Thursday, October 28, 2010

आत्महत्या

आत्महत्या ----

का करावी वाटते आत्महत्या, आणि ते सुद्धा वयाच्या २० -२२व्या वर्षी. 

जमलेले सगळे झालेल्या घटनेला अतर्क्य, अकल्पित वगॆरे म्हणत होते, पण आदर्शला का वाटलं असेल 

या मार्गानं जावं असं, असतील काही समस्या, प्रश्न आणि जटिल पण असतिल तरी हे पाउल घेण्याआधी सगळे इतर मार्ग संपल्याची खात्री केली होती त्यानं ? 

कोणि नसेल का भेटला त्याला जसा पार्थाला भगवान भेटला, आता मान्य कि पार्थ आत्महत्या करायला चालला नव्हता , पण एका क्षत्रियानं युद्ध नाकारणं म्हणजे आत्महत्याच होती की एका प्रकारे.त्याला आमक्लेश झाला होता किंवा होत होता,पण भदवदगीता ऎकुन त्याचा आत्मक्लेश दुर झाला.पण या मझ्या मित्राच्या बाबतीत असं म्हणणं बरोबर ठरेल का  कि त्याचा आत्मक्लेशच त्याच्या आत्महत्येला कारणीभुत ठरला.

दारु सिगारेट वगॆरे होतं पण व्यसन होईल इतकं नाही, एक दोन प्रेम प्रकरणं सुद्धा होऊन गेली आहेत. 

मी आता विचार करतो आहे, मी त्याच्या क्रुष्ण व्हायला हवं होतं का ? मी होऊ शकलो असतो का क्रुष्ण,सांगु शकलो असतो त्याला आमच्या दोघांच्या आयुष्यापुरती गीता ? करु शकलो असतो का त्याचा आत्मक्लेश दुर ज्यामुळे त्याने अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला नसता ?

असे बरेच प्रश्न आता पडत आहेत माझ्या मनाला पण मेंदु म्हणतो अरे वेड्या जर असं समजलं असं की त्याच्या दुखाचं कारणच तु आहेस तर, तर काय केलं असतंस? त्याची माहिती असलेली प्रेम प्रकरणं ठिक आहे पण असं समजलं असतं की तो कस्तुरी वरच प्रेम करतो आहे तर, मग तुझ्यातल्या क्रुष्णानं काय केलं असतं? उगाच नसतं विचार करु नकोस. काल पर्यंत तो होता आणि आता नाही हेच एकमेव आणि अंतिम सत्य आहे आणि तुला ही हेच ..........

क्रमश...

1 comments:

Vinoba said...

आत्महत्या ... कुणाचीही फार दुखावून जाते.त्यातुन ती व्यक्ती आपल्याशी संबंधित असल्यास हे सगळे विसरु म्हणता विसरता येत नाही आणि कारणांचा वांझोटा शोध घेण्याची तडफड चालु राहाते.

Post a Comment