Tuesday, December 28, 2010

पण तुमचं आमचं सेम नसतं..

प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आमचं सेम नसतं..

कॊलेजच्या शेवटच्या वर्षी मी प्रेमात पडल्याची मला खात्रि झाली होती आणि ती माझ्या मित्रांना पण असेल असं मला वाटत होतं. मी माझ्या आठवणींवर जोर दिला तेंव्हा असं लक्षात आलं की, हे सगळे मागच्या वर्षी म्हणजे दुस-या वर्षी सुरु झालेलं होतं. एका दिवशी माझा शर्ट आणि तिचा टॊप सेम टु सेम डिझाईनचा होता, काही मित्रांनी त्यावरुन चिडवलं आणि मनातल्या त्या कोमल प्रेमाच्या भावना वाढीस लागल्या. आमच्या कॊलेजातलं वातावरण फार मोकळं वगॆरे नव्हतं पण मुलं+मुली अशा शाळेच्या वातावरणातुन इथे आलेला मीच होतो, बाकी माझ्या ग्रुपचे सगळे फक्त मुलांच्या शाळेतुन आलेले होते.

प्रॆक्टिकल वगॆरे आम्ही एकत्रच असायचो तरी सुद्धा फार बोलणं वगॆरे नव्हतंच, फक्त समोर बसणं, कधीतरी फाईल, सबमिशन या वरुन बोलणं व्हायचं तेवढंच. तरी पण असं वाटायचं की आता जे मला वाटतंय तेच तिला पण वाटत असणार आहे. अशा विचारात एक वर्ष कसं गेलं ते कळालंच नाही. त्या वेळी १४ फेब्रुवारी पेक्षा १४ नोव्हेंबरलाच अजुन जास्त महत्व होतं निदान आमच्या लेखी तरी. नाही म्हणायला मी एकदा आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलींना आमच्या घरी नाष्ट्याला बोलावलं होतं, ती पण आली होती.

त्यादिवशी त्या सगळ्यांना सोडायला गेल्यावर गेलाबाजार दोस्तीचा तरी विषय काढायचा असा माझा विचार होता, पण ते सोलापुरातले रस्ते, रहदारी छे सगळंच माझ्या नशीबाच्या विरोधात होतं. हात हलवत आणि पायडल मारत परत आलो घरी. पण तिस-या वर्षी मात्र एकदा घरुन कॊलेजला जाताना तिच्या रस्त्यावरुन गेलो होतो, बरोबर तो रस्ता आधी ब-याच वेळा पाहुन ठेवलेला होता, दोघंही सायकलवर, नव्हं एकाच नाही आपल्या आपल्या, मागुन जात असताना सायकल जरा जोरात दामटली आणि तिच्या बरोबर जाउन तिला विचारलं, मुझसे दोस्ती करोगी?

आणि काय सांगु मंडळी माझा अंदाज कधी नव्हे ते बरोबर आला, अगदी मनकवडी होती ती, लगेच माझ्या मनातलं ओळखुन बोलली ती हं............... नाही. आज लक्षात येतंय की हिंदीतुन विचारलेल्या माझ्या प्रश्नाला तिनं दिलेलं मराठी उत्तर हे सध्या गाजणा-या भाषाप्रश्नाचं मुळ आहे. तिनं नाही म्हणल्याबरोबर मी ज्या स्पीडनं सायकल चालवली म्हणता की विचारयाची सोय नाही. त्या वर्षी कॊलेज संपताना आमच्या कडे स्क्रॆपबुक भरायची फॆशन होती, त्यात सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या मुलींच्या स्क्रॆपबुकात एकच ओळ लिहिलेली होती - छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते हॆ तुम कही तो मिलोगे कभी तो मिलोगे तो पुछेंगे हाल....

नंतर त्यातल्या काही भेटल्या काही आजपर्यंत कधीच नाहीत, कधी भेटतील माहित नाही. आज जर तिनं हे वाचलं तर तिच्या पण मनांत त्या आठवणी उभ्या राहतील तशाच आणि एक रात्र जाईल अर्धवट झोपेत अर्धवट जागेत, तिची आणि माझी पण.

आज वाटतं जे मी केलं ते प्रेम नव्हतंच ते फक्त आकर्षण होतं, प्रेम तर अजुन होतंय, मी अजुन पर्यंत माझ्यावरच्या प्रेमातुनच बाहेर पडत नाहिये तर दुस-या कोणावर काय प्रेम करणार आहे.

हर्षद

वाचकांना नम्र विनंती बरा वाईट जो असेल तो प्रतिसाद द्यावा.

9 comments:

Maithili said...

छान झालिये पोस्ट... :-)

हर्षद छत्रपती said...

thanks very much and keep visiting.

~~~~~Atul~~~~~ said...

Bhooli Bisari Yaadon Main Abhi Kahi Pyaar Chupa Hain..........

हर्षद छत्रपती said...

atul thanks for the reply keep visiting.

DipesH- said...

prem he kay asata kunalach kalal nahi

हर्षद छत्रपती said...

dipesh, thanks for the comment keep visiting and many a best wishes to you for your blog.

Dev said...

अजुन दुसर्‍या भाग वाचायचाय पण हा खुप आवडला, भूतकाळात घेऊन गेला. त्या दिवसांची गोड आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद..
Tha way you exploit your experiences, to end up with such a post is fascinating. Special admiration for "आज जर तिनं हे वाचलं तर तिच्या पण मनांत त्या आठवणी उभ्या राहतील तशाच आणि एक रात्र जाईल अर्धवट झोपेत अर्धवट जागेत, तिची आणि माझी पण." this line. Time for part 2 :)

हर्षद छत्रपती said...

dev, thanks a much and keep visiting. your blog is also very good, will like to get some guidance from you on photography. can you send your email.

Unknown said...

CHAAN LIHTOS.....ARE PAN FIRST TIME NAHICH MHANTE PORAGI

Post a Comment