Sunday, December 5, 2010

मिंटीच्या जन्मस्थानी..

मिंटीच्या जन्मस्थानी....

गेल्या शुक्रुवारी  म्हणजे ३ डिसेंबारला टिम फियाट ईंडिया व फियाट ईंडिया च्या वतीने, सर्व फियाट्च्या गाड्या वापरणा-यांसाठी फियाट्च्या रांजणगांव येथील फॆक्टरीच्या भेटीचा कार्यक्रम योजला होता. माझी एखाद्या गाडी बनवणा-या कारखानाल्या भेट देण्याची पहिलीच वेळ होती.पुढ्च्या महिन्यांत माझी मिंटी दोन वर्षांची होईल,त्या आधीच तिच्या जन्मस्थानी जाणं ही तिच्यासाठी एकप्रकारे तिच्या वाढदिवसाची भेट्च होती.

शुक्रुवारी सकाळी मी मिंटी मधुन व शांतिश त्याच्या मल्टिजेट मधुन बालेवाडी जवळच्या हॊटेल विट्स मध्ये पोहोचलो. तिथे आधिच बरेच पुंटो व लिनिआ आलेल्या होत्या. थोड्याच वेळात येणा-या घुं॓॓॓॓॓॓॓॓॓ आवाजाने प्रगल्भ भंडारीच्या आगमनाची वर्दी दिली. मग आम्ही अमोघला भेटलो, अमोघ टिफिईं चा पुण्यातला कोऒर्डिनेटर आहे. त्याच्या चेह-यावर लग्नाच्या कार्यालयांत मुलीच्या मामाच्या चेह-यावर असतात तसे भाव होते, काय हे किती उशीर, अजुन व-हाड (मुंबई टिफिईं चा ग्रुप) कसं नाही आला अजुन वगॆरे.

माझी व शान्तिश च्या पेलियो


आत मध्ये सगळ्यांसाठी नाष्टाची व्यवस्था केलेली होती, तिथेच टिफिईंचे टि-शर्टस पण मिळत होते, आम्ही नाष्टा करताना चेतन हिरेमठ पण आले, नंतर मुंबईच्या ग्रुप बरोबर संजीव हरिकांत पण आला. चला आमचा पॆलिऒचा ग्रुप पुर्ण झाला होता. इथेच फियाट्ची पुंटो स्पोर्टस ९० एचपी सुद्धा आणली होती. निघायच्या आधी फियाट ईं. चे सिओ ओ श्री. राजिव कपुर यांच्याशी भेट झाली. आपल्या कंपनीचे वाहन विकत घेणा-यांसाठी त्या कंपनीचा सर्वोच्च अधिकारी येतो ही गोष्ट खुप मोठि आहे, या साठी श्री. राजीव कपुर व टिम फियाट ईंडिया यांना धन्यवाद.

साडेन उ ला विटस मधुन निघालो, ते बाणेर - शिवाजी नगर - बंड गार्डन- येरवडा - वाघोली - शिक्रापुर मार्गे साडेअकराच्या सुमारास रांजणगावला फियाट्च्या कारखान्यात हा सगळा फियाट मेक गाड्यांचा ताफा पोहोचला. माझ्या माहिती प्रमाणे साधारण ७० ते ८० गाड्या होत्या एकुण.


माझी मिंटी  फियाट कारखान्यात

कारखान्यांत आत गेल्यावर थोडीशी माहीती व चहा/कॊफी/थंडपेय घेउन झाल्यावर एकुण जमलेल्यांचे दोन ग्रुप करण्यांत आले. त्या पॆकी आमचा ग्रुप पहिल्यांदा पॊवर्ट्रेन म्हणजे कारचे गिअर बॊक्स व ट्रान्समिशन ड्राईव्ह जिथे बनतात तो विभाग पाहायला गेला. तिथे फियाटच्या उपस्थित अधिका-यांनी अतिशय उत्तम प्रकारे व सर्वांना समजेल अशा पद्धतीने सर्व तांत्रिक माहीती सांगितली. आज पहिल्यांदा गिअर टाकतो म्हणजे काय होतं ते कळत होतं, गाडी चालवताना जेंव्हा ईंजिन ३००० आरपिएम ला फिरत असतं आणि मी सहज चवथ्या गिअर वरुन पाचव्या गिअर वर जातो, तेंव्हा खाली काय काय होत असतं याची कल्पना आली. विशेष म्हणजे हा विभाग त्याच्या सध्याच्या परिस्थितित शक्य आहे तेवढा स्वयंचलित आहे. आज गिअर बॊक्स व ईंजिन तयार करण्याच्या बाबतीत फियाट हे जगात अग्रगण्य आहेत, त्याचे कारण हा विभाग पाहिल्यावर समजतं. कुठेही रंग, तेल किंवा कशाचेही डाग नाहीत, उगीचच आरडाओरडा नाही, कसला गोंधळ नाही, प्रत्येक जण आपल्या नेमुन दिलेल्या मशिनवर फक्त लक्ष ठेवतो आहे, काम मशीनच करते आहे हे द्रुश्य खुप छान वाटलं.

या नंतर आमचा ग्रुप कार असेंब्ली प्लॆंट मध्ये गेला. आता खरंच गाडिच्या कारखान्यांत आल्या सारखं वाटत होतं. प्रत्यक्ष गाडी बनताना पाहणं हा एक खुप सुखद अनुभव आहे. या विभागांत सुद्धा जवळपास ४० टक्के काम हे रोबो करतात. प्रत्येक भाग आपोआप बेल्ट वरुन ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी येतो आणि रोबो त्यांच्या ठरलेल्या पद्धतीने तो पार्ट एकमेकांना जोडतात, सगळं काही अतिशय शिस्तबद्ध चाललेलं असतं. छोट्याशा स्क्रु पासुन ते पुढच्या/मागच्या काचा, टायर, ईंजिन सर्व काही पुढे पुढे चालत जाणा-या असेंब्ली लाईन वर जोडलं जात होतं. आम्ही पुर्ण विभाग फिरुन येईपर्यंत जवळपास ३ गाड्या पुर्ण होवुन बाहेर टेस्टींग व शेवटच्या क्वालिटी निरिक्षणासाठी तयार झाल्या होत्या. सध्या इथे फियाट्च्या पुंटो. लिनिआ व टाटाच्या मांझा या गाड्यांचं उत्पादन होतं.

आता पोटात भुक लागल्याची जाणिव होत होती, त्यामुळे सगळे जण त्यासाठी पुन्हा सकाळच्या एकत्र जमलेल्या ठिकाणी आलो. जेवणाची सोय देखिल अतिशय छान केलेली होती. जेवण झाल्यावर सर्व उपस्थित ग्राहक व फियाट्चे उच्च अधिकारी यांच्या मधील गप्पांचा एक अनॊपचारिक कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला सुद्धा श्री. राजीव कपुर स्वत: उपस्थित होते, त्यांच्या छोट्याश्या व छान भाषणानंतर एक छोटासा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. या मध्ये श्री. रवि भाटिया यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. यानंतर दोन अतिशय सुखद आश्चर्याचे अनुभव सर्व उपस्थितांना आला. फियाट तर्फे सर्वांना दोन भेटी देण्यांत आल्या. एक म्हणजे फियाट्च्या ५०० या लक्झरी कारच्या आकाराचा अतिशय सुंदर माउस व सर्व गाद्यांसाठी टाकी फुल्ल होईपर्यंत इंधन, अगदी मोफत. सकाळ पासुन चाललेल्या छान पाहुणचाराचा असा शेवट कोणिच कल्पिला नव्हता.

मग ऒपचारिक गोष्टी पार पाडुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
माझी, शान्तिश व संजीव च्या पेलियो


हा सर्व कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या आयोजित केल्याबद्दल प्रथम टिम फियाट ईंडिया व फियाट ईंडियाचे अतिशय आभार. अशा प्रकारे आपल्या ग्राहकांना मान व अतिशय उत्तम सेवा देणारी फियाट ईंडिया ही भारतातली ऒटोमोबाईल क्षेत्रातली   नक्कीच एकमेव कंपनी असावी.
हर्षद

0 comments:

Post a Comment