tag:blogger.com,1999:blog-2976138582624600512024-02-07T12:03:51.924+05:30गा आणि खाThe only two things I like in the life.हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.comBlogger100125tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-31562991272523584242016-07-02T02:16:00.000+05:302016-07-02T02:16:45.489+05:30अंकोदुही भाग ११
माझ्या दालनात येईपर्यंत माझ्या कानांत काकांचं शेवटचं वाक्य घुमत होतं ‘
तुम्हांला तिघींना तुमचा निर्णय घेण्यासाठी उद्या सुर्यास्तापर्यंतची वेळ आहे,
उद्या सुर्यास्तानंतर आपण सर्वजण इथं जमु आणि तुमचा निर्णय ऐकु. त्यानंतरच्या
दिवशी चवथ्या प्रहरी राजा दशरथांना भेटायला आपणा सर्वांना जायचं आहे, तुमचा निर्णय
काहीही असला तरी..’<o:p></o:p>
मांडवी शक्य तेवढ्या रागानं बोलत माझ्या दालनात आली. तिच्या मागोमाग श्रुतकिर्ती
आणि ताई पण आल्या. ‘ ताईच्या स्वयंवरात कितीतरी राजे आले होते, त्या सर्वांनी तो
धनुष्याचा पण पुर्ण करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर तिचा विवाह निश्चित झाला,
जे त्या स्वयंवरात सहभागी झाले त्यांची नावं, राज्यं, संपत्ती याची थोडी तरी
कल्पना होती आपल्याला, पण याबाबतीत तसं काहीच घडणार नाही.’<o:p></o:p>
पण त्याच बरोबर एक निर्णय समानतेची किंवा स्वातंत्र्याची संधी मिळत नसल्याचा राग
देखील होताच.<o:p></o:p>
पाहायचं आहे तुझा निर्णय घेण्यापुर्वी.’ श्रुतकिर्ती या विषयावर पहिल्यांदाच
स्पष्ट बोलली., ‘ मला तर नुसतं पाहायचंच नाही तर त्यांची भेट घ्यायची आहे आणि
बोलायचं देखील आहे ‘<o:p></o:p>
उद्यापर्यंत न ठेवता आताच आईला अन् काकुला सांगायचं ठरलं आणि आम्ही आईच्या दालनात
गेलो. तिथं आई एकटीच होती, दासी तिच्या पायांना उटी लावत होत्या, आम्हांला बघताच
त्या निघुन गेल्या, ‘ मला वाटलंच होतं, तु येशील असं, पण तुम्ही तर सगळ्याच जणी
आल्या आहात ‘ आई माझ्याकडं पाहात उठुन बसली. <o:p></o:p>
घेता, तिचा विचार आईला बोलुन् दाखवला. ‘ तुझी मागणी अगदीच अयोग्य आहे असं नाही, पण
याचा निर्णय उद्या सकाळी राजा जनक आणि कुलगुरु करतील, आणि राजा दशरथांना देखील या
बद्दल विश्वासात घ्यावं लागेल.’ <o:p></o:p>
एकदा आमच्या बाजुनं बोलली होती, आम्ही परत निघताना तिच्या हालचालीतुन एक तणाव
जाणवत होता, किंचित आनंदाचा भास होत होता, दालनाच्या दरवाज्यातुन मी मागं वळुन
पाहिलं तेंव्हा आई एका गवाक्षाला टेकुन बाहेरचं आकाश पाहात होती. माझ्या दालनात
येउन मी देखील तशीच उभी राहिले, पण माझ्या गवाक्षातुन मला आकाश पाहता येत नव्हतं,
त्याची कल्पना करावी लागत होती. तो छोटासा काळाकभिन्न् आकाशाचा तुकडा आणि एखादाच
तारा कुठंतरी दुरवर चमकणारा, प्रत्येक रात्री तुमच्या समोर चंद्राची कोर येत नसतेच
आणि आली तरी तिचा प्रकाश तुम्हाला पुढची वाट दाखवेलच असं नाही,<o:p></o:p>
समजायला सुर्याचीच साथ असावी लागते, उदया काय होईल याच्या नेहमीसारख्या विचारात
हरवुन मला झोप लागली, कधीतरी दासी येउन दालनातले दिवे शांत करुन गेल्याचं जाणवलं. <o:p></o:p>
रात्रभर दिवे जळत असल्याचं कळालं, या
पुर्वी असं कधी झालेलं नव्हतं. मी मात्र सकाळी उठुन गाईंच्या गोठ्यात गेले, दिवस
उजाडताच त्या सा-या गाई अन् वासरं चरायला नेली जात, पुर्वेच्या जंगलांच्या सीमेवर
जिथं उंच उंच गवतांची दुरवर पसरलेली वनं होती, मला तिथं जायला खुप आवडायचं, पण आज
ते शक्य नव्हतं. थोडा वेळ तिथं थांबुन मी दालनात आले, आईचा निरोप आलेला होता
सकाळच्या दुस-या प्रहरीच आम्ही तिघी जणी आईच्या दालनात आलो, बाबा तिथंच होते. आईनं
आमचं कालचं बोलणं त्यांच्या अन् काकांच्या कानी घातलं होतं. <o:p></o:p>
घालत होते, बहुधा काकांची वाट पाहात होते. ते येइपर्यंत कुणीच काही बोललं नाही, मला
ताईची तिथं नसण्यानं उगा अस्वस्थ होत होतं, काही क्षण असे वाट पाहण्यात गेले, आणि
काका, काकु आणि ताई एकत्रच आले, ताईनं आज रक्तवर्णी वस्त्र अन् अलंकार घातले होते,
पांढ-या शुभ्र वस्त्रांत असलेल्या काकांच्या मागुन येताना ती ज्वालेसारखीच दिसत
होती. सगळे जण बसल्यावर दालनाचे दरवाजे बंद करण्यात आले अन् दिवसा देखील
गवाक्षांचे पडदे ओढले गेले. <o:p></o:p>
राजा दशरथांना स्वतः यायचे आहे, असा निरोप आला आहे आताच दुताने, तसेच आपण सर्वांनी
त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणी म्हणजे उत्तकिर्ती उपवनात यावं असा देखील निरोप
त्यांनी दिला आहे. ‘ काकांनी एका दमात सगळं सांगुन टाकलं. मी ताईकडं पाहिलं, तिन्ं
डोळ्यांनीच सगळं काही व्यवस्थित असल्याचं सांगितलं. ‘ आज दुपारी भोजनानंतर राजा
दशरथ आणि त्यांचे पुत्र आपल्या सभेत येणार आहेत, तुम्ही सर्वांनी त्यावेळी तिथं
यावं, अर्थात सर्व मर्यादा पाळुनच ही भेट होईल, तसेच पुर्वेकडच्या काही राज्यांनी
या स्वयंवराच्या विरोधात एकत्र येउन युद्धाची तयारी सुरु केली असल्याची वार्ता
आलेली असल्यानं या प्रस्तावावर एक दोन दिवसांत आपण निर्णय घ्यावा असं
मंत्रिपरिषदेचं विचार आहे, अर्थात तुम्हां तिघींवर कोणताही दबाव नाही निर्णय
घेण्यासाठी हे लक्षात ठेवा परंतु त्याचवेळी हे आपलं राज्य, प्रजा आणि समाज या
सर्वांचाही विचार तुम्ही कराल एवढ्या ज्ञानवती तुम्ही आहात हे मी जाणतो ‘<o:p></o:p>
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-64934539937003064732016-06-27T06:29:00.001+05:302016-06-27T06:29:55.257+05:30अंकोदुही भाग १०
बोलावलं आहे,’ दासीच्या आवाजानं दोघीही एकदमच भानावर आलो, अंगावरची वस्त्रं सावरुन
लगेच काकांच्या कक्षाकडं निघालो, जाताना मांडवी अन् श्रुतकिर्ती देखील आमच्या
बरोबरच होत्या .
राजसभेच्या मोठ्या दालनात बोलावलं होतं, याचा अर्थ आता जे बोलणं होणार आहे ते
वैयक्तिक किंवा कौटुंबिक नव्हतं तर त्यापेक्षा जास्त मोठे असं काही होतं. आम्ही
सगळ्याजणी जेंव्हा तिथ्ं पोहोचलो, तेंव्हा तिथ्ं आई, बाबा, काका, काकु आणि काही
म्ंत्रि व आमचे कुलगुरु बसलेले होते. आमच्या साठी आसनं राखुन ठेवलेली होतीच, आम्ही
बसताक्षणीच, काकांनी बोलायला सुरुवात केली,‘हे कुलगुरु आणि मंत्रिगण,सितेचं
स्वयंवर संपन्न झालं, अयोध्येचा राजकुमार रामाबरोबर तिचा विवाह निश्चित झाला आहे,
त्याचवेळी राजा दशरथांनी एक प्रस्ताव ठेवला आहे, तो प्रस्ताव या तिघींच्या
संदर्भात आहे’<o:p></o:p>
आले होते.. त्यांनी मंत्रिगणांपैकी एक, स्वधत्वांना पुढे बोलायला सांगितले,
त्यांनी राजा दशरथांचा प्रस्ताव आम्हां समोर मांडला, आणि पुन्हा आसनस्थ् झाले..<o:p></o:p>
निर्णय आहे प्रत्येक् स्त्री साठी, त्या बद्दलच्या प्रस्तावाची चर्चा अशी राजमंत्र्यांचा
समोर का करण्यात येते आहे, याचं कारण विचारु शकतो का आम्ही ? मी माझा प्रश्न विचारला.
आईचं माझ्याकडं पाहणं मला अजुनही आठवतं, किंचितसा धाक आणि बरंच कौतुक होतं तिच्या
बघण्यात..<o:p></o:p>
आले होते, तेंव्हा स्वधत्वांना काही बोलायचं होतं, पण काकांनी हात वर करुन त्यांना
बसायला सांगितलं, ‘उर्मिले, हा प्रश्न मला फक्त तुझ्याकडुनच अपेक्षित होता अन तु
माझा अपेक्षाभंग केला नाहीस. होय, विवाह संबंध हा वैयक्तिकच निर्णय आहे
तुमच्यासाठी, नव्हे सर्वांसाठीच पण राजा दशरथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी जी शंका
उपस्थित केलेली आहे, त्या शंकेचं उत्तर शोधण्यासाठी किंवा तिचं निराकरण करण्यासाठी
त्यांनीच हा प्रस्ताव् मांडला आहे, आणि हे इतक्या कमी वेळात झालं आहे, याचा अर्थ
या प्रस्तावावर त्यांनी इथं येण्यापुर्वीच विचार केलेला आहे. सहज सुचलेला असा हा
उपाय नाही. या प्रस्तावावर आपण जो काही निर्णय देउ त्याचे बरेच साद पडसाद फक्त
सितेच्या किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरच पडतील असे नाही तर आपल्या राज्यावर,
राजकारणावर देखील पडु शकतात्.’<o:p></o:p>
मी आणि तुझ्या बाबांनी आपल्या मंत्रिसभेसोबत आणि सेनाध्यक्षांसोबत् विचार केलेला
आहे, तसेच दिवसभर तुझी काकु आणि आई ह्या कुलगुरंसोबत याबद्दलच्या शास्त्र आणि
धर्मग्रंथाच्या संदर्भाने चर्चा करत होत्या. या दोन्ही बाजुंनी विचार केल्यास हे
चारही विवाह होणं हे आपल्या राज्याच्या सुरक्षेच्या आणि भविष्यातील प्रगतीच्या
दुर्ष्टीनं उपयुक्त आहेच, आणि शास्त्रांनी देखील अशा विवाहांना मान्यता नाकारलेली
नाही.’<o:p></o:p>
निवड तुम्ही करण्याबाबत, .. आईनं उठुन आमच्या बाजुला येत बोलायला सुरुवात केली. ‘
अयोध्येच राज्य आणि तिथला राजवंश हे काही
उत्क्रुष्ट राजसंस्थांपैकी एक आहेत, राजा दशरथांचे चारही पुत्र शारिरीक, बौद्धिक
आणि भावनिक कसोट्यांवर उत्तम उतरु शकतील याबाबत आपल्या गुप्तहेरांनी खात्री दिलेली
आहे, आणि आपल्या आयुष्यभराच्या सहचराबद्दल अशा उत्तम क्षत्रिय कुळात जन्मलेल्या
पराक्रमी पुरुषांपेक्षा तुमची अपेक्षा फार वेगळी नसेल असं आम्हांला वाटतं’<o:p></o:p>
प्रस्ताव आमच्या पैकी एकालाही योग्य वाटला नसता, तर या चर्चेसाठी तुम्हाला बोलावण्यात
आलंच नसतं, तुमचं मत विचारलं गेलंच नसतं. आता हा प्रस्ताव स्विकारणं किंवा नाकारणं
हेचं तुमचं स्वयंवर आहे असं तुम्ही समजु शकता..<o:p></o:p>
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-3831215276302280432016-06-19T13:59:00.000+05:302016-06-19T13:59:30.784+05:30अंकोदुहि भाग् ०९
आज, वाड्यातला मोठा चौक सजवला होता, सर्व् बाजुंनी तलम् वस्त्रांचे पडदे अन् त्या जोडीला विविध आकाराची आसनं, वेगवेगळ्या पुष्परचना आणि खुप सारे सुगंधी द्रव्यांचे धुप त्या चौकात एका मंगल कार्याची चाहुल देत होते. तिस-या प्रहराला दशरथ राजा सहित, राम्, लक्ष्मण्, ऋषीगण, कुलगुरु आणि मंत्रिगणांचं आगमन झालं, बाबा स्वागताकरिता वाड्याच्या मुख्या प्रवेशद्वाराजवळच उभे होते. चौकात सगळे जण् आल्यावर, काकांनी सर्वांचं स्वागत केलं, ज्याला त्याला मानानुसार आसनांवर बसवलं गेलं, मध्याभागी दोन वर्तुळाकार आसनांवर् काका आणि राजा दशरथ बसले होते. जलपान् आणि मिष्टान्न सेवनानंतर बराच काळ चर्चा होत राहिली.
‘’ जनका, तुम्ही तुमच्या कन्येचं उभं केलेलं स्वयंवर माझ्या मुलानं जिंकले आहे, हे तुमचं आणि आमचं, सौभाग्यचं म्हणावं लागेल, या दोन्ही प्रचंड आणि बलवान राज्यांमध्ये जुळुन येणारा हा संबंध आपल्या सुरक्षित भविष्याची सुरुवात ठरेल हे नक्की. परंतु माझ्या एका मंत्र्यानं एक शंका उपस्थित केलेली आहे, त्याबद्दल आपण आपापल्या कुलगुरुंचा विचार घ्यावा असं मला वाटतं..
राजा दशरथांच्या शांत अन गंभीर आवाजानं तिथं उपस्थित असलेले सगळेजण मोहित झाले होते जणु,, ‘’ तुझी कन्या सीता हि तुमची निजकन्या नाही, तुम्हाला सापडलेली या भुमिच्या पोटात, तिचं उत्पतस्थान आणि वंश यांचा शोध लागणं फार कठिण आहे. अशा कन्येबरोबर् माझ्या ज्येष्ठ् राजपुत्राचा विवाह झाला, तर तो क्षत्रिय आणि अक्षत्रिय विवाह् ठरेल आणि वर्णभेद झाल्यानं आणि यानंतर माझ्या इतर तीन पुत्रांचा विवाह क्षत्रियकन्यांशी होणं ही गोष्ट अवघड होईल.
‘ परंतु महाराज दशरथांनी असा विचार करावा हे योग्य वाटत नाही ‘ काकांचा आवाज् सुद्धा तेवढाच शांत आणि विश्वासु होता. ‘ प्रत्यक्ष देवाधिदेवांच्या प्रसादानं आपणांस प्राप्त झालेले हे चार् पुत्र तेवढेच पराक्रमी अन् तेजस्वी आहेत., हा वर्णभेदाचा विचार एखाद्या अशक्त क्षत्रियानं केला पाहिजे, आपल्यासारख्या बलवान राजा आणि अयोध्येसारख्या शास्त्रनियंत्रक राजसत्तेसाठी असा विचार योग्य नव्हे.
‘योग्य आणि मान्य असा विचार तुम्ही पुढं ठेवला आहे राजा जनक, जसे आम्ही चार पुत्रांचे पिता आहोत तसेच तुमच्या शुभकुळात् देखील् अजुन तीन कन्या आहेत. या स्वयंवराने राम जानकीचा विवाह् सिद्ध झाला आहे, तसेच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह् त्या तिघिंच्या समवेत करुन हा शास्त्रोत्त्पन्न प्रश्न सोडवता येउ शकतो..’
एखाद्या गोष्टीचा फार खोलवर आणि दुरपर्यंत विचार करुन बोलल्याप्रमाणे राजा दशरथांनी त्यांचा विचार त्या छोट्याश्या सभेपुढे ठेवला. या शक्यतेचा कुणी विचारच केला नसावा, किंबहुना ताईचं स्वयंवर, ते धनुष्य या गोष्टी एवढ्या मोठ्या झालेल्या होत्या की त्यामागे असा काही विचार करावा हे देखील कुणाला सुचले नाही. अर्थात बाबा आणि आईच्या बोलण्यात ब-याच वेळा अशा प्रकारच्या चर्चा ऐकु येत हे खर्ं..
त्या दिवशी इतर काही विषय नव्हताच कुणाला बोलायला, नगरातल्या नागरिकांपासुन ते आमच्या मंत्रीगणांपर्यंत हा एकच विषय होता, ताईच्या वेगळेपणाचा प्रभाव एवढ्या प्रखरतेनं या पुर्वी कधीच जाणवलेला नव्हता. या सगळ्यांनं तिला एकाकी वाटु नये म्हणुन् मी तिच्या दालनात् गेले. ती नेहमी प्रमाणे शांत होती, मंचकावर झोपुन ती फार काही गहन विचार करत आहे असं जाणवलं मला, तरी देखील माझ्या चाहुलीनं ती उठली अन पश्चिमेच्या तिच्या आवडत्या गवाक्षात् जाउन् उभी राहिली, मी तिच्या जवळ जाउन थांबले, बाहेर सुर्य क्षितिजाला टेकला होता, कोणत्याही श्रेष्ठ रंगकर्मीन्ं कितीही तपस्या केली तरी शक्य होउ नये अशा रंगछटा तिथं पसरल्या होत्या, आणि दर क्षणाला त्यांच्यात असंख्य बदल होत होते, काहीशा वेगानं चाललेल्या वा-यांनी चुकार ढगांबरोबर खेळ चालवलेला होता.
तितक्यात सुर्यास्ताचा घंटानाद नगरात दुमदुमु लागला, आमच्या मागुन आलेल्या एका दासीनं घाईनंच त्या गवाक्षावरचा जाड गवताचा पडदा खाली पाडला अन् आम्ही दोघी पुन्हा कालच्याच पुष्करणिजवळ येउन बसलो, काहीही न बोलता, बरंच काही सांगितलं जात होतं अन् ऐकु येत होत्ं.. शेवटी ताईनंच सुरुवात केली.. ‘ का गं, तुम्हा क्षत्रियकन्यांना मान्य आहे का असा विना स्वयंवराचा विवाह,? स्वत्ः निवड करण्याचा तुमचा अधिकार तुम्हाला आहे, पण तो न वापरता येणं याला तुमची तयारी आहे?
‘स्वयंवराची गरजच आहे कशासाठी, तर एखाद्या स्त्रीला ज्या पुरुषाबरोबर आपल्ं आयुष्य व्यतित करायचं आहे, तिला तो पुरुष योग्य वाटतो किंवा नाही, हे समजुन् घेण्याचा हा अधिकार् आहे. यांत स्वातंत्र्य निवडीचं आहे, ‘ मी आईबरोबरच्या चर्चेतुन जे मला समजलं होतं त्याचा विचार करुन उत्तर दिलं..
परंतु, ही निवड करायची आहे, ती कोणत्या क्षमतांवर, त्या पुरुषाची युद्धसज्जता, परहत्या पराक्रम का संपत्ती का बौद्धिक संपन्नता अथवा प्रजननक्षमता.. माझ्यासाठी हा धनुष्याचा पण उभा केला गेला, पण जर हे धनुष्यच नसतं तर कशाच्या आधारावर मला माझ्या आयुष्याच्या जोडिदाराची निवड करावी लागली असती ? ताईच्या मनात असे बरेच प्रश्न होते तसे माझ्या मनात् देखील. त्यांची उत्तरं माझ्याकडंही नव्हती त्यामुळं मी शांत राहायचं ठरवलं. अशा वेळी शांतताच आपल्या प्रश्नांची उत्तरं देते किंवा कधी कधी त्या प्रश्नांचं अस्तित्वच मिटवुन टाकते.
मग असे प्रश्न पडुन राहतात शस्त्रागारांच्या अंधा-या कोप-यात पडुन राहिलेल्या वज्रांच्या पात्यांसारखे, त्यांच्या तुटलेल्या धारेला आता काहीही अर्थ उरलेला नसतो, आणि त्या मोडुन् पडलेल्या शराग्रांसारखे ज्यांच्या मागचे काष्ठांगही तुटुन गेल्यानं ते होउन राहिलेले असतात धातुंचे तुकडे, पुन्हा कधी एकदा तो अग्नी वितळवुन् टाकेल अन पुन्हा जन्म होईल या आशेवर.
आणि हो एकदा का हे अर्थहीन वाटणारे धातुंचे तुकडे वितळवले की मग मात्र त्यापासुन् पुन्हा बनतात तशीच शस्त्रे जी पुन्हा तेवढीच जीवघेणी असतात, तुम्हाला हवी असली तरी किंवा कसेही..
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-103009617256148912016-06-19T13:58:00.001+05:302016-06-19T13:58:32.372+05:30अंकोदुहि भाग् ०८
पुर्वी एका रात्री मी आईच्या मांडीवर डोकं ठेवुन झोपण्याचा प्रयत्न करत होते, तेंव्हा आईनं विचारलं, ' बाळा, काहीतरी विचारायचं आहे तुला, आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मला सुद्धा शांतता मिळणार नाही, विचार काय हवंय तुला ?'
मी आईला आज पुन्हा तोच प्रश्न् केला, ‘’ आई, स्वयंवर् म्हणजे आपल्याला जो आवडेल्, हवासा वाटेल् असा वर् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् देणारी व्यवस्था ना, मग् ताईच्या स्वय्ंवरात् तो धनुष्याचा पण् कशासाठी ठेवला गेला ?, त्या धनुष्याच्ं अन् ताईच्ं काही नात्ं आहे. आणि तु मागे एकदा क्षत्रिय असा उल्लेख् केला होतास्, त्याचा इथ्ं काही स्ंब्ंध् आहे अशी श्ंका आहे मला, या सगळ्याचा उलगडा झाल्याशिवाय् मला देखिल् शांतता लाभणार् नाही.’’
आईच्या चेह-यावरचे शांत भाव् बदलत चालल्याच्ं मला जाणवल्ं, अगदी तिच्याकड्ं न पाहता देखील्, माझ्या डोक्यावर् फिरणारा तिचा हात् आता एकाच् ठिकाणी स्तब्ध् झाला होता. ‘’ हे पहा बाळा, तु म्हणतेस् ते अगदी योग्य् आहे, एखाद्या स्त्रिला तिला योग्य वाटेल् अशा पुरुषाशी विवाह् करण्याची मोकळीक् असण्ं म्हणजे स्वयंवर्, पर्ंतु हे तुम्हां तिघींच्या, क्षत्रियकन्यांच्या बाबतीत् खर्ं आहे, कारण् तुमचा जन्मच् झालेला असतो, स्वत्ंत्र विचाराच्या आणि निर्णयक्षमता असलेल्या स्त्रि पुरुषाच्या संकरातुन्, तुमच्या आईन्ं देखील् स्वयंवराचा अधिकार् वापरुन् आपल्या पतिची निवड् केलेली असते, पर्ंतु तुझ्या ताईच्ं तस्ं नाही, ती भुमिकन्या, जमिनिच्या पोटात् एका पेटित सापडलेली, तिच्या ख-या मातापित्यांविषयी कुणालाच सत्य् माहित् नाही.
मग या भुमिलाच तिची आई मानल्ं जाउ लागल्ं, क्षत्रिय् हे या भुमिवर् राज्य करणारे आणि भुमि हे राज्य् करुन् घेणारी हा नियम् आहे या जगाचा. या भुमिच्ं रक्षण् करण्ं हे आपणा क्षत्रियांच्ं कर्तव्य, या बदल्यात् हि भुमी त्यांना धान्य्, धातु अशी स्ंपत्ति देत् राहते.. तिला आपला रक्षक् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् नाही, अनेक् वेळा युद्धातुन् किंवा तहांमधुन् तिचा रक्षक् , तिचा अधिकारी बदलतो,
म्हणुन् तुझ्या ताईसाठी हा स्वयंवरात् हा पण् ठेवला गेला, निदान् या धनुष्याच्या निमित्तान्ं तरी या भुमिकन्येचा विवाह् योग्य अशा क्षत्रियाबरोबर् व्हावा जो तिच्ं रक्षण् करु शकेल्, तिला जपु शकेल् आणि तिच्यापासुन् प्राप्त् होणा-या स्ंपत्तीचा अधिकारी होउ शकेल्.
या उत्तरान्ं ना माझ्ं समाधान् झालं, ना आईच्ं पण् आता अजुन् झोप् टाळण्ं शक्य् नव्हत्ं, म्हणुन् आम्ही दोघीही झोपी गेलो.
या दिवसान्ंतर् आमच्या नगरांत् फिरण्यावर् ब्ंधन्ं आली, कुठेही जायच्ं असेल् तर् बाबांना किंवा काकांना विचारुनच् जाव्ं लागे आणि प्रत्येकवेळी महिष् दलाच्या आवरणातच् वावराव्ं लागे, नाट्यशाळा असो की गोशाळा, एखादाच् दिवस् उद्यानात् आणि नदी किनारी जायची परवानगी मिळे.
‘ उद्या राजा दशरथ् आणि त्यांचे म्ंत्रिगण् वाड्यात् येणार् आहेत्’ बाबांनी आमच्या दालनात् येत् घोषणाच् केली, आम्ही तिघी उठुन त्यांना नमस्कार् केला, उद्या तिस-या प्रहरी राजा दशरथ् आणि त्यांचे सहकारी म्ंत्रि तसेच् कुलगुरु येणार् असल्याच्ं कळाल्ं, बाबा, काका आणि इतर् मोठ्यांना तर काही वेळ् नव्हता, त्यांच्या सोबत् सगळी मिथिला नगरी एक् लग्ननगरी झाली होती.. सगळे जण् विवाह समारंभाच्या तयारीत् लागले होते, पण् अजुन् विवाह् कधी आहे हेच् ठरलेल्ं नव्हत्ं, उद्याच्या भेटीच्या वेळी या सर्व् गोष्टी ठरतील् अस्ं आईन्ं सांगितल्ं.
ती रात्र मी आणि ताईन्ं वाड्यातल्या पुष्करिणिच्या काठावर् बसुन् बोलत् जागवली.. ‘’ ताई, तुला पुन्हा भेटावं अस्ं वाटलं का गं रामाला, ? मी विचारल्ं ‘ नाही ग, त्या दिवशी आपण् नाट्यशाळेत् जात् होतो तेंव्हा त्यांच्या निवासाजवळुन् रथ् जाताना दिसले होते, थांबाव्ं अस्ं वाट्लं देखील्, पण् बाबांची आज्ञा आठवली अन् काही बोलले नाही.’’
‘हो, पण् तेंव्हा तर् ते दिसले होते ना, च्ंपकव्रुक्षाखाली बसलेले त्या ऋषींसोबत्, एका हातात् खड्ग् होत्ं अन् दुस-या हातात् बाण्, तुझा विचार् होता तर थांबलो असतो, मी तर बाबांची अनुमती घेतली असती अशा वेळी..
अजाणतेपणी मी तिला तिच्ं वेगळ्ंपण् जाणवुन् देण्याचा प्रयत्न् केला, अन् ती एकदम् शांत झाली, समोरच्या पाण्यात् पाहात्. मग मीच् माझ्या डोक्यातुन् एक् फुल् काढुन् पाण्यात् टाकल्ं अन् पाणि हलल्ं तस्ं तिच्ं एकटक् पाहण्ं भंगल्ं, ‘’ खर्ं सांगु, आता या पाण्यात् पण् मला रामाच्ंच् चित्र दिसत्ंय्,’’ तिच्या चेह-यावर् पुन्हा तेच आश्चर्य् आणि मोहाचे तर्ंग् उमटत होते.
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-57862766566909381712016-06-19T13:57:00.000+05:302016-06-19T13:57:09.707+05:30अंकोदुहि भाग् ०७
त्याचवेळी, काही ऋषीचं तिथं आगमन झालं, आणि त्यांच्या बरोबर दोन युवक होते, ते होते ऋषीवेशातच मात्र त्यांच्या हातात शस्त्रं होती, त्यांच्या पायातल्या लाकडी खडावांच्या खडखडाटानं सभास्थान भरुन गेलं, जेंव्हा ते सर्वजण मध्यभागी थांबले तेंव्हा अपयशानं दुखी दिसणारा रावण आपले अलंकार,वस्त्रं अन खड्ग सावरीत निघाला होता, आतादेखील तो तेवढाच तो-यात चालत होता जेवढा आत येताना होता. तो बाहेर गेल्यावर तिथली कुजबुज कमी झाली, ' हे जनकाधिपती प्रजावत्सल जनका, माझ्या बरोबर अयोध्यानरेश दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण आलेले आहेत, आणि ते देखिल इथं उपस्थित असलेल्या राजांच्या एवढेच या स्वयंवरात भाग घेण्यासाठी योग्य आहेत परंतु काही काळापासुन ते आम्हां बरोबर असल्याने ते इथं उपस्थित असलेल्या इतरांसारखे राजवस्त्रांलंकारांनी सज्ज होउन येउ शकले नाहीत, आणि अशी माझी खात्री आहे की ह्या स्वयंवरात सर्व लायक क्षत्रियांना भाग घेता येईल, या साठी त्यांना तुझी अनुमती असावी असं मला वाटतं ' त्या ऋषींचं हे बोलणं संपलं त्याच वेळी शस्त्रधारी ते दोन युवक पुढं आले, खांद्यावरची तपकिरी रंगाची भिल्ल प्रकारची धनुष्यं सावरत त्यांनी काका आणि बाबांकडे पाहात नमस्कार केला.
बाबा, घाईघाईनं आसनावरुन उठुन खाली गेले, त्यांनी त्या ऋषींच्या पायावर मस्तक ठेवुन नमस्कार केला अन अतिशय आदरानं त्यांना आसनावर बसवलं, बाजुच्याच आसनांवर राम आणि लक्ष्मण देखील बसले. दोन्ही राजकुमारांनी सगळ्या सभेचं लक्ष वेधुन घेतलं, ऋषींनी ओळख करुन दिली नसती तरी ते दोघं एखादया मोठ्या वंशाचे आहेत हे त्यांच्या चेह-यावर आणि हालचालीतुन समजत होतंच. बाबा, पुन्हा व्यासपीठावर आल्यावर त्यांचं, काकांचं अन कुलगुरुंच काही बोलणं झालं, अगदी हलक्या आवाजात. काही क्षणांनंतर काकांनी आसनावरुनच हात वर करुन आज्ञा दिली, त्याच वेळी सगळ्या मंडपातुन पसरुन राहिलेलं आमचं सैन्यदल बाहेरच्या बाजुला निघुन गेलं, माझा हात नकळत कंबरपट्ट्यामधल्या शस्त्रावर स्थिर झाला, आता अगदी एकदाच लक्ष देउन पाहिलं तरी मोजता येतील आणि लक्षात राहतील एवढेच लोक मंडपात उरलेले होते. काकांनी ऋषींच्या दिशेनं बघुन हातानंच अनुज्ञा दिली, राम आसनावरुन उठले, खांद्यावरुन धनुष्य आणि त्याखालचं भिल्ल वस्त्र काढुन ठेवलं, सभेच्या मध्यभागी येउन व्यासपीठाकडं पाहात काकांना नमस्कार केला, वळुन धनुष्याकडं गेले त्याला नमस्कार केला, आणि जणु काही बराच काळ ते धनुष्य हाताळत असल्याप्रमाणं, ते उचललं, एका बाजुला प्रत्यंचा लावली, ते टोक डाव्या पायात पकडलं, प्रत्यंचेचं दुसरं टोक उजव्या हातात होतं, डाव्या हातानं धनुष्य पकडलेलं होतं. आमच्याकडं त्यांची पाठ होती, दोन क्षण थांबुन उजवा हात पाठीमागुन फिरवत धनुष्याच्या टोकापर्यंत नेला, आणि प्रत्यंचा धनुष्याला बांधली. पण पुर्ण झाला, आणि व्यासपीठाकडं वळत उत्सुकतेनं प्रत्यंचेला ताण दिला, ताणलेली प्रत्यंचा सोडताच झालेला नाद सगळ्यांनीच आश्चर्यचकित करुन गेला.
झाल्ं, स्वय्ंवराची अट् पुर्ण् झाली, रामान्ं ते धनूष्य् खाली ठेवल्ं आणि पुन्हा मागं वळुन् काकांना नमस्कार् केला आणि जाउन् आसनावर् बसुन् राहिला, ताईची अवस्था मात्र पाहावत् नव्हती. तिच्या चेह-यावर् आश्चर्य् आणि मोह् एकत्रच् दिसत् होते, जणु काही ती याच् क्षणाची वाट् पाहात् होती, पण् त्याचवेळी तो येउ नये असंही तिला वाटत् होत्ं.
बाबांनी पुढ्ं होउन् स्वय्ंवराचा सोहळा स्ंपल्याची घोषणा केली, तसेच् सर्व उपस्थित् राजांचे आणि इतर जनांचे आभार् मानले, पाहता पाहता त्या ऋषीगण् आणि राम् लक्ष्मणाच्या बाजुला आमच्या सैनिकांची एक् तुकडी अर्धवर्तुळाकार् परिघात् उभी राहिली, बाबा खाली उतरुन् त्यांच्याकडे जाउन् त्यांच्याबरोबर् बोलत् होते, काकांनी आम्हां सर्वांना तिथुन् वाड्यात् जायला सांगितल्ं. आम्ही चौघीजणी शांतपणे आत् आलो, एव्हाना तिथ्ं जे काही झाल्ं ते आई आणि काकुना कळाल्ं होत्ंच्.. त्यांच्याही चेह-यावर् आन्ंद् होता. ताईला समोर् बघताच् काकुन्ं जवळ् घेतल्ं, दोघींच्या डोळ्यातुन् अश्रु वाहात् होते.
त्याच दिवशी एक राजदुत अयोध्येला पाठवण्यात आला, राम, लक्ष्मण आणि ऋषींची राहण्याची व्यवस्था वाड्याच्या जवळच असलेल्या एका उद्यानात केली होती. सगळे नगरवासी आता, स्वयंवराची तयारी आवरुन विवाहाच्या तयारीला लागले होते, तीन चार दिवसांनी राजा दशरथ आपल्या कुटुंबियांसहित मिथिलेला येत असल्याची वार्ता आमच्या गुप्तचरांतर्फे आम्हाला मिळाली.
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-50523005455385177812016-06-19T13:55:00.004+05:302016-06-19T13:55:42.988+05:30अंकोदुहि भाग् ०६
आणि, उजव्या रांगेच्या पहिल्या राजाच्या मंत्र्यानं उभं राहुन त्या राजाची ओळख करुन द्यायला सुरुवात केली. ते झाल्यावर काकांनी ताईला विचारलं, ' योग्य ?' तिनं उत्तर दिलं ' योग्य' . काकांनी हात उंचावुन तिची मान्यता सभेला कळवली, आणि निसंदन क्षेत्राचा तो राजा धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याकरिता उभा राहिला.
त्यानं ते धनुष्य उचललं, अगदी सहज पेललं आणि प्रत्यंचा उचलण्यासाठी तो खाली वाकला, पण त्यावेळी त्याचा तोल गेला अन तो खाली पडला, मला तर हसुच आलं, आणि मग लक्ष गेलं या गडबडीत देखिल ते धनुष्य खाली जमिनिवर पडलं नव्हतं तर त्या चौरंगावर एका टोकाला आलं होतं. तो राजा चिडुन निघुन गेला, अगदी सभा सोडुनच गेला. मग दुसरा राजा, मग तिसरा असं सुरु झालं. काहींना तर ते धनुष्य पेलता देखिल आलं नाही, तर बरेच जण त्या प्रत्यंचेच्या गोंधळात फसत होते, काही जणांना तिच्यामुळं मला झाली होती तशी जखम देखिल झाली होती. दोन प्रहर झाले, कुलगुरुंच्या संमतीनं एक प्रहराची विश्रांती घेण्याचं ठरलं. त्यानुसार स्वयंवराचा कार्यक्रम एक प्रहरासाठी स्थगित केल्याची घोषणा केली गेली. ज्या राजांना संधी मिळाली होती पण यश मिळालं नव्हतं, त्यापैकी बरेचसे सभास्थानाच्या बाहेर काही अंतरावर एकत्रित झाले असल्याचा निरोप दुताकडुन आल्यावर, बाबा आणि व्यासपिठाजवळ उभ्या असलेल्या सैनिकांचा एक गट त्या दिशेला गेला. जाताना ज्या पदधतीनं बाबांनी आपली तलवार सिद्ध केली होती ते पाहुन मला सकाळ्चे आईचे शब्द आठवले.
काही वेळानं बाबा आणि ते सैन्यदल परत आलं तेंव्हा कळालं की, फक्त बोलणी होउन होउ घातलेला तणाव टाळला गेला होता. तरी देखील बाबांची नजर बदललेली दिसत होतीच. आल्यावर त्यांनी लगेच काकांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या, आता समोर फार कमी राजे होते, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या जागी विखुरलेले होते. स्वयंवर पुन्हा सुरु होण्यास अजुन काही वेळ होता, आम्ही सा-या जणी एका बाजुला पडद्यांच्या आडोशात जलपान करुन परत येईतो पाहिलं तर समोरच्या सगळ्या मोकळ्या जाग्या नगरातल्या नागरिकांनी भरुन गेलेल्या होत्या, पुन्हा एकदा नजर फिरवल्यावर समजलं की समोर उभ्या असलेल्या नागरिकांच्या मागे आमचं सैन्यदल विखुरलेलं होतं. पुन्हा एकदा मनात भीती, उत्सुकता दाटली आणि आईच्या शब्दांनी पुन्हा एकदा धीर दिला. ताईचा हात हातात धरला, किंचीत ओलावा जाणवत होता तिच्या हाताला आणि कंप देखील. माझा दुसरा हात धाकट्या मांडवीच्या हातात होता, ती मात्र स्थिर होती, का असावं असं, तिच्या चेह-याकडं पाहुन देखील तिच्या नजरेतली शांतता मला सुखावुन गेली.
स्वयंवर पुन्हा सुरु झाल्यावर, पुन्हा आणखी काही राजांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर एका उंच आणि बलदंड पुरुषानं सभास्थानी प्रवेश केला, सगळ्यांचं लक्ष त्यानं वेधुन घेतलं, सर्वांगावर घातलेल्या सुवर्णालंकारानी त्याच्या भोवतालचा काही भाग स्वप्रकाशित झाल्यासारखा दिसत होता, एखाद्या पुरुषाच्या अंगावर एवढं सोनं मी प्रथमच पाहात होते, आमच्या नाट्यशाळेतले नट देखिल एवढे दागिने घालत नसत. तो धनुष्याजवळच असलेल्या एका रिकाम्या आसनावर बसला, आणि मोठ्या अभिमानानं त्यानं त्याचं खड्ग दोन्ही पायांच्या मध्ये टेकवलं, त्याच्या मुठीवर उजवा हात ठेवुन डाव्या हातानं त्यानं त्याच्या मानेवरचे केस मागे फिरवले ते त्याच्या बलदंड बाहुंचं प्रदर्शन करण्यासाठीच. अजुन एक दोन राजांनी धनुष्याला प्रत्य्ंचा लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्याचा मंत्री उभा राहिला, त्यानं काकांना नमस्कार केला आणि सर्व सभेला उद्देह्शुन म्हणाला ' या सुदिनी सुमुहुर्तावर मी सुवर्णलंकाधिपती रावणाचा मंत्री या नात्यानं या स्वयंवरात त्यांच्या भाग घेण्याची इच्छा महाराज जनकांसमोर सादर करतो आहे, त्यांची अनुज्ञा द्यावी.'
काकांनी प्रथम जानकीकडं पाहिलं ती गोंधळलेली आहे, हे दिसतच होते, मी लगेच बंधनेनं दिलेल्या निलवस्त्रानं तिच्या मानेवरचा घाम पुसला, क्षणार्धात ते वस्त्र लाल झालं. मी दंडावरच्या बाहुबंदामध्ये दडवलेल्या कुपी काढण्यासाठी हात वर केला खरं पण तो हात तिथंच धरला गेला, मी चमकुन मागं पाहिलं, बाबा उभे होते. मी हात खाली केला अन तिच्या दुस-या बाजुला जाउन शांत उभी राहिले, जे होईल ते पाह्त. काही क्षण असेच तंणावात गेले, जानकीनं एकदा रावणाकडं अन एकदा काकांकडं पाहिलं, यावेळी मात्र तिचे डोळे चमकल्याचं जाणवलं मला, दोन क्षणांत काकांचा हात वर झाला. राजा रावण, उठला, खांद्यावरचं वस्त्र आसनावर ठेवुन त्यावर आपलं खड्ग ठेवलं, अन दोन पावलं टाकत त्या धनुष्यापर्यंत पोहोचला देखील. एका गुड्घ्यावर खाली बसत त्यानं त्याला नमस्कार केला, अन वर उठतानाच एका झट्क्यानंच ते धनुष्य उचललं, त्याबरोबरच, आतापर्यंत सा-यांनाच गोंधळात टाकणारी त्याची प्रत्यंचा देखील सर्र्कन हवेत फिरली. ती वर हवेतच झेलत त्यानं धनुष्याच्या एका टोकाला ती बांधली, दुसरं टोक धनुष्याच्या टोकावर बांधणार इतक्यात त्याच्या वरच्या टोकाच्या दोन करड्या रंगाच्या रत्नांपैकी एक निघुन त्याच्या डोळ्यावर पड्लं, रावणाचं लक्ष विचलित झालं अन ताणलेली प्रत्यंचा त्याच्या हातुन गळुन पडली, अन धनुष्य खाली जमिनीवर पड्लं.
निशब्द शांततेमध्ये जानकीनं सोडलेला निश्वास बाकी कुणाला नसेल पण मलातरी नक्कीच ऐकु आला. मी पुन्हा तिचा हात हातात घेतला, मगाशीचा कंप नाहीसा झालेला होता. यानंतर फारच कमी लोक उरले होते,
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-44270354121443937412016-05-08T19:00:00.003+05:302016-05-08T19:01:54.693+05:30अंकोदुहि - ०५
सकाळपासुनच सगळ्या नगरात प्रचंड गडबड सुरु होती, वाड्याच्या सगळ्या खिडक्यांना जाड गवतांच्या चटयांनी झाकलेलं असल्यानं आमच्या कानावर बारीक आवाजच येत होते, पण् तणाव जाणवत होता.
आई येउन माझ्यामागं उभी राहिली, ' आज क्षत्रियकन्या म्हणुन उभ्या आहात ठिक आहे, पण उद्या क्षत्रियपत्नी व्हाल तेंव्हा अशी नजर बावरी होउन चालणार नाही शंखनादानं, तुमच्या हातातल्या कंकणाच्या आवाजापेक्षा हा तलवारींचा खणखणाट मन सुखावुन गेला पाहिजे. वाड्यातल्या मैनेची शिळ गोड वाटु दे पण त्यापेक्षा धनुष्यावर होणा-या बाणाच्या घर्षणाचा नाद जास्त घुमला पाहिजे कानात.' मागे उभं राहुन आईनं माझं वक्षवस्त्र आवरुन दिलं, आज घातलेले मोत्याचे दागिन्यांचे स्पर्श नेहमीपेक्षा वेगळे होते, ते सावरता सावरता, वस्त्रांकडं थोडं दुर्लक्ष झालं होतं.
मी तिच्या पाया पडण्यासाठी मागं वळले, पण तिनं थांबवलं अन म्हणाली ' आज खरोखरी स्वर्गस्वामिनी दिसतेस, आज नकोस करु नमस्कार, फक्त एकच सांगणं आहे, बाकी तिघिंना सांभाळायची जबाबदारी तुझ्यावर आहे, कारण ती शक्ती तुझ्यातच आहे. काल जेंव्हा गोशाळेत गेला होता तेंव्हा ज्या सहजतेनं अनेक वासरांना खेळवत होतीस ते पाहिलंय मी, तसंच आज भावनांच्या वासरांना आवरायचं आहे. स्वयंवर म्हणजे जेवढी आलेल्यांची परीक्षा आहे तेवढीच ती तुमची देखिल आहे. तुम्हा तिघींसाठी एक पुर्वतयारी आहे असं समजा हवं तर. आणि अजुन एक विसरलेच सांगायचं, आता बंधना दासी एक विशेष वस्त्र घेउन येईल, काही काही क्षणांनी ताईच्या मानेवर येणारा घाम पुसत रहा, त्या वस्त्राचा निळा रंग तांबडा झाला समजायचं की तिचा स्वतावरचा ताबा सुटतो आहे आणि सावरायचं तिला.'
' आई, पण जायचंय कधी तिथे, त्याआधी मला ताईला पाहायचंय, नविन बनवलेल्या सुवर्ण वस्त्रांत ती कशी दिसते ते पहायचंय मला, जाउ तिच्याकडं मी.?' माझी उत्सुकता मी लपवु शकतच नव्हते, ' जा, बंधना येउन गेली की जा मग, पण तुला तिलाच पाहायचंच त्या वस्त्रांत की तु कशी दिसली असतीस ह्याची कल्पना करायची आहे. हं ?' आई माझ्या खोलीच्या बाहेर पडत होती, मला ओरडुन सांगायचं होतं तिला, की हो हो हो, मला तेच पाहायचंय, ती सुवर्णाची झळाळती वस्त्रं मला माझ्या अंगावर मिरवायची आहेत, पण आवाज आतच दाबला, समोर बंधना उभी होती, एक अतिशय तलम निळंशार वस्त्र होतं, त्याच्या किना-यावर बारीकशी मोत्याची नक्षी काढलेली होती, ते वस्त्र आणि एक चांदिची कुपि माझ्या हातात देत तिनं अतिशय हळुवार आवाजात सांगितलं, ' हयात बेशुद्धिची मात्रा आहे, प्रसंग पाहुन तुम्ही निर्णय घ्या, असा महाराजांचा निरोप आहे. '
मी आणि ती एकत्रच बाहेर पडलो, तिच्या दालनात येईपर्यंत अजुन काही मैत्रिणि बरोबर आल्या होत्या, माझ्या अंगावरची निळी वस्त्रं आणि मोत्यांचे दागिने यांचे कौतुक त्यांच्या नजरेत दिसत होतंच. तिच्या दालनात बाकी सगळेच जण होते, आणि विशेष म्हणजे, आमच्या वाड्यात असणा-या महिक्षा दलाच्या स्त्री सैनिक होत्या, त्यांनी आम्हांला चौघींना आमच्या वस्त्रांलंकारांना शोभेल आणि सहज लपवता येईल अशी शस्त्रं दिली, अगदी छोटीशीच पण कमालीची धारदार. एका खाली एक अशा सहा माळा असलेल्या माझ्या मोत्यांच्या कंबरपट्यात ते शस्त्र अगदी सहजी लपुन गेलं, जसं काही दोन्ही एकाच कलाकारानं बनवलेली आहेत. ताईच्या सुवर्णलंकारात मात्र ते स्पष्ट उठुन दिसत होतं, तसंही तिच्या नाजुकशा शरीरावर एवढे अलंकार अगदी शोभत नव्हते असं नाही, पण ती चालताना मात्र सगळ्यांनाच ते जाणवलं, मग थोडा वेळ तिचे अलंकार कमी करण्यात आणि सावरण्यात गेला. आता इथुन निघुन बाहेर कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याचा निरोप आल्यावर आम्ही चौघी आई आणि काकुला नमस्कार करुन निघालो, वाड्याच्या व्हरांड्यातुन बाहेर पडताच ताईच्या अंगावर सुर्याचे किरण पडले आणि आम्हां मागच्यांना एकदम डोळे दिपल्यासारखं झालं, क्षणभर थांबलोच आम्ही सर्व, पण ती मात्र पुढं निघुन गेली होती.
स्वयंवराच्या ठिकाणी, एक खुप मोठं व्यासपीठ तयार केलेलं होतं, जवळपास एका गजाएवढी उंची होती त्याची, त्यावर काका आणि बाबांची आसनं होती मध्यभागी, आणि त्यांच्या उजव्या बाजुला काही ब्राम्हणांच्या बसण्याची व्यवस्था होई, व्यासपीठाच्या चहुबाजुला, आमच्या सैन्यातलं सर्वात उत्तम दल शस्त्रसज्ज उभं होतं. आम्ही व्यासपीठावर चढल्यावर समोरच्या गर्दीचा अंदाज आला, जवळपास शंभराहुन जास्त राजे जमा झालेले होते, आणि हे सगळे निमंत्रित होते, त्यामुळं त्यांना त्या मानानं बसण्याची व्यवस्था केलेली होती. तिथं खाली मधल्या मोकळ्या जागेत एका मोठ्या चौरंगावर ते धनुष्य ठेवलेलं होतं, त्याची प्रत्यंचा एका बाजुला गुंडाळलेली दिसत होती.
काकांनी उठुन सर्व उपस्थितांना अभिवादन करुन, या स्वयंवराची प्रस्तावना केली, आणि ताईचा जो पण होता, तो सांगितला ' हे भद्र पुरुषहो, आमची ज्येष्ठ कन्या जानकी, आपणांसर्वांसमक्ष ह्या अद्वितिय अशा धनुष्याला प्रत्यंचा ओढुन दाखवेल, तिची अशी इच्छा आहे की जो कोणि योग्य पुरुष हा पराक्रम पुन्हा करुन दाखवेल त्याचाच ती पतिरुपात स्विकार करेल. आपण सर्वांनी आपापल्या मंत्रीगणांना आपली ओळख करुन देण्यास सांगावे, आणि त्यानंतर जानकीची इच्छापुर्ती करण्याचा मानस असल्यास तिची मान्यता घेउन धनुष्यास प्रत्यंचा ओढावी. ' एवढं बोलुन काकांनी ताईला व्यासपीठावरुन खाली जाण्यास सांगितलं. आठ महिक्षा आणि त्यांच्या भोवती आठ सैनिक अशा संरक्षित पद्ध्तीनं ती खाली उतरली, त्या धनुष्याकडं जाउन, तिनं नमस्कार केला, आणि सहजच ते धनुष्य उचलुन पेललं, खालच्या टोकाला प्रत्यंचा बांधुन ते टोक डाव्या पायाच्या अंगठ्यात पकड्लं ,आणि डावा हात धनुष्याच्या मध्यात पकडला, मागं वळुन काकांकडं बघत मस्तक वाकवलं, आणि पुढच्याच क्षणी दोन्ही हातांच्या विजेसारख्या हालचाली झाल्या, आणि ते धनुष्य प्रत्यंचित झालं.
सगळी सभा आश्चर्यचकित होउन पाहात होती, तिनं पुन्हा एकदा काकांकडं पाहिल, आणि पुन्हा त्याच वेगानं ती प्रत्यंचा उतरवली, अन धनुष्य पुन्हा त्या चौरंगावर ठेवलं,त्याला नमस्कार करुन ती पुन्हा त्या संरक्षक कड्यातुन व्यासपिठावर परत आली. मी तिचे दोन्ही हात हातात घेतलं, तिच्या नाडीचे ठोके अतिशय जलद झालेले मला जाणवलं, तिला तिच्या आसनावर बसवुन आम्ही तिच्या मागं उभ्या राहिलो.
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-5732588468955205882015-01-20T23:00:00.000+05:302015-01-20T23:00:50.046+05:30आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२
आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२
' माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा,
शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि
आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या
डोळ्यासमोर अंधारी आली, जाग आली तेंव्हा मी बेडवर झोपुन होतो, बायको समोर बसुन
होती, अन दोन्ही पोरी तिला बिलगुन उभारल्या होत्या. मेव्हणा खिडकीत उभा राहुन
टॅबकडं पाहात होता वेड्यासारखा.
संध्याकाळ असावी असं वाटलं, उठुन बसलो, ' आलिया भोगासी असावे सादर' अजुन काय
बोलु मी तरी ? मेव्हणा बोलला आणि निघुन गेला..
बायको दोन्ही मुलींना घेउन दुस-या बेडरुममध्ये गेली, मी समोरच्या टॅबकडं पाहात
होतो. कधी तरी ऐकलं होतं की या विश्वात निर्माण झालेला प्रत्येक ध्वनी हा या इथंच
कुठंतरी तरंगत राहतो, तो पुन्हा कधीतरी तुम्हालाच ऐकु येउ शकतो. या आंतरजालाचंही
तसंच आहे, प्रत्येक डिस्कवरचे काही मॅग्नेटिक संकेत बदलले जातात प्रत्येक वेळी, पण
ते मॅग्नेट मागचे संकेत लक्षात ठेवत नसेलच असं नाही, आणि अगदी लाखो करोडोत एकदा असा
विचार केला तरी, प्रत्येक संकेत पुन्हा एकदा त्याच रुपात त्याच ठिकाणी येउ शकतोच
की.
पुन्हा एकदा मागच्या मार्गानंच हेम्याला फसवावं का असा विचार केला, पण ते शक्य
नव्हतं. टॅब उचलुन हातात घेतला, प्लिपकार्ट ओपन होती, आणि माझ्या नावानं एक नविन
टॅब कार्ट मध्ये टाकलेला होता, ड्युअल सिम आणि ३जि असलेला. वर्ड फाईल उघड्ली,
म्हणजे हेम्या आला, आणि आदेश दिला.. ' तुझ्या कार्डाचे डिटेल टाक, आणि टॅब आल्यावर
मला कळेलच तेंव्हा काय करायचं ते सांगतो तुला.'
नकार शक्य नव्हताच, कारण हेम्या काय करु शकतो याची कल्पनाच काय परिणाम देखिल
माहित होते. माझं डिटेल टाकुन झालं, आणि बाहेर हॉल मध्ये माझ्या सकाळपासुन
बंद असलेल्या फोनच्या अंगात जीव आला आणि एसेमेसचा टोन वाजला, मोठी कन्या पळत फोन
घेउन आली, तिच्यामागं बायको आणि तिच्या हातुन फोन घेउन मेसेज वाचत म्हणाली ' झाली
सुरुवात आर्थिक शिक्षेची'. तो फोन पण बेडवर आदळुन निघुन गेली. डोकं जड झालं होतं,
कितीतरी वेळ तसाच पडुन होतो, जाग आली तेंव्हा रुममधला छोटा दिवा चालु होता,
बाजुला कुणीच नव्हतं, टॅब पण बंद होता. बेडवरुन उठत बाहेर आलो, हॉलमधल्या घडाळ्यात
साडेतीन वाजले होते. दुस्-या बेडरुममध्ये तिघी झोपल्या होत्या, किचन मध्ये पाहिलं,
बेसिन मध्ये तिन ताटं होती, कट्यावर कुणीतरी आणुन दिलेला डबा होता. फ्रिज उघडुन एक
सफरचंद घेउन हॉल मध्ये येउन बसलो, टिव्ही लावला, बराच वेळ चॅनल बदलण्यात गेला,शेवटी
एक बातम्याचा चॅनल लावला अन सफरचंद खात बसलो, सकाळी साडेपाचच्या सुमारास अलार्म
झाला, बायको उठुन आली. माझ्या हातुन रिमोट घेतला अन शेजारी बसुन माझ्या डोक्यावरुन
हात फिरवत बसली, लहान लेकरासारखं तिच्या मांडीवर डोकं ठेवुन मी रडायला लागलो.
' का रडतोयस, कशाचं वाईट वाटतंय, का भीती वाटतेय भविष्याची ?, टाळता येणार असेल
रडुन उपयोग आहे का, टाळ मग ते आणि नसेल तर जे होईल त्याला सामोरं जा.' उठुन तिचे
दोन्ही हात हातात घेत मी म्हणलं ' माझं जे होईल त्याला मी सामोरं जाईन, पण तुमची
काळजी वाटते गं, मला काही झालं तर तुमचं कसं होणार याची कल्पनाच करवत नाही., या
दोघींना कशी सांभाळशील, काय सांगशील बाबा कुठं गेला म्हणुन, समजायच्या वयात
येईपर्यंत किती अवघड होईल ना तुला त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत राहणं याची भीती
वाटते. '
म्हणजे बदनामीची भीती नाही तुला, डायरेक्ट मरणाचीच गोष्ट सुचतेय तर, असला कसला
भित्रा रे तु ? अनुजानं डोळ्यात पाणी आणुन विचारलं, घशातुन शब्द बाहेर पडत नव्हते
तिला उत्तर द्यायला, तिला सांगायचं होतं ' बाई, बाबा देवबाप्पाकडं गेला हे
सांगणं सोपं आहे, शेजार पाजारचे, नातेवाईक थोडी सहानुभुती तरी दाखवतील, पण मला
तुरुंगवास झाला आहे हे कसं समजावशील, आणि तु लाख समजावशील, पण बाकीची लोकं माझ्या
लेकींकडं एका चोराच्या मुली म्हणुनच पाहतील ना, त्याची भीती वाट्ते. ' पण सांगायची
डेअरिंग झाली नाही.
आज ऑफिसला येत नाही असा नितिनला एसेमेस केला आणि सकाळची आन्हिकं आवरुन घेतली,
तोपर्यंत दोन्ही पोरी उठल्या होत्या, त्यांचं आवरुन अनुजा त्यांना शाळेच्या बसमध्ये
सोडुन आली. तिचं किचनमधलं आवरुन झाल्यावर दोघांसाठी चहा घेउन आली, दोघंजण गॅलरीत
बसुन चहा पित होतो. ' आपण धनुभावजींना विचारायचं का याबद्दल ? त्यांच्याकडं काही
उपाय असेल या सगळ्यावर. ' आयटित असुन सुद्धा अध्यात्माबद्द्ल बरंच कळत त्यांना'.
खरंच धन्याला विचारावं एकदा, पण पुन्हा अध्यात्म वेगळं आणि तांत्रिक वेगळं. मग
दिवसातला बराच वेळ असाच भलते सलते विचार करण्यात घालवला. दुपारी पोरी घरी आल्यावर
कालचं काहीच टेन्शन त्यांना जाणवणार नाही याची काळजी आम्ही दोघंही घेत होतो.
संध्याकाळी सगळेजण कोथरुडच्या बागेत गेलो, खरंच जवळपास ८-९ महिन्यांनी इथं येत
होतो, बाग बरीच बदलली होती, नविन जॉगिंग पाथ आणि बरंच काही बदललेलं होतं. दोन्ही
पोरी तासभर खेळल्या, मग बाहेर येउन घोड्यावर बसणं, पाणीपुरी वगैरे शिस्तीत
झालं. साडेआठच्या सुमारास घरी आलो. नितीन खालीच भेटला पार्किंगमध्ये. अनुजा अन
दोन्ही मुली वर गेल्या आणि आम्ही दोघं खालीच बागेतल्या बाकावर बसुन बोलत राहिलो, जे
दिवसभर अनुजाबरोबर बोललो तेच पुन्हा एकदा नितिन बरोबर बोलुन झालं. साडेअकराला वर
घरी आलो.
बेडरुममधल्या कपाटातुन टॅब बाहेर काढला, हेम्या ऑनलाईन होताच, ' काय आज सुट्टी
काढली होती काय हापिसातुन ?'- पहिला प्रश्न. ' मी विचारलं - ' हो, पण तुला कसं
कळालं, खरंतर तुला कळु नये म्हणुन दिवसभर तुला हात नव्हता लावला मी ' दोन चार
हसण्याच्या स्माईली टाकुन हेम्या टायपला - ' तुला आठवतंय मी यात अडकलो कसा ते,
फ्रिक्वेन्सी जुळल्या होत्या, तसंच तुझी एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे, तुझ्या
हार्टची धडधड एका विशिष्ट पद्धतीनंच होते, आणि हे कळतं मला सगळं. त्या धडधडीचा
संबंध तुमच्या रुपाशी पण असतो माहितीय का ? म्हणजे बघ तुझ्या हार्टची लय
जेवढी मद्द आणि मंद आहे ना त्यापेक्षा तुझ्या बायकोची जास्त सुंदर आहे, ती ऐकत
राहिलं ना तर काही वेळानं त्या लयीशी जुळवुन घ्यावंसं वाटतं मलापण, म्हणजे ती
दिसायला तुझ्यापेक्षा उजवी आहेच बरोबर ना ? ' मी गप्प, हेम्या भुत असला तरी पुरुष
होता किंवा भुतात स्त्री पुरुष असं काही असतं का माहित नाही, पण शेवटी
एका पुरुषाचंच भुत होता. ' अबे, गप का झाला, आता काही करणार नाही तिला घाबरु नको,
शिक्षा तुला देणार आहे तिला नाही, जा झोप आता उद्या ऑफिसला जायचंय, आणि हो उद्या तो
नविन टॅब घेउन ठेवायला सांग अन्नुला.... ' हेम्या गायब होता होता टायपुन गेला,
टॅब ठेवताना मी पुन्हा एकदा नीट पाहिलं ते अन्नु बोल्ड केलेलं होतं.....
क्रमशः
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-72695565605951657162015-01-01T08:52:00.002+05:302015-01-01T08:52:36.788+05:30आर्ट ऑफ द स्टेट
नेहमी
सारखा तो दिवस उगवला, म्हणजे सुर्य उगवला आणि दिवस सुरु झाला, दोन चार
दिवसापुर्वीच परीक्षा संपलेल्या असल्यानं घरातली सकाळची गडबड शांत झालेली
होती, तरी पण वर्षभराच्या सवयींनं सगळं घर जागं झालेलं, अर्थात त्या
जागेपणावर आळसाची एक मस्त साय आलेली होती.
मी, बायको अन दोन्ही पोरी सगळेजण निवांत बेडवर लोळत होतो, दोन्ही
पोरींचं लाथा आणि उशीयुद्ध मधुन मधुन नियंत्रित करत, रविवारची सकाळ
कुणाच्या घरी धाड घालावी यावर आम्ही दोघंही स्वतंत्र विचार करत होतो.
एका क्षणी, दोघांचा एकदमच आवाज आला, ''बंडाकडं जायचं ?'', आता एकमेकांना
एकच प्रश्न विचारला म्हणजे उत्तर होकारार्थीच असणार होतं, ही दोन लेकरं
आमच्या आयुष्यात येण्याआधी आम्हां दोघांचं असं एकमत फार दुर्मिळ होतं, पण
या दोन लेकरांनी त्या असहमतीच्या वेड्या वाकड्या काठ्या मोडुन टाकल्या
होत्या, दोघांचे प्रखर इगो विरघवळुन त्याचाच नॉर्थन लाईट सारखा विस्मयकारक
शो दोन लेकी आम्हाला दाखवायच्या.
पण बंडाकडं जायचं म्हणजे सोपं काम नव्हतं, सगंळ्यांत महत्वाचं बंडा
कुठंतरी ट्रेस होणं, दर रविवारी ' मी माझा' याला वाढवुन 'आम्ही आमचे'
तत्त्वात फिरणारे बंडा आणि त्याचं कुटुंब, घरी असेल किंवा नाही याची खात्री
नसायची. बायकोनं आमच्या दोघांत दहा-वीस केलं आणि निर्णय दिला की फोन
करायची पाळी तिची आहे, मी पुन्हा पांघरुणात गुरफटुन गेलो आणि ही गेली
बंडाला फोन करायला.. दोनच मिनिटांत हॉल मधुन हिचा आवाज आला. ' अहो, तुमचा
फोन बंद पडला आहे, रात्री चार्जरचं बटण चालुच केलं नव्हतं आणि वायफाय चालु
राहिलं बहुतेक, काय करु ?', अंथरुणातुन न उठताच मी ओरडलो, ' चार्जिंगला
लाव ना मग, होईल पाच मिनिटात चालु,' , ओके बॉस, आणि उठा आता मी कॉफि करते
आहे, चला लवकर - इति बायको हॉलमधुन. आई कॉफि करणार आहे, दोन्ही पोरींनी
ऐकलं आणि उशा तशाच टाकुन, 'बाबाला सुट्टी आवरायची डुट्टी' हा नियम ऐकवुन
बाथरुममध्ये गेल्या पण. अशा क्षणांना मी जगुन घेतो, आपल्याच संसाराकडं
थोडंसं त्रयस्थ नजरेनं पाह्तो आणि डोक्यात ' लागो न द्रुष्ट माझी माझ्याच
संसाराला' म्हणुन घेतो..
बेड आवरुन, सकाळची आन्हिकं आवरुन हॉलमध्ये येईपर्यंत, बायकोच्या दोन
वेळा आणि पोरींच्या दहा वेळा हाका मारुन झाल्या होत्या. हॉल मध्ये पेपरच्या
पसा-यात आमच्या घरातली बहुमतातली मेंबरं बसुन होती. एवढ्या वेळात फोन चालु
झाला म्हणुन मी बंडाला फोन लागतोय तो पाहतोय तर, फोन ढिम्मच, निदान
चार्जिगचा सिग्नल देखिल येत नव्हता. 'तुझा फोन बघु ग, ह्याला काही तरी
झालंय पुन्हा', असं म्हणुन बायकोचा फोन घेउन बंडाला फोन लावला, तर त्याचा
फोनमधुन 'आप कतार में और हम सतार में' हे ऐकु आलं. कॉफि पिउन मगच बघुया असं
म्हणुन कॉफि प्यायला बसलो. सुडोकु, शब्दकोडं आणि ठिपके जोडुन हत्ती बनवा
हे करुन झाल्यावर, पुन्हा फोन लावला बंडाला तर पुन्हा तेच 'आप कतार में और
हम सतार में'. मग चिडुन पुन्हा माझ्या फोनकडे नजर फिरवली, साहेब अजुन
ढिम्मच होते. तिकडुन ओठाच्या कोप-यातुन बायको हसत म्हणाली, ' घ्या अजुन
घ्या साडेपाच ईंची फोन सात हजारात, काय तर म्हणे कार्बन, मी तर या नंतर
हेलियमचा फोन घेणार आहे, एकदम हवासेभी हलका'. तिच्या जवळ जाउन कानात
खुसपुसलो, बट साईझ ड्झ मॅटर मॅडम'. आणि तिनं तिचा फेवरिट प्रश्न विचारला, '
स्वल्पविराम कुठं, ?' आणि अजुन एका रविवारची सुरुवात मनमुराद हास्यानं
झाली.
' चल गं, मी आंघोळ आवरुन घेतो, तु ट्राय करत रहा तुझ्या फोन वरुन' असं
म्हणत मी सटकणार, तर लगेच ऑर्डर आली, ' एक नग घेउन जा विसळायला, दुसरा मी
विसळते', चला धाकटीला उचलुन संडे बाथची मज्जा असं म्हणत बेडरुम मध्ये
निघुन गेलो. शॉवरच्या गार पाण्यात चांगला अर्धा तास घालवल्यावर त्या
पाण्याच्या आवाजाच्या वरताण बायकोचा आवाज आला तसं पोरीला बाहेर पिटाळ्लं
आणि लगेच मीपण आवरुन घेतलं, बाहेर येउन पाह्तो तो मोठी कन्या आणि बायको,
कपाटातुन जुना टॅब काढुन त्यात सिमकार्ड घालुन तो चालु करुन बसल्या होत्या,
त्यावरुन फोन लावत बंडाला. मला पाहुन कन्या बोलती झाली ' बाबा हा टॅब
सारखा हँग होतो आहे, मध्येच एक फाईल उघडते सारखी, खुप जुना आहे ना रे,
किटकॅट टाक ना यात.
रविवारीच मंडे ब्लुच नाही तर ब्लुच्या सगळ्या शेड डोक्यात घुमायला
लागल्या...' हज्जार वेळा वाद झालेत ना त्या टॅबवरुन मग का पुन्हा चालु केला
आज, काय हौस आहे एवढी रिस्क घ्यायची, आधुनिक काळातला पेशव्यांचा उजव्या
सोंडेचा गणपती आहे हा, आणि आता बंद सुद्धा होत नाहीये, ' तो टॅब बेडवर आपटत
मी बोललो. ' अरे पण मग ठेवलासच का घरात, का नाही देत टाकुन तळ्यात,
जादुच्या दिव्याची जादु हवीय पण धुर नकोय हे कधीपर्यंत चालणार. निदान
आतातरी घाल बत्ता त्यावर, ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी, आहे का दम तेवढा
?' दोन्ही पोरी बाहेर टिव्हीला चिकटवुन बेडरुमचा दरवाजा लावुन आम्हां
दोघांचा वाद चालु होता.
' तुझं काय नुकसान केलं होतं मी ? हा एकच प्रश्न जवळ्पास २९७ पानं टाईप केलेला होता, आणि हा आकडा वाढतच होता.
बायको, आणि पोरी तिच्या भावाकडं गेल्यावर हॉलमध्ये एकटाच बसुन त्या
टॅबकडं पाहात होतो, आणि शेवटी धीर करुन हात उचलला, आणि टाइप केलं..
' हेम्या, आय अॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी,
त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर.'
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-70851205576902116672013-02-24T09:15:00.005+05:302013-07-28T01:56:18.795+05:30अंकोदुहि - ०४
भाग - ४
तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा
आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' .... पुढं
आई तो एकच शब्द बोलुन निघुन गेली, बराच वेळ मी जागी होते पण शेवटी रात्री आईनं
जेवणात ज्या औषधी घातल्या होत्या त्यांचा परिणाम मला जाणवायला लागला, मला झोप
लागली. पहाटे नुकतंच उजाडायला लागलं तेंव्हाच जाग आली. रात्रभर न हलवल्यानं हात जड
झाला होता. मी उठुन माझ्या खोलीच्या गवाक्षात आले, तिथुन मला सुर्योदय दिसत नाही,
पण समोर न दिसणा-या सुर्यनारायणाच्या आगमनानं सगळं आकाश रंगुन गेलेलं पहायला मला
नेहमीच आवडायचं. आज सुद्धा मी तसंच पाहात उभी होते गवाक्षाजवळ, तेवढ्यात सखीनं बाबा
येणार असल्याची सुचना दिली. मी अंगावरचे ओघळलेली वस्त्रं सावरली. केसातली
सुरकुतलेली फुलं काढुन टाकली.
बाबा आत आल्यावर त्यांच्या पाया पडुन एका बाजुला उभी
राहिले. बाबा एका आसनावर बसुन होते. ' बाळा, आजपासुन मी स्वयंवराची आमंत्रणं
करण्यासाठी निघतो आहे. आसपासच्या काही महत्त्वांच्या जनपदांमध्ये प्रत्यक्ष जाणं
फार गरजेचं आहे. ' या वर मी काही बोलावं असं काहीच न समजल्यानं मी पलंगाच्या कडेला
हात धरुन निश्चल उभी राहिले. दोन क्षणांच्या शांततेनंतर पुन्हा बाबा बोलले ' याच
प्रवासात तुझ्यासाठी सुद्धा योग्य वर पहावा अशी माझी इच्छा आहे, आणि एक पिता म्हणुन
मी तुझा विचार घेण्यासाठी आलो आहे याबाबतीत, तुझी काही इच्छा किंवा काही अट आहे
विवाहासंदर्भात.'
हात पाय थरथरत होते, मैत्रिणिंबरोबर विवाहाबद्दल गुजगोष्टी करणं, आई आणि
काकु आमच्या विवाहाच्या चर्चा करत असताना त्यांच्या मागं पुढं फिरुन लाड करुन
घेणं अन हे असं बाबांनी स्पष्ट विचारणं, मी तशीच मान खाली घालुन उभी राहिले.
भीती, उत्सुकता, आनंद आणि लज्जा ह्या सगळ्या भावना एकदम माझ्या मनात फेर धरुन
होत्या. शेवटी सुटका बाबांनीच केली ' बरं, मी समजु शकतो तुझी मनस्थिती, आता निघतो
मी पण बरोबर मध्य प्रहराला आम्ही निघणार आहोत, तोपर्यंत काही सांगायचं असेल तर
मला सांग, आणि हो काही नसेल तुझ्या मनांत तर तसंही कळव, मग मी माझ्या या लाडक्या
लेकीसाठी योग्य असा एक वर निवडुन आणतो. जसं या घरात सुख अनुभवलं आहेस तसंच सगळं
आयुष्यभर अनुभवशील याची काळजी तुझा हा पिता निश्चित घेईल, चिंता करु नकोस. ' एवढं
बोलुन बाबा आसनावरुन उठले तोच माझ्या तोंडातुन शब्द निघाले 'मला पती
क्षत्रियकुळातलाच हवा, आणि तो देखील पराक्रमी, सर्व शस्त्रनिपुण असाच' आपल्या
गुड्घ्यांवर जोर देत बाबा उठुन माझ्याकडं आले, डोक्यावर हात ठेवत म्हणाले ' बाळा
तुला उदंड आयुष्य लाभो' आणि निघुन गेले.
सकाळची आन्हिकं आवरुन आम्ही स्वयंपाकघरात एकत्र येण्याआधी देवघरात जाउन
प्रार्थना केल्या. ते धनुष्य कालपासुन देवघरातच ठेवलेलं होतं. त्याच्या दोन्ही
वक्रांवर लावलेले चंदन आणि कुंकवाचे पट्टे त्याच्या असामान्यतेत भरच घालत होते.
त्याची प्रत्यंचा मात्र एका बाजुला गुंडाळुन ठेवलेली होती. देवासमोर हात जोडताना
नकळत त्या धनुष्यासमोर सुद्धा हात जोडले गेले. स्वयंपाकघरात आई आणि काकु,
बाबांच्या बरोबर जे पदार्थ द्यायचे होते त्यांची तयारी करत होत्या. ताई, मी आणि
धाकट्या दोघी त्यात गुंतलो. मध्य प्रहराला थोडासाच वेळ होता तेंव्हा प्रवासाला दिले
जाणारे पदार्थ बाहेर मागवले गेले. थोडा वेळ फार लगबग झाली, आचारी, दास, सखी यांचा
थोडा गोंगाट झाला आणि मग सगळंच एकदम शांत झालं. कालचा सोहळा पार पडल्यानंतर
कुलगुरुंनी ताईच्या स्वयंवरासाठी दिवस ठरवुन दिला होता. अजुन दोन महिने होते मध्ये.
पण घरात सगळीकडं त्याचीच चर्चा चालु होती, दास, सखी, भाट, ब्राम्हण आणि सैनिक
सर्वांच्या तोंडी हाच एक विषय होता. ज्यांना ते धनुष्य त्या खोलीतुन देवघरात नेलं
जात असताना पाहायची संधी मिळाली होती ते त्याचं वर्णन करुन इतरांना असं काही सांगत
होते की बाकीच्यांनी त्यांच्या भाग्याचा हेवा करावा. आणि मग सर्वांनाच याचं आश्रर्य
वाटायचं की असं काय आहे त्या धनुष्यात की त्याला प्रत्यंचा चढवणारा एवढा भाग्यवान
असेल की तो या घरातल्या ज्येष्ट कन्येशी विवाह करु शकेल.
बघता बघता दिवस सरु लागले, ऋतु बदलत होता. त्या बरोबर आम्हा चौघींचे बोलण्याचे
विषय सुद्धा. सुरुवातीला सख्यांकडुन रोज माहिती मिळायची की आज बाबा
कोणकोणत्या जनपदांमध्ये जाउन आमंत्रण देउन पुढे निघाले आहेत, कुणी त्या आमंत्रणाचं
सहर्ष स्विकार केला तर कुठं त्यांना नकाराला तोंड द्यावं लागलं, आणि मग अशा
आमंत्रणं स्विकारलेल्या जनपदांबद्दल आम्ही बोलत असायचो. पण काही दिवसांत जसजसे बाबा
बरेच लांब गेले तसतसं त्यांच्याबद्दल काही कळायला वेळ लागायला सुरुवात झाली, मग
आमच्या बोलण्याचा विषय असायाचा तो स्वयंवराची तयारी. तशी तर घरात ती सुरु झालेली
होतीच पण ते सगळं अगदी शास्त्रानुसार होतं. परंपरेनुसार होतं. काकु बराच
वेळा ब्राम्हणांबरोबर बोलताना दिसे, काका मात्र आपल्या जवळच्या आणि विश्वासाच्या
सेवकांना घेउन प्रत्यक्ष स्वयंवराची तयारी करण्यात गुंतलेले दिसत. आईकडं
घरातली सगळी कामं होती. लांब लांबुन वेगवेगळ्या प्रकारचं धान्य
कोठारांमध्ये येण्यास सुरुवात झाली होती. त्या कोठारांच्या जवळुन जाताना एक वेगळाच
गोडसा वास भरुन राहिलेला असे. न राहवुन एकदा मी तिथं गेले होते, त्या वासाच्या
ओढीनं. तशी ही कोठारं वर्षभर भरलेली असायची, पण आता ती अक्षरशः ओसंडुन वाहात होती.
घराच्या मागच्या अंगणाला लागुनच असलेल्या गोशाळेजवळ अजुन एक मोठी
गोशाळा उभी केलेली होती. जवळपासच्या ब-याच गावांतुन गाई आणि वासरं आणुन तिथं
बांधलेली होती, दिवसभर त्यांच्या ग़ळ्यात बांधलेल्या घंटांचा किणकिणाट सगळीकडं भरुन
राहायचा. त्यात देखील दोन भाग होते. एका बाजुला फक्त पांढ-या शुभ्र गाई अन त्यांची
तशीच शुभ्र वासरं होती. तर दुस-या भागात सगळ्या वेगवेगळ्या गाईंचा गोंधळ असायचा.
आम्ही रोज सकाळी देवघरातुन थेट तिथंच यायचो. प्रहरभर तिथं गाईंना चारा खाउ घालुन मग
पुन्हा घरात परतायचो. एकदा विचारणा केल्यावर असं समजलं की त्या पांढ-या गाई या भेट
देण्यासाठी आणलेल्या आहेत तर बाकीच्या दुध दुभतं पुरवण्यासाठी. नगरात सगळीकडंच अशी
गडबड होती. सगळ्या उद्यानात वेगवेगळ्या आकाराचे अन रंगाचे मांडव उभे केले जात होते.
स्वयंवराला येणा-या सर्वांसाठी ही राहण्याची व्यवस्था केलेली होती. या
स्वयंवराच्या निमित्तानं आमची मिथिला हे आमचं एकच मोठं घर झालेली होती. नगरात
प्रत्येक जण प्रत्येकाला सुचेल ते, सांगेल ते काम करत होता. नगरातल्या रंगमंदिरात
दिवसभर नृत्य आणि गाण्यांचा सराव सुरु होता. दोन-तीन दिवसातुन एकदा तरी आम्ही तिकडं
जायचो, पण तिथं जास्त वेळ थांबता येत नसे. त्या गणिकांच्या मे़ळ्यात आम्हाला कुणी
पाहिलं तर काय ही भीती सगळ्यात आधी मलाच वाटायची.
अशातच एका स्वयंवराला मोजकेच दिवस बाकी होते, एका सकाळी
आम्ही नगरदेवतेच्या मंदिरात एका पुजेसाठी निघालो होतो. मंदिर फार लांब नव्हतं.
तेंव्हा नगराच्या एका बाजुस फार मोठा कोलाहल ऐकु येत होता. रणवाद्यं, माणसं आणि
शस्त्रं सर्वच कसं भयकारी होतं. रथाच्या बाजुला असलेल्या सिंह प्रतिमेला मी गच्च
धरुन उभी राहिले. रथाचे घोडे देखील एकदम बेचैन झाले, सारथ्यानं त्यांना चुचकारत
तिथुन पुढं काढलं ' गेल्या आठ दिवसांत हा गोंधळ फारच वाढला आहे' सारथी सांगु लागला,
' स्वयंवराच्या वेळी जर कुणी काही आगळीक केली, आणि युद्ध प्रसंग उभा राहिला
तर, त्याची तयारी सुरु आहे इथं ' मी ताईला विचारलं ' खरंच असं होईल का गं,
स्वयंवराच्या वेळी येईल असा काही प्रसंग, की ज्याचा सामना करण्यासाठी प्रसंगी बळाचा
वापर करावा लागेल आपल्याला.' रथाच्या अग्रभागी उभी राहिलेली ताई हसत होती ' एकतर
त्या धनुष्याला प्रत्यंचा न चढवता आल्यानं होणारा अपमान आणि
जनकासारख्या पराक्रमी राजाशी नातेसंबंध जुळवण्याची हुकलेली संधी
एखाद्या क्षत्रियाला कोणत्याही थराला नेईल, म्हणुन ही तयारी केलेली बरी '
नगरदेवतेच्या देवळातली पुजा आटोपुन परत येताना देखील माझ्या मनात ह्या एका नविन
भितिनं घर केलं होतं, क्षत्रिय, हा शब्द त्या रात्रीपासुन मला छळत होता. मी जेवढं
लांब जाण्याचा प्रयत्न करायचे तेवढाच तो कोणत्यातरी अनपेक्षित दिशेनं येणा-या
बाणासारखा माझ्याकडे यायचा. आणि तरी ही मला माझ्यासाठी क्षत्रिय पती हवा
होता. आम्हां चौघींच्या शिक्षणात शस्त्र सिक्षणाचा भाग होताच पण गेली काही वर्षे
त्याकडं दुर्लक्षच झालेलं. मुळात आजुबाजुच्या प्रदेशात तशी शांतताच होती, आमच्या
राज्याच्या उत्तर पुर्वेच्या सिमांवर काही किरकोळ कुरबुरी सोडल्या तर फारशी
युद्धजन्य परिस्थिती उदभवलेली नव्हती. त्यामुळंच तर हा युद्ध सराव आयोजिला होता.
पुन्हा त्या सरावक्षेत्राजवळुन येताना मला जाणवलं. स्वयंवराच्या आधी चार
दिवसांपासुन आम्हां चौघींना घराबाहेर जाण्याची बंदी घातली गेली, वाड्याला जास्तीचा
पहारा बसवला गेला. अगदी देवघराच्या आजुबाजुला शस्त्रसज्ज सख्या दिसायला लागल्या, हे
सारं पाहुन आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. बाहेरुन आत येणा-या सख्या आणि
मैत्रिणिंच्या कडुन नगरात पोहोचलेल्या राजे आणि राजकुमारांच्या कथा कानावर यायच्या.
कुठल्या मांडवात कोणत्या जनपदाचा राजा आहे, त्याचं वय काय, त्याचा तोरा कसा,
त्याच्या सख्या कशा आहेत, त्याचे रथ कसे आणि किती, अश्वांचा रंग कसा आणि बरंच काही.
आम्ही आमच्या दालनांतच दिवसभर बसुन असायचो. सगळी गवाक्षं तृणांच्या पडद्यांनी झाकुन
घेतली गेली होती.
त्या दिवशी, त्या स्वयंवराच्या दिवशी मात्र सकाळपासुनच एक मोकळेपणा जाणवत होता,
सगळं घर कसं आनंदलं होतं, आई, काकु, काका आणि बाबा सगळेच सकाळपासुन गडबडीत होते.
आम्ही चौघी सख्यांकडुन श्रुंगार करुन घेण्यात गुंग होतो. ताईनं तिच्यासाठी
सुवर्णरंगी वस्त्रं निवडली होती, माझ्यासमोर एकच पर्याय होता निलवर्णी रंवाची
वस्त्रे नेसायचा. माझी तयारी त्यानुसारच चालु होती. हे सगळं चालु असताना आई माझ्या
दालनात आली, तिच्या बरोबर आमच्या घरातली सर्वात वृद्ध दासी होती, पांढरे केस आणि
सुरकुतलेली त्वचा, तरी देखील या समारंभासाठी गळ्यात घातलेले अलंकार हे थोडंसं
विचित्रच वाटलं मला तरी. सनिष्ठा तिचं नाव. मी आईच्या पाया पडले, तिनं मला
जवळ घेतलं अन बाकी सख्यांना दालनाबाहेर जाण्यास सांगितलं. मग मला एका चौरंगावर
बसवुन स्वतः एका कोप-यात जाउन थांबली. सनिष्ठा माझ्यासमोर येउन, दोन्ही हात वरखाली
झटकत माझ्या भोवती गोल फिरु लागली, दोन आवर्तनं झाल्यावर तिनं आपल्या मुठी उघडल्या,
एका मुठीत काहीतरी होतं, दुस-या हातानं तिनं माझ्या चेह-यावरुन तिचा तो खरखरीत हात
फिरवला अन पुन्हा दोन्ही हात एकमेकांवर ठेवुन दालनाबाहेर निघुन गेली. ती गेल्यावर आई, माझ्याकडं आली आणि पुन्हा एकदा मला जवळ घेतलं, मी गोंधळलेल्या
नजरेनं तिच्याकडं पाहिलं हसत हसत ती म्हणाली ' कळेल तुला तु आई झालीस म्हणजे '
तेवढ्यात बाहेर गेलेल्या सख्या आत येत होत्या त्यांचं बोलणं ऐकु आलं ' फार वेळ
लागेल त्याला, एवढं सोपं नसतं ते '
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-92086438001536776512013-01-14T23:01:00.003+05:302013-07-28T01:43:39.530+05:30अंकोदुहि - ०३
भाग - ०३
तेव्हाच ताईनं त्या धनुष्याला एक हिसका दिला अन कुठल्याश्या प्राण्याच्या
आतड्याची असावी अशी ती खरखरीत प्रत्यंचा माझ्या हातातुन सरकन ओढली गेली, माझ्या
हातावर अजुन एक रेघ ओढुन ...........
पुढं....
माझ्या हातातुन रक्त वाहणं थांबतच नव्हतं, मी.आई आणि धाकट्या बहिणींबरोबर त्या
खोलीबाहेर पडले, बाहेर सगळेच उत्सुक होते आत काय आहे आणि काय चाललं आहे ते पहायला,
समजुन घ्यायला. त्याचवेळी आम्हा चौघींचं असं बाहेर पडण्यानं थोडा गोंधळ झाला.
थोड्याच वेळात वैद्य औषधी लेप घेउन आले, तोपर्यंत आईनं हात धुतला होता, तो लेप
हातावर लावल्यावर चंदनाचा स्पर्श एकदम थंड वाटला,मात्र थोडया वेळानं जसजसं त्या
लेपामधलंते औषध जखमेपर्यंत पोहोचायला लागलं आग आग व्हायला सुरुवात झाली. आईच्या
मांडीवर डोकं ठेवुन मी झोपले होते ती बराच वेळ. जाग आली तेंव्हा दिवस मावळलेला
होता, खोलीत समया लावलेल्या होत्या त्यांच्या शांत उजेडानं जरा बरं वाटलं. आईला
देखील झोप लागली होती. माझ्या हालचालीनं ती उठली, मग उठुन दोघींनी आवरलं. हातावरचा
लेप वाळुन निघुन गेला होता. पलंगाच्या बाजुला त्याच्या खपल्या पडल्या होत्या, एका
सखीनं येउन सगळं साफ केलं.
मला काकांना आणि बाबांना भेटायचं होतं, तसं मी आईला सांगितल्यावर तिनं कुणाला
तरी तिकडं पाठवलं. दोघंही काही कामात होते, तोपर्यंत काकुकडं गेले. ती आणि ताई दोघी
बाहेर बागेत फिरत होत्या. मला बघताच ताई पळत आली आणि माझा हात हातात घेतला,
तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातनं दोन आसवं गळाली माझ्या हातावर आणि पुन्हा तेच झालं,
आधी शीतलता आणि नंतर जळणं. मला वाटलं होतं, ताई तिच्या चुकीबद्दल काहीतरी बोलेल पण
तसं काहीच झालं नाही, पण त्या धनुष्याबद्दलच बोलत राहिली. पेटीबद्दल एक चकार शब्द
नव्हता तिच्या बोलण्यात. ते धनुष्य म्हणे योगी परशुरामांनी काकांना दिलं होतं, आणि
त्यांना ते प्रत्यक्ष भगवान शंकरांनी दिलेलं होतं. खरं असावं असं मला तरी वाटलं
नाही. खरं आश्चर्य या पुढंच होतं, ते धनुष्य आमच्या घरातल्या
कुणीच आजपर्यंत वापरलेलं नव्हतं. काका एका विशिष्ट दिवशी त्याची पुजा करत तेवढंच.
काही दिवसांपुर्वी एका ऋषींच्या करवी काही निरोप पोहोचला होता काकांकडे आणि
त्यानुसार ही आजचा समारंभ साजरा झाला होता.
संध्याकाळचा शेवटचा प्रहर संपल्याचं नगा-यांच्या आवाजानं लक्षात आलं, आता आमच्या
वाड्याचे सगळे दरवाजे बंद होणार,उदया सुर्योदयापर्यंत ते बंद्च राहणार. आजच्या
समारंभाच्या नियमांनुसार बाबा आंणि काकांना सुर्यास्ताच्या आधीच भोजन करणं गरजेचं
होतं, त्यासाठी काकु मगाशीच आत गेल्या होत्या. कारंज्याबाजुच्या पाय-यांवर बसुन मी
आणि ताई त्या धनुष्याबद्दलच बोलत होतो. मला त्या ताईच्या पेटीबद्दल अजुन ऐकायचं
होतं, पण ती अजिबात तो विषय काढु देत नव्हती. तिनंच सांगितलं की, आज काकांनी तिच्या
स्वयंवराची घोषणा केली आहे, ' जो क्षत्रिय पुरुष, त्या धनुष्याच्या प्रत्यंचा
चढवुन दाखवेल अशाशीच तिचं लग्न होणार होतं'. यापुर्वी लग्नाचा विषय निघाला की ताई
थोडीशी गुपचुप असे, पण आज तिच्या चेह-यावर एक वेगळीच लकाकी होती, डोळ्यात एक वेगळाच
भाव होता, थोडा आनंदाचा. ज्याच्याबद्दल मला असुया वाटायला लागली होती. आतुन आईची
हाक आल्यावर आम्ही दोघी उठुन आत गेलो. माझ्या खोलीकडं जाताना बाबांच्या खोलीकडं
माझी नजर गेली, तिथं सख्या आता समयांच्या वाती नीट करत होत्या, म्हणजे बाबा तिथं
नव्हते. मला जे विचारायचं होतं ते आज राहुन जाणार होतं हे नक्की.
रात्री जेवताना थोडासा त्रास झाला हाताला, जेवण झाल्यावर पुन्हा आईनं हाताला लेप
लावला, ती माझ्या खोलीतुन निघाली तशी मी तिला अडवलं, ' आई थोडा वेळ बस ना ?' मी
तिला विचारलं. ती थांबली, मागं न वळता तिनं विचारलं ' मला उत्तरं देता येणार नाहीत
असे प्रश्न विचारणार असशील तर मी थांबुन काय उपयोग?' तिला काहीतरी लपवायचं होतं
असं वाटलं नाही, उलट ती मला मर्यादांच आणि त्या पाळण्याचं प्रात्याक्षिक देत होती.
' हो आहेत असे काही प्रश्न, पण त्यांची उत्तरे दिली नाहीस तरी चालेल मला' आई मागं
वळली तेंव्हा तिच्या डोळ्यात पाणी असेल असं वाटलं, पण तसं नव्हतं. अजुन
एक प्रात्यक्षिक, कसं जगायचं याबद्दल. मी पलंगावर एका बाजुला होउन बसले आणि आईला
जागा करुन दिली. तिनं खोलीच्या बाहेर उभ्या असलेल्या सखीला बोलावुन तिला
विचारल्याशिवाय कुणालाही आत पाठवु नये असं सांगितलं. यावरुन मला माझ्या प्रश्नांची
उत्तरं मिळाली नाहित तरी ते मला विचारता येतील याची खात्री आईनं दिली मला.
'आई, स्वयंवर म्हणजे, उपस्थित आणि योग्य अशा वरांपैकी आपल्याला आवडेल आणि योग्य
वाटेल अशा एकाची निवड करणं, होय ना? ', ' होय, क्षत्रियकुळांमध्ये स्वयंवराचा हाच
अर्थ असतो' - आईला या विषयावर प्रश्नाची अपेक्षा होतीच बहुदा, तिनं शांतपणं
सांगितलं. ' मग ताईच्या स्वयंवरासाठी तो धनुष्याचा पण का?, तिला अशा वराची निवड
करण्याचं स्वातंत्र्य नाही ? स्वयंवराच्या दिवशी एखादा क्षत्रिय पुरुष जर ताईला
योग्य वाटला, आवडला, पण त्याला त्या धनुष्याला प्रत्यंचा नाही चढवता आली तर ताईला
त्याच्याशी लग्न नाही करता येणार, असंच ना ?'- माझा पुढचा प्रश्न तिच्या उत्तराची
वाटच पाहात होता. थोडंसं थांबत आई सावरुन बसली, तिनं उत्तरं दिली नसती तरी मला
चालणार होतं, म्हणुनच तिच्या उत्तराची अपेक्षा न करता मी पुढचा प्रश्न विचारला '
म्हणजे तो क्षत्रिय पुरुष त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवु शकेल, पण तो ताईला योग्य
वाटला नाही किंवा आवडला नाही तरी तिनं त्याच्याशीच लग्न करायचं का ? , का त्या
धनुष्याला प्रत्यंचा चढवु शकणं ही या स्वयंवराची एक पुर्व पात्रता आहे, जर असे
एकापेक्षा अनेक क्षत्रिय पुरुष असतील जे ही गोष्ट सिद्ध करु शकले तर त्या
अनेकांपैकी एकाची निवड ताईला करता येईल.? का पहिला क्षत्रिय पुरुष हे सिद्ध
करु शकला तर स्वयंवर तिथंच थांबेल. ?
माझं बोलणं थांबलेलं पाहुन, आई हसली. मला सतावणारे एवढे प्रश्न विचारत असताना
आई एवढी शांत कशी राहु शकते याचं मला आश्चर्य वाटत होतं. पलंगाच्या मागच्या
नक्षीकामाला रेलुन बसल्यानं आईचं उत्तरीय खाली ओघळलं होतं, ते हातानं सावरुन घेत
तिनं बोलायला सुरुवात केली. ' हे पहा बाळा, तु मला चार प्रश्न विचारले, हो ना. त्या
प्रत्येक प्रश्नात एक शब्द वारंवार येतो आहे, तो कोणता यावर जरा विचार कर, तुझ्या
सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझी तुलाच मिळतील. मी काही न सांगता देखील.' एवढं बोलुन
ती पलंगावरुन खाली उतरली, माझ्या मस्तकावरुन हात फिरवत म्हणाली ' बाळा, मला तुम्हा
तिघींच्या भविष्याची काळजी वाटते, ज्यांचं आयुष्य जन्मापासुनच अविश्वासनिय आहे,
असामान्य आहे त्यांच्याबद्दल आपण सामान्यांनी काय बोलावं, का विचार करुन आपली मति
कुंठित करुन घ्यावी.?' झोप आता, तुझ्या जेवणामध्ये तुला गुंगी यावी असे काही
पदार्थ मी मुद्दाम घातले होते, आणि हो हाताची जास्त हालचाल नको होउ देउ.' एवढं
बोलुन तिनं पलंगाच्या बाजुच्या समईतल्या दोन वाती फुंकर मारुन शांत केल्या, अन ती
बाहेर जायला निघाली.
माझ्याच प्रश्नातला एक शब्द, माझ्या भविष्याचीच काळजी, आम्हां तिघींचं सामान्य
असणं, ताईचं असामान्यत्व या सर्वांनी माझ्या डोक्यात पुरता गोंधळ माजवला होता त्या
चार क्षणांत. या सर्वात माझे प्रश्न कुठंतरी बाजुलाच पडले होते. मी फक्त घटनांच्या
परिणामांचा, आणि त्यादेखील समोर घडणा-या आणि मला दिसणा-या परिणामांचा विचार करत
होते, तर आई त्या घटनांच्या मागं घडलेल्या आणि घडवुन आणलेल्या कारणांबद्दल बोलत
होती. आई खोलीतुन बाहेर पडणारच होती, तेवढ्यात या विचार चक्रातुन बाहेर येत
मी तिला विचारलं, ' आई, मला काही समजलं नाही, तु काय समजावते आहेस ते, आणि ते
समजल्याशिवाय मला झोप देखील येणार नाही, किमान तो शब्द कोणता ते तरी सांगुन जा'.
दरवाज्याच्या चौकटीचा आधार घेत आई थांबली, एक पाय उंबरठ्यावर होता, तशीच मान मागं
वळवुन माझ्याकडं पाहिलं, तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली होती. किंचित
गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' ....
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-30719139936499737742012-12-18T00:05:00.000+05:302013-07-28T01:41:55.610+05:30अंकोदुहि - ०२
भाग - ०२
दर चार दिवसांत ताईच्या बोलण्यात मात्र त्या खोली उघड्ण्याचा विषय यायचा,
मग माझा तो दिवस घाबरुनच जायचा, माझा पडलेला चेहरा बघुन ताई धीर द्यायची पण मनातली
भीती काय अशी जाते काय छे...
एक दिवस आम्ही मैत्रिणिंसोबत बसलो होतो बोलत तेंव्हा त्या खोलीबद्दल बोलणं चाललं
होतं, माझी एक मैत्रिण जिचे बाबा आमच्या गावातले मोठे तालेवार सोनार होते, ती
म्हणाली की ' अगं माझे बाबा सांगत होते, तुझ्या काकांनी एक मोठा चौरंग सोन्यानं
मढवुन घेतला आहे आणि जेंव्हा पासुन तो चौरंग त्यांनी तुमच्या वाड्यावर पाठ्वुन दिला
त्यानंतर तो बाहेर कधीच दिसला नाही तुमच्या घरात पुन्हा, तोच असेल तिथं त्या खोलीत
? मला तरी असा एखादा खुप मोठा चौरंग घरात कधी पाहिल्याचं आठवत नाही आणि तो देखील
सोन्यानं मढवलेला तर मुळीच नाही, कारण सोन्या-चांदीची तशी कमतरता नाहीच आमच्याकडे.
अगदी दररोजची जेवणाची ताटं सुद्धा चांदीची आहेत. मी ताईकडं पाहिलं,ती सुद्धा गप्पच
होती म्हणजे तिला सुद्धा त्या चौरंगाबद्दल काही माहित नव्हतं. म्हणजे त्या
खोलीत नक्कीच तो चौरंग असणार.
आणि अशातच एके दिवशी सकाळी स्वयंपाकघरात काम करत असताना ती बातमी कळाली,
अजुन सहा दिवसांनी ती खोली उघडणार असल्याची. माझी पाच रात्रींची झोप उडाली. त्या
दिवशी सगळ्या घरात एकच धामधुम होती,कितीतरी लोकं आली होती. आज ब्राम्हण सुद्धा खुप
जास्त होते, देवघराच्या बाहेर त्या खोलीच्या मागे एक मोठा मंडप घातला होता तिथं
कसलं तरी हवन चालु होतं पहाटेपासुनच. एकंदर सगळं शुभ वातावरण होतं, माझ्या मनात
मात्र कुठंतरी दाटलेली भीती परत परत वेडावुन दाखवत होती. ताईला काही बोलणं शक्यच
नव्हतं, तिला सगळ्यात जास्त आनंद झाला होता, मी दोन्ही धाकट्या बहिणिंना बोलुन
दाखवलं तसं, त्यांची अवस्था देखील माझ्यापेक्षा फार वेगळी नव्हती. उत्सुकता आणि
भीतीच्या सावल्या त्यांच्या चेह-यावर आलटुन पालटुन दिसत होत्या.
त्या खोलीत काय असेल याबद्दल आम्ही बरेच अंदाज बांधलेले होते, त्यांची
सत्यासत्यता तपासुन पाहायची होती. आमच्या घरातल्या पुरुषांना त्या खोलीत काय आहे
याची कल्पना होतीच पण बायका कधी त्या खोलीत गेल्याचं ऐकलं देखील नव्हतं, आई आणि
काकु तर त्या खोलीचा विषय निघाला की गप्प गप्प राहायच्या. आमच्या मैत्रिणिंकडुन
काही अर्ध्या मुर्ध्या गोष्टी कानावर येत होत्या पण त्याबद्दल देखील आई
किंवा काकुकडं बोलणं शक्य नव्हतं. एक शक्यता त्या चौरंगाची होती, पण कशासाठी असेल
तो चौरंग आणि काय असेल त्यावर, एखाद्या देवाची प्रतिमा की आमच्या कुलदेवतेच्या
विशिष्ट पुजेसाठी तो चौरंग बनवलेला असेल काय माहित.
सुर्य पुर्ण माथ्यावर येइस्तोवर पुजाअर्चा, हवनं चालु होती, मग नैवेदय झाले आणि
तो क्षण आला, दोन तीन ब्राम्हणांनी मोठ मोठ्यानं मंत्र म्हणत त्या बंद
दरवाज्यवरच्या प्रतिमेची पुजा केली आणि मग काकांनी ती प्रतिमा त्या दरवाज्यावरुन
बाजुला केली. खोलीच्या दरवाज्यावर त्या प्रतिमेमागचा भाग तेवढा स्वच्छ राहिला होता,
आणि प्रतिमेला वाहिलेल्या कुंकुवामुळं एक लाल चौकट तिथं तयार झालेली होती, अशी चौकट
जिच्यातुन बाहेर पडणं अवघड होतं. काकांनी मागं सरकुन त्या दरवाज्याला साष्टांग
दंड्वत घातला अन उठता उठता खांद्यावरचं उपरणं काढुन कमरेवर बांधुन घेतलं
घट्ट, बायकांच्या बाजुला सगळ्यात पुढं काकु, आई होत्या, त्यमागं ताई अन मी ताईच्या
मागं उभी होते. ती विस्फारल्या डोळ्यांनी सगळं पाहात होती तर मी डोळे किलकिलेच
केलेले होते. काकांनी दोन्ही हात उंचावुन सुर्यदेवाच्या स्तुतीचे मंत्र म्हणले, मग
दोन्ही हात छातीवर घट्ट नमस्कारात धरुन शिवस्तुतीचे एक दोन मंत्र म्हणले आणि मग
आपल्या बलदंड हातांनी ते दार आत ढकललं.
दार उघडता क्षणी एक वेगळाच वास तिथं भरुन राहिला , दोन ब्राम्हण दोन समया घेउन
आत गेले आणि क्षणार्धात ती खोली प्रकाशानं भरुन गेली. त्या खोलीत दोन वस्तु होत्या
व्यवस्थित कापडानं गुंडाळुन ठेवलेल्या. आणि त्या दोन्ही एका मोठ्या चौरंगावर
ठेवलेल्या होत्या. तोच तो सोन्यानं मढवलेला चौरंग, वरुन मोठं कापड पांघरलेलं असलं
तरी त्याचे पाय दिसत होते खाली मोकळे आणि त्यावरुन अंदाज येत होता तो किती मोठा
असेल याचा. आत जाउन ब्राम्हणांनी समया खाली ठेवल्या आणि बाहेर येउन पुजेचं ताट
घेउन आत गेले, काका आणि बाबा त्या खोलीच्या उंब-याला नमस्कार करुन आत गेले आणि
त्या चौरंगावरचं कापड बाजुला केलं. त्या चौरंगावर पुढच्या बाजुला एक लाकडी
पेटी होती, खुप छान नक्षीकाम केलेली. पेटीचा आकार देखील मोठा होता जवळ्पास दोन हात
लांब आणि एक हात रुंद होती ती पेटी, उंचीला देखील दोन हात उंच होती. काका आणि
बाबांनी त्या चौरंगावरच्या दोन्ही वस्तुंना नमस्कार केला, ब्राम्हणांचं अनुक्रमे
भुमिस्तवन आणि शिवस्तुती म्हणणं चालु होतं. त्या पेटीची पुजा केल्यानंतर, काका
आणि बाबा मागच्या बाजुला गेले, तिथं काय आहे ते बाहेरुन दिसत नव्हतं.
पुजा झाल्यावर दोन्ही ब्राम्हण बाहेर आले, अजुन दोन समया खोलीत ठेवुन परत बाहेर
आले, आतुन बाबांची हाक आल्यावर आम्ही सगळ्या बायका आत गेलो, तो उंबरा
ओलांडतानाच मला एवढी भीती वाटत होती की मी ताईचा हात घट्ट पकडला, पण तिनं एका
झटक्यानं तो बाजुला केला आणि चटकन आत गेली. दोन क्षण मी त्या उंब-यावरच
घुटमळले, नाईलाज होता म्हणुन पाय आत टाकले. चार समयांच्या उजेडात ती खोली प्रकाशित
झालेली होती, समोरचा सोन्यानं मढवलेला चौरंग झळाळुन निघाला होता, मी आत येताच
बाबांनी दरवाजा बंद केला. आता खोलीत आम्ही आठच जण होतो आणि समोरच्या चौरंगावर
ठेवलेली ती भलीमोठी पेटी आणि त्यामागं काय होतं ते मलातरी अजुन दिसलं नव्हतं. एक तर
मी अजुन सुद्धा चौरंगापासुन बरीच लांब होते आणि त्यावरचं कापड अजुन तसंच होतं.
सगळ्याजणी बाबांच्या बाजुला जाउन उभारल्यावर लक्षात आलं की मी एकटीच आहे एका बाजुला
उभी असलेली, स्वेच्छेनं की बाकीच्यांनी मला एकटं सोडलं म्हणुन, पण अशा विचारांवर
मनातल्या भीतीनं कधीच मात केली होती.
मी आता काकु आणि आईच्या मागं उभी होते, आणि समोर चौरंगाच्या दुस-या बाजुला काका
आणि ताई उभे होते. ताईनं काकांकडे पाहिलं, तिच्या नजरेनंच परवानगी मागितली अन
काकांनी डोळ्यांनीच हो म्हणलं, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, मी एकदम चमकले,
काकुकडं पाहिलं ति देखील रडत होती, आई पण,बाबा पण. अरे पण का,का रडत आहेत सगळे,
काही कळेना. विस्फारल्या नजरेनं जे होतंय ते पाहात राहिले. ताई पुढं आली तिनं त्या
पेटीला नमस्कार केला अन ती उघडली, काही क्षण ती तशीच बसुन होती त्या पेटीसमोर,
एकदम तिनं काकुला विचारलं ' खरंच या पेटीतच होते मी, अगदी खरं ना, का थट्टा करताय
तुम्ही सगळे माझी? ' काकांनी निशब्द मान हलवली, काकु पटकन पुढं होउन ताईकडं गेली,
तिला उठवुन आपल्या मिठित घेत म्हणाली ' होय बाळा, तु याच पेटीत होतीस, जेंव्हा
आम्हाला सापडलीस तेंव्हा, आजपर्यंत हे सत्य तुला सांगितलं नव्हतं, पण कधीतरी ते
तुला समजणारच होतं म्हणुन तुम्ही सगळ्याजणी मोठं होण्याची वाट पाहात होतो, कारण
तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्यावरच की अशा गोष्टी समजावुन घेउ शकाल म्हणुन.'
आम्हां तिघिंसाठी हा आश्चर्याचा धक्का होता, म्हणजे ताई काका-काकुंची मुलगी
नाही, ती त्यांना सापडली होती या पेटीत. एका क्षणात
माझ्या डोळ्यासमोरुन आतापर्यंतचं आमचं सगळं आयुष्य सरसरत गेलं, प्रत्येकवेळी ताईला
मिळणारी वेगळी वागणुक, ती मोठ्या काकांची मुलगी आहे म्हणुन मिळत असेल अशी माझी
समजुत होती पण त्यामागचं कारण हे होतं खरंतर. ' आणि ते मागं काय आहे ?' माझ्या
धाकट्या बहिणिनं विचारलं. अशा वेळी खुप छोटं असणं फार फायद्याचं असतं, खोट्या
मोठेपणाचे मुखवटे वागवावे लागत नाहीत चेह-यावर. एका बाजुनं बाबा आणि एकाबाजुनं ताई
पुढं झाली, आता मलादेखील तिकडं जायचं होतं, पण पुढं होताना काकुच्या पायावर पाय
पडला आणि तिथंच थांबले. तिथुन पुढं जाईपर्यंत ते जांभळ्या रंगाचं कापड बाबांनी
सरसरत ओढलं होतं, आणि मी पहिल्यांदाच एवढं मोठं धनुष्य पाहिलं, एवढं मोठं म्हणजे
बाबांच्या धनुष्यापेक्षा मोठं पण एकदम साधंसंच, एखाद्या भिल्लाचं असावं तसं. दोन
टोकांना मात्र दोन माणकं लावलेली होती, तीसुद्धा करड्या रंगाची.
समोर ठेवलेल्या समयांच्या प्रकाशात त्या धनुष्याच्या अर्धवर्तुळांच्या सावल्या
भिंतीवर पडल्या होत्या, त्या सर्पासारख्या दिसत होत्या आणि टोकाला लावलेली ती करडी
माणकं त्या सर्पजिव्हेसारखी लवलवत होती, कितीतरी काळ या खोलीत बंद असुन देखील त्या
धनुष्यावरची चमक कमी झालेली नव्हती, साधारणपणाचा एकही गुण त्याच्यात दिसत नव्हता.
आता मी जाउन ताईच्या मागं उभ्री राहिले होते. ' मी उचलु हे धनुष्य ?' मी काकांकडं
पाहात विचारलं, त्यांच्या थकत चाललेल्या डोळ्यांत देखील एक चमक होती,
नजरेनंच त्यांनी मला होकार दिला, मी ताईच्या मागुन पुढं झाले. खांद्यावरुन खाली
घसरु लागलेलं उत्तरीय कमरपट्ट्यात खोचलं आणि त्या धनुष्याला वाकुन नमस्कार केला.
दोन्ही हात त्या अर्धवर्तुळांच्या मध्यभागी ठेवले आणि ते धनुष्य उचललं, दोन पावलं
मागं आले चौरंगापासुन. वाटलं होतं तसंच ते वजनदार होतं ते आणि जर उभं धरलं असतं तर
जवळपास माझ्या एवढीच त्याची उंची झाली असती, त्याच्यावर कपाळ टेकवुन ते पुन्हा
चौरंगावर ठेवायला गेले आणि माझाच तोल गेला, मला वाटलं ते धनुष्य आता खाली पडेल,
मोठा आवाज होईल पण तसं झालं नाही. तोल सावरुन मी वर पाहिलं तो ताईनं ते
माझ्यापेक्षाही सहज पेललं होतं, ते सुद्धा एकाच हातानं अगदी त्याच्या मध्यभागी
धरुन, माझ्याकडं पाहुन ती हसत होती, मी खाली वाकुन माझ्या पायात गुंतलेली त्याची
प्रत्यंचा सोडवत होते, तेव्हाच ताईनं त्या धनुष्याला एक हिसका दिला अन कुठल्याश्या
प्राण्याच्या आतड्याची असावी अशी ती खरखरीत प्रत्यंचा माझ्या हातातुन सरकन ओढली
गेली, माझ्या हातावर अजुन एक रेघ ओढुन ...........
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-33485315032785365642012-12-05T22:28:00.002+05:302013-07-28T01:37:49.287+05:30अंकोदुहि - ०१
मी, बाई होते म्हणुनी. म्हणुन लग्न झाल्यावर नव-याच्या घरी यावं लागलं, पुरुष
असते तर मला घर नसतं बदलायला लागलं. कसली मज्जा लग्नात, किती लोकं, किती
माणसं, मित्र, शत्रु, जवळ्चे,लांबचे सगळे आले होते. आई बाबा किती आनंदात होते. तशी
कधी बाबांनी किंवा आईनी आमच्या, म्हणजे आम्हा बहिणींच्या लग्नाची काळजि केल्याचं
आठवत नाही मला. एकत्र कुटुंब आमचं. माझे आईबाबा, मोठे काका काकु, त्यांची मुलगी,
सगळं किती मस्त होतं. सगळ्याजणी एकत्र राहायचो, एकच मोठं घर होतं आमचं. घर कसलं
राजवाडाच होता तो. पण घर म्हणलं की जीवाच्या जवळचं वाटतं.
आम्ही सगळ्या जवळपास एकाच वयाच्या, एक दोन वर्षांचा फरक असेल . घरात
खाण्यापिण्याची ददात नव्हती पण शिस्त देखील तेवढीच, तसं आमचं घर जुन्या वळणाचं,
संस्कारांचं होतं. सकाळी लवकर उठणं, आवरणं, मग देवघरात जाउन बसणं, कधी मोठे काका तर
कधी बाबा पुजा करत असायचे. म्हणजे ब्राम्हण असायचे पुजा सांगायला, ते सांगतील
तसं काका,बाबा करायचे, मध्ये मध्ये ते मंत्र म्हणायचे. आम्ही परकर पोलक्यात गप्प
मागं बसुन राहायचो, समोरच्या प्रतिमेच्या गळ्यातले हार, पायातले पैंजण बघत.
त्यांना म्हणे पैंजण म्हणायचं नाही असं आई सांगायची, ते तोडे आहेत. पायात म्हणजे
पैंजण आणि हातात म्हणजे कंगन एवढंच कळायचं वय होतं आमचं. देवाच्या घरात, आम्हाला
सगळीकडं फिरता यायचं नाही. तिथं सगळ्यात पुढं ब्राम्हण मग पाठमोरे बाबा किंवा काका
आणि त्यामागं थोडं अंतर सोडुन आम्ही असायचो.
मध्ये मध्ये आई नाहीतर काकु यायच्या, देवाच्या जेवणाचं घेउन, त्याला म्हणे
नैवेद्य म्हणायचं पण असायचं काय त्या ताटात, छे काय नसायचं ते विचारा, पार ताज्या
ताज्या फळांपासुन गरम गरम पु-या अन दाट खीर असायची. त्या खिरीवरच्या तुपाचा असा
मस्त वास यायचा की कधी एकदा पुजा संपते आणि आम्हाला प्रसाद मिळतो असं व्हायचं.
देवघराच्या आत उजव्या बाजुला एक दरवाजा होता, त्याला मात्र नेहमी कुलुप असायचं.
त्या दरवाज्यावर एक मोठी प्रतिमा होती, जिची पुजा केली जायची दररोज त्या लालभडक
कुंकुवानं अन लालभडक फुलांनीच. पण दरवाजा उघडलेला आम्ही ती कधीच पाहिला नव्हता.
मला तर त्या प्रतिमेतल्या साधु बाबाचीच भीती वाटायची, म्हणुन मी कधी कुणाला विचारलं
देखील नव्हतं त्या दरवाज्याबद्दल. पण एके दिवशी मात्र, आम्ही नेहमीप्रमाणे पुजा
झाल्यावर नमस्कार केला आणि बाहेर निघणार प्रसाद घेउन तेवढ्यात काकांच्या मुलीनं
विचारलं ' बाबा, त्या खोलीत काय आहे ? अजुन मोठे देव आहेत का आत ? तुम्ही पाहिलेत
का ते ? ' आणि क्षणांत तिथले सगळेच जण स्तब्ध झाले. काका, पुजा सांगायला आलेले
ब्राम्हण, काकु, माझी आई सगळेच जण, आम्ही तर हातातला प्रसाद खायचं देखील विसरलो.
काही वेळाच्या शांततेनंतर काकांचा आवाज आला ' बाळा, आपण ती खोली वर्षातुन एकदाच
उघडतो, आतले देव ज्या दिवशी आपल्या घरी आले ना, त्या दिवशीच. आणि या एक दोन
वर्षात वर्षी तुम्हाला कळेलच आत काय आहे ते, या गोष्टी समजण्याएवढं
मोठ्या व्हालच तुम्ही तोपर्यंत, ठीक. चला पळा आता, गुरुजी येतील ना शिकवणीला,
पळा.'
काका एवढ्या सहजी ती खोली उघडुन दाखवायचं म्हणतील असं मला तरी वाटलं नव्हतं,
पण ताईचा, म्हणजे काकांच्या मुलीचा चेहरा एकदम आनंदला होता, ती चालताना देखील
उड्याच मारत होती. माझ्या मनात मात्र उत्सुकतेपेक्षा भीती जास्त होती त्या खोलीत
काय असेल याची. एवढे दिवस त्या साधुबाबाची भीती आणि आता आत काय असेल याची भीती याचा
अजुन जास्त गोंधळ माझ्या मनात व्हायला लागला. मी त्यादिवशी रात्री आईला विचारलं
देखील, पण तिनं नुसतीच उडवाउडवीची उत्तरं दिली. म्हणे आमचं वय नाही अजुन, लहान आहोत
असलंच काही. मला काही समाधान वाटलं नाही पण आईनं तिच्या कुशीत ओढलं तेंव्हा ती रडेल
असं वाटत होतं, म्हणुन मी पण फार काही न विचारता झोपुन गेले. मला नाही
आवडायचं आईनं रडलेलं. कारण तिला पण नाही आवडायचं मी रडलेलं. बाबा किंवा काका जरी
रागावले तरी आई आणि काकु किती समजुन घ्यायच्या. पण कधीतरी आई सुद्धा रागावायची मग
मात्र मी काकुमागं जाउन लपायची. आणि आईला पण हे माहित होतं, ती यायचीच नाही
काकुच्या खोलीत. मग काकु बोलता बोलता काय झालं ते माझ्याकडुन काढुन घ्यायची, आणि
मग माझी समजुन काढुन परत पाठवायची आईकडं. खरंच किती मजा यायची त्या वेळी.
मला वाटतं बहुधा दोन वर्षे गेली, आणि आमचं बालपण संपलं आम्ही मोठ्या झालो.
निसर्गाचा जादुचा पिसारा उमलायला सुरुवात झाली होती. आमची खेळ्णी बदलली, खेळ बदलले,
हल्ली घरात बसुन रहायला आवडेनासं झालं, बाहेर बागेत फिरावं,लांब कुठंतरी फिरुन यावं
असं वाटायला लागलं. आणि एवढी वर्षे हे करत नाही म्हणुन ओरडणा-या आई आणि काकु आता
हेच करु नका म्हणुन रागावायाला लागल्या. आम्हा चौघींचे बोलायचे बिषय बदलले, या
घरापलीकडच्या जगाची स्वप्नं हळुहळु आकार घेत होती. एवढी वर्षे आम्ही सगळ्या
मैत्रिणींच्या घरी जायचो खेळायला आता त्यावर पुर्ण बंदी आली, त्याच आमच्या
घरी यायच्या. तेंव्हा देखील गप्पाच जास्त व्हायच्या. आणि खरंतर अशा गप्पांना जास्त
वेळ मिळायाचाचं नाही. सकाळी उठुन आवरलं की आई आणि काकुला मदत करायला स्वयंपाकघरात
जावं लागायचं, अजुन पदार्थ शिजवणं आम्हाला करावं लागत नव्हतं पण सगळी छोटी छोटी
कामं आम्हाला करायला लागायची,तसं तर हे सगळं करायला नोकर चाकर होते, पण ' या वयात
सगळं यायला हवं' या एका सुचनेखाली सगळं करावं लागायचं. तिथं देखील आम्ही चौघी
नेहमी हसत खिदळतच असायचो, आमच्या गप्पा ऐकुन बरोबर काम करणा-या बायका देखील
हसायच्या, मग आई नाहीतर काकु ओरडायच्या. लहानपणी त्या ओरडण्याची भीती वाटायची,
हल्ली गंमत वाटायची. मुद्दाम असं काहितरी करावं वाटायचं ज्यामुळं त्या रागावतील.
दर चार दिवसांत ताईच्या बोलण्यात मात्र त्या खोली उघड्ण्याचा विषय यायचा,
मग माझा तो दिवस घाबरुनच जायचा, माझा पडलेला चेहरा बघुन ताई धीर द्यायची पण मनातली
भीती काय अशी जाते काय छे...
क्रमश :
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-88905661337685646862012-11-28T22:54:00.000+05:302012-11-28T22:56:49.050+05:30तुझ्या गळा माझा गळा ' .........
ऑफिसच्या गारव्यातुन बाहेर येत लिफ्ट समोर उभं राहिलं की जरा बरं वाटतं, मन शरीराच्या आधीच बार मध्ये जाउन पोहोचलेलं असतं. खाली पार्किंग मध्ये येताना मी रोज विचार करतो, प्रत्येकवेळी बाहेर पडणं हे असं आधी खाली खोल खड्यात जाउन मगच असतं का ? कारण, आमच्या ऑफिसचं पार्किग मायनस ९ ला आहे. गाडी घेउन वर येताना प्रत्येक वळणावर गाडी घसरायची भीती वाटते, पण घसरलो कधीच नाही, बहुतेक त्या भीतीमुळंच माझा वेग आपोआप कमी होतो. बाहेर आल्यावर लगेच सिक्युरिटी समोर थांबावं लागतं, रोज नेमका इथं येउन थांबलो की मंद्याच्या फोन येतो. तो सिक्युरिटी वाला बॅग उचकत असतो अन मंद्याची बोंबाबोंब चालु असते. केबिन मध्ये ती लेडिज गार्ड असेल तर मी फोन उचलतच नाही, 'जिगर मा बडी आग है, पर्यंत रिंगटोन वाजु देतो, तो बाहेरचा काळा ठोकळा अन ती लेडिज गार्ड वैतागुन जातात, संध्याकाळची स्रुरुवात मजेत होते.
मी आज सगळ्यांना सांगितलं, उद्याचा शुक्रुवार शेवटचा. त्यानंतर मी दोन वर्षे येणार नाही. प्रोजेक्टला बदली झाली आहे माझी. सगळ्यांना खुप हेवा वाटतोय, तोंडावरुन दिसतंय तसं. आज सगळे मिळुन मला त्यांच्या पेगमधला एक चमचा दारु माझ्या ग्लासात टाकुन कॉकटेल करुन देतात. एक लार्ज बुईथ सोडा, बॉटम्स अप. पाच मिनिटं काही सुचत नाही, मग ह़ळु हळु नॉर्मल होतो. तसं मला कधी चढत नाही दारु पण हे पाच वेग़ळ्या वेगळ्या एकत्र करुन म्हणुन थोडा त्रास झाला. सगळ्यांचा निरोप घेउन मी लवकर निघतो, प्रवासाची तयारी करायची आहे, मेडिकल टेस्ट करुन घ्यायच्या आहेत, तीन लसी टोचुन घ्यायच्या आहेत. हे सग़ळं आवरुन घरी पोहोचायला अकरा वाजतात. दरवाजा उघडुन मी आत येतो, लाईट सकाळी अॅटो मोडला टाकले होते, ते चालु बंद होत राहतात माझ्या मागं मागं. दोन तासांत बॅगा भरुन होतात. मग दोन्ही गाड्यांच्या किल्या घेउन मी खाली जातो, इथं पण खड्यात जावं लागतं मायनस ३ ला. स्कॉर्पचं कव्हर काढतो, आतुन पल्सरचं कव्हर काढतो. स्कॉर्पचं कव्हर पल्सरच्या बॅगमध्ये ठेवतो, तिच्या बॅटरीच्या वायर कादुन ठेवतो, कव्हर घालतो. मग ठोंगा, म्हणजे स्कॉर्पिओ चालु करुन चेक करतो. ठोंगा महिन्यातुन दोन वेळाच बाहेर निघतो.
आज शनिवार, ऑफिसमधुन अर्धे डिटेल घ्यायचे आहेत, ते मिळणार संध्याकाळी साडेचार वाजता, आणि त्यासाठी ठोंगा घेउन जावा लागेल. अर्धे डिटेल उद्या मिळणार अर्धे १४० किलोमिटरचा प्रवास झाल्यावर. नेहमीचं आहे हे. यावेळी हॉटेल आणि पोरी वेगळ्या आहेत असं ऐकुन आहे, पाहुया. नेहमीप्रमाणे ऑफिसला आलो, कामं केली, रिपोर्ट छापले, पैसे घेतले, प्रोजेक्ट करन्सी. बरोबर साडेचार वाजता मायनस ९ ला आलो. ठोंगा वॉशिग एरियात घातला, बाहेर आलो तेंव्हा आउट ऑफ द वर्ल्ड फिलिंग आहे. मग सरळ घरी आलो, जेवण केलं आणि झोपलो. उद्या सकाळी अकराच्या सुमारास निघेन. खरंतर लवकर निघणार होतो पण सात वाजता शाल्मली येणार आहे. मग दोन तास तरी जातीलच म्हणुन अकरा वाजता. अकरा वाजता निघालो की हॉटेलला पोहोचायला तीन वाजतील मग तिथंच मुक्काम होईल, पहाटे तीन वाजता निघेन आणि सात वाजता साईटवर. कार्यक्रम पक्का आहे. उद्या सकाळी शाल्मली येईल त्याची वाट बघत झोप लागली आज थोडी लवकरच.
सकाळी साडेसहा जाग आली, उठुन आवरलं, बरोबर सात वाजता दरवाजा वाजला, शाल्मलीचं ही, कधीच बेल वाजवत नाही. दरवाजा उघडुन आत येताच तिच्या ओल्या केसांचा वास घरभर पसरला. पुढचा तास फार छान गेला. दोघांनी मिळुन चहा, पोहे केले, घरातल्या माझ्या आवडीच्या गोष्टी काढुन तिच्या आवडीच्या गोष्टी वर काढुन ठेवल्या, आता दोन वर्षे तिच्या मनासारखं होणार सगळं, पुन्हा मी गेल्यावर तिला हे सगळं जमणार नाही, म्हणुन. मग दहा ते साडेदहा आम्ही गॅलरीत बसुन होतो. अलार्म वाजला तसा उठुन आवरलं. एकटाच मायनस ३ ला आलो. शाल्मलीला पुजा करायची होती. ठोंगा काढला, शहरातली गर्दी मला ही आवडत नाही अन ठोंग्यालाही. ती संपली की पाचवा गिअर, अठराशे आरपिएम, पंच्याहत्तरचा स्पिड. पहिला घाट लागेपर्यंत तरी.
साडेचार वाजल्यानंतर जे पहिलं हॉटेल दिसलं तिथं गाडी घातली, दहा सेकंड इंजिन बंद केलं, सिस्टिमनं सर्व काही अपडेट झाल्याचं कळवलं. बाहेर पडुन हॉटेलमध्ये गेलो, रुम बुक केली आणि आत जाउन झोपलो, जेवण वगैरे करायचं नव्हतंच. पहाटे अलार्म वाजला, उठुन आवरलं. चेक आउट करुन निघालो. आज एकुण नउ तास प्रवास करायचा आहे. ही साईट नविनच आहे, आजचा प्रवास तसा नविनच भागातुन आहे, ब-यापैकी निर्मनुष्य सुद्धा. कंटाळवाणं होणार आहे सगळं. या नोकरीत आलो ते पैसा, घर, गाडी मिळणार म्हणुन, पहिले सहा महिने फार छान गेले पण जेंव्हा पासुन साइट सुरु झाल्या तेंव्हापासुन त्रास आहे खरंतर. ही माझी दुसरीच साईट, पहिली एक महिन्यासाठीच होती ट्रायल बेसिसवर, वर्षभरानी त्याचे रिझल्ट आल्यावर मग इथं दोन वर्षासाठी पाठवत आहेत. शाल्मलीला जेंव्हा हे समजलं तेंव्हा तिनं स्पष्ट नाराजी व्यक्त केलेली होती, पण मिळणारा पैसा, सुरक्षितता ह्यांच्या जीवावर तिला समजावता आलं होतं. दिवसभर गाडी चालवुन साडेपाचच्या सुमारास साईटच्या गेटसमोर उभा आहे, सगळ्या चेकिंगला वगैरे अर्धा तास गेला. मग आत आलो, आता सगळंच सिस्टिमच्या हवाली इथुन पुढं.
गेले आठ दिवस नुसता माझ्या रुममध्ये बसुन आहे,जेवणखाण वेळेवर मिळतंय, ठरल्या वेळेला बाहेर फिरायला मिळ्तंय ठरलंय तेवढंच मग पुन्हा रुममध्ये. प्रत्यक्ष काम काहीच दिलेलं नाही अजुन. सिस्टिमवर वेटिंग लिस्ट चेक केली. अजुन तीन दिवस मला कुणी भेटणार नाही. प्रचंड कंटाळा आलेला आहे. पहिल्यांदा साईटवर गेलो होतो ते आठवतं पुन्हा एकदा, म्हणजे गेल्या आठ दिवसांत दररोज दोन वेळा आठवुन झालेलं आहे. आता पुन्हा आठवंतय, बॉसनं घेतलेलं ब्रेन स्टॉर्मिंग, झालेले वाद आणि मग दोन दिवसांनी दिलेला होकार, नंतर शाल्मलीचा गोंधळ आणि बरंच काही. ही कंपनी जॉइन करतानाच लक्षात आलेलं होतं की काहीतरी घोळ आहे, पण पैसा, घर आणि गाडी डोळ्यासमोर नाचत होते. अशावेळी नेहमी करतो ते केलं, बॅगमधुन एक इंजेक्शन काढलं आणि टोचुन घेतलं. या ऑषधाचा प्रभाव पुढचे दोन दिवस टिकेल. मग एकच दिवस वाट बघणं आणि त्यानंतर काम सुरु.
आज दुपारी माझा पार्टनर येणार आहे, नंबर ८९३७, वय वर्षे २९, आज सकाळीच आलेल्या मेसेज मध्ये होतं तसं. बरोबर तीन वाजता रुमचा दरवाजा उघडला तेंव्हा समोर जॉब नंबर ८९३७ उभी होती. चेह-यावर प्रसन्न हसु, केसांचा बांधलेला पोनी आणि त्याला न शोभणारं बंगाली कुंकु कपाळावर. ' हाय, मी प्रवीण ' , ' हाय, मी मीना, आत येउ ?' दोनच वाक्यं बोललो, पण खुप जवळची ओळख आहे असं वाटलं. पुढची दोन वर्षे तरी एकत्र काढायची आहेत, किंवा रिझल्ट मिळेपर्यंत. दोघं आत येउन रुममागच्या लॅबमध्ये गेलो . ' थोडा वेळ गप्पा मारु या का, आपण अहेड ऑफ स्केड्युल आहोत बरंच' तिला विचारलं. कपडे बदलत पडद्यामागनं तिनं उत्तर दिलं ' मी तेच करणार आहे, तुझी कितवी साईट आहे ?' मला बरंच हायसं वाटलं ' दुसरी, तुझी?' पडदा बाजुला करत ती म्हणाली 'चवथी, यु आर टु ज्युनियर टु मी, किती रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत आजपर्यंत, काय पर्सेंटेज ? तिनं सोफ्यावर अंग टाकत विचारलं. ' काही घेणार, नव्वद टक्के आहेत रिझल्ट, निदान माझ्याकडुन तरी' पार्टनर आल्यावर रुममधल्या सर्व सर्विस ओपन होतात, त्यानुसार बार उघडलेला होता. ' आतातरी फक्त सोडा दे तीन क्युब टाक त्यात' दोघांचे ग्लास तयार करुन टिपॉयवर ठेवले तेंव्हा तिचा चेहरा फुललेला होता, बंगाली कुंकु पुसल्यानं कपाळ थोडं जास्तच मोठं दिसत होतं.
'तर मि. प्रवीण, येत्या महिनाभरात आपल्याला ही दोन पझल्स सोडवायची आहेत, मला वाटतं तुम्ही माझ्या शरीरापेक्षा या कोड्यांवर जास्त लक्ष द्यावं, कसं सुरु करायचं आपण, आधी एक पुर्ण करायचं की दोन्ही पॅरलली करत जायची. ' तिच्या आवाजात सिनियरनेस जाणवत होता, मी माझी नजर तिच्या वरुन काढुन समोरच्या टिपॉयच्या स्क्रिनवर नेली. दोन प्लॅन आणि दोन ड्रॉइंग उघडी होती स्क्रिनवर. मला एका ड्रॉईंगमधलं बरंचसं समजलं, प्लॅनमधली गावं रस्ते ओळखीचे वाटत होते, पण दुस-याचा काही पत्ता लागेना. ' मला पण काहीच समजत नाही यातलं, प्लॅन ए आहे तो पुर्ण शहरातला पाणीपुरवठा विषयुक्त करुन मरणाचा थैमान घालायचा आहे, पण दुसरा काय आहे समजत नाहीये. तुला कळालं का काही यातलं ? मीनानं संवादाला सुरुवात केली. ' ग्रेट , मला प्लॅन बी समजलाय संपुर्ण, सगळ्या शहरात मोक्याच्या ठिकाणी गाड्या अडवुन एक प्रचंड ट्रॅफिक जाम घडवुन आणायचा आणि मग मेमॅवेच्या साहाय्यानं धुळ्धाण उडवुन द्यायची. वुई कॉम्प्लिमेंट इच अदर ' उगा जवळीक दाखवायची म्हणुन मी बोललो. ' मेमॅवे म्हणजे काय ? समथिंग केमिकल ऑर हाउ ?' मिनानं मुलभुत प्रश्न विचारला. ' मेमॅवे म्हणजे मेगा मॅगनेटिक व्हेव - मेमॅव्हे, पण उच्चार मेमॅवे असाच केला जातो.
'चल तु माझ्या क्षेत्रातल्या प्लॅनवर काम करायला सुरुवात कर, मी तुझ्या फिल्ड्मध्ये दिवे लावतो, म्हणजे दोन्ही प्लॅनच्या सगळ्या बाबी चेक होतील आणि व्यवस्थित होतील, व्हॉट से पार्टनर ?' मी माझा नेहमीचा गेम प्लॅन टाकला, असं केलं की मला माझ्या चुका, ते माझं फिल्डच नाहीय या सबबीखाली लपवता येतात. तिनं होकार दिला. माझी व्होड्का आणि तिचा सोडा संपला होता. आता तिनंच उठुन विचारलं ' अजुन एक घेणार का ? माझा होकार आहे असं समजुन ती बारकडं गेली. काचेचा दरवाजा उघडणार तेवढ्यात सिस्टिमचा बायकी आवाज आला ' रुट ३ रुमचे अल्कोहोल कंझ्म्शन लिमिट संपले आहेत.' आणि त्यामागं एक जिवंत बायकी आवाज ' ओ शिट मॅन, धिस इज अनफेअर' हातातला ग्लास तिनं फोडुन टाकला. पुन्हा येउन ति सोफ्यावर बसली. दोन्ही हात डोक्याच्या मागं धरुन, मी तिच्या कडं न पाहायचा अयशस्वी प्रयत्न केला, ते जास्त वेळ जमलं नाही, आणि तिच्यदेखील लगेच लक्षात आलं, डोळे बंद असुन देखील ' तुझी पहिली साईट डेडबॉडीज वरुन व्हायरस उचलायची होती ना ?' मला सिनियर असल्यानं तिला माझी हिस्ट्री माहित होती, तो चान्स मला नव्हता. ' हो, पहिली साईट एवढी बेकार लागली मला' मी माझी निराशा स्पष्ट केली. ' मग त्या वेळी स्त्रियांच्या प्रेतांकडं पाहताना, त्यांच्यावरुन व्हायरस उचलताना ज्या भावनेनं वागला असशील ना त्याच भावनेनं वाग आताही माझ्याबरोबर, पुरुषाबरोबर राहायची वेळ आली तर माझी रिअॅक्शन प्रेतापेक्षा जास्त वेगळी नसते हे लक्षात घे, उगा नंतर अपेक्षाभंग नको.' तिचं स्पष्ट बोलणं मला लागलं ' म्हणजे तु इथुन बाहेर गेल्यावर माझ्यामागं भुत होउन लागणार नाहीस ना, माझ्या इच्छा पुर्ण कर म्हणुन, त्यापेक्षा आताच काय ते मागुन घे, प्रेतं देखिल काही कमी डिमांडिंग नसतात. ' माझ्या विनोदाच्या ढ क्वालिटिवर तिला हसु देखील आलं नाही, ती उठुन रुममधल्या तिच्या बेडवर गेली, बाजुचा लेसर ट्रॅप चालु केला अन झोपली, अगदी प्रेतासारखी.
आज, दोनशे दिवस झालेत, केमिकल इंजिनियरिग आमच्या इंजिनियरिंगपेक्षा फार कमी अवघड नसतं याची पुर्ण कल्पना मला आली आहे. त्यत मिनाबरोबर झालेल्या करारानुसार वर्किंग टाइममधला फक्त एकच तास एकमेकांच्या शंका निरसनासाठी ठेवलेला आहे. त्यामुळं फार अवघड होतं, प्रत्येक वेळी माहिती सिस्ट्मिमधुन घ्यावी लागते, मिळत नाही, समजत नाही असं नाही पण तिच्याकडुन ऐकायला बरं वाटतं, आणि मी सिस्टिमवरुन माहिती करुन घेउन तिला पुन्हा मुद्दाम विचारतो आहे हे तिच्या लक्षात येतं, तिच्या शिक्षणाची नक्की कल्पना नाही पण फार नसावं, जेवढं मला अडतं त्यापेक्षा तिला जास्त अडतं, आनि स्पेशली मॅगनेटिक ईंडक्शन मध्ये ती जाम फसते, तो टेस्ला तिला प्रत्येक वेळी घुमव घुमव घुमवतो आणि जोरात आदळतो खाली, आणि तो तर आपला खास दोस्त, याचा बराच फायदा घेतो मी, तिच्या शंका अर्धवटच क्लिअर करतो. मग पुढच्या शंकानिरसनच्या तासात ती पुन्हा तेच घेउन बसते, सिनियर असली तरी लाजत नाही कळत नाही हे सांगायला. माझं तसं नाहीये, बहुधा पुरुषी अहंकार मध्ये येतो अजुन देखील. तिच्या प्रत्येक उत्तरात काहीतरी खुसपट काढतो, तिचं बोलणं मध्येच तोडतो, तिला आवडत नाही ते खरंतर. पण पुरुष असल्याचा कंड कुठं तरी शमला पाहिजे ना.
' प्रवीण, हे बघ म्हणजे हा मेमॅवेचा संपुर्ण प्लॅन झाला नाही अजुन, पण एका शहराच्या गेल्या एकोणीस महिन्यातल्या ट्रॅफिकचा स्टडी करुन मी एक ट्रॅफिक होल्ड प्लॅन बनवलाय, पहिल्या होल्ड पासुन शेवटचा होल्ड येईपर्यंत बारा मिनिटं जातील, आणि त्यानंतर मेमॅवेला तु म्हणतो तसं अर्धा तास लागेल होत्याचं नव्हतं करायला, किमान ७०% सक्सेस रेशो दिसतो आहे. आपल्याला काय पाहिजे रेशो मिनिमम ९५ % ना, मग अजुन बरंच काम करावं लागेल. ' एक दिवस मीनानं एक वॉक थ्रु दाखवला रुममधल्या स्क्रिनवर. माझं समोर टिपॉयच्या स्क्रिनवर काम चालु होतं. मला वर पहायला दोन मिनिटं गेली. तिनं पुन्हा पहिल्यापासुन दाखवलं, 'गुड ना ,ब-यापैकी जमलंय ना रे, आणि हेच अल्गोरिथम वापरुन कोणत्याही शहराला यात फिट बसवता येईल असं करायचं आहे मला ते आता उरलेलं २५% तु जमव.' तिला प्लॅन पुन्हा एकदा रनथ्रु करायला लावला, त्यावेळी मी टिपॉयवर लिहित होतो वर बघता बघता. रन थ्रु संपल्यावर तिच्या ते लक्षात आलं, शेजारी येउन बसत ती म्हणाली ' काय काय लिहिलं आहेस माझ्या विद्यार्थ्यानं बघु ?' मी तिची व्हायवा घ्यायला सुरुवात केली. एक तासभर आम्ही बोलत होतो. तिनं टिपॉयच्या तिच्या बाजुला ब-याच नोट्स काढ्ल्या आमचं बोलणं संपलं तशा त्या बोटातल्या रिंगवर पिकप केल्या अन तिच्या बेडवर जाउन बसली, लेसर ट्रॅप चालु केला.
आज सहाशे पन्नास दिवस संपले प्रोजेक्टचे, मिना आणि मी, बाकीच्या दोन्ही टिमपेक्षा खुप पुढं आहोत,म्हणजे सातशे दहा दिवसांचे टारगेट आम्ही साठ दिवस आधीच पुर्ण केलंय. सध्या आम्ही प्लॅन २ आणि प्लॅन ३ बनवतोय, पहिले प्लँन फेल झाले तरची तयारी,अर्थात आम्हाला ते डिटेल वर्कआउट करायचे नाहीत, पुढच्या सिनियर टिम आमच्या स्क्रॅचवर काम करुन फायनल करतील आणि आता पण सिस्टिम पॅरलली त्यावर काम करत आहेच. आमचे ओरिजनल प्लॅन सध्या रुट १९ ला चेक होत आहेत, त्यापुढं अजुन एक रुट, तो क्लिअर केला मी प्रमोशन, मी मास डिस्ट्रक्शन वरुन पर्सनल हंटिंगला जाईन आणि मिना इनर किलिंगला. तिच्या पहिल्या दोन साईट पर्सनल हंटिंगच्या होत्या त्यामुळं तिला ती एक स्टेप टाळता येईल असं वाटतंय. उद्या पहाटे पाच पासुन रुट१९ बरोबर मिटिंगला बसायचं आहे. डार्क मिटिंग, या प्रकाराचा मला अनुभव नाही, म्हणजे रुममध्ये फक्त स्क्रिनच दिसते, पलीकडं कोण आहे तुम्ही पाहु शकत नाही आणि ते पण तुम्हाला पाहु शकत नाही, फार भयाण प्रकार आहे हा. मिनाला विचारलं तर ती काही स्पष्ट बोलली नाही याबद्दल. आज संध्याकाळी ती आमची गाडी घेउन बाहेर गेली आहे कुठंतरी, बहुदा लांब गेली असेल कारण आज गाडी हवी म्हणुन तिनं गेला आठवडाभराचा कोटा सेव्ह केला होता तिचा आणि मला पण एक दिवस रुममध्येच बसवुन ठेवलं होतं.
पहाटे पाच ते दुपारी एक, रुट १९ ची मेगामॅरेथॉन मिटिंग संपली, आमची दोन्ही प्रोजेक्ट रुट १९ नं अॅडमिन क्लिअर केली, आता ती फायनान्स क्लिअरसाठी रुट २० ला जातील, तिथं साधारण ५० दिवस लागतात, आणि त्यानंतर हातात येईल डायरेक्ट डि डेट आणि प्रमोशन लेटर. डि डेटच्या आदल्या दिवशी आम्हाला इथुन सोडलं जाईल. पुढचे ५० दिवस फार निवांत नाही जाणार पण फार टेन्शन नसेल आम्हाला. आता निम्मा दिवस गाडी वापरायची परवानगी आहे, प्रोजेक्टच्या रुट १६ पर्यंत आम्ही बिनघोर फिरु शकतो, रुममधला बार चोवीस तास खुला होणार उद्यापासुन. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शाल्मलीबरोबर दररोज ३०० सेकंद बोलु शकतो, हो म्हणजे पाच मिनिटंच पण ३०० म्हणलं की खुप जास्त वाटतं. जवळ्पास दोन वर्षानी,धाकट्या बहिणीबरोबर बोलताना काय बोलु आणि काय नको असं होणार आहे मला, अर्थात आमचं बोलणं ट्रॅक होणार, रेकॉर्ड होणार आणि सेन्सॉर देखील, तरी पण खूप खुप छान वाटतंय मला. गेल्या सहाशे पन्नास दिवसात एकावेळी २० लाख लोकांना कसं मारता येईल याचाच विचार करत होतो. मिना तिचे ३०० सेकंद कुणाबरोबर बोलेल काय माहित. असेल तिचा कुणीतरी बॉयफ्रेंड वगैरे नाहीतर मुलगा आणि नवरा सुद्धा असेल. अजुन साठच दिवस मला देखील तिची हिस्ट्री चेक करायची ऑथोरिटी मिळेल आणि मग कळेल मला सगळं.
उद्या सातशे दिवस पुर्ण होणार, आज आम्ही दोघं बाहेर गेलो होतो रुट १३ ला तिथं, आमच्या प्रोजेक्टवर एक ग्रुप चर्चा करत होता. आम्ही पण जाउन उभे राहिलो झालं, काही कमी पडलंय का पहायला, अर्थात इथं कुणीच कुणाला ओळखत नाही त्यामुळं ती लोकं बिनधास्त बोलत होती. काही पॉइंटस मिळाले आहेत. रात्री बसुन पुन्हा अपडेट करुन घेउ ते. गेले पन्नास दिवस मिना दररोज पाच मिनिटं पुढचा वेळ देते, पहिला दिवस ००:०० ला बोललो, दुस-या दिवशी ००:०५ ला असं करुन तिचा प्रत्येक वेळचा मुड समजला मला. एकदम मस्त आयडिया दिली तिनं. सगळ्या घराला नविन रंग दिला आहे तिनं,टाइल्स बदलल्या आहेत, अजुन बरंच काही. माझ्यासाठी दोन तीन मुली पाहुन ठेवल्यात. आई बाबांची कसर भरुन काढते आहे. हे सगळं मी मिनाला पण सांगितलं, ती कुणाशी बोलते ते कळालंच नाही, दररोज दुपारि एक वाजता मला रुमच्या बाहेर जायला सांगते, काही कळालंच नाही त्यामु़ळं. उद्या दिवसभरात कधीही रुममधले स्पिकर सुरु होतील आणि आम्हाला गुड न्युज मिळेल. आणि मग अर्धा दिवस फोन, पुर्ण दिवस गाडी आणि रुट १८ पर्यंत प्रवासपरवानगी. मिना पण कुठं गेलीच नाही आज दिवसभर, नुसती बेडवर पडुन आहे. सकाळीच तिनं चार पेग व्होड्का घेतली आहे, त्याबरोबर तीन बाटल्या सोडा. एवढं डायल्युट करुन कसं काय घशाखाली कोण जाणे. असते एखाद्याची आवड कोण सांगणार काय ते?
डोक्याचा भुगा झालाय, डि डे अजुन एक महिन्यानं आहे, मेमॅवेचा प्लॅन फायनल झाला आहे, मला आणि मिनाला प्रमोशन मिळालं आहे. अजुन पगार पण वाढला आहे पण फोन बंद झालेत आता प्लँन यशस्वी किंवा अयशस्वी होईपर्यंत आम्हाला बाहेर कुणाशी संपर्क साधता येणार नाही. पण प्रत्येक सिनेमाला असतो जसा क्लायमॅक्स असतो इथं पण आहे, आमचा प्लॅन ज्या शहरात ट्राय करणार आहेत तिथं मिनाच्या आईबाबांचं घर आहे, जसाजसा आमच्या प्लॅनवर शहराचा प्लॅन लॅप होत गेला तसं तसं तिला रडु आवरेनासं झालं, आम्ही नेहमीप्रमाणे अंधारात होतो डार्क मिटिंगच्या,पण रुममधली आर्द्रता लिमिटच्या बाहेर गेल्याचं आणि अनावश्यक आवाज येत असल्याचं सिस्टिमनं रुट २० ला कळवलं तसं, एक क्षण आमची रुम प्रकाशानं झगझगुन गेली, मिनानं प्रयत्न करुन देखील तिला डोळ्यातलं पाणी पुसता आलं नाही. मिटिंग संपल्यावर ति लगेच निघुन गेली गाडी घेउन. कधी परत येईल माहित नाही. मला आता तिची दया येते आहे, इथं पुर्वी झालं आहे तसं ती बहुधा रुट २० ला जायचा प्रयत्न करेल आणि मरुन जाईल. इथं आत्महत्या करायचा तो एकमेव मार्ग आहे, बाकी कोणत्याही मार्गानं तुम्ही स्वताला संपवु शकत नाही. मी पण तसंच केलं असतं का आमच्या शहराचा प्लॅन लॅप केला असता तर, कालपर्यंत मिनाला आमचा २० लाख लोकांना एकत्र मारायचा प्लॅन निवडला गेला म्हणुन आनंदात होता, आणि आज तिला दुख आहे ते त्या मरणा-या वीस लाखांचं नाही तर त्यातल्या दोघांचं. का तर ती तिची आपली आहेत म्हणुन.
त्या बिनओळखी एकोणीस लाख नव्याण्ण्व हजार नउशे अठ्याण्णव लोकांच्या मरणानं आम्हाला काही फरक पडत नव्हता पण या दोघांच्या जाण्यानं पडत होता. त्या विस लाखांचं मरणं आमच्या देशाच्या साठी फार गरजेचं आहे, दर सहा महिन्यांत असे रॅडम निवड करुन वीस लाख लोक मारले जातात, त्याशिवाय बाकीच्यांना जगणंच शक्य नाही असा एक निष्कर्ष काढलेला आहे सिस्टिमनं. या मरणाच्या उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांना वाचवणं शक्य आहे, पण त्यासाठी त्यांची गरज आम्हाला सिस्टिमला सिद्ध करुन दाखवता आली पाहिजे, अजुन तीस दिवस उरले आहेत. काहीतरी करणं भाग आहे, काय ते कळत नाहीये. मिनानं आत्महत्या केली नाही, ती रात्री परत आली. कुठं गेली होती ते विचारलं, काही बोलली नाही. मी माझ्या बेडकडं जात होतो तेंव्हा माझ्या मागं आली, मला घट्ट पकडलं मागुन आणि सोफ्यावर आणुन ढकललं. मला काहीच समजेना. आज तिनं पुन्हा ते बंगाली कुंकु लावलं होतं. दोन वर्षात तिची पोनी जाउन केस चांगले खांद्याच्या खालपर्यंत आले आहेत, कधी लक्षात आलं नव्हतं पण आज आलं. पण माझ्याकडं पाहताना भेसुर वाटली नाही उलट डोळ्यात कुणावर तरी उपकार करत असल्याची भावना दिसत होती.
' तुला ड्राय बनवु का कॉकटेल' तिनं विचारलं,' आज एंजॉय करायचं आहे आपल्या जवळच्या कुणाचं तरी मरण, आज मी प्रेतासारखं नाही तर मित्रासारखं वागणार आहे तुझ्याबरोबर' व्होड्काचे दोन ग्लास हातात घेउन येत ती बोलत होती. ' तुला काय वाटलं असतं रे, तुझ्या बहिणीच्या घराखाली मेमॅवेचा जनरेटर लावला असता तर, त्या एका न दिसणा-या वलयानं तुझ्या घराची विट अन विट हादरवुन तोडली असती, एखाद्या बिमच्या खाली तुझी बहिण चिरडली असती, तुझी आवडती पल्सार, किती तुकडे होउन पडली असती का तिला आग लागेल रे लगेच. ....' बराच वेळ ती बडबडत होती. काही काही कल्पना तर एवढ्या भयंकर होत्या की मला खरंच भीती वाटायला लागली, शाल्मलीबद्दल हे ऐकवेना. जेंव्हा ती थांबली तेंव्हा तिला सांगितलं' असं काही होणार नाही माझ्या घराला, माझा अंदाज खरा ठरला मेमॅवेचा, गेल्या महिन्यात मी दररोज पाच मिनिटं शाल्मलीला समजावलं आहे त्याबद्दल आमच्या कोड मध्ये. आता माझं घर मेमॅवेप्रुफ झालं आहे. तुझी घाणेरडी स्वप्नं कधीच पुर्ण होणार नाहीत. शाल्मलीला पाणी पिणं बंद कर हे सांगणं मला शक्य नव्हतं. म्हणुन मग मीच पहिल्यापासुन पाण्यात विष घालायच्या प्लॅन मध्ये फॉल्ट ठेवत गेलो. आणि शेवटी मला हवं ते मिळवलं. तुला माझ्या क्षेत्रात एवढं तज्ञ व्हायचं होतं की तु प्रत्येक गोष्ट काळजीपुर्वक करत गेलीस आणि मग माझ्या ट्रॅप मध्ये अडकत गेलीस. आता या मधुन मी तुला सोडवु शकतो पण एका अटीवर. '
' माझं शरीर हवंय तुला, पण मिळणार नाही अजिबात अगदी माझ्या आईबाबांच्या बदल्यात देखील नाही' तिच्या बोलण्यात निर्धार होता, ' आणि तु असं काहीतरी करशील याची मला कल्पना होतीच, अरे तुझी सिनियर आहे मी, या खेळाचे, सिस्टिमचे नियम तुझ्यापेक्षा जास्त माहित आहेत मला. आपले फोन बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी मी शाल्मलीला निरोप दिला आहे, आपण लग्न करणार आहोत आणि तयारीसाठी तिला माझ्या घरी जायला सांगितलं आहे. पाच सहा दिवसांनी ती तिकडे जाणार आहे.' मंदशी हसत ती खाली बसली. आणि मी तर तुला यातुन सोडवु पण शकत नाही. सॉरी ज्युनियर. माझं डोकं अजिबातच कामातुन गेलं, तिला जीवे मारावं असा विचार करुन मी उठलो पण ती माझ्यापेक्षा चपळ निघाली, मी तिला पकडेपर्यंत ती तिच्या बेडवर पोहोचली अन लेसर ट्रॅप सुरु केला. हताश होउन मी तिथंच खाली बसलो, सगळं हरलो होतो मी. 'आणि आता ऐका आजच्या परिस्थितीला अनुरुप गाणं याचे निवड कळलीय श्री.प्रवीण यांनी' रेडिओवरच्या निवेदिकेसारखा आवाज तिनं काढला आणि मग गाणं म्हणायला लागली ' तुझ्या गळा माझ्या गळा गुंफु मोत्यांच्या माळा, तुज कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला, ह्हे तुझ्या गळा माझा गळा ' .........
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-40861422240148686382012-10-21T21:42:00.004+05:302012-10-21T21:44:51.344+05:30क क कपलचा - भाग १० (अंतिम)
स्मिता साधा सरळ विचार करत होती, ही असली पोचलेली बाई, हिनं दुसरा कुणीतरी गाठला असेल असा, पण स्व:त प्रेमात पडुन लग्न केलेल्या नव-याचा असा अपमान केला असेल असं तिला वाटलं नव्हतं, आणि असं का वाटलं नाही याचं तिलाच आश्चर्य वाटत होतं ' एवढ्यावरुन सरांनी तुला घटस्फोटाची मागणी केली, खरं नाही वाटत मला ' स्मितानं तिची शंका बोलुन दाखवली. अनुजा हसली ' सगळ्यांना असंच वाटतं, आजसुद्धा, जाउ दे, चुका माझ्या सुद्धा झाल्याच, ए असं करा आता जेवुनच जा, दोघंजण, आमच्या घरी आलात खरं पण घरचं जेवलाच नाहीत, काल केटरर होता आज आपण बाहेरच जेवलो, पुन्हा हर्षद रागवेल मला ' असं म्हणत अनुजा उठुन किचनकडे गेली.
तिच्या मागंमागं जात स्मितानं विचारलं ' किती वाजता येतात गं? ' दाळ तांदळाचे डबे काढत अनुजा म्हणाली' आठ साडेआठ तरी होतात, मला तरी अजुन कुठं याचं टाइमटेबल माहित झालंय, तीन महिने तर झालेत लग्नाला' ' म्हणजे अजुन दोन तास आहेत तर ' समोरच्या ड्ब्यातल्या शेंगा उचलत स्मिता बोलली. ' हो तेवढ्यात आपलं बोलुन होईल सगळं, तु नको काळजी करु आता थोडंच राहिलंय.' तांदळाचं भांडं नळाखाली धरत अनुजा बोलली, त्या पाण्याच्या आवाजात तिच्या बोलण्याचा रोख नक्की कसा आहे ते स्मिताच्या लक्षात आलं नाही. ' असं ही केसबद्दल मी फार बोलणार नाहीये, तो विषय बोलायचा नाहीये मला, मळमळतं मला ते वाद अन चर्चा आठवल्या की' दाळ धुता धुता अनुजानं क्लिअर केलं. ' पण ते वाद अन चर्चा तुम्ही जे करत होता आणि बघत होता त्याबद्दलच होत्या ना, खुशीनं असुदे कि जबरदस्तीनं तुम्ही दोघंही जे करायचा, जे पाहायचा, जे अनुभवायचा किंवा ज्याची कॉपी करायचा, त्यावरच चर्चा व्हायची ना ? स्मिताचा प्रश्न ऐकुन अनुजाच्या हातातलं दाळीचं भांडं कुकरमध्ये पडलंच, का माहित नाही या बाजुनं तिनं कधी विचारच केला नव्हता.
' हो, म्हणजे तसंच आहे थोडंफार, पण ते पाहणं आणि करणं आमच्या घरात होतं, घरातच काय घरातल्या पण एका खोलीत होतं, आमच्या दोघांत होतं, तिथंच सुरु व्हायचं अन तिथंच संपायचं, त्या सगळ्याचा असा बाजार मांडला गेला त्याचं दुख: जास्त आहे. सरांनी मला enjoy करायचा ऑप्शन दिला तो मी जमेल तेवढा स्विकारला होताच मग त्यांना improve करायचा ऑप्शन स्विकारायला काय अडचण होती ?' वाईट याचं वाटतं की, एक बाई म्हणुन मी होणारा अन्याय सुद्धा आनंद म्हणुन स्विकारला पण त्या बदल्यात मला त्या पातळीचा आनंद मिळावा ही माझी इच्छा सुद्धा पुर्ण होउ नये याचं, समोरचा तुम्हाला चाबकानं मारणार असेल तर, मार खायची तयारी आहे, पण मारताना किमान त्याचं पेटुन उठलेलं शरीर दिसावं,त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेलं असावं आणि प्रत्येक फटक्याच्या आवाजाबरोबर रागानं येणारा त्याचा आरडाओरडा तरी ऐकु यावा असं मला वाटतं, enjoy करायचा आहे तर मग त्या अन्यायात पण काहीतरी थ्रिल नको का ? , हे असलं लॉ़जिक स्मिताच्या डोक्याबाहेर चाललं होतं. तिनं अनुजाच्या समोरुन कांदे अन बटाटे घेतले अन चिरायला सुरु केले. बराच वेळ दोघीजणी आपल्या घरातल्या स्वयपाकाच्या पद्धती आणि चवी यावर बोलत होत्या. तासाभरात स्वयपाक झाला, दोघी हातात कॉफीचे मग घेउन हॉलमध्ये येउन बसल्या.
'तुमच्या केसमध्ये हर्षद कसा काय आला ?' ब्रेक नंतर स्मितानं पुन्हा गाडी मुळ विषयाकडं नेली. ' केस फॅमिलि कोर्टात होती तोपर्यंत काही संबंधच नव्हता हर्षदशी, चार महिने झाले होते केस करुन तेंव्हा सरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, आणि लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीत माझं नाव होतं, त्यावेळेला चौकशीला पोलिस घरी आले तेंव्हा हर्षद पहिल्यांदा भेटला. सर तर वाचले, पण हे नवं लचांड माझ्या मागं लागलं, अर्थात माझ्या वकिलांनी याचा देखील उपयोग करुन घेतलाच घटस्फोटाच्या केसमध्ये, त्यामुळं माझी सुटका जरा लवकर झाली एवढंच,पण या चौकशीच्या निमित्तानं हर्षद भेटत राहिला, आमचं बोलणं होत राहिलं आणि आम्ही प्रेमात पडलो एकमेकांच्या. माझं सगळं प्रकरण हर्षदला माहित होतंच, आणि त्यानं प्रामाणिकपणे कबुल केलं की त्याला सुद्धा अशा गोष्टीचंच जास्त आकर्षण आहे,' तिचं बोलणं तोडत स्मितानं विचारलं ' आणि तुलादेखील एक पुरुष हवा होताच, हो ना?' दोन सेकंद गप्प राहुन अनुजा थोड्या चढ्या आवाजात बोलली, ' हो मला हवाच होता पुरुष, का हवा असु नये, तुझा नवरा आठ दिवस गावाला गेला, तर तुला नाही काही वाटत, महिन्यातलं चार दिवस लांब राहणं पुरुषांच्या जीवावर येतं, तर एक वर्ष सुखापासुन लांब राहिले होते मी, उलट मलातरी वाटतं की मी याबाबतीत फार संयम बाळगला, आम्ही वेगळं राहायला लागल्यानंतर एक दोन वेळा सरांनी माझ्या रुममध्ये घुसायचा प्रयत्न केला होता, माझी केस बघणारा पहिल्या वकीलानं पण फासे टाकुन पाहिले होते, एक वेळ अशी आली होती की, जाउदे मला बोलायचंच नाही आता त्याबद्दल.' एवढं बोलुन अनुजा मग ठेवायला किचनमध्ये गेली.
हर्षद आणि शरद एकत्रच आले, दोघी अजुन घरच्याच कपड्यात होत्या, आल्या आल्या शरदनं घरी जायची गडबड सुरु केली, पण स्वयपाक तयार आहे हे कळल्यावर त्याचा नाईलाज झाला, सगळुयांनी एकत्र बसुन जेवण केलं, जेवण झाल्यावर हर्षद खाली पान आणायला गेला, तो परत येईपर्यंत स्मिताचं आवरुन झालं होतं, ती दोघं निघायच्या तयारीत होते, पुन्हा भेटायच्या आमच्या घरी या ना एकदा असल्या गप्पा झाल्या अन अकराच्या सुमारास घराचा दरवाजा लावुन हर्षद आता आला, तेंव्हा अनुजा बेडवर बसुन होती, समोरच्या भिंतीकडं पहात ' यापुढं घरात कुणलाही बोलवायचं नाही, काहीही झालं तरी, समजलास ' तो आत आल्याचं जाणवताच ति अक्षरशः ओरडलीच त्याच्या अंगावर ' नालायक साले सगळे, दुखावर औषध तर नसतंच कुणाकडं पण पट्ट्या काढुन किती लागलंय ते पहायला फार आवडतं सगळ्यांना हराखखोर कुठले एकजात ', अनुजा दिवसभराचं ओझं उतरवुन ठेवल्यासारखं बोलली, ' होय, खरंय आणि तु सुद्धा अल्बम उघडुन बसली असशील दिवसभर हा माझा अन्याय, हा माझा न्याय करत, मानसिक आजार झालाय तुला, कुणीतरी लागतं तुझ्या अन्यायाबद्दल वाईट वाटतंय म्हणणारं तुला जवळ घेउन थोपटणारं, तुझंच खरं,तुझंच बरोबर असं म्हणणारं, आणि असं झालं नाही की तुला अॅटॅक येतो अन्यायग्रस्त असल्याचा मग जाहिरात करावीशी वाटते. इथं आल्यापासुन एक निकाळजे काकु भेटल्या होत्या, आता ही एक झाली. बेडवर आडवं पडत हर्षद बोलला.
बराच वेळ दोघं घुसमटुन झोपली होती, मग दोघांनाही कधीतरी शांत झोप लागली असावी. सकाळ झाली तशी दोघंही सवय लागल्याप्रमाणे उठली अन नेहमीच्या कामाला लागली, हर्षदचं आवरुन होईपर्यंत अनुजानं त्याचा डबा करुन हॉलमधल्या टिपॉयवर ठेवला, तो बाहेर येउन बुट घालायला लागला तसं किचनच्या दारातुनच अनुजानं विचारलं ' केसचं कुठपर्यंत आलंय, कधी निकाल लागेल काही कळालंय का?' 'बघतो आज, जाउन येतो पांढरेकडं', डब्याची पिशवी उचलुन हर्षद निघुन गेला. अनुजा दरवाजा लावेपर्यंत निकाळजे काकु समोर आल्या. ' पाहुणे राहिले होते वाटतं काल पण?' मग अर्धा तास दोघींच्या दारगप्पा झाल्या, अनुजा आत येउन बेडवर पडली अन तिनं आईला फोन लावला, पुजेच्या दिवसापासुन तिचं बोलणंच झालं नव्हतं. एक तास भर ती बोलत होती. कंटाळा आल्यावर फोन ठेवुन तशीच झोपुन गेली. संध्याकाळी हर्षद आला, त्याला वकीलाकडं जाणं जमलं नव्हतं, सकाळचं गरम करुन संपवलं अन दिवस संपला. असे बरेच दिवस संपले, रात्री काही जागत काही पेंगत तर काही वाट बघण्यात गेल्या. चार महिन्यांनंतर पुन्हा केसची तारीख पडली, हर्षदनं दोन दिवस रजा काढली, एक दिवस आधी अन दुसरा केसचा दिवस कोर्टात गेला. फारसं महत्वपुर्ण काही झालं नाही, पण एक झालं की सरांच्या वकीलानं फारसं ताणुन धरलं नाही, अजुन एक दोन तारखांत केस सुटेल असं वाटायला लागलं.
आताशा दोन वर्षे झालीत, अनुजा आणि हर्षदचं तसं बरं चाललंय, ज्या एक दोन तारखांत केसचा निकाल लागायचा होता त्या अजुन आलेल्या नाहीत. केसचा निकाल लागेपर्यंत अन स्वताचं घर होईपर्यंत मुल होउ द्यायचं नाही असा निर्णय दोघांनी घेतलाय. मध्ये एक दोन वेळा अनुजाची आई गुपचुप येउन गेली घरी. हर्षद्च्या घरचं अजुनही कुणी येत नाही. तो दोन वेळा घरी जाउन आला, घराला पैसे हवे होते तेवढ्यापुरतं घरानं जेवण पाणी विचारलं, तो तेवढ्यावर खुश आहे, निदान तसं दाखवतो तरी, अनुजा पण त्याला या विषयावरुन काही बोलत नाही. स्मिताला एक मुलगा झाला, पण तिनं अनुजाला बारशाला येउ नको असं सांगितलं फोनवरुन,रडतच पण स्पष्ट सांगितलं होतं. हल्ली अनुजा सुद्धा या सगळ्याचं वाईट वाटावं याच्या फार पुढं गेली आहे किमान दिवसभर तरी, मग जेंव्हा असह्य होतं तेंव्हा फिल्म्स बघते पुन्हा जुने दिवस आठवतात, त्याकाळची गरिबी आजची श्रीमंती याची नकळत तुलना करते, आणि पुन्हा मागचं सगळं विसरायचा प्रयत्न पहिल्यापासुन सुरु करते. त्या जागलेल्या रात्रीचा आनंद पुढं चार दिवस टिकतो.
नोकरीतल्या पगारात घर घेणं शक्य नाही, वरच्या पैशात घेतलं तर दुस-या दिवशी अँटीकरप्शनवाले धरुन नेतील या भितिनं हर्षद घर घ्यायचं टाळतोय. यावर्षी गाडी घेतली खरी, एक सेकंड हँड स्कॉर्पिओ. पण साहेबच अल्टो घेउन येतो म्हणल्यावर स्टेशनला गाडी घेउन जायला अवघड होतं, मग 'कल भी आज भी' बजाज पल्सर उपयोगी पडते. नाही म्हणायला अनुजा चार गल्ल्या पलीकडे दळण न्यायला आणायाला गाडी घेउन जाते. दळणाच्या खर्चापेक्षा डिझेलचा खर्च आणि दळणाच्या वेळापेक्षा ती गाडी काढण्या घालण्याचा वेळ हेच जास्त आहेत. वर कॉलनीतल्या गिरणीवाल्याला 'असलं' गि-हाईक तुटल्याचं वाईट वाटतं. दोन वर्षात घरी बाहेरचं कुणी फारसं आलं गेलेलं नाही. घरगुती अडिनडीला निकाळजे काकु आहेतच. सोनवणे मॅडमनी केस पांढरे वकीलांना दिली तेंव्हा त्या समजवायला आल्या होत्या, त्यांच्या घरच्या एक दोन पार्ट्यांना अनुजा गेली होती.
एकुणात म्हणलं तर बरं चाललंय. वातीला काजळी पकडली असली तरी कंदिलाची वरची काच स्वच्छ आहे, खालच्या रॉकेलमध्ये कचरा आहेच, वेळ दिला तर तो साफ करता येईल पण तेवढी आज गरज नाही म्हणुन वेळ असुन देखील कुणी ते करत नाही, पण कधीतरी धक्का लागतोय, रॉकेल डहुळतंच आणि मग वात खाली वर करुन उजेड वाढवायची खटपट केली जाते. वातीत अडकलेला कचरा जळुन जातो, उजेड वाढतो. आता हवाय तेवढा पडतो. आणि तेवढ्यावर सगळे समाधानी आहेत कंदिल पण, वात पण आणि रॉकेल पण.
आपण ज्याचं उत्तर आहोत; असा प्रश्न हुडकणा-या अमर्याद उत्तरांची कहाणी काही उत्तरी सुफळ संपुर्ण.
धन्यवाद.
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-31226805541052456052012-09-26T11:23:00.001+05:302012-09-26T11:23:10.647+05:30क क कपलचा - भाग ०९
पाणी प्यायला उठत अनुजानं विचारलं ' शरद मारतो ना ग तुला, तु असं नाही म्हणालीस तर ?' - पुढे चालु....
अनुजानं तिची कथा सांगावी आपण ऐकत रहावी, कथा संपली की तिच्या दुखा:बद्दल दोन अश्रु ढाळावेत, तिच्यात नसलेल्या अन आपल्यात नसलेल्या धैर्याबद्दल थोडी चिडचिड करावी अन निघुन जावं, असा सरधोपट विचार स्मिता करत होती, पण ऐकता ऐकता आपण यात एवढं रंगुन जावु याची तिला कल्पना नव्हती, आणि या अनोळखी क्षणी ती बोलुन गेली ' हो, ब-याचदा', देवळाबाहेरची घंटा निशब्द अडकुन असते पण कुणीतरी नाद केला की आपल्याच आवाजानं थरारुन जाते तशी स्मिता थरारली, काहीतरी बोलु नये असं बोललं गेलंय ते सावरण्यासाठी ' म्हणजे याचसाठी असं नाही, बाकीही बरीच कारणं असतात, त्यांची ड्युटीच तशी आहे ना, दिवसभर चौकात उभं रहायचं केवढं टेन्शन असतं गं,' तिच्या सावरासावरीचं अनुजाला मनापासुन हसु आलं, कसंबसं तोंडातलं पाणी गि़ळुन ती हसायला लागली. ' माझ्यापासुन काय लपवतेस तु स्मिता, अगं वरच्या पाट्या वेगळ्या असतात, आत सगळ्या एस्ट्यांच्या सीट फाटलेल्याच असतात, तुला हवंय का पाणी ?' स्मिताला हवंच होतं, ती पाणी पित असतानाच अनुजानं विचारलं' एक सांगु स्मिता तुला, निदान माझ्याबरोबर तरी उघड उघड बोल, काही सांगणार नाही मी ना हर्षदला ना शरदभावोजीना, केसच्या ८ महिन्यात कुणाला कधी काय आणि कसं सांगायचं आणि काय लपवायचं हे चांगलं समजलं आहे मला.'
' पण नक्की कसली केस झाली होती, तु तक्रार केलीस का पोलिस स्टेशनला सरांबद्दल ?' स्मितानं पुढचा प्रश्न विचारला, ' हं, छे ग, मी काय जाणार होते तक्रार करायला, आणि कशाची तक्रार करणार होते, माझा नवरा असं वागतो, असं करतो, तसं करायची जबरदस्ती करतो अशी, कोण ऐकणार होतं माझं, उलट तिथंच माझ्या चारित्र्याचा पंचनामा मांडला असता, आणि माझ्या मागं त्यावरुन मनमुराद हसले असते, शेवटी हे झालंच कोर्टात, काही टळलं नाही नशिबातलं.' या विषयावर तिला फार बोलायचं नव्हतं, पटकन उठुन ती निघुन बेडरुम मध्ये गेली, दार आतुन बंद करुन घेतलं. स्मिताला काय करावं हेच सुचेना, तिनं भेदरुन बेडरुमच्या दरवाजावर थापा मारत अनुजाला हाका मारायला सुरुवात केली, दोन तीन मिनिटं गेली, अनुजा बाहेर आली, रडुन ओला झालेला चेहरा कोरडा केल्याचं दिसत होतंच. स्मितानं तिचे दोन्ही हात हातात घेत ' सॉरी ग, माझंच चुकलं, हा विषयच काढायला नको होता मी, ' असं सांत्वनाचा प्रयत्न केला. ' असु दे गं, कधीतरी आपली दुख: उगाळायला सुद्धा बरं वाटतं, आणि ज्या दुखातुन सहिसलामत बाहेर पडतो ती दुख: तर जास्तच आठवतात आपल्याला' अनुजा तोंड धुवायला बाथरुम मध्ये गेली. ती बाहेर येत असतानाच स्मितानं तिला विचारलं ' इतर वेळी बरा धीर दाखवतेस, केसचा विषय निघाला की फार अवघडतेस एकदम, का ग?'
'घरातली दुख: कितीही मोठी असली तरी घराच्या चार भिंतीत फार छोटी असतात, जेंव्हा त्यांच्या बाजार मांडला जातो तेंव्हा असहय होतं सगळं. मला माझ्या लग्नाच्या नव-यानं आमच्या घरात काय करावं आणि काय नाही हा आमच्या दोघांच्या मधला व्यवहार होता, खुशीचा असेना का जबरीचा असेना, पण जेंव्हा जग यात तोंड खुपसायला लागतं, तेंव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या आहेत ते जाणवायला लागतं, आणि नसतील तरी हे जग त्यांच्या मोठेपणा तुमच्या नजरेसमोर असं नाचवत राहतं की तुम्हाला तुमच्यातलं नसलेलं खुजेपण टोचायला लागतं, नुसतं टोचतच नाही तर जगणं नकोसं करतं, फुग्याच्या आत टाचणी घालुन फुगा फुगवला तर आतल्या टाचणीला कसं वाटेल, तसं वाटायला लागतं. फुग्याच्या आत टाचंणीला सुरक्षित वाटतं, पण हा सुरक्षेचा घेराव आपल्यामुळंच फुटणार आहे ही भीती सुद्धा असते प्रत्येक क्षण जगताना, प्रत्येक हालचाल करताना. स्वताचे अस्तित्व जपायचं आणि फुगा फुटणार नाही याची काळजी घेत जगणं फार मुश्किल असतं. केसच्या सुरुवातीच्या दिवसांत सरांना बहुदा केस करुन आनंद मिळत होता, मला धडा शिकवल्याचं समाधान वाटलं, माझ्या चारित्र्यावर संशय घेउन मी दिलेल्य त्रासाचा, मी केलेल्या अपमानांचा बदला घेतल्याची भावना त्यांना सुखावुन जात होती, पण जसजशी केस पुढं पुढं गेली तसं तसं त्यांनासुद्धा चटके बसायला लागले' अर्धवट निघालेल्या खपलीवर मलम लावलं की जीवाला शांतता लाभते तसं झालं अनुजाला, एका दमात एवढं सगळं बोलुन गेल्यावर.
दोघी जणी हॉलमध्ये बसल्या होत्या, 'म्हणजे तुला काय म्हणायचंय, कळलं नाही मला' स्मितानं पुन्हा प्रश्न केला ' आपण बायका फुगा असतो का टाचणी, की आपला संसार हा फुगा असतो आणि आपण टाचणी, समजलं नाही मला.' अवघडलेले हात मोकळे करायला आळस देत स्मितानं विचारलं. काही क्षण शांतता पसरली आणि मग अनुजानं विचारलं ' का ग, आपण बायकाच प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यावर ओढुन घेतो, का वाटतं तुला हा संसार म्हणजे फुगा आणि आपण त्यात अडकलेली टाचणी आहोत, असं का नाही वाटलं की फुगा म्हणजे संसार असेल आणि टाचणी म्हणजे पुरुष, प्रत्येक वेळी संसार फुटणं किंवा न फुटणं ही जबाबदार बाईचीच का असते किंवा बाई ती ओढुन का घेते आपल्या डोक्यावर ?' का नाही पुरुषाकडं त्या नजरेनं पाहिलं जात, का त्याला गुन्हेगार केलं जात नाही, या समाजानं नाही केलं हरकत नाही पण आपण बायका तरी का अशा समजुतीत राहतो, नुकसान कुणाचं होतंय अशानं आपलंच ना ? ' स्मिताकडं या प्रश्नांची उत्तरं नसावीत अशा नजरेनं तिच्याकडं पहात अनुजानं आपलं बोलणं थांबवलं, ' वाचलीत, मी सुद्धा असली स्त्रिमुक्ती वाल्यांची पुस्तकं वाचली आहेत, थेट त्यातलीच वाक्यं बोलतेस तु, तुझ्या केसमध्ये कुणी होतं का स्त्री जागरण मंचवालं ?' वर्गातल्या ढ विद्यार्थ्याला एखादा प्रश्न विचारुन त्याची जिरवायची असा विचार करुन एखादा नवीन मास्तर वर्गात येतो आणि नेमका त्याच दिवशी तो विद्यार्थी आख्खं अपेक्षित पाठ करुन आलेला असतो, मग मास्तरला कसं वाटतं, तसं अनुजाला झालं, या प्रतिप्रश्नाची अपेक्षाच नव्हती ठेवली तिनं.
' चहा करु का कॉफी ग, काय घेणार तु?' वेळ उलटी आली की विषय बदलायचा हे बायकांना जन्मजात येतच असतं आणि त्यात केसचा अनुभव यामुळं असं करणं अनुजला फार अवघड गेलं नाही, दोघी उठुन किचनमध्ये गेल्या, स्मितानं कॉफी करायला घेतली तशी अनुजा निवांत खुर्चीवर बसली ' किती छान वाटतं ना आपल्याच घरात कुणीतरी फुकट बसवुन चहा करुन देतंय ते, मला तर फार बरं वाटतं, पण आमच्याकडं कुणी येतंच नाही असं करुन द्यायला' कॉफि साठी दुध गरम करायला ठेवुन स्मिता कट्ट्यावर बसत स्मितानं विचारलं ' केस नक्की कसली झाली होती, म्हणजे केली होतीस तु ?' अनुजा हसली, थोडंसं असहाय वाटेल असं हसु होतं, ' मी केली, सांगितलं ना तुला, मी नव्हती केली केस, सरांनी केली होती केस, आणि केस कसली घटस्फोटासाठी अर्ज केला कोर्टात, एकतर्फी', स्मिता जवळ जवळ ओरडलीच, त्याला उतु जाणा-या दुधाच्या चरचरण्यानं साथ दिली, गॅस बंद करता करता तिनं विचारलं ' काय, हे असं घाणेरडं वागुन, तुला एवढा त्रास देउन त्यांनीच घटस्फोटासाठी अर्ज केला, नालायक मनुष्य असणार नक्कीच, शिक्षक म्हणायच्या लायकीचा नसणारच तो, हरामखोर कुठला, लाज नाही वाटली असं करायला त्याला' कळत नकळत स्मिता एकेरीवर आली होती. ' काही म्हण हे असंच झालंय, एके दिवशी सर वकिलाकडुन दोन सेट घेउन आले परस्परसंमतीने घटस्फोटाचे त्यावर सही करुन दे असं सांगितलं, मला वाटलं होतं की त्यांना जे हवंय जसं हवंय ते दिल्यावर ते समाधानी असतील, माझ्या मागण्या सोडुन द्यायची मी तयारी दाखवली, त्यांच्या हातापाया पडुन झालं, रडुन झालं, काही उपयोग झाला नाही. त्या रात्री सर बेडरुम मध्ये झोपले एकटेच, मी रात्रभर हॉल मध्ये जागी होते, दोन तीन वेळा पळुन जायचा विचार केला, दरवाज्यापर्यंत आले, दरवाजा उघडला पण मागं फिरले.'
' का, एवढा चांगला चान्स होता त्या नरकातुन बाहेर पडायचा मग का नाही पळुन गेलीस ?' स्मितानं कॉफिचा कप अनुजाच्या हातात देत विचारलं ' मोह असतो, सगळे रस्ते बंद झाले तरी एक नविन रस्ता असेल जवळ्च कुठंतरी अशी आशा असते आणि खरं सांगु मला वेड लागलं होतं, व्यसन लागलं होतं सुखाचं, या शरीराचे लाड करुन घ्यायचं ते सुटणं अवघड होतं, फरक एवढाच होता की पुरुष हे उघड व्यक्त करतात या ना त्या मार्गानं स्त्रीला ते शक्य होत नाही किमान आपल्याकडं तरी, जेवढं मिळेल तेवढ्यात सुख मानायची सवय लागलेली असते किंवा लावलेली असते, माझी ती सवय बदललेली होती आणि एकदा पायवाट सोडुन रान तुडवायला सुरुवात केली की सुरुवातीला टोचणारे काटे नंतर सुखावायला लागतात, प्रत्येक वेळी पाय समजुन उमजुन काट्यांवर पडायला लागतो, माझं तसं झालं होतं. शेवटी व्यसन ते व्यसनच आणि मी त्यात अडकले होते. आठ दिवस सर काहीच बोलले नाहीत घरात जेवण पण करत नव्हते, आणि एक दिवस संध्याकाळी त्यांनी सांगितलं की त्यांनी एकतर्फी केस दाखल केली आहे आणि उद्यापासुन ते वेगळं राहणार आहेत, माझ्या जगण्या खाण्याची सोय माझी मी पाहायची आहे' कॉफि संपवुन दोघी पुन्हा गॅलरीत येउन बसल्या, स्मितानं विचारलं' पण घटस्फोटासाठी नक्की काय कारण दिलं होतं सरांनी, म्हणजे असं नुसतंच हवाय म्हणुन घटस्फोट मिळत नाही ' अनुजा ह्सली ' तुला ग काय माहित घटस्फोटाबद्दल एवढं, शरदनं कधी ऑफर केला होता का, का तुच घेतली आहेस माहिती याबद्दल,' आपण प्रश्न विचारुन चुकतोय आणि फसतोय हे समजुन सुद्धा आपण असे प्रश्न का विचारतो हे स्मिताला कळत नव्हतं. ' कारण ना, विवाहबाह्य संबंध असणे, थोडक्यात चारित्र्य वाईट असणे हे प्रमुख कारण होतं, त्यामुळं संसाराकडं दुर्लक्ष, मुल होउ न देणं वगैरे वगैरे गोष्टी त्यातच आल्या त्यानंतर'
थोडंसं चाचरत स्मितानं विचारलं ' पण तु म्हणतेस तसं तुला लागलेलं हे व्यसन पुर्ण करायला तु कोणताही मार्ग अवलंबले असतील, विस्तु असल्याशिवाय धुर नाही येणार ना, सरांना संशय आला असेलच तुझं वागणं पाहुन' अनुजानं थोडं चिडुन विचारलं ' का ग का संशय यावा, ज्याच्या जोरावर ते मला उपभोगायचे किंवा मी तसं सुख द्यावं अशी त्यांची अपेक्षा होती त्याच मार्गांनं मी त्यांना सुख मागत होते यात माझं काय चुक होतं, त्यांचं वागणं पाहुन मला संशय आला होता पण त्याचं मुळ कशात आहे ते मी शोधुन काढलं आणि तोच मार्ग अवलंबला म्हणुन असले आरोप करायचे, ते ही थेट घटस्फोटासाठी' तेवढ्यात बाहेर दरवाजा वाजला, अनुजा बाहेर गेली तसं स्मितानं धीर गोळा केला ती परत आली की तिला काहितरी विचारण्यासाठी. ' कसलीतरी वर्गणी मागायला आले होते ' बेडरुममधला लाईट लावत अनुजा बोलली ' ये ना इथंच बसु, गॅलरीचा दरवाजा बंद करावा लागेल नाहीतर डास येतात घरात ' स्मिता दार लावुन आत आली, बेडवर बसत तिनं विचारलं ' पण तु देखील नक्की काहीतरी केलं असणारच त्या शिवाय ह्या थराला सर जाणार नाहीत, कारण बघ तु बरंच काही मागत होतीस तरी त्याबदल्यात त्यांना जे हवंय ते मिळत होतंच ना, मग ?' ' बरोबर पकड्लंस, ' अनुजा खाली जमिनीवरच बसत म्हणाली , ज्या दिवशी सरांनी घटस्फोटाचे अर्ज आणले त्या आधी दोन दिवस आम्ही रात्र जागवली होती, शेवट त्या दिवसांत व्हायचा तसं माझ्या रडण्याऐवजी सरांच्या चिडण्यात आरडा ओरडा करण्यत झाला होता, ते निघुन हॉलमध्ये गेले, आणि सकाळी जेंव्हा ते निघाले तेंव्हा मी त्यांच्या हातात एक जाहिरात ठेवली होती पेपरमध्ये आलेली ' अपने खोये हुवे पौरुषत्व की पुनप्राप्ती के लिये हमारे पास आये अक्सीर इलाज सिर्फ तीन दिनोमे' आणि म्हणलं ''when you cannot avoid it, try improving it'
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-46206571846116555912012-09-13T11:21:00.001+05:302012-09-13T19:19:19.138+05:30सहल - श्री गोंडेश्वर पंचायतन सिन्नर.
दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे.
प्रचि.१
प्रचि.२
प्रचि. ३
यौवनाची दोन रुपं, एक शतकांपुर्वी दगडांत उतरवलेलं दुसरं जिवंत पण दगडातलं देखील तेवढंच जिवंत..
प्रचि.४
प्रचि. ५
प्रचि. ६
प्रचि. ७
प्रचि.८
प्रचि.९
प्रचि.१०
प्रचि. ११
हे मंदिर संपुर्ण फिनिश केलेलं नसल्यानं हेमाडपंती बांधकाम पद्धतीचा अभ्यास करणं इथं शक्य आहे.
प्रचि. १२
प्रचि. १३
प्रचि. १४
प्रचि. १५
प्रचि. १६
संपुर्ण मंदिराला ह्या हत्तीशिल्पांनी उचलुन धरलेलं आहे,
प्रचि. १७
प्रचि. १८
एकतर काम अपुर्ण राहिलंय किंवा ही मंदिरं त्याकाळची आर्किटेक्ट किवा इंजिनियरिंग किंवा आर्टस कॉलेजेसची ऑन साईट प्रयोगशाळा असावीत बहुधा.
प्रचि. १९
प्रचि. २०
प्रचि. २१
हे मुख्य मंदिराचं शिखर
प्रचि.२२
बहुधा दगडाच्या क्वालिटिमुळं देखील इथलं नक्षिकाम पुर्ण होउन अपुर्ण वाटतंय, निसर्गाचा परिणाम जास्त जाणवतोय...
प्रचि. २३
प्रचि. २४
प्रचि. २५
प्रचि. २६
प्रचि. २७
प्रचि.२८
हा सादर मानाचा मुजरा त्याकाळच्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सना, आणि अर्थात त्या प्रत्येक मजुराला ज्यानं हे काम धर्मासाठी केलं का पोटासाठी केलं का मरणाच्य भितीपोटी केलं माहित नाही, पण का करतोय या पेक्षा कसं करतोय याचं जास्त भान ठेवुन ह्या कलाकृतीला जन्म दिला, निसर्गातल्या दगडांना एक नविन रुप दिलं एक व्याख्या दिली, जगण्याची दिशा दिली, जगण्याचा आशय दिला.
हे सगळं घडताना तो निसर्ग पाहात होताच, तो या सगळ्यांचा बाप, पिता, पितामह , प्रपितामह का त्याहुनही मोठा, एखाद्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडं आलेल्या चिल्यापिल्यांनी संध्याकाळी खेळुन दमल्यावर हात पाय धुवुन देवासमोर बसुन शुभंकरोती म्हणुन संपवावी, आणि मग एक क्षण शांतता अनुभवावी तेवढ्यात बाहेरच्या ओट्यावरुन आजोबांचा आवाज घुमावा एखादं मोठं अवघड स्त्रोत्र म्हणणारा हा जो अनुभव आहे.. तो दुस-या भागात.
प्रवासमाहिती
स्थळ - श्री शिवगोंडेश्वर पंचायतन देवस्थान, सिन्नर.
प्रवाससोय - सिन्नर गाव हे नाशिक - पुणे हमरस्त्यावर नाशिकच्या आधी ३० किमी अंतरावर आहे, पुण्याहुन जाणा-या सर्व एसटी या ठिकाणी थांबतातच, मुंबईहुन नाशिकला येउन मग पुण्याच्या बाजुला यावं लागेल,अहमदनगरकडुन येताना सुद्धा सिन्नर नाशिकच्या आधीच आहे, प्रवासाची सोय रात्री १० पर्यंत उत्तम आहे.
हा मंदिरसमुह सिन्नर गावातच पोलिस स्टेशन / कोर्टाच्या मागच्या बाजुला आहे, सिन्नर एस्टिस्टँडपासुन रिक्षाने ४० रुपये खर्च होतो, चालत गेल्यास २० मिनिटांचा रस्ता आहे.
जेवणखाण - सिन्नर औद्योगिक शहर असल्यानं इथं सर्व प्रकारचं, जेवण खाण उपलब्ध आहे, स्टँडसमोरचं पंचवटी गुजराथी थाळी ही नो रिस्क जेवणाची सोय.
सिन्नरचं एस्टि स्टँड हे एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं दिसतं निदान बाहेरुन तरी.
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-9426500468702012062012-09-11T08:07:00.001+05:302012-09-11T08:07:21.959+05:30क क कपलचा - भाग ०८
- रात्रभर अनुजाच्या आयुष्याची कथा ऐकुन स्मिताला पुढं काय झालं असावं याची उत्सुकता होतीच.. दुस-या दिवशी सकाळी सगळे आवराआवरी करत असताना, ती बेडरुममध्ये अनुजाकडं आली आणि म्हणाली ' -
'आज मी इथंच राहतेय, ह्यांना इकडच्याच एरियात ड्युटी आहे, मला तुझी एखादी साडी देशील नेसायाला ?' स्मिताच्या आवाजात उत्साह होता, कालची अर्धवट स्टोरी तिला पुर्ण ऐकायची उत्सुकता होती. ' घे ना कपाटातली कुठलीपण' कपाट उघडत अनुजा बोलली, ' चल मी चहा टाकते'. ती निघुन गेली. एका तासात सगळ्यांच आवरुन झालं, नैवेद्याची तयारी झाली, गुरुजी आले. उत्तरपुजा झाल्यावर कालचा उरलेला शिरा खाउन हर्षद अन शरद दोघंही ड्युटीला निघुन गेले. दोघी शि-याच्या डिश घेउन बेडरुमच्या बाल्कनीत आल्या, ' तुझी अन हर्षदची ओळख कशी झाली मग ?' स्मितानं बोलायला सुरुवात केली. ' काही दिवस फार जड गेले, सरांना आधी ज्यासाठी जबरदस्ती करावी लागत होती, ते आता त्यांना सहज मिळत होतं, मी प्रत्येक गोष्ट अगदी एंजॉय करत होते असं नव्हतं पण विरोध मेला होता. दोन-तीन महिन्यात सरांना माझ्या या बिनविरोध शरणागतीचा कंटाळा आला, कॉलेजातलं काम पण वाढलं होतं, त्यामुळं त्यांच्या या संबंधातला इंटरेस्टच कमी होत गेला, आणि मी याचीच वाट पहात होते.' लिंक तोडत अनुजानं विचारलं ' तुला शिरा आणु अजुन, शिळ्या शिरा खरपुस भाजला की जास्त चवदार होतो ?' अनुजा आत गेल्यावर ती फक्त शि-याबद्दलच बोलत नाहीये हे स्मिताच्या लक्षात आलं, थोडंसं ऑकवर्ड वाटलं तिला.
अनुजा पुन्हा बाल्कनीत आली तशी स्मितानं विचारलं ' असं होण्याची का वाट पाहात होती ?' माहित असलेल्या अन कळत असलेल्या सगळ्या गोष्टी लपवायच्या कशा हे फक्त बायकांनाच जमतं बघ', थोडंसं कुत्सित हसत अनुजानं पुढं सुरु केलं' करुन करुन काय करुन घेणार होते सर माझ्याकडुन आणि किती वेळा, ह्या शरीराच्या पलीकडं बघायची शक्तीच नसणा-याकडुन काय अपेक्षा ठेवायच्या, दर रात्रीचा दहा पंधरा मिनिटांचा खेळ, नंतर माझं तोंड इकडं, त्यांचं तिकडं. सुरुवातीला मी काही दिवस रडायचे, मग ते देखील संपलं. काही गोष्टी सरांच्या देखील आवाक्यात नव्हत्या हे मला जाणवलं, आणि एकदा त्यांच्या लिमिट्स मला समजल्यानंतर मी त्यांच्याच आधारावर चाली रचायला लागले. एखादी गोष्ट बघुन त्याचा आनंद घेणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात वेगळ्या मर्यादा असतात, आणि तुम्ही खेळात जिंकु शकता खेळाचे नियम माहित झाल्यावरच, त्याआधी नाही. मी तेच केलं, नियम समजुन घेतले आणि मग त्याच नियमानुसार सरांना प्रत्येकवेळी हरवायला लागले, पुरुषाला बाकी कसलाही पराभव पचवता येतो बेडवरचा नाही, हे माझ्या लक्षात यायला लागलं, आणि मी त्याचाच फायदा घ्यायला सुरुवात केली. साहजिकच सरांची चिडचिड सुरु झाली, राग बाहेर कुठं काढावा हे समजत नव्हतं, कॉलेजात काम पडुन राहायला लागली. एकतर नोकरी नविन, त्यात असली नाटकं कोण खपवुन घेणार होतं, दोन महिन्यात त्यांची नोकरी गेली. '
दोघींचा शिरा खाउन झाला होता, किचनमध्ये चहा गरम करायला ठेवुन अनुजा तिथंच कट्ट्यावर बसली, स्मितानं हॉलमधुन खुर्ची ओढुन आणली तोवर चहा कपात ओतुन अनुजाच्या हातात कप ठेवला, त्या चटक्यानं स्मिता थोडी भानावर आली. ' पराभव म्हणजे काय करायचीस तु, कसं व्हायचं म्हणजे अजुन कुणी होतं,' स्मिता ओशाळली, आपण जरा जास्तच बोलतो आहोत असं तिला वाटलं' सॉरी हं अनुजा, तुझ्या दुखण्याबद्द्ल मी नको असं बोलायला ' अनुजाला, तिची अस्वस्थता जाणवत होतीच. छे ग कसलं दुखणं, तुला पण माहितीय किती वेळ लक्षात राहतात ही दुखणी, पहिल्या चार वेळेला अपमान वगैरे वाटतो, एकदा सवय झाली की भांडी घासण्याएवढंच साधं वाटतं सगळं, आणि तु अगदी सरांच्या सारखाच विचार केलास, अगं जो पुरुष स्वताच्या अपेक्षांच्या वजनाखाली दबुन मरायला तयार आहे त्याला मारायला दुस-या कुणाची गरजच नव्हती, ज्या मार्गानं सर अपेक्षा वाढवत होते मी सुद्धा तोच मार्ग स्विकारला, माझ्या अपेक्षा त्याच मार्गावर वाढवल्या, एका बाईनं असं करावं हे सरांना, म्हणजे त्यांच्यातला पुरुषाला पटलं नाही. पुरुषानं त्याची भुक भागवण्यासाठी स्त्रीचं शरीर वापरुन घ्यावं ह्या मानसिकतेत वाढलेल्या सरांना हे सगळं अपमानास्पद वाटत होतं, देणा-यानं देतच जावं, घेणा-यानं घेतच जावं अशी अपेक्षा ठेवुन जगणा-या सरांना देणा-यानं केलेली मागणी पेलवली नाही, दोन्ही पातळीवर शारिरिक आणि मानसिक. त्यात नोकरी गेल्याचा धक्का होताच. मग ब-याच खटपटी करुन त्यांनी इथं चिंबोरीच्या कॉलेजात नोकरी मिळवली एका महिन्यात. तो महिना माझ्यासाठी फार सुखाचा गेला, सर माझ्या जवळ देखील आले नाहीत, अगदी मी जवळ गेले तरी नाही. त्यांचं मन त्यांना खात होतं का कसं मला समजलं नाही पण त्यांनी मला त्रास दिला नाही हे तेवढंच खरं.
' हे सगळं होणार हे माहित असुन सुद्धा तु त्यांच्या जवळ जायचीस ?' स्मितानं अनुजाचं बोलणं तोडत विचारलं, ' का, माझ्या घरात, घरातल्या बेडरुममध्ये आम्ही नवरा बायको दोघंच असताना देखील मी माझ्या सुखाची मागणी करु नये, जर मी केलेल्या अपमानानंतर पुन्हा पुरुष म्हणुन सर असं करु शकत होते तर मी का नाही, आणि मी काही त्यांच्यासारखं आउट ऑफ बॉक्स मागत नव्हते, rather out Of CD मागणं नव्हतं माझं. माझ्या मागण्या साध्या सरळ सोप्या होत्या, पण निराशेच्या नशेत असलेला पुरुष काहीच देउ शकत नसतो आणि फार मोठ्या मनाचा गवगवा करत आपण बायका हे सत्य लपवुन ठेवतो, जगापासुन सुद्धा आणि स्वतापासुन सुद्धा. अशा खोट्या कोशांमध्ये राहायची सवय लावुन घेतो आपणच आणि मग वेळ निघुन गेल्यावर ओरडत राहतो. तुला सांगु, पोळ्या करताना गॅस संपला ना, की पोळी भाजली जात नाही, तवा गार होईपर्यंत मला गॅस बंद झाल्याचं कळत नाही, आणि चिडचिड होते ती पोळी न भाजल्याची, राग येतो तो गॅस संपलेलं लक्षात न आल्याचा. तशातली गत आहे ही. नविन सिलेंडर कधी लावला हे त्यावर लिहिलेलं असतं पण नंतर तो संपल्यावरच ती तारीख पाहतो आपण तो पर्यंत नाही, हो ना ?
चल, बाहेर फिरुन आणि जेवुन येउ, मी गाडी घेते निकाळजे काकुंकडुन' असं बोलुन अनुजा बाहेर गेली. स्मिताला बाहेर जाण्यात फार इंटरेस्ट नव्हता पण नको म्हणलं तर अजुन अवघड होईल म्हणुन ती तयार झाली. गाडीची किल्ली घेउन अनुजा आली, दहा मिनिटात आवरुन त्या बाहेर पडल्या. पार्किंग मध्ये गाडी मागं अडकुन पडली होती, पुढच्या गाड्या काढायला मदत करायला कट्ट्यावर बसलेली चार पोरं आली, तेवढंच नाही तर अनुजाला गाडी काढुन किक मारुन चालु करुन दिली. गाडीत पेट्रोल भरलं, दोघी जणी चिंबोरीतल्या एकुलत्या एक शॉपिंग मॉल मध्ये आल्या, हल्लीच सुरु झालेलं होतं ते. मॉल मधल्या एसिच्या गारव्यात दोघी मजेत फिरल्या, थोडी खरेदी केली, मग तिथल्याच एका स्टॉलवर खाउन घरी आल्या, निकाळजे काकु दारातच उभ्या दिसल्या. ' आलात का फिरुन, काय काय खरेदी केलीत, थांब ग थोडी भात भाजी देते, ' एकाच वेळी तीन चार वेगवेग्ळ्या गोष्टी बोलणं ही निकाळजे काकुंची स्पेशलिटि होती. भात भाजीची भांडी घेतली, गाडीची किल्ली दिली अन दोघी पुन्हा घरात आल्या. गेलेली लाईट परत आली की बटण चालु राहिलेला मिक्सर पुन्हा चालु होतो तसं झालं एकदम. '
किचनमध्ये भांडी ठेवुन दोघी तिथंच बसल्या, एक सांगु तुला, रागावणार नाहीस ना ?' स्मितानं विचारलं, कुणाच्या काही बोलण्यावर रागवावं या सगळ्याच्या पलीकडं गेली आहे मी, विचार', स्मितानं थोडा धीर गोळा केला अन विचारलं, तु अशीच आहेस का गं, तेंव्हा पासुन, म्हणजे अंगानं अशीच आहेस एखाद्या मॉडेलसारखी, तसं असेल तर कुणालाही मोह होईलच याचा उपभोग घ्यायचा, मग त्यात सरांचं काही चुकलं असं मला वाटत नाही' रात्रीपासुन स्मिताकडुन स्वतंत्रपणे आलेली ही पहिलीच रिअॅक्शन होती, अर्थात अनुजाला सध्या अनपेक्षित काहीच नव्हतं, हसुन ती म्हणाली हो हा विचार तर मी देखील केला होता, म्हणुनच तर एंजॉय करायला तयार झाले ना,
पण हिडिसतेला, विकृतीला एक मर्यादा असते, आणि सर जेंव्हा ही मर्यादा ओलांडायला लागले तेंव्हा मला लक्षात यायला लागलं की परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते आहे, इथुन पुढं सहन करणं शक्य नाही मला, म्हणुन मग मी काल म्हणलं तसं सरांचाच रस्ता धरुन त्यांच्यावर मात करत गेले, आणि माझ्या नशिबानं त्यात यशस्वी झाले' अनुजा असं काही बोलली की, स्मिताच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह यावं किंवा तिनं आणावं हे आता सहज झालं होतं, ' अशी गोंधळात काय पडलीस, सरांच्या रस्त्यावरुन म्हणजे काय हे स्पष्ट ऐकायचं आहे ना तुला, सांगते, इथं तु एकटीच आहेस, बाई आहेस, तिथं कोर्टात याबद्द्ल पाच सात पुरुषांसमोर यावर चर्चा झालेल्या आहेत, काही वेळातर माझ्या बरोबरच्या लेडिज कॉन्स्टेबलसुद्धा निघुन जायच्या, ज्युनियर होत्या बहुधा, त्यांना नसेल सवय या सगळ्याची अजुन,' कोर्ट, चर्चा या शब्दांनी स्मिताची उत्सुकता अजुन चाळवली गेली, ' माझ्या एक लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी सरांना सुचतात कुठुन, त्या ब्लु फिल्म पाहुन, मग मी एक दिवस हिम्मत करुन एक फिल्म पाहिली, पहिल्या पाच मिनिटात्च बंद करुन टाकली, उलटी झाली मला लगेच, पण असं मागं सरकले असते तर मी मरुन गेले असते,एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली होती , समोरचा जेवढा हिडिस किंवा विकृत होतो आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण झालो की तो तोल सोडतो,आणि हेच मला हवं होतं,
दुसरं कारण तोपर्यंत सर सुद्धा इथं सेटल झाले होते, त्यांची गाडी मुळ रस्त्यावर यायची चिन्हं दिसत होती, मग मात्र मी सगळा धीर गोळा केला अन एक दिवस एक पुर्ण फिल्म पाहिली, दोन दिवस, तीन दिवस असं करत महिनाभरात मला त्याचं व्यसन लागलं, नशे मध्ये माणसाचं धाड्स वाढतं, दोन महिन्यापुर्वी मी सरांना नाही म्हणायला घाबरत होते, आता माझ्या सुखाच्या मागण्या पुढं ठेवायला सुरुवात केली केली, एक हात दो एक हात लो, असं सुरु केलं,
एक दोन वेळा सरांनी विरोध केला, घरातुन निघुन गेले, दारु पिउन यायला लागले, ते तर माझ्यासाठी जास्त चांगलं होतं,दारु पिल्यावर त्यांचा स्वतावर ताबा राहायचा नाही, माझ्यावर काय हुकुम चालवणार होते' ' मारलं नाही त्यांनी तुला कधी सरांनी यावरुन ?' स्मितानं अनुजाचं बोलणं तोडत विचारलं ? ' नाही, तेवढी ताकद नव्हती त्यांची,मांजर उंदराला खेळवते तशी त्यांना खेळवत होते, अगदी उपाशी मारायची नाही त्यांना, जिवंत राहतील एवढं अन्न मिळत होतं त्यांना,' पाणी प्यायला उठत अनुजानं विचारलं ' शरद मारतो ना ग तुला, तु असं काही क्ररायला नाही म्हणालीस तर ?'
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-72249345344647546462012-08-27T08:33:00.002+05:302012-08-27T08:33:25.755+05:30क क कपलचा - भाग ०७
'be positive, when you cannot avoid it, try enjoying it'- माझ्यासाठी आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का होता, ' अनुजानं पुढं बोलायला सुरुवात केली, स्मिताला खरंतर ओरडावसं वाटत होतं, इथुन पळुन जावंसं वाटत होतं, पण ती थिजल्यासारखी पडुन राहिली, एखादा भीतीदायक चित्रपट पाहताना उठुन जावंसं वाटतं,पण पाय एवढे जड होतात की हलवता येत नाहीत आणि भीती सहन होत नाही अशी अवस्था होते, तसं तिचं झालं होतं. अनुचं बोलणं सुरुच राहिलं 'एवढा मोठा की प्रेत पडल्यासारखं जागच्या जागी पडुन होते संध्याकाळ पर्यंत. डोळे उघडले तेंव्हा सगळीकडं अंधार होता नुसता, उठुन बसायला देखील नको वाटत होतं, खुप जोरात रडावंसं वाटत होतं, शक्य तेवढं सावरलं आणि बाहेर आले, घराच्या दाराला बाहेरुन कुलुप लावुन सर गेले होते. कुठं ते ठाउक नाही, घरातले लाईट सुद्धा बाहेरुनच बंद केलेले होते. मग बराच वेळ दाराला टेकुन बसुन होते. रात्री केंव्हातरी दार ढकललं गेलं तसं बाजुला पडले, तेंव्हा मात्र घाबरुन ओरडले. सर येताना जेवण घेउनच आले होते, किचनमध्ये त्यांनीच ताटं मांडली, मला जेवायला बोलावलं, दुपारी हे असं घाणेरडं वागल्यावर माणुस रात्री ताट वाढुन जेवायला बोलावतो, लाज, शरम्,माणुसकी हे सगळं फक्त शब्दांपुरतंच असतं असं वाटायला लागलं मला. सर जेंव्हा मला उठवुन आत नेउ लागले तेंव्हा मी ओरडले, आणि उठलेच नाही, मग ते एकटेच निघुन गेले जेवायला, मी जेवुन घेतो, गरम आहे तोवर घे जेवुन.'
दहा मिनिटांत जेवले सर अन बाहेर आले, मी तिथेच बसुन होते, ' का जेवली नाहीस भुक नाहिये का ?' अग ताट उघडं राहिलं की गारढोण होउन जातं मग बरं नाही वाटत जेवायला, आत गार झालंच आहे, जेंव्हा जेवावसं वाटेल तेंव्हा घे जेवुन.' एवढं बोलुन सर बेडरुममध्ये निघुन गेले.
वाटलं की बाई म्हणजे पण असंच एक ताट असतं का पुरुषासाठी?, भुक लागली की जेवुन घे, पोट भरलं की टाक नेउन घासायला, माझं मलाच समजत नव्हतं हे काय होतंय, काय चाललंय ते. पहाटे कधीतरी पुन्हा डोळा लागला माझा. सकाळी जाग आली तेंव्हा सर निघुन गेले होते पुन्हा दाराला बाहेरुन कुलुप लावलेलं होतं, दिवसाच्या उजेडानं जरा धीर आला, रात्र तरी उपाशीच गेली होती. उठुन पाणी प्याले, किचनमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यात उरलेलं अन्न तसंच पडुन होतं, कट्ट्यावर एक ताट वाढलेलं तसंच होतं. ते आवरयचा धीर झाला नाही. बेडरुम मध्ये आले, पिसीच्या टेबलवर एक सिडी तशीच पडुन होती, किचनमध्ये पडलेल्या ताटासारखी. घशात आवंढे गिळत अन डोळ्यातलं पाणी पुसत माझं आवरलं, सगळं सामान एका बॅग मध्ये भरलं आणि घर सोडायचं ठरवलं. बॅगमध्ये काही पैसे लपवुन ठेवलेले होते, ते अजुन सरांच्या हातात लागले नव्हते, निदान इथंतरी नशीब माझ्याबाजुनं होतं, दोन चार महिने माझं म्हणुन सजवलेल्या घराकडं पाहिलं आणि निघाले', अनुजानं एक पॉझ घेतला तसा स्मिताचा खोल पण उत्सुक आवाज आला ' पण बाहेरुन कुलुप होतं ना घराला, मग बाहेर कशी आलीस ?
अनुजा पुन्हा किचनमध्ये जाउन पाणी घेउन आली, एक ग्लास आधीसारखाच स्मिताला दिला,' तुला काय वाटतं, कशी आली असेन घराबाहेर ?' एवढ्या नॉर्मल आवाजात हा प्रश्न ऐकुन स्मिताला ठसका लागला एकदम. खोकतच तिनं विचारलं ' हे एवढं सगळं भोगुन बाहेर पड्लीस तरी काही वाटत नाही याचं, एखादं कोडं घालावं तसं विचारतेस ?' बेडवर बसत अनुजा म्हणाली' होय मी फक्त यात दोन्ही भोगलंय, फक्त दुख्:च नाही तर सुखही या सगळ्यातलं, तुझं काय, तु अजुन दुख भोगतेस की आनंद पण उपभोगतेस काय करते आहेस, तुझं तुला समजतंय का ? आता स्मिता निरुत्तर होती. शांत पडुन पुढं काय झालं ते ऐकावं अशी भुमिका घ्यायचं तिनं ठरवलं, पण अनुजाच्या प्रश्नावर तिच्या अंतर्मनाचा बर्नर पेटला होताच, आणि त्याची धग तिला जाणवु लागली. आपल्यासारख्या संस्कारित सुशिक्षित रितीभातीनुसार लग्न होउन नव-याच्या घरी येउन सुखानं नांदणा-या एका पतिव्रतेला, एखाद्या अन्याय झालेल्या असल्या तरी दुय्यम वागणुकीच्या स्त्री च्या आयुष्याबद्दल आकर्षण वाटावं, पुढं काय झालं असेल यात मजा वाटावी याची तिला एकीकडं लाज वाटत होती, स्वताचा राग येत होता त्याचबरोबर एवढ्या क्लायमॅक्सला आलेला पिक्चर सोडावा पण वाटत नव्हता.
' नाही सुचत ना मी कशी आली असेन घराबाहेर, असु दे मीच सांगते' अनुजानं बोलणं पुन्हा सुरु केलं, तसं छताकडं एकटक बघत बसलेली स्मिता तिच्याबाजुला कुशीवर वळली, गारुड गारुड म्हणतात ना तसं, ' मी आलेच नाही बाहेर, येणं शक्यच नव्हतं, मग घरातच बसुन या सगळ्याचा बदला घ्यायचा, यातुन बाहेर पडायचा विचार सुरु झाला, अगदी आत्महत्येपासुन ते सरांच्या खुनापर्यंत सगळे विचार करुन झाले, काल सर जे बोलले ते शब्द्च डोक्यात घुमत होते 'when you cannot avoid it, try enjoying it', आत्महत्या किंवा खुनाचा आवेग कमी झाला होता, डोकं प्रत्यक्ष समोर आलेल्या परिस्थितीबद्दल आणि त्यातुन सुटण्याबद्दल विचार करत होतं, खरंच मी अॅव्हॉईड करु शकणार होते का, इथुन जरी बाहेर पडले तरी माहेरुन काही आधार मिळण्याची शक्यता फार कमी होते, अर्थात माझ्याच उद्योगांमुळं मी माझं माहेर तोडलं होतं, गाव बदलल्यानं मैत्रिणी अशा कुणी नव्हत्या, आईबाबाच जवळ करणार नाही म्हणजे इतर नातेवाईकांकडुन काही अपेक्षाच नव्हती, आणि तशीच बाहेर पडुन करणार काय होते, सेकंड इयरला या प्रकरणात गुंतवुन घेउन कशीबशी काठावर पास झाले होते, शिक्षण पुर्ण नव्हतं, म्हणजे बहुतेक सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह होत्या, मग एकच मार्ग उरला तो म्हणजे, 'try enjoying it', त्याक्षणी नाईलाजानं मी तोच स्विकरायचा ठरवला.'
'दोन-तीन दिवस अबोल्यात गेले, मग पुन्हा सगळं पहिल्यासारखं सुरु झालं, कॉलेज दुपारी तीनला संपायचं, सर घरी आले की काय होईल याची भीतीच बसली होती माझ्या मनात' , अनुजा न थांबता बोलत होती, एके दिवशी त्यांनी विचारलंच मला ' हल्ली थंड पडतेस फार लवकर, तुला एकदाच बोललो आहे, enjoy it, तु आणि मी, दोघंही जवानीत आहोत तोवरच काय आहे ती मजा, एकदा का पोरं झाली नंतर काय राहणार आहे, तुच विचार कर, नाहीतर जे सुख मला तुझ्याकडुन मिळायला हवं त्यासाठी मी घराबाहेर पडणार आणि मग काय अर्थ राहिला या लग्नाला, एकत्र राहण्याला?' एवढं बोलुन सर उठुन आवरायला लागले. पाच मिनिटं शांततेत गेली' जसं सर उठुन बाहेर निघाले, एवढ्या दिवसांचा गोळा केलेला धीर गोळा करुन मी विचारलं, ' enjoy it म्हणजे काय, जे तुम्हाला enjoy वाटतं, त्याचा मला किती त्रास होतो हे कळतं का तुम्हाला, का जे तुम्ही एंजॉय करता तेच मी पण एंजॉय केलं पाहिजे हा हट्ट का ? माझी काही वेगळी आवड असेल किंवा नसेलच काही आवड हे शक्य नाही का? आणि भुक वेगळी आणि आवड वेगळी हे का नाहि समजुन घेत तुम्ही. प्रत्येक वेळी जे तुम्हाला हवं ते देण्यातच मी का समाधान मानावं, तेच का एंजॉय करावं मी. ' मला वाटलं मी खुप बोलले, म्हणुन थोडं थांबले.
बेडरुमच्या दारातुन सर परत आत आले, ' एंजॉय म्हणजे काय, हेच मुळात समजत नाही तुम्हा बायकांना, थांब दाखवतोच एंजॉय म्हणजे काय ते' एवढं बोलुन सरांनी पिसि सुरु केला. पुढचा एक तास माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट वेळ होता, निदान तेंव्हापर्यंतरी.' मोबाईलमधला अलार्म वाजला आणि दोघी भुतकाळातुन वर्तमानकाळात आल्या, अनुजानं उठुन टेबलावरचा मोबाईल घेतला, अलार्म बंद करुन पुन्हा बेडवर अंग टाकलं. अलार्ममुळं लिंक तुटली, आणि सकाळ होत आल्याची जाणीव देखील झाली. ' तुला कधी निघायचं आहे, उत्तरपुजा करुनच निघा आता' ,' हो ग, निघावंच लागेल आज, परवा सासुबाई जायच्या आहेत गावाकडं परत, त्यांची औषधं आणुन द्यायची आहेत,अजुन बरंच काही आहे' स्मिताच्या मनात खरंतर राहायचं होतं, अजुन बोलायचं होतं, एवढा वेळ ती ऐकत होती, बोलण्यासारखं तिच्याकडंही बरंच होतं, अपघातातुन वाचलेली दोन माणसं, त्या अपघाताचं वर्णन एकमेकांना सांगुन आपणच कसे सुदैवी, धाडसी याचं कौतुक गात राहतात तसं तिला होत होतं, अनुजाची कथा तिनं ऐकली होती, ती संपल्यावर तिला देखील बरंच काही बोलायचं होतं, पण आपण तिच्याएवढं मोकळं होउ शकणार नाही याची खात्री होती तिला. अनुजाच्या मोकळं होण्यातच आपल्याला जे म्हणायचं ते येतंय हे तिला जाणवत होतं. पुन्हा एकदा अलार्म वाजला, मगाशी अलार्म पुढं ढकलला गेला होता फक्त, यावेळी अनुजा उठलीच नाही,अलार्म वाजु दिला, तो आपोआप बंद झाला आणि ती पुन्हा बोलायला लागली ' तु बघितल्यात का ग कधी ब्लु फिल्म?' शाळेत धड्यावरचा सगळ्यात अवघड प्रश्न आपल्यालाच विचारावा असं वाटत असतं, आणि तसा तो विचारल्यावर मात्र उत्तर सुचत नाही तसं झालं स्मिताला. नाही म्हणावं तर पहिल्याच भेटीत एवढं प्रामाणिकपणे बोलणारीशी खोटं बोलल्यासारखं होतंय आणि हो म्हणावं तर अजुन पंचाईत, अर्थात काल रात्रीचा अनुजाचा प्रत्येक प्रश्न तिला असाच अस्वस्थ करुन सोडत होता, त्या अस्वस्थतेची रात्रभरात स्मिताला सवय झाली होती.
' एवढा विचार करते आहेस हो म्हणायला म्हणजे पाहिल्यात तु पण, स्मिताकडं वळत तिला विचारलं ' तु नाहीस करत एंजॉय हे सगळं?' एकतर हिनं असल्या गोष्टी एंजॉय करायच्या ठरवल्या आणि आता मला विचारतेय, मी एंजॉय करते का नाही ते ? इंजक्शनची सुई टोचते त्या क्षणी दुखतं, पण त्या सुईतुन आत जाणारं औषध आपल्या भल्यासाठीच आहे ही जाणीव ते दुखणं विसरायला लावते, तसं होत होतं स्मिताला. अनुजाच्या प्रश्नानं ती अजुनच गप्प झाली. ' उठलीस काय ग ?' शरदच्या आवाजानं स्मिता भानावर आली. उठुन केस अन कपडे नीट केले आणि बाहेर गेली.बाहेर जाताना सुटले बाबा एकदाची परिक्षेतुन असा विचार तिच्या मनात आला. अनुजा एकटीच राहिली, दवाखान्यात एखाद्याला डॉक्टर समजुन जखम उघडुन दाखवावी अन तो तिथला झाडुवाला निघावा असं तिला वाटलं. रात्रीपासुन पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं, ती तशीच एका कुशीवर पडुन राहिली. ' झाली का झोप, चला गुरुजी येणार आहेत आठ पर्यंत ' असं म्हणत हर्षदनं तिच्या खांद्यावर हात ठेवुन तिला हलवेपर्यत ती तशीच पडुन होती. तिचा चेहरा पाहुन रात्रभर काय झालेलं असेल याची हर्षदला कल्पना आली, सांत्वन करतात तसं तिच्या डोक्यावरुन त्यानं हात फिरवला, खाली वाकुन तिच्या कपाळावर ओठ टेकवले अन हात हातात घेत म्हणाला, ' आज ती आईनं दिलेली निळी पैठणी नेस, चालेल.' उठुन बसत तिनं उत्तर दिलं ' तिचा ब्लाउज फाटलाय'. आपल्या आईनंच दिलेल्या सगळ्या साड्यांचे ब्लाउज का फाटतात हे एकदा शोधलं पाहिजे, असं हर्षदला वाटलं. ' ठिक आहे, जी तुला आवडेल ती नेस.', स्मिता आत आल्याची चाहुल लागल्यानं तो बाहेर निघुन गेला.
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-49161995142463586302012-08-06T08:56:00.003+05:302012-08-06T08:56:20.377+05:30क क कपलचा - भाग ६
गच्चीवरचं सगळं आवरुन झालं, दोघं घरात आले तेंव्हा निकाळजे काकु घरी निघुन गेल्या होत्या, त्यांच्या दाराबाहेर तेच दोन महागडे बुटांचे जोड होते, घराचं दार स्मितानंच उघडलं, आज मुक्कामाला आलेले असल्यानं तिनं कपडे बदलुन गाउन घातला होता, मागं बेडरुममधुन अनु बाहेर आली, तिचंही आवरुन झालं होतं. 'चहा करु का रे?' तिनं विचारलं, कुणीच काही बोलत नाही हे पाहुन ति सुद्धा गप्प झाली, सगळे जण हॉलमध्येच बसुन होते. पार्टीत ब-याच गोष्टी स्मिताच्या कानावर पडल्या होत्या, काही आधीपासुन शरद लपवतो आहे हे तिला जाणवत होतंय, त्यामुळं आता तिच्या स्त्रिसुलभ आकर्षणानं हे सगळं नक्की काय आहे हे तिला जाणुन घ्यायचं होतं, पण स्पष्ट विचारणं शक्य नव्हतं,म्हणुन ती देखील गप्प होती. पाच मिनिटं अशीच टेन्शनमध्ये गेली ' आम्ही दोघं इथं हॉलमध्येच झोपतो,तुम्ही दोघी आत झोपा' हर्षद उठत बोलला, सगळ्यांना तेच हवं होतं. अंथरुणं टाकुन हर्षद पुन्हा दरवाजा लावायला आला तेंव्हा ते महागडे बुट जागेवर नव्हते.
' तुला वाईट वाटलं का ग फार, लोकं काय बोलतात ते ऐकुन?' बेडवर एका कुशीवर होत अनुजानं स्मिताला विचारलं, स्मिता गोंधळली, हो म्हणावं तर काही माहित नाही, नाहि म्हणावं तर फार बावळटपणा वाटेल, ती उगाच डोळे मिटुन झोप लागल्यासारखी पडुन राहिली. कुस बदलत अनुजानं विचारलं ' तुला नाही का ग काही वाटत बाकीं कुणाबद्दल, म्हणजे पुरुषांबद्दल ?' स्मितानं घेतलेलं झोपेचं सोंग गळुन पडलं, डोळे सताड उघडले, थोडंसं घाबरतच तिनं अनुजाकडं पाहिलं, अंगापिंडानं तिच्यापेक्षा थोडी थोराडच होती अनुजा, तिच्या डोक्यात नाही ते विचार यायला लागले, अगदी आता इथुन उठुन दरवाज्यापर्यंत जाउन कडी काढुन बाहेर कसं पळायचं इथंपर्यंत सुद्धा.' मला वाटतं, म्हणजे कधी आकर्षण वाटतं, तर कधी कीव येते, कधी तर त्याचीच कीव येते ज्याचं आकर्षण वाटतं.' सगळा धीर गोळा करुन स्मितानं एकच शब्द उच्चारला 'का?'. गच्च पाणी भरलेल्या टाकीचा एकच थेंब पुरेसा असतो ओव्हरफ्लो सुरु व्हायला तसं झालं,.
'सेकंड इयरला असताना' अनुजानं सुरुवात केली' मी प्रेमात पडले पहिल्यांदा आमच्या एका सरांच्या, एक वर्ष नक्की काही कळलंच नाही, पण थर्ड इयरला मात्र ब-याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या, इतक्या की मला आवडणारा शर्ट सर सलग दोन दोन दिवस घालायचे आणि मी पण रात्री ड्रेस धुवुन पुन्हा दुस-या दिवशी तोच घालुन जायचे, कॉलेजात चर्चा होत होत्याच, पण ना मी कधी स्पष्ट बोलले ना कधी सर. एक दिवस मैत्रिणीच्या घरी गप्पा मारताना तिच्या लहान बहिणीनं ऐकलं, तिच्या आईला सांगितलं आणि मग माझ्या घरी समजलं. गोंधळ झाला,वय,कमाई अशा चिल्लर तेवढ्या सगळ्या गोष्टी आड येत होत्या. खरंतर आम्हाला लगेच लग्न वगैरे करायचं नव्हतंच, पण आमचे संबंध फार पुढं गेले आहेत असा काकुला संशय होता, ' एवढी भरली कशी नाहीतर वर्षात' मी आणि आई दोघीच समोर असताना तिनं घेतलेला संशय आणि कँटिन मध्ये बसुन मारलेल्या गप्पा यांचा संबंध लागायला लागला मला. कॉलेज बंद, मैत्रिणी बंद आणि स्थळं पाहणं सुरु झालं. पंधरा दिवसात तीन ठिकाणी दाखवुन झालं. साहजिकच मी सुद्धा ठाम विरोध सुरु केला,जे विचार आजपर्यंत करत नव्हते ते करायला लागले, माझी काही चुक नसताना मला शिक्षा भोगावी लागत होती, म्हणुन बंडाचा मार्ग धरला.'
'बंड म्हणजे?', एक अध्याय संपेपर्यंत ऐकणारा सत्यनारायणाच्या कथेत गुंतलेला असतो, मध्येच गुरुजी पाणी प्यायला थांबले तरी अस्वस्थ व्हायला होतं, तसं स्मिताला होत होतं. अनुजा खिड्कीच्या बाजुला होती, त्यामुळं तिच्यामागुन रस्त्यावरच्या लाईटचा येणारा उजेड तिच्या चेह-यावर पडत नसला तरी तिच्या मागं एक प्रभावळ उभी केल्याचा भास होत होता, आणि ही कथा ऐकताना अनुजा काही एखाद्या देवीपेक्षा कमी नाही असंच स्मिताला वाटत होतं. 'चार दिवस जेवलेच नाही, आजारी पडले, घरीच डॉक्टरांना बोलावुन उपचार सुरु झाले, मैत्रिणि यायला सुरुवात झाली, एक दिवस मैत्रिणिकडुन त्या गोळ्या मागवुन घेतल्या, घेतल्या, पहिल्यांदाच, घाबरतच पण अपेक्षित परिणाम झाला, तारखा उलटुन गेल्या. पहिल्यांदा आई आणि काकु उघडपणे,आणि नंतर सगळेच हादरले. काका आणि बाबा त्याच दिवशी कॉलेजमध्ये जाउन सरांना भेटले, पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट नाकारलं, मला भेटण्याची परवानगी मागितली एकट्यानं. अर्थात असं काही झालंच नव्हतं पण बहुधा कधीतरी त्या वयातल्या आकर्षणानं आणि अव्यक्त प्रेमानं बाजी मारली, जातीचा काही प्रश्न नव्हता, सरांनी दोन दिवस घेतले, आणि मग हो म्हणाले. ते पिक्चरमध्ये असतं ना ' मुझे इस जमानेने गुनहगार बना दिया' तसं झालं माझं. लग्नाचा सिझन चालु होताच, फक्त शिक्षण पुर्ण करणे ही सरांची अट होती. तारखा उलटण्याचं खरं कारण समजेपर्यंत माझ्या लग्नाची गोष्ट जगजाहीर झाली होती, आता मागं सरकणं ना माझ्या घरच्यांना शक्य होतं ना सरांना.' 'आलेच ग पाणी पिउन' लागलेली तंद्री तोडत अनुजा उठत म्हणाली, त्यावर स्मिताची सहज रिअॅक्शन गेली 'पटकन ये' आता ती सुद्धा बेडला टेकुन बसली होती.
परत येताना एक ग्लासभरुन पाणी स्मिताला सुद्धा आणलं होतं अनुजानं, तिचं पाणी पिउन झाल्यावर अनुजानं पुढं सुरु केलं ' नंतरच्या पहिल्या मुहुर्तावर माझं लग्न झालं, सहा महिने राहिले होते लास्ट इयरचे, पण आता माझ्याच कॉलेजमध्ये जाणं फार अवघड झालं होतं. आज पार्टीत काय बोलली असतील लोकं त्यापेक्षा घाणेरडं ऐकायला मिळायचं आणि ते पण बरोबरच्या मुलांमुलींकडुनच नाही लॅब असिस्टंट कडुन सुद्धा. महिनाभरात चिडुन सरांनी नोकरी बदलली, गाव बदललं आणि माझं शिक्षण अर्धवटच राहतं का काय अशी शंका यायला लागली मला. ' लग्नानंतर पण सरच म्हणायचीस त्यांना?' स्मितानं बोलणं तोडत प्रश्न केला. 'हो, अग तशीच सवय पडली होती दोन वर्षात, नवीन गावात माझी अॅडमिशन व्हायला वेळ होता, तेंव्हा घरीच असायचे, अभ्यास पुन्हा सुरु करावा म्हणुन एक दिवस घरातला पिसि जोडला, सर एकटेच असायचे त्यामुळं पासवर्ड वगैरे नव्हताच सिस्टिमला. थोडा अभ्यास केला मग गाणी आणि पिक्चर आहेत का पहावं म्हणुन सर्च केला, गाणि आणि काही पिक्चर सापडले, बरेचसे जुने पण जे जे पहायला सुरु केले तेंव्हा चालु झाल्या त्या तसल्या घाणेरड्या फिल्मस, ज्यांच्याबद्दल आजपर्यंत इनडायरेक्टली ऐकत होते ती गोष्ट, ब्लु फिल्मस. ब-याच फाईल्स पाहिल्या सगळ्यात तेच, शेवटी कंटाळुन पिसि बंद केला अन सुन्न बसुन राहिले. सरांकडं ह्या असल्या घाणेरड्या गोष्टी असाव्यात याचं फार वाईट वाटत होतं, घरी आल्यावर त्यांच्याशी यावर बोलायचं ठरवलं. '
या विषयाबद्दल स्मितानं देखील फक्त ऐकलंच होतं, आणि यावर एका नवरा बायकोत काय बोलणं झालं असेल याची तिला फार उत्सुकता लागुन राहिली होती. अनुजानं दोन मिनिटं गॅप घेतला, तेवढं थांबणं सुद्धा तिला अवघड झालं ' मग बोललीश त्यांच्याशी ?' तिनं अनुजाला विचारलं. ' नाही' , एकदम निराश करणारं उत्तर आलं, पण अनुजानं पुढं चालु केलं बोलणं 'नेमकं त्याच दिवशी माझ्या अॅडमिशनचं, सरांचं अपॉईंट्मेंट लेटर, त्यांच्या घरुन आमच्या लग्नाला मिळालेला स्विकार अशा ब्-याच गोष्टी झालेल्या, त्यामुळं दोघंही खुप खुश झालो, आणि या आनंदात त्यांना असं काही विचारावं हे माझ्या डोक्यातच आलं नाही, मग लगेच दुस-या दिवशी सरांच्या मुळ गावी देव देव करायला गेलो, दोन दिवस तिथं राहुन सर परत निघुन आले आणि मी पुढचे आठ दिवस तिथंच राहिले. आठ दिवसानी परत आले त्या दिवशी सरांच्या वागण्यातला बदल पाहुन एक दोन दिवस मला सुद्धा बरं वाटलं. खरा फटका बसला तो त्यानंतर, त्यांच्या अपेक्षा आणि मागण्या वाढत दर रात्री वाढत होत्या, दोन दिवसातच लक्षात आलं की त्यांची अपेक्षा त्या फिल्म मध्ये दाखवतात तसं मी वागावं अशी होत होत्या, त्या प्रकारांची खरंतर पहिल्यांदा चिड आली होती, त्यावरुन आमच्यात वाद होणं सुरु झालं, स्पष्ट तर दोघंही बोलत नव्हतो, मी बेडरुमचा दरवाजा बंद करुन झोपायचा प्रयत्न करायचे, माझ्याच घरात घाबरुन, लपुन जायचे. माहेरी काय अन कसं सांगणार, शेजार पाजार देखील नविनच आणि या विषयावर बोलणार तरी काय आणि कुणाला.'
' तोंड दाबुन बुक्क्यांचा मार, म्हणतात ना तेच हे' सरांनी वर्गाबाहेर उभी केलेली मुलं एकमेकांकडं जशी पाहतात त्या नजरेनं पहात स्मिता बोलली, ' बाईच्या जन्माचे भोग आहेत, भोगल्याशिवाय संपणार का?' ' का नाही ?', रात्रीच्या शांत वातावरणात अनुजाचा आवाज जरा जास्तच मोठा वाटायला लागला ' मी पण असाच विचार करत होते काही दिवस, मग जेंव्हा सरांनी सकाळी, दुपारी कधीही अंगाला झटणं सुरु केलं तेंव्हा मात्र पुर्ण विरोध करायची, एक दिवस तिथं शारिरिक ताकद कमी पडली आणि शेवटी बाजुला झाल्यावर सर हसत हसत बोलले 'be positive, when you cannot avoid it, try enjoying it'
क्रमशः
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-32055609648321291652012-07-20T22:51:00.004+05:302012-07-20T22:51:43.897+05:30क क कपलचा - भाग ०५
हॉलमधले सगळेच उठुन उभे राहिले,खांद्यावरचं उपरणं सावरत गुरुजींनी सुरुवात केली ' सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची......' तेंव्हा दरवाज्यात सोनवणे साहेब उभे होते विठ्ठल स्टाईलमध्ये..आणि मागं चक्क सौ. सोनवणे,
सोनवणे साहेब पार्टीला येणारच हे नक्की होतं, पण सकाळी पुजेला सुद्धा ते येतील आणि ते पण सहकुटुंब अशी अपेक्षा हर्षदनं तरी केली नव्हती, एका हातात आरतीचं तबक धरुनच हर्षदनं मान हलवत साहेबाना नमस्कार केला, साहेब सुद्धा लगेच आत येउन टाळ्या वाजवायला लागले, दहा मिनिटात सगळे सोपस्कार संपले. हर्षद अन अनुजानं दक्षिणा देउन गुरुजींना नमस्कार केला, बाकी उपस्थितांनी सुद्धा पुजेसमोर यथाशक्ति नाणी, नोटा ठेवल्या,नमस्कार केला आणि तिर्थप्रसाद घेउन बाजुला झाले. स्वयंपाकाचं सगळं आटोपलंच होतं, निकाळजे काकुंनी कॉलनीतल्याच अजुन एक दोन बायकांना वाढणं वगैरे कामाला बोलावलं होतं, त्यांची कामं चालु होती. दोघं जण कपडे बदलुन येईपर्यंत शरद सोनवणे साहेबांबरोबर बोलत बसला, अजुन एक दोन कॉलनीतलेच पिएसआय आलेले होते, पोरांचा दंगा चालु होताच, त्यातल्या त्यात एका थोराड पोराला प्रसाद वाटायच्या कामावर बसवुन गुरुजी साबुदाण्याची खिचडी आणि दुध घेउन निघुन गेले होते, बाकीची पोरं त्या प्रसादवाल्याला वशिला लावण्याचं काम करत होती.
' ताटं घ्यायची का ग लगेच ?' निकाळजे खणखणीत आवाज आला तसा, बेडरुम मधुन बाहेर येत येत अनुजा काही बोलणार त्याआधीच हॉलमधुन सोनवणे साहेबांचं उत्तर आलं, ' मग हो काकु, आता अजुन कुणाची वाट पाहताय, इथं ड्युटी बोलावतीय, रोजचा समाजसेवेचा रतिब घालायला जायचंय आम्हाला, घ्या ताटं, जरा फास्ट हात चालवा.' स्टेशनातली सिनियरगिरी त्यांनी इथं पण सुरु केली. हर्षदनं बाहेर येउन अनुजाची अन जमलेल्या सर्वांची ओळख करुन दिली, सगळे संपल्यावर सोनवणे साहेबांनी त्यांच्या बायकोकडं हात करुन सांगितलं ' हे आमचं खटलं, म्हणजे तुमच्यासारखं खटल्यातच सापडलेलं म्हणुन खटलं, पार बापजाद्यांपासुन वकिलीत आहेत मॅडम' साहेबांची बायको शहरातील ब-यापैकी सेटल्ड वकील होती. अनुजाला एकदम मळमळावं असं झालं, तोंडावर हात दाबुन उलटी थांबवावी असा चेहरा करुन अनुजा बाथरुममध्ये निघुन गेली. हर्षद सुद्धा हातानंच एक मिनिट असं म्हणत आत गेला, त्याच्या मागं स्मिता पण गेली. बाहेर सौ. सोनवणेंनी नव-याकडं असं काही पाहिलं की विचारता सोय नाही.
निकाळजे काकुंनी अन बरोबरच्या दोघींनी ताटं मांडली तोपर्यंत पोरं सगळी निघुन गेली होती, शरदनं जाळीचा दरवाजा लावुन घेत पडदा टाकला. बेडरुममधुन बेडशीट आणुन त्याच्याच घड्या करुन बसायची व्यवस्था केली, एकीनं ताटांच्या बाजुला रांगोळी काढली, साहेब बसण्याची वाट पाहात सगळे जण उभे होते, तर साहेब हर्षद्ची वाट पहात होते. पाच मिनिटात तिघंही बाहेर आली, पावडर लावली काय किंवा विको टर्मरिक गालावर पडलेले डोळ्यातल्या पाण्याचे डाग लपता लपत नाहीत किमान सौ. सोनवणेंना तरी ते लक्षात येत होतं. ' अरे बसा ना, तुम्ही बसल्याशिवाय काकु वाढायला नाहीत घेणार, काकु बसले ओ सगळे घ्या वाढायला' एकदम दोन्ही बाजुला बोलता बोलता अनुजा पायानंच एका बाजुचं बेडशीट नीट करायला लागली. ती दोघं जण पुजा मांडली होती त्याच भिंतीला टेकुन बसली, त्यांच्या ताटासमोर स्मितानं आठवणीनं आणलेली मोत्यांची रांगोळी मांडुन ठेवली. जेवणं चांगली अर्धा तास चालली. कॉलनीतले मेंबर निघुन गेल्यावर हॉलमध्ये हर्षद अनुजा, शरद स्मिता आणि साहेब व सौ. एवढीच जण होती.
सौ. सोनवणेंनी पर्स मधुन एक वेल्वेटचा बॉक्स काढला, तो उघडुन अनुजाच्या हातात दिला, आत एक नेकलेस आणि कानातल्यांचा कुड्या होत्या. बॉक्स हातात घेउनच अनुजा आणि हर्षंद त्यांच्या पाया पडली ' हे फक्त प्रथा म्हणुन, नाहीतर आमची लायकी नाही तुमच्याकडुन पाया पडुन घ्यावं एवढी' हर्षदला एवढंच बोलुन सौ. व साहेब घराबाहेर पडले. ' आम्ही बसु का आता ग, का अजुन कोणी यायचं बाकी आहे ?' जास्त झालेला स्वयंपाक आपल्या घरात ठेवुन आलेल्या निकाळजे काकुंनी विचारलं तेंव्हाच हॉलमधली शांतता भंग झाली. ' चला आम्ही वाढतो तुम्हाला, तुम्ही होता म्हणुन झालं सगळं,' रितीप्रमाणे कौतुकाचे शब्द बोलुन अनुजा त्यांना घेउन किचनकडे गेली. हर्षद अणि शरदनं हॉलमधलं आवरायला घेतलं, पुजेसमोरची शांत झालेली समई पुन्हा पेटवली. तेवढ्यात संध्याकाळच्या पार्टीसाठी ठरवलेला केटरिंगवाला खुर्च्या अन टेबलं घेउन आला. शरद त्याला घेउन गच्चीवर गेला, स्मिता अन अनुजा काकु आणि बाकीच्या दोघींना वाढत होत्या, हॉलमध्ये हर्षद एकटाच पुजेच्या समोर बसुन होता, थोडासा सुन्न थोडासा उदास, मगाशीच ऐकलेल्या कथेतल्या वाण्यासारखी त्याची अवस्था झाली होती, बुडालेली नौका बाहेर काढायला फार प्रयत्न करावे लागणार होते, अर्थात नौका पहिल्यांदा बुडत नव्हती.
दुपारी जेवणाला मोजुन १२ जण होते पण संध्याकाळी कोरडी अन व्हेज पार्टी असुन देखील, शंभर दिडशे जण तरी येणं अपेक्षित होतं, आणि साहेब येउन गेले हे स्टेशनमध्ये सगळ्यांना कळाल्यानं ते सगळे निवांत येणार होते. लागलेल्या किंवा लावुन घेतलेल्या सवयीनं अनुजानं पुन्हा सगळं आवरलं, पार्टीसाठी म्हणुन ति हिरव्या रंगाची शिफॉन नेसणार होती, काळ्या वेलवेट्च्या ब्लाउजवर. आवरताना ती आणि स्मिता दोघीच होत्या बेडरुम मध्ये, तिनं कपाटातुन साडी आणि ब्लाउज काढुन टाकल्यावर स्मितानं हसत विचारलं ' एवढी बारीक होतीस आधी ?' अनुजानं हसत हसत उत्तर टाळलं, ' तु पण आवर ना पटकन, वर जावं लागेल पहायला, ह्यांना काही समजत नाही, सगळं आपल्यालाच पाहायचं आहे, नाहीतर पुढचा आठवडाभर मला नान आणि पनीरची भाजी खावी लागेल या शि-याबरोबर' त्या दोघी आवरुन गच्चीवर येईपर्यंत सात वाजलेच होते, तेंव्हाच कॉलनीतल्या गणेश मंडळाची पोरं साउंड सिस्टिम लावुन निघाली ती यांना वर येताना पाहुन जिन्यातच थांबली, ' या ना खाली, बरंच वजन आहे ना तुमच्याकडे' एका बाजुला थांबत अनुजा म्हणाली. पोरं निघुन गेल्यावर गळ्यावरचा पदर नीट करत स्मिताला म्हणाली' आपल्याला बघुन नाही, बघण्यासाठी बाजुला थांबली होती'.
साडेसातला सुरु झालेल्या पार्टीत रंग भरला, साडेआठच्या सुमारास, चिंबोरी स्टेशनचा पन्नास टक्के स्टाफ, सहकुटुंब एकत्र होता, त्यांच्या पार्ट्या व्हायच्या त्या बहुदा ओल्या आणि सड्या, असे प्रसंग क्वचितच यायचे. प्रत्येक जण टिशर्ट आणि जीन घालुन आलेला असला तरी चिंबोरीत किती वर्षं काढलीत ते बायकोच्या अंगावरचे दागिने आणि पोरांच्या अंगावरचे कपडे यावरुन समजत होतं. थोड्याच वेळात ग्रुप तयार झाले आणि गच्चीचा एक एक कोपरा गाठुन गप्पा सुरु झाल्या, हर्षद आणि अनुजा थोड्या थोड्या वेळानं एका एका ग्रुपजवळ जावुन बोलुन पुढं सरकत होते, मग कुणीतरी नाचायचा फंडा काढला आणि थोडा वेळ सगळ्यांचं नाचुन झालं, शरद एका कोप-यात एकटाच उभा असलेला पाहुन अनुजा त्याच्याकडं गेली ' का हो भावजी, एकटेच उभे आहात असे, काही झालं का?' ' काही नाही, सहजच, स्मिता पण खाली गेलीय बाथरुममध्ये म्हणुन इथं थांबलोय, त्यात आम्ही ट्रॅफिकवाले, ह्या स्टेशनवाल्यांच्यात जास्त मिसळुन घेत नाहि आम्ही' अजुन थोडं बोलुन अनुजा तिथुन निघुन गेली.
दहाच्या सुमारास पार्टी संपली, शरदनं थोडा आवाज चढवला आणि मग अनुजा, स्मिता आणि निकाळजे काकु खाली घरात निघुन गेल्या, गच्चीत केटररची दोन चार पोरं आवराआवरी करत होती, हर्षद आणि शरद कठड्याला टेकुन बसले, तात्पुरत्या केलेल्या आडोशामागं केटररची माणसं भांडी साफ करत होती तिथुन आवाज येत होता ' भावड्या, फंक्शनची हीरॉइन एकदम आयटम होती बाप,ब्लाउज तर कट टु कट, ना उन्नीस ना बीस' दुस-यानं उत्तर दिलं ' उन्नीस बीस तुज्या*ला भाड्या चौतीसची गॅरंटी बघ, च्या*ला दिड वर्षे टेलरकडं काढलंय' कठडयाला टेकुन बसत शरद हर्षदला बोलला 'वहिनीला सांगा चारचौघात बाहेर असले कपडे घालत जाउ नको', हसत हर्षद बोलला ' मनापासुन बोलतो आहेस का, वरवरचं रे, नाही तुला पण बघितलं नजर तर तुझी सुद्धा हलत नव्हती तिच्यावरुन,' शरद गप्प झाला, खरंतर त्याची नजर अनुजावरुन हलत नव्हतीच पण मनात तो तिची अन स्मिताची तुलना, ती पण समोर दिसत होती तेवढीच नाही तर इतर वेळेची पण, आणि तोच का चिंबोरीस्टेशनचा सगळा स्टाफ याबद्दल बोलत होताच ' नशीब रायटरचं तिच्यायला, पहिली पोस्टिंग चिंबोरी, करुन घेतलेली बदली रद्द झाली, आणि हे असलं प्रकरण घरी.' या कौतुकाच्या गप्पांना नजर लागु नये म्हणुन 'आणि ते पण एक्स्पिरिय्न्स्ड, अनुभवी' ही काळी तिट.
क्रमशः
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-55620006588296129292012-07-12T07:41:00.003+05:302012-07-12T07:41:45.526+05:30क क कपलचा - भाग ०४
पिसिवरच्या फाईल पाहण्यात ती गुंग होती, तेंव्हाच बाहेर बेल पण वाजत होती.पिसि बंद करुन ती बाहेर आली, निकाळजे काकु आल्या होत्या, ' झालं का सामान लावुन, की येई मदतीला ?' असं विचारत थेट आत येत हॉलमधल्या एकुलत्या एक खुर्चीवर बसत बसत बोलल्या. अनुजाला हा भोचकपणा आवडला नाही पण आपल्या अनुभवहीन नव-यानं न केलेल्या कामांची यादी संपवण्यासाठी तिला काही दिवस तरी कुणीतरी मदतीला हवंच होतं. ' अहो, सामान आवरायचं काय एका दिवसात होणार का, चांगला आठवडा लागेल सगळं, आवरायला, काकु, तुमच्याकडची धुणं भांडीवाली करेल का हो आमच्याकडं काम ?' अंगावरचा टीशर्ट नीट करत अनुजा खालीच भिंतीला खेटुन बसली. ' आमच्याकडे नाही बाई वगैरे भांड्याल, आम्हीच करतो सगळं, परवडत नाही हो हल्ली' गळ्यातल्या बत्त्तीस इंची मंगळसुत्राशी चाळा करत काकु बोलल्या, आणि एकदम काहीतरी महत्त्वाचं आठवलं असं दाखवुन निघुन गेल्या. अनुजानं उठुन दार लावलं, पुन्हा बेडरुम मध्ये येउन पिसि चालु केला, विंडोज चालु होईपर्यंत तिची मोठी बॅग उघडली, वरचे कपडे बेडवर टाकले, खाली एका जुनाट पर्समध्ये एम्पि३ प्लेअर होता, तो आणि त्याची डाटा कॉर्ड काढली.
एकुण फाईल्स पाहिल्या जवळपास २२ जिबि होत्या, तिच्या २ जिबित किती म्हणुन बसणार होत्या, मग तिनं एक एक फाईल पाहुन महत्त्वाच्या तेवढ्याच घ्यायचं ठरवलं, आणि एक एक फाइल उघडुन पाहायला सुरुवात केली, दोन मिनिटातच खिडक्या बंद करुन पुन्हा पिसि समोर येउन बसली.
तीन वाजल्यापासुन सात वाजेपर्यंत तिचा वेळ त्या फाईल्स बघण्यातच गेला, खोलीत फक्त बाहेरच्या लाईटचा उजेड येतो आहे हे जाणवल्यावर ती उठली, पिसि बंद केला, किचनमध्ये येउन आवराआवरी केली, करायचं काहीच नव्हतं, फोन पाहिला तो डिसचार्ज होउन पडला होता, चार्जिंगला लावला अन लगेच हर्षदचा फोन आला, मग दोन मिनिटं चार्जर सापडला नाही, लाईट नव्हती, झोप लागली होती अशी कारणं सांगुन वेळ मारुन नेली. हर्षदनं तिला आवरुन बसायला सांगितलं खरं, पण त्याला घरी यायला साडेनउ वाजले, तो पर्यंत ती तिचा आवडता लखनवी टॉप अन काळी सलवार घालुन बसली होती. हर्षद आल्यावर दार उघडुन ती फणका-यानं वळुन आत गेली, तिला तसंच पाठमोरं मिठित घेउन हर्षदनं तिच्या मानेवर ओठ टेकवायचा प्रयत्न केला, पण ती सटकली अन खिडकीत जाउन उभी राहिली ' मागुन बघणा-या प्रत्येक पुरुषाला असंच करावं वाटेल, हे असले झिरझिरीत कपडे घातल्यावर, सगळं दिसतंय आतलं ' फाडकन बोलुन हर्षद आवरायला निघुन गेला. तिला किती अभिमान होता त्या पांढ-याशुभ्र कुडत्याचा, तरी पण डोळ्यातलं पाणी आवरुन ती सुद्धा कपडे बदलायला गेली.
बेडरुम मध्ये दोघांनी एकदमच कपडे बदलले, पण काहीही न बोलता, अगदी घुम्यानं. सुटलेलं पोट दिसणार हे माहित असुन देखील त्यानं एक बॉडी टाईट टिशर्ट घातला अन तिनं एक दोन साइझ मोठा ब्राउन कलरचा कुर्ता अडकवला, ' आता मागुन काय पुढुनही कुणाला काही वाटणार नाही, ठिक आहे ना ?, ' त्याच्या स्टेटमेंटला तेवढंच सडेतोड उत्तर देउन ती हॉलमध्ये येउन बसली. ' चल आता, आज चायनिज खायला जाउ, बिहाईंड द वॉल मध्ये. जाम मस्त जागा आहे' , बुट चढवत हर्षद बोलला. तिचा मुड असाही गेलेलाच होता, आता जेवण म्हणजे ' जाणिजे यज्ञकर्म' एवढंच उरलं होतं तिच्यासाठी. जाणं येणं आणि जेवणं एवढ्यात दोन तास गेले, घरी येउन दोघांनी कपडे बदलले, पुन्हा घुम्यानंच. बेडवर पडल्यावर हर्षदनं तिला जवळ ओढलं, त्यानं काही करायच्या आधीच तिनं विषय काढला ' गॅसची सोय कधी करणार आहेस, का गावातली सगळी हॉटेल फिरुन घ्यायची आहेत ? ' रिझर्वला आलेल्या गाडीचा नॉब ऑनवर असावा अन उगाच किका मारुन हैराण व्हावं तसा त्याचा चेहरा झाला, लांब होत बोलला ' एक दोन दिवसात होईल सगळं, आज गेलो होतो दुपारी तिथं ' , तिचा प्रतिप्रश्न ' शेगडी दोन बर्नरची आहे की तीन ?' छताकडं पाहात ती निर्विकारतेनं विचारत होती.
पंधरा दिवसांत बरीच प्रगती झाली, तो सकाळी लवकर उठुन जॉगिंगला जायचा , घरात दोन डंबेल्स आले होते, तिनं गाउन घालुन घराबाहेर जाणं सोडलं, लखनवी पार बॅगच्या तळाशी गेला होता. पण एक महत्त्वाची गोष्ट बदलली नव्हती ती म्हणजे हर्षदच्या नोकरीची जागा, चिंबोरी स्टेशनला एकच दिवस उरलेला असतना सिपि ऑफिस मधुन एक ऑर्डर आली अन सगळ्या बदल्या अनिश्चित काळापर्यंत स्थगित केल्याचं कळवलं गेलं, जेवढं दुखः हर्षदला झालं त्यापेक्षा जास्त सोनवणे आणि भरत दाबडे, जो हर्षदच्या जागी येणार होता त्यांना झालं. स्टेशनात पुन्हा हर्षदच्या नशीबाचं कौतुक केलं सगळ्यांनी. अशातच एक दिवस अनुजानं सकाळी निघताना त्याला सांगितलं ' घरात एक पुजा करुयात, चार लोकांना बोलवु जेवायला, आधी एकटा होतास ठिक होतं, पण आता बरोबर नाही, महिना झाला कोणी फारसं आलेलं नाही घरी शरद भावोजी सोडले तर' तसा तो ही धार्मिक होता, पण त्याला फारसं कुणाला घरी बोलावण्यात स्वारस्य नव्हतं, पण आता पुजेचा विषय काढल्यावर नाही म्हणणं ही जड गेलं, दिवस वार ठरला तसं, दोघंही पुजेच्या तयारीत गुंतली, सकाळी पुजा, दुपारी १५-२० लोकांची पंगत आणि संध्याकाळी छोटीशी पार्टी, असा बेत त्याच्याकडुन मंजुर करुन घेण्यात अनुजा यशस्वी झाली होती.
संसार म्हणजे काय काय याची ओळख त्याला पटायला लागली होती हळुहळु, अजुन दोन दिवसांनी पुजा होती, पहाटे जॉगिंगला जाणं चार दिवस बंदच होतं त्याचं, सातच्या सुमारास जाग आली, बेडच्या बाजुला कपाटासमोर उभं राहुन अनुजा केस पुसत होती, साबणाचा अन शांपुचा अजुन न उडालेला वास आणि केसातुन गळालेल्या पाण्यानं पाठीवर आणि कंबरेवर ओला झालेला गाउन , हर्षद्ची झोप पुरी उडवायला पुरेसा होता, तसंच पडल्या पडल्या पुढं सरकुन त्यानं अनुजाचा गाउन पकडुन ओढला अन तिला बेडवर पाडली. ' आईगं ' एकदम तोल गेल्यानं ओरडतच अनुजा बेडवर पडली, आणि त्यानं काही करावं याच्या आधीच सावरुन उठली. लंगडत लंगडत बाजुला होताना तिच्या चेह-यावर वेदना दिसत होत्या ' गुरुजीनी सांगितलंय, पुजेच्या आधी दोन दिवस पुर्ण पवित्र राहायचं, म्हणुन काही लाड नाहीत आता पुजा होईपर्यंत , आणि कपाट लागलं ना माझ्या पायाला केवढं ' ती तशीच लंगडत बेडरुमच्या बाहेर निघुन गेली, ' लाड केलेचं नाहीत तर पुजा होणारच कशी मग ?' होता त्याच मुडमध्ये राहुन हर्षंदनं विनोद करायचा प्रयत्न केला. ' आईगं, आउच, ' अशा आरड्या ओरड्यानं तो उठुन किचनमध्ये गेला, कपाट लागलेला पाय कट्ट्यावर ठेवुन अनुजा जखमेवर हळद लावत होती, तिची पैंजणं मध्ये येत होती, पुढं होउन त्यानं पैंजणं काढायचा प्रयत्न केला, पण ते काही जमेना म्हणुन मग ती पार पिंडरीच्या वर नेउन घट्ट रुतवुन ठेवली, तिनं तशाही अवस्थेत त्याच्या हातावर फटका मारला.
पुजेचा दिवस उजाडला, दोघांच्याही घरी कळवलं होतं पुजेचं, पण कुणी आलं नव्हतं, कारणं वेगवेगळी होती, त्याच्या आईचं ऑपरेशन ठरलेलं असल्यानं त्यांना प्रवास करायचा नव्हता, तिच्या घरी कुणाला वेळ नव्हता' अरे वहिनिच्या डिलिव्हरीची डेट आहे ना अशात, म्हणुन नाही येणार कुणी ' तिनं स्वताच्या मनाला अन हर्षदला समजवायचा प्रयत्न् केला, दिवसाचं महत्त्व आणि तिचा मुड पाहुन हर्षद्चं ' हो नकोच उगा प्रवास अशा वेळात ' म्हणुन पुढं ढकललं. सकाळी घरातलं सगळं आवरलं, निकाळजे काकु मदतीला होत्याच, गुरुजी आले, त्यांचं पु़जा मांडुन होईपर्यंत दोघांनी पुन्हा हात पाय धुवुन घेतले, त्यानं सोवळं पुन्हा एकदा घट्ट करुन घेतलं तर तिनं मुद्दाम आणलेली निळी पैठणी पुन्हा एकदा चोपुन बसवली, ' हा नॅपकिन, यालाच हात पुसा सोवळं घाण नका करु' त्याच्या कमरेला सोवळ्यात नॅपकिन खोचता खोचता तिच्या सुचना सुरु झाल्या. तिच्या खांद्यावरचा दुसरा नॅपकिन काढुन घेत हर्षद बोलला ' आता माझी पाळी, मी लावणार नॅपकिन तुझ्या कमरेला' तशी ती पटकन दुर झाली, पण त्यानं पुन्हा जवळ ओढलीच तिला, तसंच ढकलत आरशासमोर घेउन आला, आरशासमोर तिला पुढं घेउन उभा राहिला, तिच्या खांद्यावर हनुवटी टेकुन आणि दोन्ही हात तिच्या पोटावर आवळुन. न राहवुन तिनंसुद्धा त्याच्या दंडाना पकडलं, दोन क्षणच दोघांना खुप हवेहवेसे आणि गरजेचे होते.
दारातुनच शरदचा आवाज आला, ' हर्ष्या, अबे मला वाटलं झाली का काय पुजा ?' दोघंही एक एक करुन बाहेर आले, शरद त्याच्या बायकोबरोबर आला होता, ती सुद्धा जरीची काठापदराची साडी नेसलेली. अनुजा आणि शरदची बायको स्मिता पहिल्यांदाच भेटत होत्या, दोन मिनिटं दोघींचही हसणं बोलणं झालं आणि दोघी आत गेल्या. कॉलनीमधली पाच सात पोरं हॉलमध्ये दंगा करत होती. स्वयंपाकाला निकाळजे काकुच होत्या, निवडणूकित अपक्ष उमेदवार एकटाच प्रचाराचा गोंधळ करत फिरतो तशी त्यांची एकटीचीच गडबड चालु होती, एक दोन पोरं त्यांचं लक्ष चुकवुन काकडी, काजु असलं काहीतरी उचलायचे, त्यांच्यावर रागवणं चालु होतं. गुरुजींचा आवाज आल्यावर अनुजा बाहेर आली, दोघांनी किचन मध्ये जाउन देवाला नमस्कार केला, आता अव्हेलेबेल मोठं निकाळजे काकुच त्यांच्या पाया पडुन हॉलमध्ये येउन पुजेला बसले, गुरुजींनी पुजा सांगायला सुरु केली, दिड तास सगळे सोपस्कार चालु होते, कमरेचे नॅपकिन कमरेची शोभा वाढवत राहिले तर हर्षद्चं सोवळं अन् अनुजाची साडीवर नविन डिझाइन तयार होत राहिल्या. मागं भिंतीला टेकुन शरद अन स्मिता पुर्ण वेळ बसुन होते. गुरुजींनी 'नैवेद्याचं आणा' असा हाकारा करत आरतीची तयारी करायला घेतल्यावर हर्षदनं अनुजाकडं पाहिलं, आज आपण खुप काहितरी केलं याचं समाधान दाखवणारे डोळे बघुन त्याला खुप बरं वाटलं, त्याचवेळी निका़ळजे काकुंनी अंदाज चुकुन केलेला पाच किलो शि-याचं पातेलं समोर आणुन ठेवलं, म्हणजे आदळलंच, तेवढा शिरा पाहुन ही दोघंच काय गुरुजी देखील चाट पडले ' अरे वा, हल्ली एवढा प्रसाद गणेश मंडळं देखील करत नाहीत, यजमान, धार्मिक आहात तुम्ही, ईश्वरावर श्रद्धा आहे तुमची, जे हव ते भरभरुन देईल तो तुम्हाला, चिंता नको. उठा, ते पातेलं घ्या इकडं, पाणि फिरवा अन घ्या आरती करायला'
हॉलमधले सगळेच उठुन उभे राहिले,खांद्यावरचं उपरणं सावरत गुरुजींनी सुरुवात केली ' सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची......' तेंव्हा दरवाज्यात सोनवणे साहेब उभे होते विठ्ठल स्टाईलमध्ये..
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-22488125638690451192012-07-05T09:21:00.000+05:302012-07-05T09:21:01.827+05:30क क कपलचा - भाग ३...
क क कपलचा - भाग ३...
कुठलिहि गोष्ट पहिल्यांदाच करताना जो वेळ लागतो तेवढा घेउन हर्षदनं मेडिकल
काउंटरची खरेदी संपवली, तिथल्या पोरानं ज्या पद्धतीनं मयतीचं सामान देतात तसं, मख्ख
चेह-यानं सगळं सामान काउंटरवरच्या पोरीकडं दिलं, तिंनं तेवढ्याच मख्ख चेह-यानं सगळं
एका काळ्या बँगेत टाकलं वर बार कोडचं स्टिकर लावुन बॅग हर्षद्कडं दिली. त्याच्या
मनावरचं फार मोठं ओझं उतरल्यासारखं झालं, पंधरा मिनिटं रांगेत उभं राहुन बिल देउन
तो तिथुन बाहेर पडला, शरदला फोन करुन प्रितीलाच यायला सांगितलं अन सामान
घरी टाकायला आला. शेजारच्या निकाळजेंच्या दाराबाहेर दोन चार चपला जोड होते, ते बघत
दरवाज्याचं कुलुप उघडलं, आत येउन सगळं सामान जिथलं तिथं लावलं. काळी पिशवी तशीच
बेडरुम मधल्या कपाटात कपड्यांखाली लपवुन ठेवली अन बाहेर पडला. निकाळ्जेंच्या
घराबाहेर चपला वाढल्या होत्या, जाळीचा दरवाजा पुढं केलेला होता.
पुन्हा प्रितीपर्यंत यायला पंधरा मिनिटं गेली, शरद पोहोचलाच होता. नेहमीचं टेबल
नव्हतं, मग बाहेर गार्डन मध्येच दोघं बसले. ' हर्ष्या, भाड्या अशी ही शेवटचीच
पार्टी बहुतेक तुझ्याबरोबरची, मिल्याला बोलवु का, आणि वहिनी येणार होत्या ना आज, ते
सोडुन तु इथं कसा ? मोबाईल काढत शरद बोलला. ' अरे तिचा एसेमेस आला होता, एक्सप्रेस
१२ तास लेट आहे, उद्या साडेसात पर्यंत येणार आहे, तेंव्हा जाईनच आणायला.' बहुधा फोन
एंगेज लागत होता मिल्याचा ' आणि गाडी खरंच लेट आहे का हे पहायला तु स्टेशनवर गेला
असशील ना आता, इथं येताना ?' हर्षदला एकदम त्याचं टॉप सिक्रेट बोर्डावर टांगावं तसं
झालं. ' अबे भाड्या, मोजुन १०२५ दिवस झालेत माझ्या लग्नाला, हे अन असले सगळे घंदे
करुन बसलोय मी. तु आता काहीही कारणं सांग न भेटायला, मी तुला तुझी खरी कारणं
सांगेन, मी जिंकलो की प्रत्येक वेळी एक क्वार्टर, बोल लावतो काय बेट ? , हर्षदनं
हसुन वेळ काढली, तोवर वेटरनं शेव चकलीच्या वाट्या आणुन ठेवल्या. मग दोघं जण गप्पा
मारत साडेबारा पर्यंत निवांत बसले. पिणं संपल्यावर बारच्या दरवाज्यापर्यंत
दोघंही धडपडत आले, मग गळ्यात गळा घालुन रडले आणि मग निघुन गेले.
पिल्यावर हर्षद नेहमीच गाडी हळु चालवायचा, त्यात उद्या सकाळी उठुन
अनुजाला आणायला जायचं होतं, व्यवस्थित घरी आला, कुलुप काढताना पाहिलं निकाळजेंच्या
घराबाहेर दोन महागातल्या बुटांचे जोड होते.
नेहमी पिउन आल्यावर हर्षदला गपगुमान झोप यायची, पण आज टुम्म, काही केल्या झोप
येईना. एक तर जागा नविन, सारखा रस्त्यावरच्या गाड्यांचे हॉर्न वाजत होते, त्यानं
उठुन एका खोक्यातुन एफएम काढला, बेडरुम मध्ये लागेना म्हणुन बाहेर हॉल मध्ये
आणुन लावला, तो सेट होउन चालु व्हायच्या आतच बाहेरुन आरडाओरडा ऐकु आला, तसा लगेच
दरवाजा उघडुन पाहिलं, दोघंजण घाईघाईनं जिन्यावरुन खाली गेले, निकाळजेंच्या घराबाहेर
महागातले बुट दिसत नव्हते.
आत येउन, तो आता हॉलच्या खिडकितच बसला, आत एफएमवर ' दिल की ये आरजु थी' लागलं
होतं, दारु प्याली की अशी गाणी जास्तच केविलवाणी वाटतात हे त्याचं आवडतं मत होतं.
अनुजाला फोन लावला, आउट ऑफ रेंज होता. फोन चार्जिंगला लावुन पुन्हा त्यानं बेडवर
अंग टाकलं, झोप काही येईना. उठुन त्यानं कपाटातली काळी पिशवी काढली. '
ति**ला, ह्याचा अन चॉकलेट,स्ट्रॉबेरीचा काय संबंध, बोंबलायला, पब्लिकना ति**ला, काय
पण विकतंय अन काय पण विकत घेतंय, पण एकदा बघुच पुन्हा घाईच्या वेळेत जमेल नाय
जमेल' पाकिटं बाहेर काढली तसा शरदचा सल्ला आठवला ' अंधारात पॅकचा चमकणारा चौकोन
असलेला कोपरा ओळखता आला पाहिजे, नाहीतर संपलं सगळं ' त्याचं त्यालाच हसु आलं, मग
उठुन लाईट बंद केली ,घरातल्या लाईट बंद केल्या तरी रस्त्यावरच्या लाईटचा
उजेड खिडकीतुन आत यायचा अन नेमका बेडच्या पायाशी थांबायचा.
सहाला अलार्म वाजला तसा हर्षद उठला, आणि जोरजोरात हसायला लागला, रात्री
नशेत प्रॅक्टिस म्हणुन १२ पॅक फोडली होती, बेडवर सगळीकडं तोच कचरा होता. उठुन
त्यानं सगळं आवरलं, बेडशीट बाथरुम मध्ये नेउन भिजवुन ठेवली, काल दुध आणलं नव्हतं
त्यामुळं चहाचा प्रश्नच नव्हता, तसंही अजुन किचन सगळं लावुन झालंच नव्हतं, आवरुन
लगेच बाहेर पडला. त्यानं कुलुप लावुन जिन्याची पहिली पायरी उतरली तोच मागुन आवाज
आला, ' चहा घेणार का ?' या.' इति, निकाळजे काकु. प्रश्न पण आणि आमंत्रण पण, नक्की
काय करावं समजेना, पण चहाचा मोह काही मोडवला नाही. पहिल्यांदाच निकाळजेंच्या घरात
गेला, हॉलमध्ये सोफ्यावर बसला तोच निकाळजे काकु चहा घेउन बाहेर आल्या. चहा समोरच्या
टिपॉय वर ठेवला आणि आत निघुन गेल्या. आतुन पैंजणांचे आवाज येत होते, काकुंच्या
पायात पैंजण होते का नाही, त्यानं लक्ष दिलं नव्हतं. ' कांचन असेल, त्याला एकदम
आठवलं, काल काकुनी हेच नाव सांगितलं होतं, तीच असावी. फोन वाजला, अनुजाचाच होता.
पटकन चहा संपवुन कपबशी टिपॉयवर ठेवली, 'काकु थँक्यु,येतो मी' एवढं पटकन बोलुन
निघाला, कॉलनीच्या बाहेर येईन रिक्षा पकडुन स्टेशनवर आला.
एस-३ बोगीच्या दोन्ही दरवाज्यांच्या मध्ये उभा राहिला, टेनिसची मॅच
पाहिल्यासारखा मान हलवुन दोन्ही दरवाज्यांकडं पाहात होता. एकदाची त्याला उजव्या
दरवाज्यात अनुजा दिसली, हातावरची पुसटत चाललेली मेंदी, साडी, ब्लाउज, चपला, रुमाल,
टिकली सगळं पक्कं मॅचिंग, नवेपणाची सगळी दिखाउ लक्षणं उतु जात होती. हर्षदला
पाहिल्यावर तिनं हात हलवला पण मग हसावं की लाजावं तिला कळालंच नाही, ती तशीच अवघडुन
उभी राहिली. मागच्या पॅसंजरनं ' साईड' असं जोरात ओरडल्यावर भानावर येउन ती उतरली,
हर्षदनं पुढं येउन दोन्ही बॅगा घेतल्या. दोघंही थोडी सावरली, ' नवि बायको, नवं घर,
अपुन की तो निकल पडी बॉस, चल नविन घरी जाउ लगेच'. त्याच्या थिल्लरपणाचं तिला थोडं
हसु आलं थोडं कौतुक वाटलं, दोघंही स्टेशनच्या बाहेर आले. रिक्षानं घरी यायला पंधरा
मिनिटं गेली, दोन जिने चढुन दारासमोर आले तेंव्हा निकाळजे काकु बाहेरच होत्या,
वाण्याचं बिल देत होत्या. दोघांना हातानंच खुण करुन जिन्यात मागं सरकुन उभं
केलं, आत जाउन पाणी घेउन आल्या, भाताची मुद ओवाळुन टाकली, अन म्हणाल्या ' बोलला
नाहीत ते, सुधारस केला असता आज, कालचा पाक उरलाय ना जिलेब्याचा' , त्या घरात निघुन
गेल्या.
दोघं पुढं आली, घराचा दरवाजा उघडुन एकत्रच आत आली, एकमेकांना खेटुन आत येताना
दोघंही बावरली खरी, अनुजा आत आल्या आल्या बाथरुम मध्ये गेली, हर्षदनं सामान नेउन
बेडरुम मध्ये ठेवलं. ती बाहेर आली तसा तो दुध आणायला बाहेर निघाला ' मॅगी आणल्या
नसतील तर त्या पण आण ?' १२ वर्षे संसार झालेल्या बायकोसारखं अनुजानं विचारलं, '
हो, किचनमध्ये आहेत काढुन घे,आणि दरवाजा लावुन घे'. दार लावताना अनुजाचं लक्ष
शेजारच्या दाराकडं गेलं, उंब-याच्या दोन्ही बाजुन निटशी गाईची पावलं काढलेली दिसली.
' म्हणजे मला स्पर्धा आहे इथं पण' असा विचार करत तिनं दार लावलं, सगळं घर फिरुन
पाहिलं, किचनमध्ये पसारा तसाच होता, इलेक्ट्रिकची शेगडी वर काढलेली होती, पण तिला
याचा काही अनुभव नव्हता, म्हणुन तिनं त्याकडं दुर्लक्ष केलं. हर्षद आलाच तेवढ्यात,
दरवाजा उघडल्या उघडल्या हातातली दुधाची गार पिशवी अनुजाच्या पोटावर चिकटवली,
मगाशी गाडीतुन तिनं हात हलवुन इशारा केला तेंव्हापासुन तो लक्ष ठेवुन होता, चान्स
आता मिळाला. एकदम चिरकुन अनुजा मागं सरकली. बाहेर येउन दाराकडे पाहात निकाळजे
काकुंनी त्यांच्या घराचा दरवाजा सुद्धा धाडकन लावुन घेतला.
' गॅस नाही आला ना हो अजुन, मी बोलले होते ना तुम्हाला महाबळेश्वरलाच, मला नाही
येत त्या लाईटच्या शेगडीवर काही करायला, शॉक बिक बसला म्हणजे ?' पंधरा
मिनिटानंतर घरातुन सहजतेनं अर्थ लागु शकेल असा आलेला हा आवाज. ' हो मगासारखाच लागेल
शॉक, फक्त गरम चटका असतो लाईटचा गार नाही' हर्षद किचनमध्ये जात जात बोलला. ' हे बघ
मी दाखवतो, ही पिन ह्या प्लग मध्ये घट्ट बसवायची, लुज बसली की फरफर ठिणग्या पडतात,
आणि हे लाल बटण दाबायचं, एका मिनिटात सगळी कॉईल लालबुंद होते, मग
काय वर भांडं ठेवायचं, त्यात पाणि ओतायचं, ते उकळलं की मॅगी टाकायची, दो मिनिट में
तयार' असं म्हणुन त्यानं प्रात्याक्षिक करुन दाखवलं. ' अहो मिस्टर, पण आयुष्यभर
मॅगीच खाणार आहोत का तिन्ही त्रिकाळ, बाकीचं कसं करणार, मला नाही जमायचं
ह्याच्यावर' अनुजानं पुन्हा स्पष्ट नकार दिला. अर्ध्या तासात मॅगी आणि चहा, एवढं
आटोपुन दोघं हॉल मध्ये येउन बसली ' आज सुटी घेतलीत का हो ?' अनुजानं विचारलं, नाही
स्टेशनला शेवटचे तीन चार दिवस आहेत, बरीच कामं पडलीत. एक वाजेपर्यंत जाईन, रात्री
यायला दहा वाजतील. बाहेरच जाउ जेवायला आज, दोन्ही वेळा, आणि शेजारी विचारुन
कामवालीचं वगैरे पाहुन घे' जसजशी मॅगी गार होत होती तसतसा संसाराची फक्त स्वप्नंच
रम्य असतात याची जाणिव दोघांना होत होती. मागच्या महिन्यातली लग्नाची रजा, बदली आणि
घर बदलणं यात ब-याच गोष्टी करायच्या राहुन गेल्या होत्या.
हर्षदचा फोन वाजला, सोनवणेंचा फोन होता ' काय मिस्टर, कुटुंब आलं काय घरी ?
पोहोचले ना व्यवस्थित, मग इथं कधी येताय, चिकार राडा आहे निस्तरायचा, तिथला संसार
कुटुंब बघेल या इथं लवकर, नाहीतर चार दिवस नाईट मारावी लागेल.' फोन कट.
हर्षदच्या चेह-यावर टेन्शन दिसायला लागलं, तो उठुन आवरायला गेला, अनुजानं उठुन
सामान लावायला सुरुवात केली, ज्या एक दोन गोष्टी तिनं विचारल्या त्याला काहीतरी
उत्तरं देउन हर्षद बाहेर पडला. त्याला युनिफॉर्ममध्ये अनुजा पहिल्यांदाच बघत होती,
एकदम चार्मिंग वगैरे दिसायचा फोटोत पण प्रत्यक्ष काही फार बरा नाही दिसत असं तिला
वाटलं. दुपारी एकच्या सुमारास तो परत येईपर्यंत बरंचशी जागा मोकळी झाली होती, तो
आला तेंव्हा अनुजा तयारच होती, दोघंजण बाहेर जेवण करुण आले, तिला घरी सोडुन तो
पुन्हा स्टेशनला निघुन गेला. तिनं आता पिसि जोडायला घेतला, अर्धा तास खटाटोप करुन
ती विडोजच्या पासवर्ड पर्यंत येउन थांबली, फोन करुन हर्षदला पासवर्ड विचारला तर
त्यानं ऑफिसचे महत्त्वाची माहिती त्यात आहे असं सांगुन पासवर्ड देणं टाळलं खरं, पण
बिसिए केलेल्या अनुजाला दहा मिनिटं पुरेशी होती, सिस्टिम सुरु करायला.
थोडंफार शोधाशोधी करुन झाल्यावर, हर्षदला नक्की जे लपवायचं होतं ते सापडलं...
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-61294142621460372512012-06-25T23:47:00.000+05:302012-06-25T23:47:33.725+05:30क क कपलचा - ०२
क क कपलचा - ०२
प्रीती मधली पार्टी संपवुन हर्षद क्वार्टरवर आला, 'क्वार्टर चढवुन क्वार्टरवर
येणे' अशी एक निरर्थक कोटी तो नेहमी करायचा, आईचं शिक्षिका असणं हे यामागचं एक कारण
होतं, त्याचा अन साहित्याचा तेवढा एकच संबंध होता बाकी त्याचं आयुष्य निरस होतं
म्हणलं तरी चालेल, किंवा तो तरी म्हणायचा. त्याला दारु पिताना सुद्धा पंकज उदास
वगैरे काही लागयचं नाही, हां लसुण शेव फार गरजेची गोष्ट आहे असं त्याचं स्पष्ट मत
होतं. दाराचं कुलुप काढुन त्यानं समोरच्या खोलीतच ठेवलेल्या सिंगल बेडवर अंग टाकलं
अन छताकडं पाहता पाहता त्याला अनुजा, त्याची बायको आठवली. लग्न होउन महिना होउन
गेला होता. देव देव आटोपुन हनिमुनला गेला होता तेंव्हाच्या गोष्टी त्याला आठवायला
लागल्या. लग्न झाल्यापासुन हे एक नविनच होत होतं, दारु पिल्यावर सुद्धा ब-याच
गोष्टी आठवायच्या, नाहीतर आधी लगेच झोप लागायची. थोडा वेळ छतावर अनुजाचा चेहरा बघुन
झाल्यावर तो उठला अन आत किचनमध्ये जाउन बेसिन मध्ये तोंड धुतलं.
उद्या
सुट्टी घेतली होती, कारण क्वार्टर बदलायची होती. ह्या वन रुम किचन मधुन वन बेडरुम
किचन मध्ये सगळं सामान शिफ्ट करायचं होतं. सकाळी आठच्या सुमारास टेंपो येणार होता,
त्याआधी पुन्हा एकदा त्यानं सगळी पॅकिंग चेक करुन घेतली. महत्त्वाचं सामान आजच नेउन
टाकलं होतं. लग्नातलं रुखवतातलं सामान डायरेक्ट तिकडंच नेउन ठेवलं होतं. आता उरलं
होतं गेली दोन - तीन वर्षे त्याला सोबत करणारं बॅचलरातलं सामान.
तोंड धुवुन सामान आवरुन सुद्धा तीनच वाजले होते, आता झोपणं भाग होतं, उद्याचा
दिवस सगळा घर लावण्यात जाणार होता, आणि संध्याकाळी अनुजा येणार होती तिला घ्यायला
जायचं होतं. पुन्हा तिच्या विचारानं त्याचं डोकं चढलं, सगळं अंग थरथरलं. उगाचच या
अंगावरुन त्या अंगावर होता होता त्यानं स्वतालाच मिठित घेतलं, दोन्ही पंजे आपल्याच
पाठीवर दाबुन अंगाखालच्या उशीवर चेहरा घासायला लागला, उशीवरचा त्याचा कान त्यालाच
गरम लागत होता. तशीच कधीतरी त्याला झोप लागली. सकाळी जाग आली ती शरदच्या फोनमुळं,
शरद त्याचा जोडीदार आणि सध्या ट्रॅफिकला चिंबोरीतच होता. सामान हलवायला टेंपो आणि
माणसं तोच आणणार होता. त्याला यायला अर्धा तास होता, आंघोळ करणं भागच होतं
म्हणुन त्यानं आवरलं, अंदरकी बात बाहेर समजु नये म्हणुन सरळ कपडे एका प्लॅस्टिकच्या
बॅगेत भरले आणि वाट पहात बसला.
माणुस जिथं राहतो मग ते एक दिवस असेना का आयुष्यभर त्या जागेची एक ओढ लागते,
हर्षदला आता तेच जाणवत होतं, किचनच्या खिडकितुन दिसणारी मागची डोंगररांग अन हल्लीच
त्यावर सुरु झालेलं हॉटेल पाहताना त्याला एकदा वाटलं की आता पुन्हा ही मोकळी हवा
मिळेल का नाही कुणास ठाउक. डिपार्ट्मेंटचे फॅमिली क्वार्टर म्हणजे अगदीच
खुराडी होती, कुण्या बिल्डरनं सरकारी कोट्यातुन बांधुन दिलेल्या त्या इमारती,
बाहेरुनच इतक्या वाईट दिसायच्या की विचारता सोय नव्हती आणि मॉडर्न डिझायनच्या
नावाखाली बिल्डरनं बाकी साईट्वर उरलेलं मटेरियल तिथं खपवलं होतं, पण आता उपाय
नव्हता.
साडेआठला शरद टेंपो घेउन आला आणि तो ड्रायव्हर आणि सहा पोरं हर्षदच्या ताब्यात
देउन ड्युटीला निघुन गेला. साडेअनउ ते दिड वाजेपर्यंत दोन ट्रिप झाल्या, सामान घरात
उतरवुन टेंपो निघुन गेला, आणि सामान लावायला जेवण करुन येतो म्हणुन ती सहा पोरं पण
गायब झाली, हर्षद पुन्हा सकाळच्याच सिन मध्ये आला, हे एवढं मोठं सामान पडलेलं आणि
मध्ये तो. भुक त्याला पण लागली होती पण बाहेर पडायचा प्रचंड कंटाळा आला होता, घर
हलवलं हे सांगायला त्यानं फोन लावला अनुजाला, चार वेळा एंगेज. मग शेवटी आईला फोन
लावला, सगळं कसं कसं झालं सांगितलं, त्याचं बोलणं होईपर्यंत अनुजाचा बारा वेळा कॉल
येउन गेला. यानं काही रिटर्न कॉल केला नाही, फक्त एसेमेस - हाउस शिफेट्ड
नाउ,थँक्स. आता सहापैकी दोनच पोरं परत आली, मग त्या दोघांना शिव्या घातल्या.
त्याचा
आवाज खाली उतरेपर्यंतच दरवाज्यात बहुधा शेजारच्या घरात राहणा-या काकु येउन उभ्या
राहिल्या. अंगावरच्या साडी अन दागिने पाहुन गेला बाजार सौ. एपिआय तरी असणार असा
विचार करुन तोंड बंद् करुन हर्षदनं नमस्कार केला.'जेवणाची काय सोय केली?' - काकुंचा थेट प्रश्न. नाव वगैरे काही न विचारता
आलेल्या ह्या प्रश्नानं तो बावचळला. ' अं हं, नाही आता चाललोच आहे आता, हे आलेत
लावतील सामान'. त्याच्या उत्तरानं काकुंचं समाधान झालं नाही, ' थांबा, सामान
यांच्या जीवावर टाकुन कुठं जाताय ?' मी ताट आणुन देते, का येताय आमच्याबरोबरच मी
आणि कांचन बसतोय आता?' हो म्हणावं का नाही हा पेच हा हर्षदच्या आयुष्याचा अविभाज्य
घटक बनला होता, पहिल्यांदा लाच घेताना, अनुजाला पसंती कळवताना आणि हनिमुनच्या काही
प्रसंगात तर हा घटक फार बेक्कार अवघड करुन गेला होता. ' नाही नाही, उगा तुम्हाला
का त्रास, असु दे, माझा नाष्टा झालाय सकाळीच मजबुत' कसंतरी उत्तर दिलं अन चेहरा
ह्सरा केला. ' नाष्टा झालाय ना, मग ठीक आहे आणि त्रास काही नाही, आमची मेस आहे,
एखादा मेंबर नसतो एखादं दिवशी मग उगा वाया जातं ' एवढं बोलुन काकु निघुन गेल्या.
सगळं सामान जागच्या जागी ठेवायला सहा वाजले, दोन्ही पोरं निघुन गेली आणि मग
नव्या घराला कुलुप लावुन हर्षद बाहेर पडला. शेजारच्या घरावरची पाटी पाहिली
श्री. श्.दि. निकाळजे सि.कॉ. एवढंच लिहिलेलं. म्हणजे दुपारी पाहिलेले दागिने हे
त्या मेसचा आशीर्वाद होता, आणि ते देखील खरे होते का कसे काय माहित. खाली उतरुन
बाहेर आला, ही जागा चिंबोरीच्या एकदम हार्ट ऑफ् दी सिटीत होती, कंपाउंड्ला लागुनच
रिक्षा स्टँड, उजव्या बाजुला एक मिनि शॉपिंग सेंटर जिथं बरंच किंवा बहुतेक सगळंच
मिळायचं, तर डाव्या बाजुला फुटपाथवरच भरणारा भाजी आणि मासळी बाजार होता.
बॅचलर क्वार्टर या बाबतीत फार छान होती असं त्याला उगाचच वाटलं. तरी बाहेर पडल्यावर
येणा-या गाड्या माणसांच्या आवाजाला सरावुन घेण्याचं ठरवत, रिक्षा पकडुन भद्रा सन्स
च्या सर्विस सेंटरला आला, चिठ्ठी दाखवुन पैसे देउन आपली पल्सार घेतली, यावेळी
गाडीला पॉलिश करुन घेतल्यानं मस्त फिल होता.
ऑइल बदलल्यानं इंजिन सुद्धा
एकदम स्मुथ झालं होतं, त्याला उगाचच दर पंधरा दिवसाला गावाकडं जाउन ऑइंलिंग करुन
येतो म्हणणा-या शरदची आठवण झाली, आता अॅडजेस्ट करुन थोडं मागं सरकावं लागलं नाहीतर
तो एवढं मागं कधी बसायचा नाही. थेट सांदवी फाट्याचा स्टुडिओ धाबा येईपर्यंत गाडी
तीस ते एकशे दहा सगळ्या रेंजमध्ये चालवुन झाली होती.
आज पंचवीस तारीख, उद्यापासुन सहा दिवस उरले चिंबोरी स्टेशनला. एक तारखेपासुन
थेट कोर्टात ड्युटी बदली मिळाली होती. लग्नानंतर तरी काही माहिने त्याला दहा ते
पाच ड्युटी हवी होती. धाब्यावरच्या पोराला दोन रोटी अन दाळ फ्राय आणायला सांगुन
त्यानं निवांत ताणुन दिली. आता वर आभाळातल्या ढगात पण त्याला अनुजाची फिगर दिसायला
लागली, लगेच पुन्हा फोन केला. यावेळी तिचं नशीब चांगलं होतं, मग अर्धा तास एकदा
इकडुन एकद तिकडुन सॉरी, झालं का, हो, नाही ,उद्या असा फोन झाला. धाब्यावरचं पोरगं
पण त्याचा फोन अन चेहरा बघुन गालातल्या गालात हसत होतं.
शेवटी फोन ठेवल्यावर
त्यानं जेवण आणुन दिलं. पटकन जेवण संपवुन निघाला, ते थेट गोल चौकातल्या नव्या मॉल
मध्ये आला. खरंतर त्याला बाहेरच्या खिडकित दिसणारे झिरझ्रिरते गाउन घ्यायचे होते,
पण पुन्हा तोच हो का नाही हा पेच उभा राहिला, बराच वेळ तो तिथल्या चार पुतळ्यांपैकी
नक्की कोणत्या पुतळ्यासारखं अनुजाचं अंग आहे याचा हिशोब लावत होता. शेवटी एवढ्या
मोठ्या ट्रॉलीत काहीतरी घ्यायचं म्हणुन दोन डिओ, एक बेडशीट जोड, पाच मॅगीचे पुडे,
हे अनुजानं सांगितले म्हणुन, एवढं घेउन निघाला. पण ज्यासाठी तो इथं आला होता त्याला
हात घालायची त्याची अजुन हिंमत होत नव्हती. ओटिसि मेडिकलच्या काउंटरसमोरुन दोन
तीन फे-या मारुन झाल्यावर तिथल्या पोरानंच त्याचा अंदाज घेत त्याला विचारलं 'काय
हवंय साहेब ?'
एवढ्या मोठ्या जागेत, ह्या पोराला सांगायचं कसं काय हवंय ते आणि ते पण
मागं काउंटरवर एक पोरगी उभी असताना हा त्याला प्रश्न पडला, तो इकडं तिकडं पाहतोय हे
लक्षात घेउन तो पोरगा त्याला मागच्या रॅककडं घेउन गेला, 'साहेब, फक्त इथले पॅक
रिकामे आहेत, तुमचं झालं की मला सांगा,आणि हे काही स्पेशल ऑफर पण आहेत ते पण बघा'
एवढं बोलुन हर्षदच्या हातात चार दोन गुळगुळीत जाहिराती दाबुन तिथुन निघुन गेला.
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-297613858262460051.post-23391455630998000442012-06-17T17:57:00.000+05:302012-06-17T17:57:25.196+05:30
क क कपलचा .....
बाकी लोकं चिंबोरीतुन बदली झाली की शक्य ते सर्व प्रयत्न करायचे ती टाळायचे, अगदी काहीही म्हणजे माझ्या आईची ट्रिटमेंट जवळच्या शामताबेन हॉस्पिटलमध्ये आहे तरी माझी बदली करु नये, अशी काहीही कारणे असायची त्या अर्जात, हर्षद्ला असे अर्ज घेतानाच काय पण आत साहेबांना नेउन देताना सुद्धा हसु आवरायचं नाही, पण ८-१० दिवसांत असेच अर्ज विनंती मंजुर होउन परत यायचे तेंव्हा आश्चर्य देखिल वाटायचं.
आज त्याच चिंबोरी पोलिस स्टेशनात हर्षदचा शेवटचा दिवस होता ३० एप्रिल , तो इथं आला तीन वर्षापुर्वी. सोलापुरात ९ वर्षांनी पोलिस भरती झालेली त्यात नशिबानं अन, वडिलांच्या ज्या वरकमाईचा त्याला एकेकाळी राग होता, त्या वरकमाईचा यथोचित उपयोग तो डिपार्ट्मेंटला जॉइन झाला. सोने पे सुहागा का काय तसं, त्याला पहिलीच रायटरची पोस्ट मिळाली चिंबोरीला. हे मात्र फक्त भाग्यातच असावं लागतं. पहिल्या दिवसापासुन चिंबोरीतला प्रत्येक जण त्याच्या नशिबाची तारीफ करायचा. प्रत्येकवेळी तो सुखावुन जायचा, दोन महिन्यात त्याला या कौतुकाची सवय झाली अन त्यामागची भावना पण समजुन यायला लागली. मग सहा महिन्यात तो सरावला, पुढं वर्षभरात स्थिरावला आणि तीन वर्षात दुणावला. अंगानं आणि पैशानं दोन्ही बाजुनं.
जानेवारीत लग्न ठरलं तेंव्हाच त्यानं सोनवणे साहेबांकडं बदलीसाठी अर्ज केला होता, कारण दिलं होतं पालकांच्या तब्येतीचं, अर्थात ते कागदावर लिहिलेलं. सोनवणेंच्या घरी गेल्यावर त्यानं स्पष्ट सांगितलं होतं ' साहेब, दोन अडीच वर्षात बरेच भले बुरे संबंध निर्माण झालेत, लग्न झाल्या झाल्या इथं नकोय आणायला मला बायकोला ' सोनवणे पाच मिनिटं डोळे मिटुन बसले आणि मग त्याला म्हणाले ' हर्षदराव, हे आपलं डिपार्टेमेंट आहेच असं *****, तिज्यायला यातुन मिळणारी सगळी ऐश पाहिजे बायकोला, पोराला पण ह्याच्या घाणीचा वास नको घरात घुसायला. तुला काय वाटतं, चिबोरी सोडलंस म्हणजे या सगळ्यापासुन दुर जाशील, हा वास जाईल का युनिफॉर्मचा , ** नाही जात, साला ही वर्दी अंगावरुन उतरवलीस ना तरी तिची मस्ती , तिचा माज डोक्यातुन कधीच नाही जाणार लिहुन ठेव , साला फुकणीचा रायटर कुठला , जा बोलतो मी त्या हराम्याशी, पाकिट मात्र तयार ठेव, ज्या दिवशी हो म्हणेल त्या दिवशीच डिल सोडवायचं, रात्र गेली की काही आठवत नाही इथं कुणाला. '
सोनवणेंनी काम केलं, अर्थात तिथंही डबल गेम केलाच, जो येणार होता त्याच्याकडनं पण पैसे घेतलेच होते. हर्षदला एवढ्याच गोष्टीचं बरं वाटलं की लग्नात स्टेशनच्या लोकांनी ४ तो़ळ्याच्या अंगठ्या दिल्या दोघांना पण आणि गेलेले थोडे वसुल झाले. आज रात्री प्रिती मध्ये पार्टी होती सेंडऑफची. त्याच्या तयारिसाठी त्यानं आपला आयफोन काढला अन महेश मांढरेना फोन लावला. ' नमस्कार, स्टँडिंग कमिटि मेंबर साहेब'...
क्रमशः
Print Page
हर्षद छत्रपतीhttp://www.blogger.com/profile/10306615638696495157noreply@blogger.com0