंच सडेतोड उत्तर देउन ती हॉलमध्ये येउन बसली. ' चल आता, आज चायनिज खायला जाउ, बिहाईंड द वॉल मध्ये. जाम मस्त जागा आहे' , बुट चढवत हर्षद बोलला. तिचा मुड असाही गेलेलाच होता, आता जेवण म्हणजे ' जाणिजे यज्ञकर्म' एवढंच उरलं होतं तिच्यासाठी. जाणं येणं आणि जेवणं एवढ्यात दोन तास गेले, घरी येउन दोघांनी कपडे बदलले, पुन्हा घुम्यानंच. बेडवर पडल्यावर हर्षदनं तिला जवळ ओढलं, त्यानं काही करायच्या आधीच तिनं विषय काढला ' गॅसची सोय कधी करणार आहेस, का गावातली सगळी हॉटेल फिरुन घ्यायची आहेत ? ' रिझर्वला आलेल्या गाडीचा नॉब ऑनवर असावा अन उगाच किका मारुन हैराण व्हावं तसा त्याचा चेहरा झाला, लांब होत बोलला ' एक दोन दिवसात होईल सगळं, आज गेलो होतो दुपारी तिथं ' , तिचा प्रतिप्रश्न ' शेगडी दोन बर्नरची आहे की तीन ?' छताकडं पाहात ती निर्विकारतेनं विचारत होती.
पंधरा दिवसांत बरीच प्रगती झाली, तो सकाळी लवकर उठुन जॉगिंगला जायचा , घरात दोन डंबेल्स आले होते, तिनं गाउन घालुन घराबाहेर जाणं सोडलं, लखनवी पार बॅगच्या तळाशी गेला होता. पण एक महत्त्वाची गोष्ट बदलली नव्हती ती म्हणजे हर्षदच्या नोकरीची जागा, चिंबोरी स्टेशनला एकच दिवस उरलेला असतना सिपि ऑफिस मधुन एक ऑर्डर आली अन सगळ्या बदल्या अनिश्चित काळापर्यंत स्थगित केल्याचं कळवलं गेलं, जेवढं दुखः हर्षदला झालं त्यापेक्षा जास्त सोनवणे आणि भरत दाबडे, जो हर्षदच्या जागी येणार होता त्यांना झालं. स्टेशनात पुन्हा हर्षदच्या नशीबाचं कौतुक केलं सगळ्यांनी. अशातच एक दिवस अनुजानं सकाळी निघताना त्याला सांगितलं ' घरात एक पुजा करुयात, चार लोकांना बोलवु जेवायला, आधी एकटा होतास ठिक होतं, पण आता बरोबर नाही, महिना झाला कोणी फारसं आलेलं नाही घरी शरद भावोजी सोडले तर' तसा तो ही धार्मिक होता, पण त्याला फारसं कुणाला घरी बोलावण्यात स्वारस्य नव्हतं, पण आता पुजेचा विषय काढल्यावर नाही म्हणणं ही जड गेलं, दिवस वार ठरला तसं, दोघंही पुजेच्या तयारीत गुंतली, सकाळी पुजा, दुपारी १५-२० लोकांची पंगत आणि संध्याकाळी छोटीशी पार्टी, असा बेत त्याच्याकडुन मंजुर करुन घेण्यात अनुजा यशस्वी झाली होती.
संसार म्हणजे काय काय याची ओळख त्याला पटायला लागली होती हळुहळु, अजुन दोन दिवसांनी पुजा होती, पहाटे जॉगिंगला जाणं चार दिवस बंदच होतं त्याचं, सातच्या सुमारास जाग आली, बेडच्या बाजुला कपाटासमोर उभं राहुन अनुजा केस पुसत होती, साबणाचा अन शांपुचा अजुन न उडालेला वास आणि केसातुन गळालेल्या पाण्यानं पाठीवर आणि कंबरेवर ओला झालेला गाउन , हर्षद्ची झोप पुरी उडवायला पुरेसा होता, तसंच पडल्या पडल्या पुढं सरकुन त्यानं अनुजाचा गाउन पकडुन ओढला अन तिला बेडवर पाडली. ' आईगं ' एकदम तोल गेल्यानं ओरडतच अनुजा बेडवर पडली, आणि त्यानं काही करावं याच्या आधीच सावरुन उठली. लंगडत लंगडत बाजुला होताना तिच्या चेह-यावर वेदना दिसत होत्या ' गुरुजीनी सांगितलंय, पुजेच्या आधी दोन दिवस पुर्ण पवित्र राहायचं, म्हणुन काही लाड नाहीत आता पुजा होईपर्यंत , आणि कपाट लागलं ना माझ्या पायाला केवढं ' ती तशीच लंगडत बेडरुमच्या बाहेर निघुन गेली, ' लाड केलेचं नाहीत तर पुजा होणारच कशी मग ?' होता त्याच मुडमध्ये राहुन हर्षंदनं विनोद करायचा प्रयत्न केला. ' आईगं, आउच, ' अशा आरड्या ओरड्यानं तो उठुन किचनमध्ये गेला, कपाट लागलेला पाय कट्ट्यावर ठेवुन अनुजा जखमेवर हळद लावत होती, तिची पैंजणं मध्ये येत होती, पुढं होउन त्यानं पैंजणं काढायचा प्रयत्न केला, पण ते काही जमेना म्हणुन मग ती पार पिंडरीच्या वर नेउन घट्ट रुतवुन ठेवली, तिनं तशाही अवस्थेत त्याच्या हातावर फटका मारला.
पुजेचा दिवस उजाडला, दोघांच्याही घरी कळवलं होतं पुजेचं, पण कुणी आलं नव्हतं, कारणं वेगवेगळी होती, त्याच्या आईचं ऑपरेशन ठरलेलं असल्यानं त्यांना प्रवास करायचा नव्हता, तिच्या घरी कुणाला वेळ नव्हता' अरे वहिनिच्या डिलिव्हरीची डेट आहे ना अशात, म्हणुन नाही येणार कुणी ' तिनं स्वताच्या मनाला अन हर्षदला समजवायचा प्रयत्न् केला, दिवसाचं महत्त्व आणि तिचा मुड पाहुन हर्षद्चं ' हो नकोच उगा प्रवास अशा वेळात ' म्हणुन पुढं ढकललं. सकाळी घरातलं सगळं आवरलं, निकाळजे काकु मदतीला होत्याच, गुरुजी आले, त्यांचं पु़जा मांडुन होईपर्यंत दोघांनी पुन्हा हात पाय धुवुन घेतले, त्यानं सोवळं पुन्हा एकदा घट्ट करुन घेतलं तर तिनं मुद्दाम आणलेली निळी पैठणी पुन्हा एकदा चोपुन बसवली, ' हा नॅपकिन, यालाच हात पुसा सोवळं घाण नका करु' त्याच्या कमरेला सोवळ्यात नॅपकिन खोचता खोचता तिच्या सुचना सुरु झाल्या. तिच्या खांद्यावरचा दुसरा नॅपकिन काढुन घेत हर्षद बोलला ' आता माझी पाळी, मी लावणार नॅपकिन तुझ्या कमरेला' तशी ती पटकन दुर झाली, पण त्यानं पुन्हा जवळ ओढलीच तिला, तसंच ढकलत आरशासमोर घेउन आला, आरशासमोर तिला पुढं घेउन उभा राहिला, तिच्या खांद्यावर हनुवटी टेकुन आणि दोन्ही हात तिच्या पोटावर आवळुन. न राहवुन तिनंसुद्धा त्याच्या दंडाना पकडलं, दोन क्षणच दोघांना खुप हवेहवेसे आणि गरजेचे होते.
दारातुनच शरदचा आवाज आला, ' हर्ष्या, अबे मला वाटलं झाली का काय पुजा ?' दोघंही एक एक करुन बाहेर आले, शरद त्याच्या बायकोबरोबर आला होता, ती सुद्धा जरीची काठापदराची साडी नेसलेली. अनुजा आणि शरदची बायको स्मिता पहिल्यांदाच भेटत होत्या, दोन मिनिटं दोघींचही हसणं बोलणं झालं आणि दोघी आत गेल्या. कॉलनीमधली पाच सात पोरं हॉलमध्ये दंगा करत होती. स्वयंपाकाला निकाळजे काकुच होत्या, निवडणूकित अपक्ष उमेदवार एकटाच प्रचाराचा गोंधळ करत फिरतो तशी त्यांची एकटीचीच गडबड चालु होती, एक दोन पोरं त्यांचं लक्ष चुकवुन काकडी, काजु असलं काहीतरी उचलायचे, त्यांच्यावर रागवणं चालु होतं. गुरुजींचा आवाज आल्यावर अनुजा बाहेर आली, दोघांनी किचन मध्ये जाउन देवाला नमस्कार केला, आता अव्हेलेबेल मोठं निकाळजे काकुच त्यांच्या पाया पडुन हॉलमध्ये येउन पुजेला बसले, गुरुजींनी पुजा सांगायला सुरु केली, दिड तास सगळे सोपस्कार चालु होते, कमरेचे नॅपकिन कमरेची शोभा वाढवत राहिले तर हर्षद्चं सोवळं अन् अनुजाची साडीवर नविन डिझाइन तयार होत राहिल्या. मागं भिंतीला टेकुन शरद अन स्मिता पुर्ण वेळ बसुन होते. गुरुजींनी 'नैवेद्याचं आणा' असा हाकारा करत आरतीची तयारी करायला घेतल्यावर हर्षदनं अनुजाकडं पाहिलं, आज आपण खुप काहितरी केलं याचं समाधान दाखवणारे डोळे बघुन त्याला खुप बरं वाटलं, त्याचवेळी निका़ळजे काकुंनी अंदाज चुकुन केलेला पाच किलो शि-याचं पातेलं समोर आणुन ठेवलं, म्हणजे आदळलंच, तेवढा शिरा पाहुन ही दोघंच काय गुरुजी देखील चाट पडले ' अरे वा, हल्ली एवढा प्रसाद गणेश मंडळं देखील करत नाहीत, यजमान, धार्मिक आहात तुम्ही, ईश्वरावर श्रद्धा आहे तुमची, जे हव ते भरभरुन देईल तो तुम्हाला, चिंता नको. उठा, ते पातेलं घ्या इकडं, पाणि फिरवा अन घ्या आरती करायला'
हॉलमधले सगळेच उठुन उभे राहिले,खांद्यावरचं उपरणं सावरत गुरुजींनी सुरुवात केली ' सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची......' तेंव्हा दरवाज्यात सोनवणे साहेब उभे होते विठ्ठल स्टाईलमध्ये..


Print Page

Thursday, July 5, 2012

क क कपलचा - भाग ३...


क क  कपलचा - भाग ३...

 कुठलिहि गोष्ट पहिल्यांदाच करताना जो वेळ लागतो तेवढा घेउन हर्षदनं मेडिकल काउंटरची खरेदी संपवली, तिथल्या पोरानं ज्या पद्धतीनं मयतीचं सामान देतात तसं, मख्ख चेह-यानं सगळं सामान काउंटरवरच्या पोरीकडं दिलं, तिंनं तेवढ्याच मख्ख चेह-यानं सगळं एका काळ्या बँगेत टाकलं वर बार कोडचं स्टिकर लावुन बॅग हर्षद्कडं दिली. त्याच्या मनावरचं फार मोठं ओझं उतरल्यासारखं झालं, पंधरा मिनिटं रांगेत उभं राहुन बिल देउन तो तिथुन बाहेर पडला, शरदला फोन करुन प्रितीलाच यायला सांगितलं अन सामान घरी टाकायला आला. शेजारच्या निकाळजेंच्या दाराबाहेर दोन चार चपला जोड होते, ते बघत दरवाज्याचं कुलुप उघडलं, आत येउन सगळं सामान जिथलं तिथं लावलं. काळी पिशवी तशीच बेडरुम मधल्या कपाटात कपड्यांखाली लपवुन ठेवली अन बाहेर पडला. निकाळ्जेंच्या घराबाहेर चपला वाढल्या होत्या, जाळीचा दरवाजा पुढं केलेला होता.
पुन्हा प्रितीपर्यंत यायला पंधरा मिनिटं गेली, शरद पोहोचलाच होता. नेहमीचं टेबल नव्हतं, मग बाहेर गार्डन मध्येच दोघं बसले. ' हर्ष्या, भाड्या अशी ही शेवटचीच पार्टी बहुतेक तुझ्याबरोबरची, मिल्याला बोलवु का, आणि वहिनी येणार होत्या ना आज, ते सोडुन तु इथं कसा ? मोबाईल काढत शरद बोलला. ' अरे तिचा एसेमेस आला होता, एक्सप्रेस १२ तास लेट आहे, उद्या साडेसात पर्यंत येणार आहे, तेंव्हा जाईनच आणायला.' बहुधा फोन एंगेज लागत होता मिल्याचा ' आणि गाडी खरंच लेट आहे का हे पहायला तु स्टेशनवर गेला असशील ना आता, इथं येताना ?' हर्षदला एकदम त्याचं टॉप सिक्रेट बोर्डावर टांगावं तसं झालं. ' अबे भाड्या, मोजुन १०२५ दिवस झालेत माझ्या लग्नाला, हे अन असले सगळे घंदे करुन बसलोय मी. तु आता काहीही कारणं सांग न भेटायला, मी तुला तुझी खरी कारणं सांगेन, मी जिंकलो की प्रत्येक वेळी एक क्वार्टर, बोल लावतो काय बेट ? , हर्षदनं हसुन वेळ काढली, तोवर वेटरनं शेव चकलीच्या वाट्या आणुन ठेवल्या. मग दोघं जण गप्पा मारत साडेबारा पर्यंत निवांत बसले. पिणं संपल्यावर बारच्या दरवाज्यापर्यंत दोघंही धडपडत आले, मग गळ्यात गळा घालुन रडले आणि मग निघुन गेले.
पिल्यावर हर्षद नेहमीच गाडी हळु चालवायचा, त्यात उद्या सकाळी उठुन अनुजाला आणायला जायचं होतं, व्यवस्थित घरी आला, कुलुप काढताना पाहिलं निकाळजेंच्या घराबाहेर दोन महागातल्या बुटांचे जोड होते.
नेहमी पिउन आल्यावर हर्षदला गपगुमान झोप यायची, पण आज टुम्म, काही केल्या झोप येईना. एक तर जागा नविन, सारखा रस्त्यावरच्या गाड्यांचे हॉर्न वाजत होते, त्यानं उठुन एका खोक्यातुन एफएम काढला, बेडरुम मध्ये लागेना म्हणुन बाहेर हॉल मध्ये आणुन लावला, तो सेट होउन चालु व्हायच्या आतच बाहेरुन आरडाओरडा ऐकु आला, तसा लगेच दरवाजा उघडुन पाहिलं, दोघंजण घाईघाईनं जिन्यावरुन खाली गेले, निकाळजेंच्या घराबाहेर महागातले बुट दिसत नव्हते.
आत येउन, तो आता हॉलच्या खिडकितच बसला, आत एफएमवर ' दिल की ये आरजु थी' लागलं होतं, दारु प्याली की अशी गाणी जास्तच केविलवाणी वाटतात हे त्याचं आवडतं मत होतं. अनुजाला फोन लावला,  आउट ऑफ रेंज होता.  फोन चार्जिंगला लावुन पुन्हा त्यानं बेडवर अंग टाकलं, झोप काही येईना. उठुन त्यानं कपाटातली काळी पिशवी काढली. ' ति**ला, ह्याचा अन चॉकलेट,स्ट्रॉबेरीचा काय संबंध, बोंबलायला, पब्लिकना ति**ला, काय पण विकतंय अन काय पण  विकत घेतंय, पण एकदा बघुच पुन्हा घाईच्या वेळेत जमेल नाय जमेल' पाकिटं बाहेर काढली तसा शरदचा सल्ला आठवला ' अंधारात पॅकचा चमकणारा चौकोन असलेला कोपरा ओळखता आला पाहिजे,  नाहीतर संपलं सगळं ' त्याचं त्यालाच हसु आलं, मग उठुन लाईट बंद केली ,घरातल्या लाईट बंद केल्या तरी रस्त्यावरच्या लाईटचा उजेड खिडकीतुन आत यायचा अन नेमका बेडच्या पायाशी थांबायचा.
सहाला अलार्म वाजला तसा हर्षद उठला, आणि जोरजोरात हसायला लागला, रात्री नशेत प्रॅक्टिस म्हणुन १२ पॅक फोडली होती, बेडवर सगळीकडं तोच कचरा होता. उठुन त्यानं सगळं आवरलं, बेडशीट बाथरुम मध्ये नेउन भिजवुन ठेवली, काल दुध आणलं नव्हतं त्यामुळं चहाचा प्रश्नच नव्हता, तसंही अजुन किचन सगळं लावुन झालंच नव्हतं, आवरुन लगेच बाहेर पडला. त्यानं कुलुप लावुन जिन्याची पहिली पायरी उतरली तोच मागुन आवाज आला, ' चहा घेणार का ?' या.' इति, निकाळजे काकु.   प्रश्न पण आणि आमंत्रण पण, नक्की काय करावं समजेना, पण चहाचा मोह काही मोडवला नाही. पहिल्यांदाच निकाळजेंच्या घरात गेला, हॉलमध्ये सोफ्यावर बसला तोच निकाळजे काकु चहा घेउन बाहेर आल्या. चहा समोरच्या टिपॉय वर ठेवला आणि आत निघुन गेल्या. आतुन पैंजणांचे आवाज येत होते, काकुंच्या पायात पैंजण होते का नाही, त्यानं लक्ष दिलं नव्हतं. ' कांचन असेल, त्याला एकदम आठवलं, काल काकुनी हेच नाव सांगितलं होतं, तीच असावी. फोन वाजला, अनुजाचाच होता. पटकन चहा संपवुन कपबशी टिपॉयवर ठेवली, 'काकु थँक्यु,येतो मी'  एवढं पटकन बोलुन निघाला, कॉलनीच्या बाहेर येईन रिक्षा पकडुन स्टेशनवर आला.
एस-३ बोगीच्या दोन्ही दरवाज्यांच्या मध्ये उभा राहिला, टेनिसची मॅच पाहिल्यासारखा मान हलवुन दोन्ही दरवाज्यांकडं पाहात होता. एकदाची त्याला उजव्या दरवाज्यात अनुजा दिसली, हातावरची पुसटत चाललेली मेंदी, साडी, ब्लाउज, चपला, रुमाल, टिकली सगळं पक्कं मॅचिंग, नवेपणाची सगळी दिखाउ लक्षणं उतु जात होती. हर्षदला पाहिल्यावर तिनं हात हलवला पण मग हसावं की लाजावं तिला कळालंच नाही, ती तशीच अवघडुन उभी राहिली. मागच्या पॅसंजरनं ' साईड' असं जोरात ओरडल्यावर भानावर येउन ती उतरली, हर्षदनं पुढं येउन दोन्ही बॅगा घेतल्या. दोघंही थोडी सावरली, ' नवि बायको, नवं घर, अपुन की तो निकल पडी बॉस, चल नविन घरी जाउ लगेच'. त्याच्या थिल्लरपणाचं तिला थोडं हसु आलं थोडं कौतुक वाटलं, दोघंही स्टेशनच्या बाहेर आले. रिक्षानं घरी यायला  पंधरा मिनिटं गेली, दोन जिने चढुन दारासमोर आले तेंव्हा निकाळजे काकु बाहेरच होत्या, वाण्याचं बिल देत होत्या. दोघांना हातानंच खुण करुन जिन्यात मागं सरकुन उभं केलं, आत जाउन पाणी घेउन आल्या, भाताची मुद ओवाळुन टाकली, अन म्हणाल्या ' बोलला नाहीत ते, सुधारस केला असता आज, कालचा पाक उरलाय ना जिलेब्याचा' , त्या घरात निघुन गेल्या.
दोघं पुढं आली, घराचा दरवाजा उघडुन एकत्रच आत आली, एकमेकांना खेटुन आत येताना दोघंही बावरली खरी, अनुजा आत आल्या आल्या  बाथरुम मध्ये गेली, हर्षदनं सामान नेउन बेडरुम मध्ये ठेवलं. ती बाहेर आली तसा तो दुध आणायला बाहेर निघाला ' मॅगी आणल्या नसतील तर त्या पण आण ?' १२ वर्षे संसार झालेल्या बायकोसारखं अनुजानं विचारलं,  ' हो, किचनमध्ये आहेत काढुन घे,आणि दरवाजा लावुन घे'. दार लावताना अनुजाचं लक्ष शेजारच्या दाराकडं गेलं, उंब-याच्या दोन्ही बाजुन निटशी गाईची पावलं काढलेली दिसली. ' म्हणजे मला स्पर्धा आहे इथं पण' असा विचार करत तिनं दार लावलं, सगळं घर फिरुन पाहिलं, किचनमध्ये पसारा तसाच होता, इलेक्ट्रिकची शेगडी वर काढलेली होती, पण तिला याचा काही अनुभव नव्हता, म्हणुन तिनं  त्याकडं दुर्लक्ष केलं. हर्षद आलाच तेवढ्यात, दरवाजा उघडल्या उघडल्या हातातली दुधाची गार पिशवी अनुजाच्या पोटावर चिकटवली, मगाशी गाडीतुन  तिनं हात हलवुन इशारा केला तेंव्हापासुन तो लक्ष ठेवुन होता, चान्स आता मिळाला. एकदम चिरकुन अनुजा मागं सरकली. बाहेर येउन दाराकडे पाहात निकाळजे काकुंनी त्यांच्या घराचा दरवाजा सुद्धा धाडकन लावुन घेतला.
' गॅस नाही आला ना हो अजुन, मी बोलले होते ना तुम्हाला महाबळेश्वरलाच, मला नाही येत त्या लाईटच्या शेगडीवर काही करायला, शॉक बिक बसला म्हणजे ?' पंधरा मिनिटानंतर घरातुन सहजतेनं अर्थ लागु शकेल असा आलेला हा आवाज. ' हो मगासारखाच लागेल शॉक, फक्त गरम चटका असतो लाईटचा गार नाही' हर्षद किचनमध्ये जात जात बोलला. ' हे बघ मी दाखवतो, ही पिन ह्या प्लग मध्ये घट्ट बसवायची, लुज बसली की फरफर ठिणग्या पडतात, आणि हे लाल बटण दाबायचं, एका मिनिटात सगळी  कॉईल लालबुंद होते, मग काय वर भांडं ठेवायचं, त्यात पाणि ओतायचं, ते उकळलं की मॅगी टाकायची, दो मिनिट में तयार' असं म्हणुन त्यानं प्रात्याक्षिक करुन दाखवलं. ' अहो मिस्टर, पण आयुष्यभर मॅगीच खाणार आहोत का  तिन्ही त्रिकाळ, बाकीचं कसं करणार, मला नाही जमायचं ह्याच्यावर' अनुजानं पुन्हा स्पष्ट नकार दिला. अर्ध्या तासात मॅगी आणि चहा, एवढं आटोपुन दोघं हॉल मध्ये येउन बसली ' आज सुटी घेतलीत का हो ?' अनुजानं विचारलं, नाही स्टेशनला शेवटचे तीन चार दिवस आहेत, बरीच कामं पडलीत. एक वाजेपर्यंत जाईन, रात्री यायला दहा वाजतील. बाहेरच जाउ जेवायला आज, दोन्ही वेळा, आणि शेजारी विचारुन कामवालीचं वगैरे पाहुन घे' जसजशी मॅगी गार होत होती तसतसा संसाराची फक्त स्वप्नंच रम्य असतात याची जाणिव दोघांना होत होती. मागच्या महिन्यातली लग्नाची रजा, बदली आणि घर बदलणं यात ब-याच गोष्टी करायच्या राहुन गेल्या होत्या.
हर्षदचा फोन वाजला, सोनवणेंचा फोन होता ' काय मिस्टर, कुटुंब आलं काय घरी ? पोहोचले ना व्यवस्थित, मग इथं कधी येताय, चिकार राडा आहे निस्तरायचा, तिथला संसार कुटुंब बघेल या इथं लवकर, नाहीतर चार दिवस नाईट मारावी लागेल.' फोन कट. हर्षदच्या चेह-यावर टेन्शन दिसायला लागलं, तो  उठुन आवरायला गेला, अनुजानं उठुन सामान लावायला सुरुवात केली, ज्या एक दोन गोष्टी तिनं  विचारल्या त्याला काहीतरी उत्तरं देउन हर्षद बाहेर पडला. त्याला युनिफॉर्ममध्ये अनुजा पहिल्यांदाच बघत होती, एकदम चार्मिंग वगैरे दिसायचा फोटोत पण प्रत्यक्ष काही फार बरा नाही दिसत असं तिला वाटलं. दुपारी एकच्या सुमारास तो परत येईपर्यंत बरंचशी जागा मोकळी झाली होती, तो आला तेंव्हा अनुजा तयारच होती, दोघंजण बाहेर जेवण करुण आले, तिला घरी सोडुन तो पुन्हा स्टेशनला निघुन गेला. तिनं आता पिसि जोडायला घेतला, अर्धा तास खटाटोप करुन ती विडोजच्या पासवर्ड पर्यंत येउन थांबली, फोन करुन हर्षदला पासवर्ड विचारला तर त्यानं ऑफिसचे महत्त्वाची माहिती त्यात आहे असं सांगुन पासवर्ड देणं टाळलं खरं, पण बिसिए केलेल्या अनुजाला दहा मिनिटं पुरेशी होती, सिस्टिम सुरु करायला. थोडंफार शोधाशोधी करुन झाल्यावर, हर्षदला नक्की जे लपवायचं होतं ते सापडलं...

Print Page