Tuesday, February 1, 2011

गड्डा यात्रे काठ्या

Print Page


गेल्या आठवड्यांत गड्डा यात्रेवर एक लेख टाकला होता,  त्या लेखात काठ्या व लग्न यांचे उल्लेख व जालावरुन घेतलेले फोटो होतेच, पण गेल्या शनिवारी माझे सहकारी व मित्र श्री. काशिनाथ स्वामी यांच्याकडुन या वर्षीच्या काठ्याचे फोटो टाकत आहे. हे फोटो इथे प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल श्री. काशिनाथ स्वामी यांचे अतिशय आभार. 


या काठ्या हया म्हणजे बांबु असतात ज्यांना लवचिक व मजबुत करण्यासाठी वर्षभर तेल पाजलेले असते व गड्ड्याच्या दिवशी त्यांना सजवुन त्यांची मिरवणुक काढली जाते.
ह्या फोटोत श्री. काशिनाथ स्वामी हे पारंपारिक बाराबंदी घातलेले दिसत आहेत. त्यांनी बाराबंदीच्या वर कमरेला एक सुती दोराने विणलेला पट्टा बांधला आहे, या पट्ट्याच्या पुढे आलेल्या टोकात या काठ्यांचे टोक ठेवुन ती काठी अलगद दोन्ही हाताने सावरत हे काठीवाहक चालतात.काठ्यांचे टोक हे बहुधा पितळी असुन ते उलट्या शंकुच्या आकाराचे असते.

हा श्री. सिद्धेरामेश्वरांचा पालखितला मुखवटा.

आणि ही पालखी.

या फोटोत काठ्यांच्या उंचीची कल्पना येईल. या काठ्यांना पुर्ण लोकरी घोंगड्यांनी लपेटुन त्यावर सोन्याची किंवा चांदिची कडी घातलेली असतात. एका दिवशी या वर खोब-याच्या वाट्यांचे हार घातलेले असतात, तसेच लग्नाच्या दिवशि बाशिंगे पण बांधतात.

या एकुणं सात काठ्या व एक नंदिधव्ज अशी पुर्ण मिरवणुक असते.

हल्ली या काठ्यांच्या संपुर्ण मार्गावर अशा अत्यंत सुंदर रांगोळ्या काढलेल्या असतात.

हे स्वामी
 हा देवळाच्या आवारात चाललेला विडे लावण्याचा कार्यक्रम.
शेवटी पुन्हा एकदा काठ्या देवळात आल्यावर.
तर या अशा वॅशिष्ट्य पुर्ण गड्डा यात्रेत पुढच्या वर्षी आपणां सर्वांचे सहर्ष स्वागत आणि पुढच्या वर्षी काठ्यांच्या लग्नाला व गड्डा यात्रेला जरुर येण्याचे स्नेहपुर्ण आमंत्रण.
हर्षद.

2 comments:

sharayu said...

गड्डा यात्रेची परंपरा किती जुनी आहे, आणि काठ्या नाचविण्याची पद्धत कशी रूढ झाली या प्रश्र्नांची उत्तरे मनोरंजक ठरतील

harshad said...

http://misalpav.com/node/16579 आणि http://misalpav.com/node/16457 येथे जास्त माहिति मि़ळेल, आणि प्रतिसादाकरिता अतिशय धन्यवाद. भेटत राहु,

हर्षद.

Post a Comment