Wednesday, September 21, 2011

ट्रेक टु नाणेघाट छे, ब्रेक टु नेचर


' येथे शुद्ध कॉटनच्या अंडरवेअर मिळतील, इलॅस्टिक आणि नाडीवाल्या'
रविवारी सकाळी, फुगेवाडीच्या अशोका चहावाल्याकडे चहा पिताना वाचलेली ही जाहिरात आजची ट्रिप परचन्ड आनंददायी होणार याची खात्री देणारं होतं, मालोजीराव (हे नाव नविन सभासदाला प्रोतसाहन देण्यासाठी आधी घेत आहे, याची नोंद घेणेत यावी), धनाजीराव( झगे आणि पराठेवाले), वपाडाव(भावी जयपाल), अन्या दातार(अजुन तरी आवसे-पुनवे बद्दल भिती न घालणार आयाय्टिय्न) आणि मी, बरोबर ठरलेल्या वेळेच्या २५ मिनिटं नंतर या स्पॉटला होतो. थोडं पुढं जाउन एक कच्कन टर्न मारला आणि पिएम्टिच्या जागेत गाड्या लावल्या, पुन्हा एकदा अशोका मधाला चहा पिण्याचं आमंत्रण टाळून वल्ली (द डायरेकटर) आणि सासुसौरभ ( माहिति अधिकारी) यांना घेउन निघालो, वाटेन चाकण मधुन किसन (ह्यांना नावं देणं शक्य नाही, लै वरपर्यंत वळखी आहेत ह्यांच्या) यांना घेणं आम्ही विसरलो, पण प्लॅन बी नुसार धनाजीरावांनी उचललं आणि थेट सायबर कॅफेत आलो,
छे छे रिटर्न नाय मारला मंचरवरुन सदाशिवपेठेत, हा सायबर कॅफे मंचर मधला, अजुन एक मिपासदस्य सायबर कॅफे मालक असल्याचा अभिमान वाटला , हे श्री. विनोद बाणखेले आणि त्यांच्या सायबर कॅफे,
आपल्याकडे सायबर कॅफेत मित्र आल्यावर खाउ पिउ घालायची प्रंप्रा आहे, त्यानुसार विनोद आम्हाला हाटेल विसावा मध्ये मिसळपाव खायला घेउन गेला,
कुठल्यातरी वड्या ह्या अजुन एक ट्रेडमार्क होत आहेत कट्ट्याच्या याची नोंद घेण्यात यावी.
या आदरातिथ्याबद्दल श्री. विनोद यांचे अतिशय आभार आणि मिसळ, बटाटेवडे आणि चहा, सगळंच लई भारी होतं. मनापासुन धन्यवाद.
तिथुन पुढं निघालो, नारायणगावातुन लेफ्ट मारुन जुन्नर मार्गे थेट कुकडेश्वराच्या देवळात आलो, या प्रवासातले अन तिथले काही फोटो, माहितीसाठी श्री. वल्लींना संपर्क करावा,
चावंड किल्ला
हे कुकडेश्वराचं मंदिर, पुरातत्व खात्यानं सरकारी पद्धतीनं जमेल तेवढी वाट लावलेली आहे,
श्री कुकडेश्वर
गाभा-यातली ज्योत श्रद्धा समर्पण सगळं शिकवुन जात होती.
देउळ अन मागचा डोंगर यांना घेउन ट्रिक फोटोग्राफि करायचा एक प्रयत्न.
हे बाहेरचे दोन वेताळ, यांना बघुन एखाद्या आयडिची आठवणं आल्यास आम्ही जबाबदार नाही
बाजुनं वाहणा-या पाण्यात उतरुन काढलेले काही फोटो
तिथुन पुढं निघालो, नाणेघाटाच्या दिशेनं, रस्ता प्रचंड खराब, तरीही व्यवस्थित नाणेघाटापर्यंत पोहोचलो.
हे नाणेघाटाच्या बाजुचे जुन्या इमारतींचे अवशेष आणि खाली आहे तो प्रसिद्ध जकात गोळा करण्याचा रांजण
ही घाटाची सुरुवात अन घाटातल्या गुहांचे काही फोटो
या गुहांमधल्या ब्राम्ही लिपितल्या शिलालेखांबद्दल जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे, वल्ली लिहिणार आहे आणि मला ब्राम्ही मध्ये प्रगाढ अज्ञान आहे, त्यामुळं जास्त लिहित नाहि.
नाणेघाटातुन दिसणारं तळकोकण,
घाटातुन वर येउन, बाजुच्या नागफणीवर किंवा नानाच्या अंगठ्यावर जाउन आले, म्हणजे मी , सासुसौ व मालोजी गेलो नव्हतो, काय आहे, बिस्किटं, बाकरवड्या आणि किसनच्या बहिणीनं दिलेला डब्यातला खाउ खाउन पुन्हा कष्ट करायची माझी तरी अजिबात तयारी नव्हती.
मग वल्ली आणि धनाजीनं नागफणीवरुन काढलेले अन आम्ही खाली बसुन काढलेले फोटो
हा किसनचा खास किसन स्टैलचा फोटो, (संदर्भ, स्पावड्याचा सज्जनगड धागा / किसनची खव)
हा आकाशात घुसत जाणारा नानाचा अंगठा - हॅट्स ऑफ टु वल्ली फोटोसाठी.
आता पहिला भाग इथंच थांबवतो, पण पुढ्च्या भागाचे दोन टिझर टाकुन अन पेश्शल टु गणेशा आणि आत्म्शुन्य, वुई मिस यु अ लॉट आणि बॅड्ली.
वरच्या फोटोचे प्रताधिकार व वापर हक्क विशिष्ट आय्डिंकडे सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत याची नोंद घेण्यात यावी.
विसु - फोटो लई झालेत अन बघाया खुप वेळ लागेल म्हणुन रिपोर्ट दोन भागात टाकणार आहे, पुढच्या भागात लिहिण्यासारखं फारसं काही नाही, पण फोटोस विल स्पिक..


Print Page

3 comments:

प्रशांत दा.रेडकर said...

छान लिहिले आहे
पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा!
माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

ईन्टरफेल said...

छान फ़ोटो आहेत !
आपल्याला न विचारता आपला ब्लॊग
माझ्या ब्लॊगवर टाकला आहे माफ़ी आसावि

harshad said...

@ इंटरफेल, अरे माफि कशाची त्यात, खरं तर मीच आभार मानायला हवेत. आधीच्या लिखाणाबद्दल पण प्रतिसाद दिलेत तर बरे वाटेल.

@ प्रशांत रेडकर, धन्यवाद, मला कवितांमधलं फार काहि उमजत नाही, पण तुझा ब्लॉग पाहिला मस्त आहे, बायकोला दाखवला तिला ह्यात समजतं. ती प्रतिसाद देईलच तिथं.

Post a Comment