Sunday, December 5, 2010

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२

सदर्न स्पाइस

मागच्या वेळी सदर्न स्पाईस मधील जेवणा बद्दल बोललो होतो, तर आज नाष्ट्याविषयी.
येथे इतर उडुपी हॊटेल प्रमाणे मुख्यत: दक्षिण भारतीय पदार्थच मिळतात, पण त्यात ही वेगळेपणा आहे. इथे विशेष आहे ते चटण्यांचं. वेगवेगळ्या आणि मुबलक. उडिदाची चटणी तर वेगळी वाढतच नाहीत, एका वाडग्यात भरुन टेबलवर ठेवलेली असते,घ्या हवी तेवढी. अजुन एक खास पदार्थ म्हणजे लाल तिखट किंवा मसाला न घालता केलेलं सांबार. याच्या पिवळ्या रंगावर जाउ नका, चव घेउन पहा. ही खास चव बहुधा फक्त हळद, हिंग, कडिपाला आणि मोहरी /मेथि दाणे एवढयाचीच असते.

बाकी इडली,मेदुवडे,डोसे असतातच, पण त्या बरोबरच बॊम्बे उत्तप्पा हा प्रकार थोडासा पिझ्झाच्या जवळ जाणारा असतो. मस्त कांदा उत्तप्पा खरपुस भाजलेला,त्यावर लावलेली दाळ्य़ांची चटणी व बटाट्याची भाजी. हे सगळे लावुन त्यावर भरपुर लोणि लावुन हा उत्तप्पा दोन्हि बाजुनी पुन्हा खरपुस भाजला जातो आणि मग तुमच्या समोर येतो तो सांबार व चटणी सोबत. पण या उत्तप्प्याचीच चव एवढी सुंदर असते की त्या बरोबर काहि नसेल तरी चालेल.

साधा उत्तप्पा किंवा डोसा घेतला तर आल्याची चटणी जरुर मागुन घ्या, या झणझणीत चटणी बरोबर शिळा ब्रेड पण छान लागेल इतकी ही चटणी चांगली असते. अजुन एक खास बात म्हणजे की, दक्षिण भारतीय स्वयंपाकाच्या पद्धती प्रमाणे प्रत्येक पदार्थावर बाहेरुन घातलेली फोडणी, ती पण उड्दाच्या दाळिची. ह्या फोडणीत केलेलं उप्पीट, ज्याला इकडे उपमा म्हणतात व बटाट्याची भाजी ह्या पण चवीला पुण्यातील इतर तथाकथित उडुपी हॊटेल पेक्षा कितितरी छान लागतात.

रविवारी थोडंसं निवांतच उठावं, आवरुन इथं यावं आणि भरपुर नाष्टा करुन सरळ अलका किंवा मंगलाला जाउन एक पिक्चर पाहावा किंवा बाल्गंधर्व नाहीतर यशवंतराव चव्हाणला एखादं नाटक पहावं आणि पुन्हा दुपारी इथेच जेवायला यावं हा कार्यक्रम दोन महिन्यांत एकदा तरी होतोच.

तर मग मंडळी केंव्हा जातांय वॆशाली व रुपाली सोडुन एकदा वेगळं पण खरंखुरं साउथ इंडियन खायला.

हर्षद.

4 comments:

Anonymous said...

can you please let me know the address of this hotel?i am new to Pune so a detailed address would be appreciated.
Thanks in advance.

harshad said...

hi anonymous, while coming from deccan on karve road you have to take the last left turn before NalStop chowk. At the start of the lane there is another hotel named anand veg. this lane goes to back gate of Sharda Center, which has the office of Tech - Mahindra (this is the major landmark). Once in the lane you can see a small gate of a compound,where you can see tables, ask for andhra mess there. This is the place, ask for Mr.Prasad, who is the owner.

When you come back please post your comment, so that it helps others too.
Harshad.

Vinoba said...

वा! खाण्याईतकेच लिहीणे पण छान आहे!आपण जाउया एकदा.

harshad said...

kashi yete aahes ye ravivari lagech jauya

Post a Comment