क क कपलचा - भाग ०८
'आज मी इथंच राहतेय, ह्यांना इकडच्याच एरियात ड्युटी आहे, मला तुझी एखादी साडी देशील नेसायाला ?' स्मिताच्या आवाजात उत्साह होता, कालची अर्धवट स्टोरी तिला पुर्ण ऐकायची उत्सुकता होती. ' घे ना कपाटातली कुठलीपण' कपाट उघडत अनुजा बोलली, ' चल मी चहा टाकते'. ती निघुन गेली. एका तासात सगळ्यांच आवरुन झालं, नैवेद्याची तयारी झाली, गुरुजी आले. उत्तरपुजा झाल्यावर कालचा उरलेला शिरा खाउन हर्षद अन शरद दोघंही ड्युटीला निघुन गेले. दोघी शि-याच्या डिश घेउन बेडरुमच्या बाल्कनीत आल्या, ' तुझी अन हर्षदची ओळख कशी झाली मग ?' स्मितानं बोलायला सुरुवात केली. ' काही दिवस फार जड गेले, सरांना आधी ज्यासाठी जबरदस्ती करावी लागत होती, ते आता त्यांना सहज मिळत होतं, मी प्रत्येक गोष्ट अगदी एंजॉय करत होते असं नव्हतं पण विरोध मेला होता. दोन-तीन महिन्यात सरांना माझ्या या बिनविरोध शरणागतीचा कंटाळा आला, कॉलेजातलं काम पण वाढलं होतं, त्यामुळं त्यांच्या या संबंधातला इंटरेस्टच कमी होत गेला, आणि मी याचीच वाट पहात होते.' लिंक तोडत अनुजानं विचारलं ' तुला शिरा आणु अजुन, शिळ्या शिरा खरपुस भाजला की जास्त चवदार होतो ?' अनुजा आत गेल्यावर ती फक्त शि-याबद्दलच बोलत नाहीये हे स्मिताच्या लक्षात आलं, थोडंसं ऑकवर्ड वाटलं तिला.
अनुजा पुन्हा बाल्कनीत आली तशी स्मितानं विचारलं ' असं होण्याची का वाट पाहात होती ?' माहित असलेल्या अन कळत असलेल्या सगळ्या गोष्टी लपवायच्या कशा हे फक्त बायकांनाच जमतं बघ', थोडंसं कुत्सित हसत अनुजानं पुढं सुरु केलं' करुन करुन काय करुन घेणार होते सर माझ्याकडुन आणि किती वेळा, ह्या शरीराच्या पलीकडं बघायची शक्तीच नसणा-याकडुन काय अपेक्षा ठेवायच्या, दर रात्रीचा दहा पंधरा मिनिटांचा खेळ, नंतर माझं तोंड इकडं, त्यांचं तिकडं. सुरुवातीला मी काही दिवस रडायचे, मग ते देखील संपलं. काही गोष्टी सरांच्या देखील आवाक्यात नव्हत्या हे मला जाणवलं, आणि एकदा त्यांच्या लिमिट्स मला समजल्यानंतर मी त्यांच्याच आधारावर चाली रचायला लागले. एखादी गोष्ट बघुन त्याचा आनंद घेणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात वेगळ्या मर्यादा असतात, आणि तुम्ही खेळात जिंकु शकता खेळाचे नियम माहित झाल्यावरच, त्याआधी नाही. मी तेच केलं, नियम समजुन घेतले आणि मग त्याच नियमानुसार सरांना प्रत्येकवेळी हरवायला लागले, पुरुषाला बाकी कसलाही पराभव पचवता येतो बेडवरचा नाही, हे माझ्या लक्षात यायला लागलं, आणि मी त्याचाच फायदा घ्यायला सुरुवात केली. साहजिकच सरांची चिडचिड सुरु झाली, राग बाहेर कुठं काढावा हे समजत नव्हतं, कॉलेजात काम पडुन राहायला लागली. एकतर नोकरी नविन, त्यात असली नाटकं कोण खपवुन घेणार होतं, दोन महिन्यात त्यांची नोकरी गेली. '
दोघींचा शिरा खाउन झाला होता, किचनमध्ये चहा गरम करायला ठेवुन अनुजा तिथंच कट्ट्यावर बसली, स्मितानं हॉलमधुन खुर्ची ओढुन आणली तोवर चहा कपात ओतुन अनुजाच्या हातात कप ठेवला, त्या चटक्यानं स्मिता थोडी भानावर आली. ' पराभव म्हणजे काय करायचीस तु, कसं व्हायचं म्हणजे अजुन कुणी होतं,' स्मिता ओशाळली, आपण जरा जास्तच बोलतो आहोत असं तिला वाटलं' सॉरी हं अनुजा, तुझ्या दुखण्याबद्द्ल मी नको असं बोलायला ' अनुजाला, तिची अस्वस्थता जाणवत होतीच. छे ग कसलं दुखणं, तुला पण माहितीय किती वेळ लक्षात राहतात ही दुखणी, पहिल्या चार वेळेला अपमान वगैरे वाटतो, एकदा सवय झाली की भांडी घासण्याएवढंच साधं वाटतं सगळं, आणि तु अगदी सरांच्या सारखाच विचार केलास, अगं जो पुरुष स्वताच्या अपेक्षांच्या वजनाखाली दबुन मरायला तयार आहे त्याला मारायला दुस-या कुणाची गरजच नव्हती, ज्या मार्गानं सर अपेक्षा वाढवत होते मी सुद्धा तोच मार्ग स्विकारला, माझ्या अपेक्षा त्याच मार्गावर वाढवल्या, एका बाईनं असं करावं हे सरांना, म्हणजे त्यांच्यातला पुरुषाला पटलं नाही. पुरुषानं त्याची भुक भागवण्यासाठी स्त्रीचं शरीर वापरुन घ्यावं ह्या मानसिकतेत वाढलेल्या सरांना हे सगळं अपमानास्पद वाटत होतं, देणा-यानं देतच जावं, घेणा-यानं घेतच जावं अशी अपेक्षा ठेवुन जगणा-या सरांना देणा-यानं केलेली मागणी पेलवली नाही, दोन्ही पातळीवर शारिरिक आणि मानसिक. त्यात नोकरी गेल्याचा धक्का होताच. मग ब-याच खटपटी करुन त्यांनी इथं चिंबोरीच्या कॉलेजात नोकरी मिळवली एका महिन्यात. तो महिना माझ्यासाठी फार सुखाचा गेला, सर माझ्या जवळ देखील आले नाहीत, अगदी मी जवळ गेले तरी नाही. त्यांचं मन त्यांना खात होतं का कसं मला समजलं नाही पण त्यांनी मला त्रास दिला नाही हे तेवढंच खरं.
' हे सगळं होणार हे माहित असुन सुद्धा तु त्यांच्या जवळ जायचीस ?' स्मितानं अनुजाचं बोलणं तोडत विचारलं, ' का, माझ्या घरात, घरातल्या बेडरुममध्ये आम्ही नवरा बायको दोघंच असताना देखील मी माझ्या सुखाची मागणी करु नये, जर मी केलेल्या अपमानानंतर पुन्हा पुरुष म्हणुन सर असं करु शकत होते तर मी का नाही, आणि मी काही त्यांच्यासारखं आउट ऑफ बॉक्स मागत नव्हते, rather out Of CD मागणं नव्हतं माझं. माझ्या मागण्या साध्या सरळ सोप्या होत्या, पण निराशेच्या नशेत असलेला पुरुष काहीच देउ शकत नसतो आणि फार मोठ्या मनाचा गवगवा करत आपण बायका हे सत्य लपवुन ठेवतो, जगापासुन सुद्धा आणि स्वतापासुन सुद्धा. अशा खोट्या कोशांमध्ये राहायची सवय लावुन घेतो आपणच आणि मग वेळ निघुन गेल्यावर ओरडत राहतो. तुला सांगु, पोळ्या करताना गॅस संपला ना, की पोळी भाजली जात नाही, तवा गार होईपर्यंत मला गॅस बंद झाल्याचं कळत नाही, आणि चिडचिड होते ती पोळी न भाजल्याची, राग येतो तो गॅस संपलेलं लक्षात न आल्याचा. तशातली गत आहे ही. नविन सिलेंडर कधी लावला हे त्यावर लिहिलेलं असतं पण नंतर तो संपल्यावरच ती तारीख पाहतो आपण तो पर्यंत नाही, हो ना ?
चल, बाहेर फिरुन आणि जेवुन येउ, मी गाडी घेते निकाळजे काकुंकडुन' असं बोलुन अनुजा बाहेर गेली. स्मिताला बाहेर जाण्यात फार इंटरेस्ट नव्हता पण नको म्हणलं तर अजुन अवघड होईल म्हणुन ती तयार झाली. गाडीची किल्ली घेउन अनुजा आली, दहा मिनिटात आवरुन त्या बाहेर पडल्या. पार्किंग मध्ये गाडी मागं अडकुन पडली होती, पुढच्या गाड्या काढायला मदत करायला कट्ट्यावर बसलेली चार पोरं आली, तेवढंच नाही तर अनुजाला गाडी काढुन किक मारुन चालु करुन दिली. गाडीत पेट्रोल भरलं, दोघी जणी चिंबोरीतल्या एकुलत्या एक शॉपिंग मॉल मध्ये आल्या, हल्लीच सुरु झालेलं होतं ते. मॉल मधल्या एसिच्या गारव्यात दोघी मजेत फिरल्या, थोडी खरेदी केली, मग तिथल्याच एका स्टॉलवर खाउन घरी आल्या, निकाळजे काकु दारातच उभ्या दिसल्या. ' आलात का फिरुन, काय काय खरेदी केलीत, थांब ग थोडी भात भाजी देते, ' एकाच वेळी तीन चार वेगवेग्ळ्या गोष्टी बोलणं ही निकाळजे काकुंची स्पेशलिटि होती. भात भाजीची भांडी घेतली, गाडीची किल्ली दिली अन दोघी पुन्हा घरात आल्या. गेलेली लाईट परत आली की बटण चालु राहिलेला मिक्सर पुन्हा चालु होतो तसं झालं एकदम. '
किचनमध्ये भांडी ठेवुन दोघी तिथंच बसल्या, एक सांगु तुला, रागावणार नाहीस ना ?' स्मितानं विचारलं, कुणाच्या काही बोलण्यावर रागवावं या सगळ्याच्या पलीकडं गेली आहे मी, विचार', स्मितानं थोडा धीर गोळा केला अन विचारलं, तु अशीच आहेस का गं, तेंव्हा पासुन, म्हणजे अंगानं अशीच आहेस एखाद्या मॉडेलसारखी, तसं असेल तर कुणालाही मोह होईलच याचा उपभोग घ्यायचा, मग त्यात सरांचं काही चुकलं असं मला वाटत नाही' रात्रीपासुन स्मिताकडुन स्वतंत्रपणे आलेली ही पहिलीच रिअॅक्शन होती, अर्थात अनुजाला सध्या अनपेक्षित काहीच नव्हतं, हसुन ती म्हणाली हो हा विचार तर मी देखील केला होता, म्हणुनच तर एंजॉय करायला तयार झाले ना,
पण हिडिसतेला, विकृतीला एक मर्यादा असते, आणि सर जेंव्हा ही मर्यादा ओलांडायला लागले तेंव्हा मला लक्षात यायला लागलं की परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते आहे, इथुन पुढं सहन करणं शक्य नाही मला, म्हणुन मग मी काल म्हणलं तसं सरांचाच रस्ता धरुन त्यांच्यावर मात करत गेले, आणि माझ्या नशिबानं त्यात यशस्वी झाले' अनुजा असं काही बोलली की, स्मिताच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह यावं किंवा तिनं आणावं हे आता सहज झालं होतं, ' अशी गोंधळात काय पडलीस, सरांच्या रस्त्यावरुन म्हणजे काय हे स्पष्ट ऐकायचं आहे ना तुला, सांगते, इथं तु एकटीच आहेस, बाई आहेस, तिथं कोर्टात याबद्द्ल पाच सात पुरुषांसमोर यावर चर्चा झालेल्या आहेत, काही वेळातर माझ्या बरोबरच्या लेडिज कॉन्स्टेबलसुद्धा निघुन जायच्या, ज्युनियर होत्या बहुधा, त्यांना नसेल सवय या सगळ्याची अजुन,' कोर्ट, चर्चा या शब्दांनी स्मिताची उत्सुकता अजुन चाळवली गेली, ' माझ्या एक लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी सरांना सुचतात कुठुन, त्या ब्लु फिल्म पाहुन, मग मी एक दिवस हिम्मत करुन एक फिल्म पाहिली, पहिल्या पाच मिनिटात्च बंद करुन टाकली, उलटी झाली मला लगेच, पण असं मागं सरकले असते तर मी मरुन गेले असते,एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली होती , समोरचा जेवढा हिडिस किंवा विकृत होतो आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण झालो की तो तोल सोडतो,आणि हेच मला हवं होतं,
दुसरं कारण तोपर्यंत सर सुद्धा इथं सेटल झाले होते, त्यांची गाडी मुळ रस्त्यावर यायची चिन्हं दिसत होती, मग मात्र मी सगळा धीर गोळा केला अन एक दिवस एक पुर्ण फिल्म पाहिली, दोन दिवस, तीन दिवस असं करत महिनाभरात मला त्याचं व्यसन लागलं, नशे मध्ये माणसाचं धाड्स वाढतं, दोन महिन्यापुर्वी मी सरांना नाही म्हणायला घाबरत होते, आता माझ्या सुखाच्या मागण्या पुढं ठेवायला सुरुवात केली केली, एक हात दो एक हात लो, असं सुरु केलं,
एक दोन वेळा सरांनी विरोध केला, घरातुन निघुन गेले, दारु पिउन यायला लागले, ते तर माझ्यासाठी जास्त चांगलं होतं,दारु पिल्यावर त्यांचा स्वतावर ताबा राहायचा नाही, माझ्यावर काय हुकुम चालवणार होते' ' मारलं नाही त्यांनी तुला कधी सरांनी यावरुन ?' स्मितानं अनुजाचं बोलणं तोडत विचारलं ? ' नाही, तेवढी ताकद नव्हती त्यांची,मांजर उंदराला खेळवते तशी त्यांना खेळवत होते, अगदी उपाशी मारायची नाही त्यांना, जिवंत राहतील एवढं अन्न मिळत होतं त्यांना,' पाणी प्यायला उठत अनुजानं विचारलं ' शरद मारतो ना ग तुला, तु असं काही क्ररायला नाही म्हणालीस तर ?'
Print Page
1 comments:
Parat Ekada ata ekda pudhachya bhagachi vat baghavi laganar..........ekdam mast ha pan episode as other...
Post a Comment