हो ह्या वर्षी म्ह़णजे गेल्या कित्येक दशकांत थंडी पडली नसल्यासारखी जाहिरात चालली आहे, या वर्षी पुण्यात थंडी पडल्याची. आज संध्याका़ळी स्टार माझा या चॅनेलवर बातम्यामध्ये या संदर्भात एक बातमी पाहिली.
पुणे येथील सारसबाग तेथे असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीला गेल्या दहा वर्षांपासुन थंडिच्या मोसमात, चक्क लोकरीचे स्वेटर व टोपी घालतात म्हणे. एक दोन नाही तर चांगले आठ दहा सेट आहेत तेथे. तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.
यामुळे देव व माणुस या मधलं अंतरच मिटुन जातं आहे असं वाटतं, माणसानं जरुर प्रयत्न करावा देव व्हायचा आणि व्हावं देखिल त्याला ना नाही, पण देवाला असं सामान्य माणसाच्या पातळीला आणुन बसवावं याचं वाईट वाटतं.
हा प्रकार पण अंधश्रद्धेचाच किंवा अतिश्रद्धेचा प्रकार वाटतो मला.
0 comments:
Post a Comment